Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

स्री ला समजून घेणं खरंच कठीण असत का हो

Read Later
स्री ला समजून घेणं खरंच कठीण असत का हो

इरा राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
विषय_"स्री ला समजून घेणं खरंच कठीण असत का हो.."
कथेचं नाव_"अबोली"

कडाक्याचं उन्ह डोक्यावर घेऊन शिला उपाशीपोटी शिवारात काम करत होती.मनात असंख्य प्रश्न गुजण घालत होते.आज गेली दोन वर्ष ती शिवारात राबत होती भावाच्या घरी एखाद्या नोकरासारखी तिची स्थीती होती कष्ट करत होती तिच्या पोटासाठी नव्हे भावजयीची झोळी भरण्यासाठी..!

मध्यांन झालं तसे सगळी कामं करणारी गडी माणसे आपापले डब्बे घेऊन जेवायला बसली.पण शीला मात्र दुसरीकडे एका झाडाच्या सावलीत बसून विचाराच्या धुंदीत हरवलेली.तिच्याकडे बघून एका वयस्कर बाईने तिला हाक दिली.

"ये की बाय जेऊस अस बसून पोट भरणार हाय व्हय"

"नको शांता मावशी भूक नाही मला तुम्ही जेवून घ्या"

"अग दोन तुकडा खाऊन घे अजुन लई टाईम हाय घरला जायला"

"खरंच मावशी भूक नाही मला"

"थांब मीच एती तू तशी न्हाई ऐकायची"

शांता मावशी शीलाजवळ जाऊन तिला उठवू लागल्या तिची पिशवी हातात घेतल्यावर त्यांच्या ध्यानात आलं की तिचा डब्बा तिच्या पिशवीत नाही आहे.

"शिले तुझा डब्बा न्हाई पिशवीत डब्बा न्हाई दिलं तुझ्या भावजयीने"

"माहित न्हाई मावशी वहिनी येताना बोलली होती डब्बा ठेवला पिशवीत पण इथं आल्यावर पिशवीत काहीच नव्हतं ग"

"त्या भवानीला चारचौघात हानुस पाजे..तिला काय कळणार गड्या माणसाच काम "

"असुदे मावशी तू जा खाऊन घे एवढ्यात टाईम संपेल जेवणाचा मी बसते तोवर इथंच.."

"येडी की काय ग बाय तू अग शिवारात दिवसभर राबतो समधी पोटात अन्न गेल्या बिगर न्हाई ग ताकत इत पोरी रोज रोज जर तू अशी उपाशीपोटी राबालीस तर कशी जगशील पोरी."

"खरं सांगू मावशी ज्या दिवशी मी लग्न केलं त्याचं दिवशी माझ्यासाठी जीवनमरण एक झालं "

"अगो बाय नग ग रडुस किती माणसानं रडायचं नशिबात असेल ते हिमतीनं जगायचं चल माझ्यातली वायची ठेचा भाकर खाऊन घे "

"अग मावशी नको ग खरंच…"

शीलाचे काही न ऐकता शांता मावशी सगळ्या गडी माणसाच्या जवळ तिला घेऊन ही गेली. शिलाचा डब्बा नाही म्हणून साऱ्यांनी तिला आपल्यातली थोडी थोडी भाकरी खाऊ घातली.आणि त्यांचं साऱ्याच प्रेम पाहून शीलाचे डोळे भरून आले कुठे ती रक्ताची नाती आणि कुठे ही जीवाला जीव लावणारी परकी माणसे. घरातली सगळी कामे आवरून शिवारात राबणाऱ्या तिच्या पोटाला पोटभर अन्न भावाच्या घरात मिळत नव्हते हे शीलाच दुर्दैव.!

चार वर्षापूर्वी शिलाचे बाबा अटॅकमुळे निघून गेले पंधरावीच्या शेवटच्या वर्षाला असणारी शीला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तीळ तीळ तुटली होती.बाबा गेल्यानंतर तिच्या वहिनीने तिच्यासाठी एक स्थळ आणले होते.जेमतेम सातवी शिकलेल्या आणि चहाची टपरी चालवणाऱ्या मुलाचं ते स्थळ होत.शीला उच्चशिक्षित होती आणि सुंदर ही पणं घरी तीच ओझं नको म्हणून तिच्या वहिनीने तिच्या भावाची समजूत काढून शिलाच लग्न त्या मुलाशी लावून दिलं.लग्न शिलाला कधीच मान्य नव्हत तिला नोकरी करायची होती स्वतच्या पायावर उभं राहायचं होत.तिच्या वडिलांचं ती शिक्षक व्हावी हे स्वप्न होत.त्यामुळे शीलाला देखील शिक्षक होऊन नोकरी लागल्यावर लग्न करायचं होत.येवढ्या लवकर लग्न होईल हे तिच्या ध्यानीमनी देखील नव्हत.

संतोष सोबत तीच लग्न झालं .संतोष दिसायला थोडा बरा होता पणं पुढची काहीच माहिती शीलाला
नसल्याने तिची धाकधूक वाढलेली लग्न तर झालं होत पणं पुढे काय होईल ही तिला काळजी लागलेली.नशिबात योगायोग असे जुळतात की विचार करायलाही वेळ मिळत नाही अशीच काहीशी परिस्थिती शीलाच्या बाबतीत घडली होती.

भावाची भेट घेऊन शीला संतोष सोबत सासरी आली.घर म्हणजे काय एका पत्र्याच शेड होत ते दरवाजा खोलून संतोष आत गेला तरीही शीला तशीच बाहेर उभी होती. कारण लग्न झाल्यावर प्रत्येक नवरीचा गृहप्रवेश होतो तसा तिचा ही होईल ही भाबडी अपेक्षा ती करून तिथच उभी राहिली होती. संतोष आत जाताच कपड्यात लपवलेली दारूची बाटली तोंडाला लावून आपली नवी बायको आत यायची वाट पाहत होता.अर्धा तास निघून गेला तरीही ती आली नाही म्हणून तो बाहेर आला.तर संतोष माप घेऊन येईल या आशेने ताटकळत उभी राहिलेली ती संतोषच्या आवाजाने भानावर आली.

"काय ग ए,, भवाने आत यायच नाही ?"

"ते,,,ते" त्याच्या त्या नशेली नजरेने आणि मोठ्या आवाजाने घाबरलेली शीला कचरत बोलली.

"ते ,,ते काय म्हणायचं आहे तुलाही बघ आपलं घर महालात राहायची स्वप्न पहिली असणार तू हे एक स्वप्नातले महल…चल आत****संतोषने रागाने एक शिवी हासडली.
शीलाचा कंठ दाटून आला पाहिलेलं साधं स्वप्न पणं पुरे झाले नव्हत तिचं निदान लग्नाच्या पहिल्या दिवशी या त्याच्या अशा वागण्याने तिच्या काळजावर जणू त्याच्या घाणेरड्या शब्धानी वार केला होता.घरची लक्ष्मी हसतमुखाने घरी पाऊल ठेवते पणं शीलाला डोळ्यात साठलेल्या आसवांनी घरात पाऊल ठेवावं लागलं.

घरात येताच त्या छोट्या शेडचं ती निरीक्षण करू लागली अस्ताव्यस्त पसरलेली कपडे,ठिकठिकाणी पडलेल्या रिकामी दारूच्या बाटल्या,जेवण बनवण्याची कोणतीच सोय तिथं नव्हती एक स्टोव्ह तेवढा होता.दोन भांडी, एक ताट,एक तांब्या एवढच काय ते साहित्य होत.कपडे देखील कितीतरी दिवस धुतलेली नसावीत इतकी मळकट त्या रूमची ती अवस्था पाहून शिलाला मळमळायला लागलं होत काय तीच नशीब होत .

"काय ग आवडला महल?"

"ह,,ह,,हो"

"तर मग चल आपण आपलं काम करायचं?"

"क,,क,,कोणत ,,काम?"शीला आता खरोखर घाबरली होती.

"अग अस काय करते तू आता आपलं लग्न झालंय हनिमून नको काय साजरा करायला.."

"आहो."

"अग अहो काय लाजली वाटत. चल मी येतो थोड्या वेळानी तोवर तू जेवण करून घे."

त्या शेडमध्ये बघायला गेलं तर काहीच नव्हतं ना भांडी होती ना जेवण बनवायला साहित्य होत .कसे करणार होती ती जेवण?माणूस म्हणून जन्माला आलोय याच जरा तरी भान ठेवावं माणसाने नवरा म्हणून अधिकार गाजवताना.मनाशीच ती बोलत होती तिला ही काही समजत नव्हतं काय करू?कसे बनवायचं जेवण हे तर सांगून गेलेत जेवण बनवून ठेव पणं ते कसे बनवू?तिच्या प्रश्नांच्या फैरी इतक्या सतावू लागल्या की डोक गरगरायला लागलं तीच.तोच दरवाजा खोलण्याचा आवाज आला अन् ती घाबरली.आता हा नक्की मारणार याची तिला भीती वाटू लागली . कारण तो आता पिऊन फुल्ल होता.

"शी,,लला"

त्याच ते तुटक बोलणं आणि नशेली नजर पाहून तिच्या छातीत धडधडू लागले.आता काही खरं नाही याची तिला खात्री पटली वहिनीने जाणूनबुजून या माणसाला निवडले हे तिच्या ध्यानात आलं वहिनीची विलक्षण चीड ही आली तिला. सख्खा भाऊ देखील असा वागेल अस तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता.

"शी,,, ल्ला" तो रागाने थोड मोठ्याने ओरडला.आता मात्र तिचे हातपाय लटपटू लागले कपाळावर घाम जमा झाला तो जसा जवळ येईल तसा त्याच्या अंगाचा येणारा दारूचा वास तिला नकोसा वाटू लागला.

"अग,,शी,, ला जेवण झालं,,,चल वाढ मला भूक लागली आहे."
त्याच्या बोलण्यावर तिला काय उत्तर द्यावं तेच समजेना.काहीच समान नसल्याने तिला आता जेवण केलं नाही हे संगण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

"आ,,,हो"

"बो,,ल"

"ते,,ते,,मी जेवण नाही बनवलं इथं मला काहीच समान नाही भेटलं आणि भांडी देखील नाहीत."

"मग,,,मी काय करू?"

"अहो ,,,तुम्हाला भूक लागली आहे ना?"

"काय,,,मला भूक लागली"बोलता बोलता तो गडगडाटी हसला.ती मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली.

"शीला,,मला भूक नाही लागली बघ आताच तर मी बाहेरून खाऊन आलो तुला लागलीय का?"

खरं तर शीला सकाळपासून उपाशीच होती त्यात याला काही सांगायचं तर हा आल्यापासून पिऊन फुल्ल झालेला.आणि आता देखील बाहेरून बिनधास्त खाऊन आला होता त्या बीचारीची काळजी न करता.त्याचा विलक्षण राग आला होता तिला.ती तिच्याच तंद्रीत असताना त्याचा हात तिच्या अंगाभोवती फिरू लागला तशी ती बावरली पण त्याच्या नशेलि डोळ्यातले भाव काही वेगळेच होते.बघता बघता त्याने तिच्यावर आक्रमण केलं अन् तिच्या फुलासारखा शरीर कुस्करायला सुरुवात केली होणाऱ्या असह्य वेदना रिकामी असलेलं पोट आणि त्याची वाढत असलेली शारीरिक भूक यामुळे शीला बेशुद्ध झाली.तो मात्र मन भरून सुख घेऊन झोपी गेला.

सकाळी शीला ज्यावेळी जागी झाली त्यावेळी तिला असह्य वेदना होऊ लागल्या तिने त्याच्याकडे पाहिलं तो मात्र निवांत झोपला होता.ती तशीच उठली तिथले पाणी घेऊन छोट्या असणाऱ्या बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करून आली.शरीरात अजिबात त्राण नव्हतं तरीही ती सगळ आवरत होती.संसाराचा पहिला दिवस सांभाळू पाहत होती आज नाही उद्या तरी तो नक्की चांगला वागेल संसारात रमेल अशी भाबडी समजूत मनाला घालून ती तो उठण्याची वाट पाहू लागली.

कितीतरी उशिरा संतोष जागा झाला.बाजूला पाहिलं तर शीला त्याच्याकडेच पाहत बसली होती.

"बायको शुभ सकाळ"

"अहो.. सामान काहीच नाही मी काय बनवू?"

"थांब मीच घेऊन येतो तू लिहून दे काय काय आणायचं आहे ते"

"ठीक आहे तोवर तुम्ही अंघोळ करून घ्या"

संतोष अंघोळ करून बाहेर निघून गेला चार भांडी लागणारे साहित्य घेऊन तो रूमवर आला

"शीला हे घे तुला जे करायचं ते कर मी कामावर जातोय दुपारी येऊन जेवायला बाहेर पडू नकोस अन् कोणाशी बोलत बसू नकोस.तू नवीन आहेस इथली काही माणसे चांगली नाहीत काळजी घे इतके सांगून ती बाहेर पडला त्याच ते गोड बोलणे किंचित शिलाला सुखावून गेले.पणं थोड्या वेळातच तो पुन्हा दारू पिऊन आला आणि तिच्या मनात भीती दाटून आली पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग आणि तिच्या शरीराचा खेळ चालू झाला. बिचारी शीला या त्याच्या वागण्याने पूर्ण तुटून गेली ना प्रेमळ तो बोलत होता ना तिची काळजी तो घेत होता फक्त हवा होता त्याला शरीराचा खेळ ..!

तिला चार महिन्यांतच ती गरोदर राहिली पणं त्याच्या राक्षसाच्या शारीरिक भुकेपुढे तिचा गर्भपात झाला.आणि त्याच्यासोबत राहणे तिला नकोस वाटू लागलं रोज तो मारहाण करायचा कोणाशी बोलले तरी तो तिच्यावर संशय घ्यायचा त्याची शिक्षा म्हणून पुन्हा शरीराचे हाल करायचा त्याच्या या वागण्यामुळे तिने त्याच दोन वर्षापूर्वी घर कायमच सोडलं अन् माहेरी आली. माहेरी तरी कुठे तीच कोण होत?,भाऊ होता तोही बायकोच्या शब्दा बाहेर नव्हता.ती बोलेल ते तो मुकाट्याने ऐकायचा .

ज्या दिवशी शीला माहेरी आली त्या दिवशी भावजयीने सारा गाव गोळा केला अनेक दूषणे तिला लावली नवऱ्याला मारून पळून आल्याचा तिच्यावर आरोप केला.जर इथं राहायचं असेल तर सर्व घरकाम करून शेतावर मजुरीला जायचं आणि मजुरी घरी माझ्या हातावर ठेवायची ही अट जर मान्य असेल तर इथं रहा नाहीतर चालती हो…भावजयी च बोलण तिच्या जिव्हारी लागलं पणं दुसरा कोणताच ऑपशन नव्हता तिच्यासमोर म्हणून सगळ्या अटी मान्य करून ती दिवस कंठत होती.भवजय तिचा अतोनात छळ करायची कधी कधी डबा देखील देत नसायची. त्यामुळे तिचे खूप हाल व्हायचे. पण ती जिथे काम करायची तिथं तिच्यावर जीव ओवाळून टाकणारी नाती तिच्या नशिबी होती.म्हणून तर तिला जगण्याचं बळ मिळत होत.

ती सगळ्याचा विचार करण्यात गुंतली असतानाच शांता मावशीची हाक तिच्या कानावर आली अन् ती तिच्या भूतकाळातील आठवणीतून बाहेर आली.

"अग,,बाय चल टाईम संपला कामावर जाऊया नाय तर तो पाटील नाय पगार द्याचा"

"हो मावशी चल,,"

तिची ती अवस्था लांबून बघणाऱ्या सागरच काळीज मात्र तिच्यासाठी तुटत होत दोघेपण एकाच वर्गातले बारावी होताच सागरने शाळा सोडून घराकडे शेताकडे लक्ष घातले तर शीला पुढे शिकत राहिली.त्याला ती खूप आवडायची पणं कधी तिला मनातलं सांगायचं त्याने धाडस केलं नाही त्यातच एक दिवस तिच्या लग्नाची बातमी त्याच्या कानावर पडली आणि तो पूर्ण तुटून गेला.ज्या दिवशी तीच लग्न झालं त्या दिवशी तो रात्रभर रडला होता.त्याच्याही घरी त्याच्या लग्नासाठी हट्ट होत होता म्हणून त्यानेही त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न केलं आणि ती त्याच्या संसारात रमला.पणं ज्या दिवशी शीला माहेरी आली त्यावेळी त्याला आपण उगीच लग्नाची घाई केली अस वाटू लागलं.पणं आता वेळ निघून गेली होती त्याच्या आयुष्यात सुख होत तर तिच्या आयुष्यात दुःख होत कायमचंच…!

दिवस सरला शीला कामावरून आली भावजयीने आल्या आल्या घरातल्या कामाला जुंपले दुपारची भरमसाठ भांडी घासून ती जेवणाला लागली जेवण आवरून ती एका कोपऱ्यात जाऊन बसली कारण सगळ्याची जेवण झाल्यावर उरलं सुरल तिच्या नशिबात असायचं.सगळी जेवणं झाल्यावर जेंव्हा ती जेवायला बसली तेंव्हा चोकभर भाकरीचा तुकडा आणि वाटीभर भात तिच्या वहिनीने तिच्यासमोर सरकावले..दिवसभर काम करून पुन्हा घरचं सार करून बीचारीच्या पोटलाही काही भेटत नव्हत हे तीच दुर्दैव.
तिने भरल्या डोळ्यांनी ताटाला नमस्कार केला अन् स्वतःच अंथरूण घेऊन ती गोठ्यात गेली.तिथल्या दोरीने तिने आढ्याला फास बांधला अन् अश्रू नयनांनी आजपर्यंत तिच्यावर माया केलेल्या शांता मावशीला हात जोडून बोलली

"मावशी मला माफ कर ग मी आज जे काही करतेय ते चूक की बरोबर हे मलाच कळत नाहीय मावशी आज पर्यंत तू माझी आई बनून तू मला साथ दिलीस तुझी मी सात जन्म ऋणी राहीन ग मावशी खरंच बाई म्हणून जन्माला येणं पाप आहे का ?आपलीच माणसे आणि एका स्री ला दुसरी स्त्री का समजून घेत नाही?का तिलाच नेहमी अहवेलाना सहन कराव्या लागतात?"
शीलाने अखेर आपले डोळे मिटले फास गळ्यात घातला अन् या जगाचा निरोप घेऊन साऱ्या बंधनातून सुटका करून निघून गेली कायमचीच…!!!

*खरंच स्री ला समजून घेणं कठीण आहे का हो,,,*

( जीला कोणीही समजून घेतलं नाही अशा एका उच्चशिक्षित स्री ची ही कथा माझ्या तमाम स्री वर्गाला समर्पित)

समाप्त…..

©®सविता पाटील रेडेकर
आजरा रोड नेसरी
तालुका_गडहिंग्लज
जिल्हा _कोल्हापूर

जिल्हा _कोल्हापूरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//