प्रेमासाठी सर्वकाही मंजूर - भाग 1

Everyone was in a hurry in the spacious hall, the big responsible men were busy with the assigned work, the little ones were scurrying around because today was Sneha and Vivek's sugarplum. but Sneha was looking out of the window with a blank stare, u

प्रशस्त हॉलमध्ये सर्वांची लगबग सुरु होती, मोठी जबाबदार माणसे नेमून दिलेली कामं करण्यात व्यस्त होती, लहान मुले इकडे तिकडे बागडत होती कारण आज स्नेहा आणि विवेकचा साखरपुडा होता, सगळे तयारी करत होते. पण स्नेहा एका शून्यात नजर लावून खिडकीतून दूरवर पाहत होती. तिला मनाची परिस्थिती समजत नव्हती. काय आहे जे आपल्याकडून सुटत चालले आहे ते समजत नव्हते एक मन सांगत होते कि, आपले आयुष्य हे घरच्यांसाठी समर्पित आहे तर दुसरे मन सांगत होते कि आपले प्रेम हा आपला हक्क आहे, पण आपण स्वार्थी नाही बानू शकत असे द्वंद्व सुरु होते.

अगं स्नेहा आवरलं का? असे म्हणत तिची मैत्रीण रिया आत आली. स्नेहाने लगेच अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर हलके स्मित आणले, जशी समारंभाची तयारी पूर्ण झाली तशी स्नेहाला साखरपुड्यासाठी बाहेर बोलावण्यात आले, एरवी दिसायला एकदम साधारण,पण बोलके डोळे, ओठावर स्मित हसू यामुळे ती खूप सुंदर दिसत असे, आणि आज हिरवी साडी, नाजूक दागिने, हलका मेकअप, साजेशी हेअरस्टाईल त्यामध्ये ती खूप सुंदर भासत होती. त्याक्षणी दूरवरून कुणाचीतरी नजर तिच्यावर खिळली होती, त्याला समजत नव्हते कि आपण खरंच का आलो आहे, स्नेहाची नजर पण हॉलवर फिरत होती, तिची नजर कुणाला तरी शोधात होती, तसा तो दिसला. तो म्हणजे भूषण, स्नेहाचा जीवष्ठ कंठस्थ मित्र, कॉलेज मध्ये 6 वर्षे एकत्र होते. त्याच्यामध्ये फक्त निखळ मैत्री होती पण जसे कॉलेजचे शिक्षण संपले त्यांना प्रेमाची जाणीव झाली, पण आता तिने ते विसरायचे ठरविले होते. तिच्या नजरेतून अश्रू बाहेर पडत होते, विवेकला हे समजले तसा तो पुढे झाला आणि तिचा हात पकडून हळू हळू स्टेजवर आला आणि हळूच म्हणाला, आज काय सगळ्यांना घायाळ करायचा इरादा आहे काय? इतकं कोण सुंदर दिसतं, आता मला कोण बघणार? माझी तयारी फुकट गेली ना.. आणि स्वतःच हसायला लागला मग तिने लगेच चेहऱ्यावर उसने हसू आणले आणि स्वतःला सावरले.   

इकडे भूषणाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले,  जसा वेळ पुढे सरकत होता तसे आपण काहीतरी गमावत आहोत याची जाणीव तीव्र होत होती  जसे त्याला असह्य झाले तो तडक निघून गेला, इकडे साखरपुडा कार्यक्रम सुरु झाला विवेकने तिला अंगठी घातली  आणि जेव्हा तिला अंगठी घालण्यासाठी सांगितले तसे ती परत हॉलवर नजर फिरवू लागली पण भूषण कुठेच दिसतं नव्हता, काकीने तिला आवाज दिला तशी ती भानावर अली, तिला अश्रू अनावर होत होते पण तिने स्वतःला सावरत विवेकाला अंगठी घातली आणि साखरपुडा संपन्न झाला आली  

आता पुढे पाहू कि भूषण आणि स्नेहा यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले आणि आता यांचे आयुष्य कोणते वळण घेते.

धन्यवाद     

🎭 Series Post

View all