भूषणची अशी अवस्था पाहून बाबा विचारात पडले आणि त्याला सांभाळत शांतपणे बोलू लागले, 'स्नेहाचा साखरपुडा होता बरोबर आहे पण तिच्या मनाची स्थिती कशी आहे, तिला खरोखरच हे लग्न मान्य आहे का? ती मनापासून या नात्यासाठी तयार आहे का? तू कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहेस का?
असे हताश होऊन बसण्यापेक्षा परिस्थितीशी सामना कर, तुला मान्य आहे ना कि तुझी चूक झाली आहे ती तुलाच सुधारावी लागेल, जर तिला हे लग्न मनापासून मान्य असेल तर तुला हि सर्वकाही विसरून आयुष्यात पुढे गेले पाहिजे आणि जर हे लग्न तिला मनापासून मान्य नसेल आणि तिचे अजूनही तुझ्यावर तितकेच प्रेम असेल तर तुला तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी तुला प्रयत्न करावे लागतील, आणि मला माहित आहे तू कधीच अविचाराने निर्णय घेणार नाहीस तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर, चला आता या जेवायला तुझी आई वाट बघत असेल, एवढे बोलून बाबा निघून गेले.
हे ऐकून भूषण आता कुठे शांत झाला. त्याच्या मनामध्ये उठलेले वादळ शांत झाल्यासारखे वाटू लागले आणि आशेचा एक किरण त्याला दिसू लागला. आता त्याने मनाशी निश्चय केला काहीही झाले तरी आपण प्रयत्न करायचा, आणि मनाशीच काहीतरी ठरवून तो बाहेर आला आणि सगळ्यांसोबत आनंदाने जेवायला बसला. त्याला तसे पाहून सर्वानाच हायसे वाटले.
इकडे स्नेहासुद्धा आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती, तिचे कशातच लक्ष्य लागत नव्हते सतत भूषणचा चेहरा डोळयांसमोर येत होता, तीचे मन एकदम सैरभैर झाले होते, तिला काहीच समजत नव्हते कि नक्की आपले आयुष्य कोणत्या दिशेला चालले आहे. मी माझ्या मनाला समजावले होते मग तू परत का आलास भूषण, मी नाही माघार घेऊ शकत, मला हे लग्न करावेच लागेल. मी तुला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन असे ती मनातच ठरवले आणि परत अश्रुना वाट मोकळी करून दिली.
स्नेहा आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी, ती लहानपणापासून खूप लाडात वाढली होती, तिच्या आई बाबांनी तिला कशाची बंधने घातली नाहीत, तिचे सगळे हट्ट पुरविले होते, त्यांना आपल्या मुलीवर खूप विश्वास होता, म्हणूनच तिने स्वतः पुढाकार घेऊन भूषणला प्रेमाची कबुली दिली होती पण त्याचे उत्तर न मिळाल्याने तिने स्वतःला समजावले होते आणि जेंव्हा आईबाबांनी विवेक बद्दल लग्नासाठी विचारले तेंव्हा ती त्यांना नाही म्हणू शकली नाही कारण विवेक हा त्यांच्या आत्याचा मुलगा आणि ते आधीपासून त्याला जवळून ओळखत होते.
पण दुसऱ्याच दिवशी विवेकाला तीने भूषण आणि तिच्याबद्दल सर्वकाही सांगितले, त्याला आधी ऐकून शॉक बसला पण तिच्या या खरेपणामुळे तिचा तो आदर करू लागला, पण विवेकचा पण एक भूतकाळ होता जो त्याने तिला सांगितला, त्याचे एका मुलीवर प्रेम आहे पण ती दुसऱ्या जातीमधील आहे म्हणून घरी आमचे प्रेम मान्य नाही आणि त्यातच आपल्या लग्नाची बोलणी सुरु केली आणि सगळे संभाळून घेण्याचा मला वेळच मिळाला नाही. स्नेहा म्हणाली मी समजावून सांगू का आत्याला म्हणजे तुझे प्रेम तर तुला मिळेल, तर विवेक म्हणाला आता नाही ऐकणार ते आणि त्यांच्या मर्जीशिवाय मला माझे प्रेम मिळवायचे नाही. लगेच विवेक बोलला, म्हणजे आपण सम दुखी आहोत, मी भूषणसोबत बोलून पाहू का?
स्नेहा बोलली, आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री आहे, मीच त्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढला म्हणून मला भूषणकडून कोणतेच उत्तर नको आहे. आता स्नेहाने स्वतःला खंबीर केले होते पण तिला विवेकसाठी वाईट वाटत होते त्याला ही त्याच्या प्रेमाला मुकावे लागत होते.
भूषणने आपल्या प्रेमाची कबुली द्यायला उशीर केला त्यामुळे तिघांच्या आयुष्यात गुंतागुंत वाढली होती आता यांचे आयुष्य कोणते वळण घेते ते पुढच्या भागात पाहू.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा