प्रेमासाठी सर्वकाही मंजूर - भाग 2

Bhushan was a very smart, understanding and respectful person, he never hurt anyone, he handled every situation very sensibly and everyone liked him very much. He didn't know how to be angry, so he was a favorite of all the professors and friends whe

भूषण हा एकदम हुशार, समजदार आणि सर्वाना अगदी आदर देऊन वागणारा होता, तो कधीच कोणाला दुखवत नसे तो प्रत्येक परिस्थिती अगदी समंजसपणे हाताळायचा यामुळे सर्वाना तो खूप आवडायचा. रागावणे हा प्रकारच माहित त्याला नव्हता त्यामुळे जेंव्हा तो कॉलेजमध्ये होता त्यावेळी सगळ्या प्रोफेसर आणि मित्रांचा तो आवडता होता, पण स्नेहा हुशार होती पण स्वभावाने अगदी त्याच्या उलट होती, समजदारी थोडी कमी होती, आणि जबाबदारीची अजून जाणीवसुद्धा झाली नव्हती, एकदम अल्लड, बिनधास्त होती.           

इकडे भूषण घरी आला, सरळ त्याच्या रूममध्ये गेला आणि दार लावून घेतले आणि अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भूषणाच्या घरी त्याचे आई, बाबा  आणि त्याची बहीण जी त्याच्यापेक्षा 2 वर्षाने लहान होती, त्यांच्या बाबांचा मोठा व्यवसाय होता. भूषण MBA चे शिक्षण  पूर्ण झाल्यावर त्यांच्या बाबांना मदत करू लागला आणि रोज कंपनीत जाऊ लागला. भूषण आधीपासूनच कर्तबगार, समजदार आणि जबाबदारीची जाणीव असणारा असे त्याचे व्यक्तिमत्व होते, पण हल्ली तो थोडा डिस्टर्ब होता हे त्यांच्या बाबांनी ओळखले होते.

आज संध्याकाळी जेंव्हा ते घरी आले त्यांनी भूषणाची चौकशी केली तर आईने सांगितले कि, दुपारपासून तो रूममध्ये आहे, बाहेर आला नाही, जेवलासुद्धा नाही, तो कधीच असे वागत नाही पण काही कळायला मार्गच नाही. तर बाबा म्हणाले, मी बोलतो त्याच्याशी तुम्ही जेवण गरम करा आम्ही आलोच त्याला घेऊन. बाबांनी त्याच्या रूमवर नॉक केले पण काहीच उत्तर आले नाही मग बाबांनी हाक मारली तसा  भूषणाने दरवाजा उघडला आणि काहीतरी काम करत असल्याचे भासवण्याचा फाईल उघडून बसला. बाबा त्याच्या बाजूला बसले आणि फक्त निरीक्षण करू लागले, भूषण नजर वर न करतच शक्य तितक्या सामान्यपणे  बाबांना म्हणाला, काही काम होतं का बाबा?

थोडा वेळ तसाच शांततेत गेला आणि नंतर बाबा म्हणाले, तू प्रेमात पडला आहेस? कोण आहे ती मुलगी?

भूषण अगदी आश्चर्याने बाबांकडे पहिले आणि म्हणाला, तुम्हाला कसे कळले?

तसे बाबांनी एकदम फिल्मी स्टाईलने म्हटले कि, " में तुम्हारा बाप हूं, जाब बेटे को प्यार होतं है तो बाप को समजमे आ जाता है" (आशिकी 2 मधील डायलॉग), आणि  प्रेमाने त्याच्या डोक्यामधून हात फिरवत त्याला विचारले कि नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, तू प्रत्येक परिस्थिती सहजपणे, योग्यरीत्या हाताळणारा मुलगा इतका कसा काय खचला, नक्की काय झाले मला सांग, तू सांग मी आता तिच्या घरी जातो आणि सरळ तुझ्यासाठी मागणी घालतो.

भूषणने सांगायला सुरुवात केली, तिचे नाव स्नेहा आहे आणि आपल्या घरी आली होती खूप वर्षाआधी कॉलेजमध्ये असताना, माझ्या बर्थडे पार्टीला, तुम्ही तिला पहिले आहे, आम्ही एकत्रच होतो कॉलेजमधे एकदम खास मैत्री होती आमच्यामध्ये आणि आम्हीसुद्धा मैत्रीपलीकडे कधी विचारच केला नाही पण जसे कॉलेज संपले तशी आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचं मन सांगत होतं कि हे प्रेम आहे पण मेंदू सांगत होतं कि प्रेम हे आपल्या तत्वात बसत नाही, स्नेहा एकदम बिन्दास्त त्यामुळे तिनेच एकदा पुढाकार घेतला आणि याबद्दल बोलली पण त्यावेळी मला काय झालेला काय माहित तिला उत्तर न देताच मी माघारी परतलो, मला ही परिस्थिती सांभाळता येत नव्हती, मला तर सुचतच नव्हते कि माझ्या मनात काय आहे. एरवी मी एकदम समंजसपणे वागणारा पण यावेळी खरा सामंजसपणा स्नेहाने दाखवला, बिचारी माझ्या अशा वागण्याला नकार समजून माझ्या आयुष्यातून अलगद बाजूला झाली,मी काल माझ्या प्रेमाची कबुली दिली पण खूप उशीर झाला बाबा... हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडू लागले.

मी खूप उशीर केला बाबा मी खूप उशीर केला तो रडत रडत बाबांना बिलगला आणि बोलू लागला आता ती बोलली कि तुला हे समजायला पूर्ण महिना लागला आता माझा साखरपुडा ठरला आहे आणि मी माझ्या कुटुंबाला दुःख नाही देऊ शकत, आणि आज तिचा साखरपुडा होता बाबा, मी खूप उशीर केला.  

हे ऐकून बाबा एकदम स्तब्ध झाले शांतपणे त्याला सावरू लागले.

भूषण आणि स्नेहाची प्रेमकथा कोणते वळण घेईल, स्नेहा भूषणकडे परत येईल कि नाही ते पुढे पाहू 

धन्यवाद     

🎭 Series Post

View all