अभिमन्यू भाग 2

अभिमन्यू निता
अभिमन्यू

पूर्वार्ध:
अभिमन्यू आर्मीमध्ये असतो. अभिमन्यूची लहान बहीण अश्मीची मैत्रीण निता अभिमन्यूच्या प्रेमात पडते. ती त्याच्या जवळ आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी जाते.

आता पुढे…..

भाग २

"मला बोलायचं तुमच्यासोबत.." निता.

"ह्मम.." अभिमन्यू तिच्यावर नजर रोखत म्हणाला.

" तू माझं आयुष्य झाला आहेस. तू माझा श्वास आहे. I Love you more than my Life." निता.

निता एका श्वासामध्ये मनातले सगळे भराभर बोलून गेली. अभिमन्यू मात्र फक्त तिच्या डोळ्यांत बघत होता. ती एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा त्याच्या सोबत बोलली होती. आणि ते पण इकडचं तिकडचं काही न बोलता, बेधडक I Love you. अभिमन्यू काहीच न बोलता एकदम शांत राहत फक्त तिच्याकडे बघत होता.

अभिमन्यूच्या डोळ्यात तिला बरीच प्रश्न दिसत होती. कदाचित त्याला तिच्या प्रेमावर विश्वास नसावा असे तिला त्याचाकडे बघून वाटले. ती हळू हळू त्याच्याजवळ गेली. तिच्या पायाच्या टाचा उंचावून त्याला काही कळायच्या आतच तिने त्याच्या मानेला एका हाताने पकडले आणि डोळे बंद करत त्याच्या ओठांवर आपल्या ओठांचा छोटासा स्पर्श केला. आणि त्याचा दूर झाली.

अभिमन्यूला काय झालं थोड्या वेळसाठी काहीच कळले नव्हते.

" मी या वाघाची वाघीण आहे. वाट बघतेय आणि बघेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. I Love U Captain!" मागे मागे जात निता ओरडली आणि बाहेर पळाली, अभिमन्यूचे काहीही एक न ऐकता.

" वाघीण! " अभिमन्यूच्या ओठांवर हसू उमटले.

********

" कॅप्टन, यावेळी बदलेले वाटत आहात? काय मग, या वाघाला फायनली प्रेम झालं तर?" राजीव, अभिमन्यूचा मित्र त्याची मस्करी करत होता.

त्याच्या बोलण्यावर अभिमन्यू ब्लश झाला, तो लाजल्यासारखा वाटत होता.

"आवडत तर ती मला दोन वर्षापासून होती. तिचं ते निरागस रूप , प्रेमाने बघणे. माझी एक झलक बघायला चाललेला तिचा खटाटोप, त्यात होणारी तिची फजिती, अगदी मी जिथे जाईल तिथे पोहचायचे, कुठल्या तरी कोपऱ्यातून मला बघत राहायचे. मला तेव्हापासूनच सगळं कळत होतं. पण आपलं हे असे आयुष्य. आपण आज आहो, उद्या नाही. मी तिला काहीच नाहीदेऊ शकत, म्हणून कधीच बोललो नव्हतो. मला वाटले मुलगी लहान आहे, विसरेल. दुसरा कुठला मुलगा तिच्या आयुष्यात आला तर मी आठवणीत पण राहणार नाही. पण असे काहीच नाही झाले.ती अजूनही तशीच आहे ,तिथेच आहे. सोबतीला आमच्या बहिणाबाई." अभिमन्यू.

" ह्मम! मग तू काय उत्तर दिले ?" राजीव.

"तिने मलाच निशब्द केले. माझ्या उत्तरासाठी थांबलीच कुठे ती, स्वतःच मला उत्तर देऊन गेली. स्वतःच माझी बनून गेली, वाघाची वाघीण." अभिमन्यू.

" मग आता तू काय करणार आहेस?" राजीव.

" तिला समजावेल. माझ्या सोबत तिचं काहीच भविष्य नाही. सुंदर आहे, हुशार आहे, मोठ्या घरची आहे. तिला चांगला मुलगा भेटेल. " अभिमन्यू.

"खरं आहे रे तुझं. माझ्या घरी पण सगळे माझ्या लग्नासाठी मागे लागतात आहेत. पण कुणा मुलीची स्वप्न आपल्यासोबत जोडायला भीती वाटते रे.." राजीव.

" हो ना. घरचे म्हणतात, का इतका नकारात्मक विचार करतात? त्यांचं पण बरोबर आहे , आपण त्यांना सुखी हवे आहोत. आपला पण परिवार असावा असे त्यांना वाटते. पण आपल्यालाच आपले माहिती नाही. पुढचा क्षण सुद्धा आपण आहोत की नाही, काहीच गॅरंटी नाही. आपण नकारात्मक विचार नाही करत. आपण फक्त रिॲलिटी सांगतो. असो बघुया." अभिमन्यू.

*******

रोज दिवसांसारखे दिवस जात होते. अभिमन्यू त्याच्या कामात व्यस्त होता. इकडे निता मात्र त्याची वाट बघत होती. त्याच्या डोळ्यात तर तिला तिच्यासाठी प्रेम दिसले होते. आणि म्हणूनच ती त्याचा इतक्या जवळ गेली होती. पण त्या दिवसापासून तो काहीच बोलला नव्हता. त्या दिवशी परत गेला तेव्हा अश्मी सोबत ती पण त्याला रेल्वेस्टेशनवर पोहचवायला गेली होती. तेव्हा पण तो काहीच बोलला नव्हता. त्याचं तिच्यावर प्रेम तर आहे, पण त्याच्या मनात काय सुरू आहे तिला काहीच कळत नव्हते. त्यानंतरही त्याने अश्मीला निताबद्दल काहीच विचारले नव्हते. त्यामुळे तो परत येईपर्यंत वाट बघण्याखेरीज तिच्याजवळ काहीच दुसरा उपाय नव्हता.

अभिमन्यू सुद्धा आपल्या कामावर फोकस करत होता. मनात कुठेतरी कोपऱ्यात त्याने निताला जपून ठेवले होते. पण त्याचे स्वप्न निता नव्हती, त्याचे स्वप्न देशाची सेवा करण्याचे होते, जे तो बखुबी करत होता.

जवळपास नऊ महिन्यानंतरअभिमन्यूला सुट्ट्या मिळाल्या होत्या आणि तो घरी आला होता.

"अश्मीssss अभिमन्यू? आलाय ना?" निता घरात पळत येत इकडे तिकडे बघत म्हणाली.

" हा, तो त्याच्या रूममध्ये आहे." अश्मी.

निताची त्याला बघायची चुळबुळ सुरु होती. ती अश्मीच्या लक्षात आली.

" निता, तू त्याचा रूममध्ये जाऊ शकतेस. आईबाबा घरी नाहीत, काही फंक्शनसाठी बाहेर गेले आहेत." अश्मी.

" खरंच जाऊ?काही प्रोब्लेम तर......." निता.

"अग हो जा. मला माहिती आहे तू कधीची त्याची वाट बघते आहेस. मॅडम मला माहिती प्रेम म्हणजे काय असतं. मला कळतात त्या भावना..जा......नको काळजी करू, मी आहे इथे." अश्मी.

निता पळतच वरती त्याच्या रूमजवळ आली. पण आतमध्ये जाऊ की नको, तिचे धाडस होत नव्हते. ती या आधी कधीच त्याच्या रूममध्ये गेली नव्हती. बऱ्याच वेळ विचार करून तिने त्याच्या रूम चे दार ठोठावले.

" आत ये , दार उघडे आहे अश्मी." अभिमन्यू बेडवर लेटून पुस्तक वाचत होता.

निताने हळूच दार उघडले आणि आतमध्ये येऊन उभी राहिली. ती शांतपणे मनभरून अभिमन्यूला बघत होती. आज पहिल्यांदा तो इतक्या दिवसांनंतर घरी आला होता. नाहीतर नेहमी सहा महिन्यांनी यायचा. त्यात ती, त्याची यावेळी खूप वाट बघत होती. तिने त्याला तिच्या मनातले सांगितल्या पासून त्याला भेटण्याची तिला खूप आतुरता होती.

"अश्मी, काय काम आहे? बोल?" अभिमन्यू त्याच्या बुकमध्ये बघतच बोलत होता.

निताला मात्र काहीच ऐकू गेले नव्हते. ती त्याला बघण्यात गुंग झाली होती.

उत्तर, आणि काहीच आवाज न आल्यामुळे अभिमन्यूने त्याची नजर वर केली तर, समोर निता त्याला बघत उभी होती. तिला असे एकदम समोर बघून त्याने हातातले बुक बाजूला ठेवले आणि उठून उभा राहिला.

" निता! " आज पहिल्यांदा त्याने तिचे नाव उच्चारले होते.

त्याच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिचे मन खूप भरून आले होते.

तिच्या डोळ्यात आज पहिल्यांदा त्याने अश्रू बघितले होते. तिच्या डोळ्यातले पाणी बघून त्याचा सुद्धा काळजात त्याला दुखल्यासारखे झाले. तिला आपल्या कुशीत घ्यावे, असे त्याला वाटून गेले. पण तो चुपचाप निताकडे बघत उभा होता..

निता हळू हळू चालत त्याच्या जवळ जात होती. आणि पुढे होत क्षणाचाही विलंब न करता पळतच त्याच्या कुशीमध्ये शिरली. तिचं हृदय खूप जोरजोराने धडधडत होते. इतके की तिच्या काळजाचे ठोके त्यालापण जाणवत होते. त्याचा दुरावा यावेळी तिला असहाय्य झाला होता. आणि काहीच विचार न करता ती त्याचा कुशीत गेली होती. आणि मन मोकळे होईपर्यंत चुपचाप त्याला बिलगून आसवे गाळत होती. अधूनमधून तिला हुंदके येत होते. नकळतच अभिमन्यूचे हाथ तिच्या भोवती घट्ट झाले. त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि परत तिला आपल्या कुशीमध्ये घेतले. दोघेही अबोल होते. फक्त एकमेकांना अनुभवत होते.

******
क्रमशः

🎭 Series Post

View all