अभिमन्यू...

अभिमन्यू ❤️

" कॅप्टन.........बघ तुझा मुलगा.......... कॅप्टन अभिनित......अगदी तुझ्यासारखा ......आज गौरव होतोय त्याचा भारतमाता समोर........सगळ्यांसमोर.........माझं कर्तव्य पूर्ण झालं.......आता मी मोकळी तुझ्या जवळ यायला..........." नीता अभिमन्यु च्या फोटो पुढे उभी होती आणि टीव्ही वर येणाऱ्या बातम्यांमधून तिच्या मुलाचा सत्कार होतांना अभिमन्यू सोबत बोलत होती......

बघ अगदी तुझ्यासारखा दिसतो....तुझीच झेरॉक्स कॉपी.....स्वप्नं पण तुझ्यासारखी नी तुझ्यासारखे च भारतमाता वर चे प्रेम........तू पण 24 वर्षाचा होता तेव्हा आगदी असाच होता........बोलता बोलता निता भूतकाळ मध्ये हरवली.....

नीता...,.तू चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीय.........तो फक्त नी फक्त भारतमाता वर प्रेम करतो......... अश्मी.....निता जी अभिमन्यू ला बाहेर गार्डन एरिया मध्ये एक्सरसाईज करतांना बघत होती......

अभिमन्यू  22 वर्षाचा खूप महत्वाकांक्षी, आर्मी मध्ये कॅप्टन ......दिसायला गव्हाळ रंग, 6.2 फूट उंची..... आर्मी मध्ये आहे म्हटल्यावर कसलेला बांधा, मजबूत बाहू, बारीक कापलेले केस, ब्रॉवून पण तेवढेच करारी डोळे, धारदार नाक, ओठांवर सकारात्मकता ची स्मायल....पण शांत स्वभावाचा........ समज आल्यापासून भारत माते च्या सेवेची स्वप्नं बघत आलेला राजबिंडा मुलगा......अश्या या करारी मुलाच्या  दोन वर्षापासून प्रेमात पडलेली नाजुकशी , सुंदर, बोलके डोळे असलेली 20 वर्षाची  निता......एका मोठ्या बिझनेसमन ची मुलगी....

नीता ही अभिमन्यू ची लहान बहीण अश्मी ची मैत्रीण.....बारावी झाल्यानंतर दोघी एका कॉलेज मध्ये दोन वर्ष पासून शिकत होत्या.... आता त्या b.com च्या फायनल ईएर ला होत्या.......दोन वर्षापूर्वी जेव्हा अभिमन्यू सुट्टीमध्ये घरी आला होता...तेव्हा पहिल्यांदाच बघितले नी त्याचा प्रेमामध्ये पडली........Love at first sight.....म्हणतात तसेच काहीसे झाले होते नीता सोबत......आणि तेव्हा पासून जेव्हा ही तो सुट्ट्यांमध्ये घरी यायचा.....निता फक्त त्याला बघत असायची.......ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे अश्मी ला सुद्धा कळले होते...... अश्मी ने तिला बरेचदा समजावले होते की अभिमन्यू कुठल्याच मुलीला जवळ फिरकू सुद्धा देत नाही......त्याच फक्त त्याचा कामावर अतिशय प्रेम आहे.......पण दिल के हातो मजबूर असं काहीसं निता च झालं होत......कॉलेज मध्ये इतकी मूल मागे लागूनही ती फक्त नी फक्त अभिमन्यु च्या प्रेमात होती......

नीता.....तुझं काही होऊ शकत नाही.....इतकं वेड्यासारखं प्रेम करते त्याच्यावर तर एकदा बोल तरी त्याच्यासोबत.....त्याला कळू तरी दे......नाहीतर मला तरी सांगू दे ........... अश्मी

नको ग....भीती वाटते.....नाही म्हणाला तर...??.......माझा त्याला बघायचा पण हक्क जाईल......नको नको जाऊ दे........निता

ये डरपोक बाई.....एका आर्मी ऑफिसर वर प्रेम करते तर असे घाबरून कसे चालणार आहे....... आर्मी ऑफिसर वर प्रेम करणं सोपं नसतं...त्यासाठी वाघिणीचे काळीज लागते.......ते ऐर्यागैऱ्या चे काम नाही......फार मजबूत मनाचं माणूस लागत.......... तू सोड त्याचा नाद........ चल कॉलेज ला उशीर होतोय........ अश्मी

मला त्याला माझं प्रेम सांगायला भीती नाही वाटत.......मला फक्त त्याच्या नकाराची भीती वाटते.......जर तुझा भाऊ वाघ आहे तर मी सुद्धा वाघीण आहे.........नीताच्या आवाजात जबर होता...

हो ना......मग जा आताच बोलून दाखव....आज त्याच्या सुट्ट्या संपत आहेत...दुपारी परत जातोय तो......आता सहा महिन्यांनी च ते पण काही इमर्जन्सी नसेल तरच त्याला सुट्ट्या भेटेल नी येईल तो........ अश्मी

तो आज परत जातोय..... अश्मीच चे बोलणे ऐकून निता च्या डोळ्यात पाणी तरळल.....

बघ.......तो जातोय ऐकूनच तुला त्रास व्हायला लागतो....प्रत्येक वेळी असेच असते तुझं......जा ना सांग ना त्याला.......त्याला पण कळू दे कुणीतरी त्याची इथे वाट बघतेय........त्याच्यावर पण कुणीतरी जीव ओवाळून टाकतय........हातातून वेळ निघून जायच्या आधी बोल............ अश्मी

हातातून वेळ निघून जायच्या आधी .....ऐकून नीताने एकदा अश्मी कडे बघितले....,.

हो...जा.......कुणीच नाहीये इथे.....तुला निवांत बोलता येईल........आणि मी आहेच इथे......लक्ष ठेवेल......जा आता............ अश्मी.

नीता ने मान हलवली......आणि ती पुढे हळू हळू अभिमन्यू एका ठिकाणी बसून डंबल्स एका हातात पकडून व्यायाम करत होता......तिथे गेली....नी त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली....

तिची चाहूल लागून त्याने वरती बघितले......तिच्या डोळ्यात त्याला खूप वेगवेगळे भाव दिसत होते........त्याने हातातले डंबल्स खाली ठेवले नी उठून उभा राहिला......

मला बोलायचं तुमच्यासोबत...........निता

ह्मम........अभिमन्यू तिच्या वर नजर रोखून बोलला..

तू माझं आयुष्य बनला आहेस..........तू माझा श्वास आहे......... I Love you more than my Life.......... निता एका श्र्वासमध्ये बोलून गेली.......अभिमन्यू मात्र तिच्या डोळ्यात बघत होता....... ती येवाद्या वर्षात आज पहिल्यांदा त्याच्या सोबत बोलली होती......आणि ते पण इकडचं तिकडचं काही न बोलता......बेधडक I Love you............. अभिमन्यू काहीच न बोलता फक्त तिच्याकडे बघत होता........

अभिमन्यू च्या डोळ्यात तिला बरीच प्रश्न दिसत होती.....कदाचित त्याला तीच्य प्रेमावर विश्वास नसावा असे तिला वाटले......ती हळू हळू त्याच्या जवळ गेली...........तिच्या पायाच्या टाचा उंचावून त्याला काही कळायच्या आतच तिने त्याच्या मानेला एका हाताने पकडले आणि डोळे बंद करत त्याच्या ओठांवर आपल्या ओठांचा छोटासा स्पर्श केला..........नी त्याचा दूर झाली........

अभिमन्यू ला काय झालं थोड्या वेळ साठी काहीच कळले नव्हते...........

मी या वाघाची वाघीण आहे......... वाट बघतेय........आणि बघेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत......I Love Captain........मागे मागे जात निता ओरडली नी बाहेर पळाली..........अभिमन्यू च काहीही न ऐकता.....

वाघीण........अभिमन्यू च्या ओठांवर स्मायल आल....

********

कॅप्टन ....यावेळी बदलेले वाटत आहात......काय मग या वाघाला फायनली प्रेम झालं तर.........राजीव, अभिमन्यू चा मित्र त्याची मस्करी करत होता...

त्याच्या बोलण्यावर अभिमन्यू ब्लश झाला.......

आवडत तर ती मला दोन वर्षापासून होती.......तीच ते निरागस रूप , प्रेमाने बघणे......माझी एक झलक बघायला चाललेला तिचा खटाटोप....त्यात होणारी तिची फजिती....अगदी मी जिथे जाईल तिथे पोहचायचे, कुठल्या तरी कोपऱ्यातून मला बघत राहायचे..........सगळच कळत होत मला तेव्हापासूनच.......पण आपलं हे असे आयुष्य.....आपण आज आहो, उद्या नाही.......काहीच नाही देऊ शकत तिला......म्हणून कधीच बोललो नव्हतो......मला वाटले लहान आहे......विसरेल....दुसरा कुठला मुलगा तिच्या आयुष्यात आला तर मी आठवणीत पण राहणार नाही....पण असे काहीच नाही झाले.........ती अजूनही तशीच आहे ,तिथेच आहे.........सोबतीला आमच्या बहिणाबाई.........अभिमन्यू

ह्मम....मग काय उत्तर दिले तू........राजीव

मलाच निशब्द केले तिने.... माझ्या उत्तरासाठी थांबलीच कुठे ती.....स्वतःच उत्तर देऊन गेली मला........स्वतःच माझी बनून गेली.......वाघाची वाघीण..........अभिमन्यू 

मग आता काय करणार आहेस तू......??.....राजीव

समजवेल तिला......माझ्या सोबत तीच काहीच भविष्य नाही.......सुंदर आहे, हुशार आहे, मोठ्या घरची आहे.....चांगला मुलगा मिळेल तिला........अभिमन्यू

खरं आहे रे तुझं......माझ्या घरी पण सगळे माझ्या लग्नासाठी मागे लागतंय.....पण कुणा मुलीची स्वप्न आपल्यासोबत जोडायला भीती वाटते रे........

हो ना......घरचे म्हणतात का इतका नकारात्मक विचार करता....त्यांचं पण बरोबर आहे , आपण त्यांना सुखी हवे आहोत, आपला पण परिवार असावा असे त्यांना वाटते, पण आपल्यालाच आपले माहिती ना.....पुढचा क्षण सुद्धा आपण आहोत की नाही...काहीच गॅरंटी नाही..........आपण नकारात्मक विचार नाही करत....आपण फक्त रिॲलिटी सांगतो......असो बघुया............अभिमन्यू

*******

रोजच्या सारखे दिवस जात होते.....अभिमन्यू त्याच्या कामात होता....इकडे निता त्याची वाट बघत होती......त्याच्या डोळ्यात तर तिला तिच्यासाठी प्रेम दिसले होते.......आणि म्हणूनच ती त्याचा इतक्या जवळ गेली होती....पण त्या दिवसापासून तो काही बोलला नव्हता....त्या दिवशी परत गेला तेव्हा अश्मी सोबत ती पण त्याला रेल्वेस्टेशन वर पोअहाचावयाला गेली होती.....तेव्हा पण तो काहीच बोलला नव्हता.......त्याच तिच्या वार प्रेम तर आहे पण त्याच्या मनात काय सुरू आहे तिला काहीच कळत नव्हते......त्या नंतर ही त्याने काही अश्मी ला निता बद्दल विचारले नव्हते.........त्यामुळे तो परत येई पर्यंत वाट बघण्या खेरीज तिच्याजवळ काहीच दुसरा उपाय नव्हता....

अभिमन्यू सुद्धा आपल्या कामावर फोकस करत होता......मनात कुठेतरी कोपऱ्यात त्याने निता ला ठेवले होते.......पण त्याचे स्वप्न निता नव्हती, त्याचे स्वप्न देशाची सेवा करायचे होते जे तो बखुबी करत होता......

********

जवळपास नऊ महिन्या नंतर अभिमन्यू ला सुट्ट्या भेटल्या होत्या........आणि तो घरी आला होता......

अश्मी......अभिमन्यू...?? नीता इकडे तिकडे बघत बोलली...

हा तो त्याच्या रूम मध्ये आहे.......... अश्मी

निताची त्याला बघायची चुळबुळ सुरु होती........ती अश्मी च्या लक्षात आली....

नीता......जा त्याचा रूम मध्ये.....घरी आईबाबा नाही आहेत....बाहेर गेले आहेत काही फंक्शन साठी...... अश्मी

खरंच जाऊ...???.......काही प्रोब्लेम तर.......

अग हो जा.......मला माहिती आहे ती कधीची त्याची वाट बघते आहेस.......मॅडम मला माहिती प्रेम म्हणजे काय....मला कळतात त्या भावना......जा......नको काळजी करू, मी आहे इथे...... अश्मी

नीता पळतच वरती त्याच्या रूम जवळ आली.....पण आतमध्ये जाऊ की नको तीच धाडस होत नव्हते........ती कधीच त्याच्या रूम मध्ये गेली नव्हती......बऱ्याच वेळ विचार करून तिने त्याचे दार नॉक केले......

आत ये , दार उघडे आहे अश्मी........अभिमन्यू बेड वर झोपल्या झोपल्या पुस्तक वाचत होता...

नीताने हळूच दार उघडले नी आतमध्ये जाऊन उभी राहिली........नी मनभरून अभिमन्यू ला बघत होती........आज पहिल्यांदा तो इतका उशिरा घरी आला होता.....नाहीतर नेहमी सहा महिन्यांनी यायचा.....त्यात ती त्याची यावेळी खूप आतुरतेने वाट बघत होती......तिने त्याला तिच्या मनातले सांगितल्या पासून ती त्याची खूप आतुरतेने वाट बघत होती......

अश्मी काय काम आहे.......बोल......अभिमन्यू त्याच्या बुक मध्ये बघतच बोलत होता....

नीताला मात्र काहीच ऐकू गेले नव्हते.....ती त्याला बघण्यात गुंग होती...

काहीच आवाज न आल्यामुळे अभिमन्यू ने त्याची नजर वर केली तर समोर निता त्याला बघत उभी होती.....त्याने हातातले बुक बाजूला ठेवले नी उठून उभा राहिला...

नीता.............. आज पहिल्यांदा त्याने तीच नाव उच्चारले होते....

त्याच्या तोंडून तिचे नाव ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले होते.....तीच मन खूप भरून आले होते .....

तिच्या डोळ्यात आज पहिल्यांदा त्याने पाणी बघितले होते.....तिच्या डोळ्यातले पाणी बघून त्याचा सुद्धा काळजात त्याला दुखल्या सारखे झाले......तिला आपल्या कुशीत घ्यावे त्याला वाटले.....पण.,..तो चुपचाप निताकडे बघत उभा होता....

नीता हळू हळू चालत त्याच्या जवळ जात होती......आणि पुढे होत पळतच त्याच्या कुशी मध्ये शिरली.......... तिचं हृदय खूप जोरजोराने धडधडत होते.......इतके की तिच्या काळजाचे ठोके त्याला पण जाणवत होते.......त्याचा दुरावा यावेळी तिला असहाय्य झाला होता.....नी काहीच विचार न करता ती त्याचा कुशीत गेली होती.....नी मन मोकळे होयीपर्यंत चुपचाप आसवे गाळत होती......अधूनमधून तिला हुंदके येत होते..........नकळतच अभिमन्यू चे हाथ तिच्या भोवती गेले.....त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला....नी परत तिला आपल्या कुशी मध्ये घेतले.........दोघेही अबोल होते....फक्त एकमेकांचा सहवास अनुभवत होते..,...

थोड्यावेळाने त्याने तिला बेड वर बसवले नी पाण्याचा ग्लास तिच्या पुढे पकडला........ती मान वर करून त्याच्याकडे बघत होती......

ह्मम.....घे........अभिमन्यू ने डोळ्यांनीच तिला पाणी पी म्हणून इशारा केला......तिने पण त्याच्या हातातून पाणी घेतले नि थोड पित ग्लास बाजूला ठेवला....

अभिमन्यु तिच्या पायाजवळ खाली त्याच्या टोंगळ्यांवर बसला ...नी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले....

त्रास होतोय ना.....??......अभिमन्यू तिच्या डोळ्यात बघून बोलत होता....

नीता ने नकारार्थी मान हलवली, पण डोळ्यातून अविरत पाणी येत होते......

मला माहिती आहे खूप त्रास होतोय....... वाट बघणं खूप कठीण आहे.......परत यायचे काहीच ठरले नसते, कदाचित कधी परत येऊ की नाही ते पण माहिती नाही..........अभिमन्यू बोलतच होता की निता ने त्याच्या ओठांवर तिचा हाथ ठेवला........नी मानेनेच नाही म्हणून इशारा केला...

त्याने आपल्या हाताने तिचा हात काढून हातात घेतला.....

ऐकायला नाही होत आहे ना......पण हेच आहे आमचं, माझं  आयुष्य......... कसं जोडू तुझं भविष्य , तुझी स्वप्नं माझ्या सोबत.......जिथे मला माझ्याच आयुष्याची खात्री नाहीये....तिथे तुला आयुष्यभर सोबत राहायची कशी खात्री देऊ..........तू खूप छान आहेस....निरागस आहेस.....तुझं मन खूप प्रेमळ आहे......सगळ्यांना मदत करते....गरजूंना मदत करते...........

नीता प्रश्नार्थक नजरने ने अभिमन्यू कडे बघत होती.........

माहिती आहे मला सगळं.......तुझ्या बद्दल सगळं माहिती मला.............सुंदर आहेस, शिकलेली आहेस......तुला खूप चांगला जीवनसाथी मिळेल...........अभिमन्यू

मला फक्त तू हवा आहेस...........निता

मी आधीच माझ्या भारतमातेचा झालोय......माझं खूप प्रेम आहे माझ्या देशावर..........अभिमन्यू

मी कधीच तुझ्या प्रेमाच्या मध्ये येणार नाही.........कधीच तुला कुठेच थांबवणार नाही............मला फक्त तुझ्या आयुष्याची सोबती करून घे..........निता काकुळतीने म्हणाली.......

नित.........तुला कळतंय काय..........अभिमन्यू

हो कळतेय सगळं.........गेल्या तीन वर्षापासून प्रेम करतेय तुझ्यावर, अश्मी ने पण समजावले, प्रयत्न पण केले....पण नाही जमले......तुला पहिल्यांदा बघितले नी तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलेय.....प्रेम काय असते कळल्याला लागल्या पासून फक्त तू असतोस माझ्या डोळ्यांपुढे........नाही दुसऱ्या कुणासाठी माझ्या हृदयात जागा........तू नाही तर कोणीच नाही...........निता

पण......मीच का....??........अभिमन्यू

सगळेच स्वतःसाठी जगतात...तुम्ही दुसऱ्यांसाठी, देशासाठी, आमच्या संरक्षणासाठी आपला जीव पणाला लावत असतात.....आपला जीवच नाहीतर, आपली स्वप्नं सगळच देशासाठी अर्पण करता....बघ ना जो देशावर इतका प्रेम करतो, तो माझ्यावर किती प्रेम करेल.......आणि मला माहिती तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतोस, बघितले होते मी तुझ्या डोळ्यात........मला एका आर्मी ऑफिसर ची बायको बनायला आवडेल......अभिमानाने जगेल मी......... प्लीज नाही नको म्हणुस.........निता खूप आशेने त्याच्या कडे बघत होती....

नित...........पागल आहेस तू...........त्याने तिला आपल्या मिठीत घेतले........नी तिच्या डोक्यावर , केसांवर, किस करत होता........

पण प्रॉमिस मी, तू कधीच माझ्या आठवणीत स्वतःला त्रास करुन घेणार नाहीस, रडणार नाहीस........अभिमन्यू

माहिती नाही मला.........ती त्याला बिलगतच बोलत होती...

तू अशी जाई जुई , मी असा रांगडा...............अभिमन्यू

We are perfectly made for each other.......... नीता

वेडाबाई...........अभिमन्यू

तुझ्यासाठी..........निता

पण राज्या मी नेहमी तुझ्यासोबत नाही राहू शकत......कधी कधी पोस्टिंग अशा ठिकाणी होत असते की तिथे फॅमिली ला नाही नेता येत, दूर राहावं लागते..........कधी कधी वर्ष, दोन वर्ष पण भेट नाही होणार..........मग राहशील एकटी.......अभिमन्यू

हो, तुझ्या आठवणी सोबत राहील मी, फक्त जेव्हा तू सुट्टया वर असशील, तेव्हा प्रॉमिस कर फक्त माझा असशील........त्या वेलेमध्येच मी खूप जागून घेईल........निता

ह्म.....सोपी नाहीये हे असे.............अभिमन्यू

सोपी लाईफ हवंय कोणाला.....या वाघाची वाघीण आहे मी.........फक्त तू हवा आहेस........निता

*****

अभिमन्यू नी निता ने मिळून ही सुट्टी पूर्णपणे एकमेकांना वेळ देत घालवली.....बाहेर पिकनिक, मूव्ही, शॉपिंग, लंच, डिनर.......असे सगळे एकत्र करत घालवली.......त्यांनी त्यांच्या रेलेशनशिप बद्दल घरी सुद्धा सांगितले.....आधी नीताच्या घरचे मानायला तयार नव्हते......एकुलती एक मुलगी ....तिच्या हट्ट पुढे ते सुद्धा तयार झाले......दोन्ही घरात खूप आनंद , उत्साह होता......अभिमन्यू च्या घरच्यांना सुद्धा निता आवडत होती.....त्यामुळे दोघांचे रिलेशन सगळ्यांनी हसत हसत स्वीकारले होते.......

अभिमन्यू ची सुट्टी संपली होती......अभिमन्यू ची फॅमिली आणि निता त्याला सोडायला रेल्वे स्टेशन ला आले होते......

बाळा काळजी घे स्वतःची.........आई

आई तू पण कोणाला सांगतेय.....जो पूर्ण देशाची काळजी घेतो त्याला......... अश्मी , अश्मी च्या डोळ्यात पाणी आले.....अभिमन्यू ने तिला मिठीत घेतले........

रक्षाबंधन, भाऊबीज , दिवाळी, कुठल्याच सणांना नसतो तू, खूप आठवण येते तुझी......आता तरी लवकर येत जा रे , तुझी कुणीतरी चातका प्रमाणे वाट बघत असते.....ती नीता कडे इशारा करत बोलली.....निता चुपचाप एका ठिकाणी उभी आपले आसवे लपावण्याचा प्रयत्न करत होती......अभिमन्यू इकडे बोलत होता, पण सगळं लक्ष त्याच निता कडे होते....

आई, अश्मी , बाबा सगळ्यांना अभिमन्यू ने हग केले......पण आई बाबा असल्यामुळे तो नीता जवळ फक्त उभा होता.........

आहो.....तिकडे चला बरं..... थोडं काम आहे.........अभिमन्यू चा आईला त्याचा अवघडलेपण लक्षात आले होते आणि तिने त्याच्या बाबांना तिकडे काहीतरी काम सांगून घेऊन गेली.......

त्यांना दूर गेलेले बघून आतापर्यंत रोखून ठेवलेले नीताचे अश्रू तिच्या गालांवर ओघळू लागले........

नित.......अशीच बाय करणार आहेस काय मला........त्याने एक हाथ तिच्या खांद्यावर टाकत तिला जवळ घेतले.......नी तिच्या डोक्यावर किस करत अशमिकडे ....डोळ्यांनीच हीची काळजी घे म्हणून खुणावले...

तू काळजी नको करू...... अश्मी ने होकारार्थी मान हलवली..

नीता ने दोन्ही हातांनी आपले डोळे पुसले.....नी त्याच्याकडे हसून बघितले......

That's like a my girl......take care.....त्याने तिच्या गालांवर हाताने थोपटत होता....आणि तेवढ्यात ट्रेन ची शिटी वाजली........नीताच्या हातातून हाथ सोडवत तो ट्रेन मध्ये जाऊन बसला.......

********

दिवसामागून दिवस जात होते.....दोघाहेही एकमेकांच्या आठवणीत दिवस काढत होते, तेव्हा मोबाईल नव्हते, पाहिजे तेव्हा फोन करता यायचा नाही.......जेव्हा अभिमन्यू फोन करायचा तेव्हाच बोलता यायचे. आठवड्यातून एकदा तो नीता ला फोन करायचा..,..बाकी पूर्ण आठवडा तिचा त्याच्यासोबत बोललेले आठवण्यात जायचा.....नंतर नंतर तिला फोन ची वाट बघणे जीवावर येत होते....आणि मग तिने त्याला पत्र लिहायला सुरुवात केली......तो पण तिला तिच्या पत्रांचे उत्तर पत्रांनी देत होता.........आता तिचे दिवस त्याचे पत्र वाचण्यात जाऊ लागले......दिवसातून कितीतरी वेळा ती त्याचे पत्र वाचत असायची.....

*******

अभिमन्यू च्या छातीवर मेडल वाढत चालले होते.....आणि त्याची पोझिशन पण.....त्याची कामगिरी बघून त्याचे प्रमोशन झाले होते......सर्वांना अभिमन्यू चा खूप अभिमान वाटत होता......आता तो फक्त चोवीस वर्षाचा होता....पण खूप लहान वयातच त्याने खूप मोठी मोठी कामे केली होती.... आर्मी ला सुद्धा त्याचावर गर्व होता...

या सुट्टी मध्ये पण घरच्यांनी सगळं वेळ खूप छान घालवला.....अभिमन्यू आला म्हणजे घरामध्ये दिवाळी दसरा असायचा.....अगदी सणावरासारखे प्रसन्न वातावरण असायचे.......राहिलेली सगळ्यांची वाढदिवस अभिमन्यू आला की सोबतच सगळे सेलिब्रेट करायचे.......त्या एका महिन्यात निता त्याच्यासोबत आयुष्यभर पुरतील इतके क्षण जागून घ्यायची.....

*********

आज दिवाळी होती.....सगळी कडे दिव्यांचा झगमगाट, पूर्ण देश आनंदाचा हा सण उत्सव साजरा करत होते.....सगळ्यांची घर सजली होती, दिव्यांनी, लायटिंग नी, घराघरात आकाशदिवे, नवीन कपडे, फराळ, फटाके.....सगळी कडे कसा उत्साह ओसंडून वाहत होता....सगळ्यांची घर त्यांच्या मुलबाळ, मुली, सूना , नातवंडं या सगळ्यांनी भरले होते......सगळ्यांच्या घरातून हसण्या खेळण्याचे आवाज येत होते......

आज निता पण खूप खुश होती....तसेच काहीसे होते....अभिमन्यू ने फोन करून सांगितले होते की पाडवा झाला की तो येतोय.....तसा तर अभिमन्यू आताचा तीन महिने झाला होता येऊन गेला होता, पण बरीच कामं फत्ते केल्या मुळे त्याला काही दिवसांसाठी सुट्टी भेटणार होती, आणि निता चांपण वाढदिवस होता....म्हणून तो येणार होता.....म्हणून निता खूप खुश होती...

कॅप्टन ....वाढदिवस तर माझा आहे.....पण मीच तुम्हाला गिफ्ट देणार आहे.......आणि माझं गिफ्ट सगळ्यात बेस्ट असणार आहे.........या हो लवकर आता.......किती वाट बघायला लावत आहात........निता अभिमन्यू चा फोटो हातात घेऊन बोलत होती........

दिवाळीची रात्र ओसरली.....नी पाडवा चा दिवस उजाडला....आणि टीव्ही वर चीन ने केलेल्या हमल्याची न्यूज सुरू होती.........आणि नीताच्या हृदयाची धडाधड वाढायला लागली......ती घाबरून तिच्या रूम मध्ये जाऊन बसली..........हातात अभिमन्यू चा फोटो होता....त्याच्या कडे बघत भूतकाळात हरवली.....

नीत काय झालं...........???इतकी का घाबरली आज....???...अभिमन्यू तिला स्वतःजवळ कुशीत घेत बोलत होता........

अभिमन्यू मला खूप भीती वाटतेय रे.........मला असेच तुझ्याजवळ राहू दे, सोडू नको मला.......ती त्याला अजून घट्ट पकडत होती..

नित काय झालं.....मला सांगशील काय....?? अभिमन्यू तिला आपल्या मिठीत पकडून तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत होता....

काही नाही.......आज मला फक्त तुझ्या जवळ राहायचं.......आणि तिला परत ती न्यूज आठवली आणि तिचे डोळे भरून आले......आणि ती त्याच्या मानेला , गळ्याला किस करत होती........

नित.........हे काय करते आहे..??....हे बरोबर नाहीये राजा..,..आपलं लग्न पण नाही झालंय...........तो स्वतःवर कंट्रोल ठेवत तिला दूर करत बोलत होता....

अभिमन्यू .....नको मला आज तुझ्या दूर करू......मला तुझं बनून जायचं आहे.........माझ्या रोमारोमात मला तू हवा आहेस.,......मला तुझ्यामध्ये विरघळून जायचं आहे........मला तुझा स्पर्श साठून घ्यायचा आहे.......मला तुझं प्रेम माझ्या नसानसात हवय.........तू माझ्या प्रत्येक श्वासात आहे, पण मला तुला अनुभवायचे आहे.......नको ना दूर करू मला...........निता खूप अपेक्षेने त्याच्या कडे बघत काकुळतीने बोलत होती...

नित.....आपलं लग्न नाही झालं आहे अजून.......हे असं ठीक नाही आहे......आपण लवकरच लग्न करू....घरी बोलतो मी...........पण आता हे नको.......प्लीज, समजून घे..........अभिमन्यू

अभिमन्यू, प्लीज तू समजुन घे ना......,लग्न तर आपले होणारच आहे ना .......मला तू हवाय.........मला माझा प्रत्येक क्षण तुझ्या सोबत घालवायचा आहे........आता मला ही आपली शरीर पण वेगळी नको आहेत.........निता ला न्यूज ऐकून खूप भीती वाटली होती, आणि अभिमन्यू ला गमवायची भीती तिला वाटत होती, आणि म्हणूनच तिचा तिच्या मनावरचा ताबा सुटला होता........आणि परत ती त्याच्या जवळ गेली नि त्याच्या कंबरे मध्ये पकडत , जवळ आणत त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले........

आणि आता व्हायचे तेच झाले.....इतक्या वेळ पासून त्याने स्वताहवार ठेवलेला कंट्रोल त्याचा सुटला.........आणि तो पण तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला........आणि दोघंही एकमेकांमध्ये विरघळू लागले.....

नीता ने न्यूज वर शहीद झालेले न्यूज ऐकली नी ती खूप घाबरली होती..... आणि ते कळताच ती त्याच्याजवळ आली होती.....आज घरी पण नव्हते कोणी, अश्मी आणि आईबाबा अश्मी चे लग्न ठरलंय म्हणून काही कमानी तिच्या सासरी गेले होते......त्यामुळे आज घरात अभिमन्यू आणि निताच होते....

थोड्या वेळाने अभिमन्यू ला जाग आली....तर निता त्याच्या हातावर डोक ठेऊन, एका हाताने त्याला पकडून झोपली होती....थोड्या वेळ पूर्वी घाबरलेली निता आता खूप शांत वाटत होती......खूप दिवस नीट झोपलेली नसेल इतकी शांत ती झोपली होती.......त्याने पण तिला उठवले नाही, तो तसाच तिला घेऊन झोपला होता.......किती वेळ असेच राहायचे म्हणून त्याने एका हातात रिमोट घेऊन टीव्ही सुरू केला...नी न्यूज बघू लागला....आणि मग त्याला नीताचे इतके घाबरण्याचे कारण कळले........,..आणि आता त्याला तिच्या मनातली भीती कळली होती..,..आणि त्याने परत तिला स्वतःच्या कुशीत घट्ट घेतले.,..,..नी परत तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला...,..आता त्याला ती हवी होती.......तिला घेऊन परत झोपी गेला.....

जे झाले ते जरी प्रेमाचा च एक भाग होता तरी त्यांचं लग्न झाले नव्हते......त्याचाच त्याला त्रास होत होता........निता ला होणाऱ्या त्रासामुळे त्याच काळीज दुखत होते....आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी त्याने नीताच्या घरी आणि त्याच्या आईबाबांना त्याच्या आणि नीताच्या लग्नासाठी एका आठवड्यात ली तारीख काढायला लावली होती........आधितर घरचे ऐकायला तयार नव्हते....पण त्याने सगळं नीट समजावून सांगितल्या मुले घरचे तयार झाले......नी घरगुती सध्या पद्धतीने लग्न करायला तयार झाले होते..........

लग्न एका आठवड्यात होते, निता खूप खुश होती....

You are the best........ नीता अभिमन्यू च्या रूम मध्ये गेली होती......

ह्मम.....ही माझी वाघीण त्या दिवशी मांजरीच पिल्लू झालं होत ना............अभिमन्यू तिची मस्करी करत होता.......

लाजतच निता त्याच्या हाताला पकडून त्याच्या खांद्यामागे आपला चेहरा लपवत होती.......

अरे अरे.....बापरे, वाघीण चक्क लाजते आहे.........त्याने तिला हाताला पकडून स्वतः समोर आणले...नी तिच्या डोळ्यामध्ये प्रेमाने बघत होता.....

काय करतोय...????......निता

तुला मन भरून बघतोय................किती प्रेम करतेस ना माझ्यावर......आणि हे सगळं झाल्यावर मी लग्न नाही म्हणालो असतो तर....???.....अभिमन्यू

तू धोका देणाऱ्या मधला नाही आहेस......,..जो भारतमाता वार इतकं प्रेम करतो, जीचा इतका मान करतो, तो तिच्याच मुलीला कसा काय धोका देणार...........तुझ्या प्रेमावर मी प्रेम करते.......निता

अभिमन्यू मात्र तिच्या डोळ्यात बघत होता.....किती विश्वास आहे नित चा माझ्यावर......तो तिला बघत विचार करत होता...

तू नी मी एक झालोय आता........मी खूप खूष आहे...I love you one.....म्हणत तिने त्याच्या गालावर किस केले.....I Love you two म्हणत दुसऱ्या गालावर किस केले......I love you three म्हणत कपाळावर किस केले..........आता तो खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघत होता........की ती आता पुढे जाईल........ती पण त्याच्याकडे बघत मिश्किल पणे हसत बघत होती.....

I Love you Infiniti........... माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे ......beyond the life........ ओरडतच ती तिथून पळाली

अभिमन्यू तिला जातांना बघत होता....

घरगुती च लग्न असले तरी जवळचे काही नातेवाईक बोलावले होते......रीतिभाती नुसार विधी सुरू होते.....दोन्ही घराचे कार्यक्रम एका ठिकाणीच करायचे ठरले होते.......त्यामुळे अभिमन्यू च्या च घरी सगळे प्रोग्रॅम्स सुरू होते.......मेहेंदी झाली, दुसऱ्या दिवशी हळद आणि मग लग्न असे ठरले होते...

सकाळी हळदीचा पण कार्यक्रम अगदी छान पार पडला......निता तर अगदी नव्या नवरी प्रमाणे दिसत होती.....तिच्या नाजुक गोऱ्या रंगावर हळदीचे तेज आले होते, हातात हिरवा चुडा.....अभिमन्यू ची तर नजर तिच्यावरून हटत नव्हती........ती बंगड्यांसोबत खेळत होती...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ....तो दुरून तिचे ते देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवत होता.......आणि फोन वाजला नी त्याची तंद्री भंग झाली..

येस सर...,.अभिमन्यू ने बोलून फोन खाली ठेवला......त्याच्या त्या कराऱ्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.....नी सगळे त्याच्या जवळ येऊन उभे राहिले.....

बाबा इमर्जन्सी आली आहे....मला आता निघाव लागेल........अर्ध्या तासात गाडी येईल घ्यायला.......मी पॅकिंग करतो........सगळ्यांना सांगून तो वरती आपल्या रूम मध्ये गेला.....

त्याचे बोलणं ऐकून सगळ्यांची डोकं सुन्न झाली होती.....उद्या लग्न नी आज त्याला जावं लागत आहे........

अभिमन्यू ची आई आणि अश्मी त्याला पॅकिंग साठी मदत करत होत्या......त्यांना या अश्या गोष्टींची सवय होती.....पण लग्न तोंडावर आणि हे असे अचानक त्यामुळे त्यांना थोडे वाईट वाटत होते......अभिमन्यू चे बाबा सगळ्यांना परिस्थितीची जाणीव करून देत त्याच जाणं किती गरजेचं आहे ते समजावून सांगत होते.....

नीता ला तर काहीच कळत नव्हते......ती कावरीबावरी होत सगळ्यांकडे बघत होती......

जा बाळा....त्याला भेटुन घे, पंधरा मिनिटातच गाडी येईल......जा वेळ नको घालाऊ.......अभिमन्यू ची आई निता च्या खांद्यावर हात ठेवत बोलली

अभिमन्यू च्या आईच्या बोलण्याने निता भानावर आली आणि पळतच अभिमन्यू च्या रूम मध्ये गेली........अभिमन्यू पाठमोरा सामान पॅक करत होता, निता पळतच जाऊन त्याला पाठीमागून च हग केले....... नी त्याच्या पाठीवर डोकं ठेऊन त्याला घट्ट पकडले......त्याचे हाथ काम करता करता तसेच राहिले....त्याने तिला तिच्या हाताला धरून तिला पुढे आणले.........नी आपल्या कुशी मध्ये घेतले......

खूप सुंदर दिसत आहेस......अगदी नवीन नवरी......त्याने तिचा चुडा भरलेला हाथ आपल्या हातात घेतला नि तिच्या दोन्ही हातावर किस केले.........त्याच्या स्पर्शाने तीच शरीर मोहरुन आले.......तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली.....

सॉरी नित....... असं जावं लागते आहे.....मला तुला नववधू  बनलेले बघायचे होते........पण माझ्या भारतमातेला आता माझी गरज आहे........

हो......तू ये तेव्हा तुझ्यासमोर तुझी नववधू बनून येईल......आता फक्त मला तुझ्या जवळ घे.....म्हणत ती त्याच्या मिठी मध्ये शिरलो.....आणि त्याचा गंध, त्याचा स्पर्श, त्याच प्रेम सगळं अनुभवत होती....

अभिमन्यू दादा गाडी आली.......... अश्मी ने खालून आवाज दिला......

तिचे शब्द ऐकून निता च्या काळजात धस्स झाले......आणि तिने त्याला अजूनच घट्ट पकडले....

काळजी घे स्वतःची........लवकरच भेटू.......त्याने तिच्या कपाळावर किस केले नि तिच्या दूर झाला....त्याच्या बॅग घेऊन खाली आला.......त्याचा आर्मी चा ड्रेस मध्ये........त्याने आई बाबा ना नमस्कार केला.........खुश रहा अश्मी......म्हणत त्याने अश्मी ला आपल्या कुशीत घेतले.....

नीता मान खाली घालून अश्रू गाळत चुपचाप उभी होती.......अभिमन्यू सगळ्यांसोबत थोडा बोलून निता समोर येऊन उभा राहिला....काळजी घे......तिच्या गालावर हात ठेवत बोलून बाहेर जायला वळला......आज पहिल्यांदा जातांना त्याच मन भरून आले होते......त्याला तिच्या समोर उभे राहावत नव्हते आणि तो वळला होता......

त्याला जातांना बघून तीच मन पण रडत होत....

अभिमन्यू.....,...... आवाज देत ती त्याला जाऊन बिलगली......आणि त्याने रोखून धरलेले अश्रू त्याच्या गालांवर ओघळले......नी त्याने तिला आपल्या कुशी मध्ये घेतले......भरल्या डोळ्यांनी त्याने त्याच्या आईबाबा कडे बघितले.....नी दोन्ही हात जोडून.....डोळ्यांनीच हीची काळजी घ्या म्हणून खुणावले....

नको काळजी करू बाळा......निता आम्हाला मुलीसारखी आहे.......तू निश्चिंत रहा....नी लवकर ये.........आई ने त्याला आश्र्वासित केले......आई च ऐकून त्याच मन शांत झाले.....,. एकदा नीता च्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला नि तिला गोड स्मायल दिले........ नी गाडी मध्ये जाऊन बसला.......

त्याच्या आठवणीत ती गेली होती........त्याचा तो स्पर्श ती अजूनही अनुभवत होती.........आणि घरातला फोन खणखणला........आणि ती भूतकाळ मधून बाहेर आली.........आणि ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते...,..तो चीन सोबत झालेल्या लढाई मध्ये शहीद झाला होता....

ज्या दिवशी तो परत येणार होता , त्याच दिवशी तो तिरांगमध्ये लपेटून आला होता........

नीता नववधूच्या रुपात त्याच्या पुढे आली होती......तो शांत झोपला होता.......देशावरच्या प्रेमाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते......वाघासारखा तो शत्रू सोबत लढला होता....शत्रू ला हाकलून लावले होते.......त्याने आपलं सर्वस्व त्याच्या पहिल्या प्रेमाला अर्पण केले होते.......आज अवघ्या पंचविसाव्या वर्षी तो देशासाठी शहीद झाला होता......

नीता न रडता त्याच्या जवळ गेली होती......तिने मन भरून त्याचा चेहरा आपल्या डोळ्यात सामावून घेतला......थोडी खाली वाकत तिने त्याचा हाथ आपल्या पोटाला लावला.....नी खाली त्याच्या कपाळावर किस केले.....नी त्याचा कानाजवळ गेली....

तू आपल्या बाळा चा बाबा होणार आहेस........आपलं बाळ त्याच्या बाबा सारखं होईल.....वाघ

आज 24 वर्ष नंतर तिने अभिमन्यू ला दिलेले प्रॉमिस पूर्ण केले होते, तिचे कर्तव्य उत्कृष्ठरित्या पूर्ण केले होते.....आज अभिनित त्याच्या बाबा च्या पावलांवर पाय ठेऊन देशाची सेवा करत होता नि त्याचा परीवराच नाव उंचावत होता...

नीता समोर लावलेल्या अभिमन्यू च्या फोटो कडे बघत होती.......नी फोन वाजला.....तशी ती तिच्या आठवणीं मधून बाहेर आली.........

Mom............again I did it...... Love you mom....... अभिनित

Mom loves you beta......but little more mom loves daddy....mom loves her Abhimanyu...........take care अभिनित..,.......निता

Yeah mom I know that..,....okay I am coming there.....bye

नीता........बघ अभिनित आलाय...... अश्मी आवाज देत निता च्या रूम मध्ये आली तर समोरच दृश्य बघून शॉक झाली......

नीता ........ अश्मी जोरायाने ओरडली तसे सगळे धावत नीताच्या रूम मध्ये आले तर समोर बघून त्यांचं हृदय सुद्धा रडायला लागले.....

नीता ने अभिमण्यूचा शर्ट घातला होता....नी दोन्ही हात आपले स्वागाहालाच कवटाळून शांत झोपली होती........नेहमी साठी.........

जब देश में थी दीवाली

वो खेल रहे थे होली

जब हम बैठे थे घरों में

जब हम बैठे थे घरों में

वो झेल रहे थे गोली

थे धन्य जवान वो अपने

थी धन्य वो उनकी जवानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुरबानी

समाप्त...,......

******

ही कथा पूर्णतः कल्पनिक आहे..,याचा कुणासोबत काहीच संबंध नाही आहे......असे काही वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा....ही विनंती

*******

नमस्कार मित्रांनो......

आपले soilders फक्त आपल्या संरक्षणासाठी लढत असतात, आपल्या जीवाची आहुती आपल्यासाठी देत असतात.......पण त्या एका जीवाच्या मागे किती जीव ते सोडून जात असतात......

आपली दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांची दिवाळी त्यांनी त्यागली असते..........आणि आपण ....??

ज्यांच्या मुळे हे घडत आहे ते नाही सोडू शकत......का नाही घालू शकत चीन च्या मालावर बहिष्कार.........काय होईल जर तुम्ही चीन मधून आलेल्या लायटिंग, आकाशदिवे नाही लावलेत तर.....तुमची दिवाळी होणार नाही की होळी होणार नाही.......विचार करा मित्रांनो....

.......

कशी वाटली ही लघुकथा.....नक्की कळवा......

...........