Login

अभिमन्यू भाग १

Soilder's Love
अभिमन्यू
भाग १



"कॅप्टन, बघ तुझा मुलगा कॅप्टन अभिनित, अगदी तुझ्यासारखा. त्याचा आज गौरव होतोय, भारतमाता समोर, सगळ्यांसमोर. माझं कर्तव्य पूर्ण झालं, आता तुझ्याजवळ यायला मी मोकळी." नीता अभिमन्युच्या फोटोपुढे उभी होती आणि टीव्हीवर येणाऱ्या बातम्यांमधून तिच्या मुलाचा सत्कार होतांना बघत अभिमन्यू सोबत बोलत होती.. 

"बघ अगदी तुझ्यासारखा दिसतो, तुझीच झेरॉक्स कॉपी. स्वप्नं पण तुझ्यासारखी आणि तुझ्यासारखेच भारतमातावरचे प्रेम. तू पण 24 वर्षाचा होता तेव्हा आगदी असाच होता." बोलता बोलता निता भूतकाळात हरवली.


"नीता, तू चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीय. तो फक्त आणि फक्त भारतमातावर प्रेम करतो." निता जी अभिमन्यूला बाहेर गार्डन एरिया मध्ये एक्सरसाईज करतांना बघत होती, तिला अश्मी म्हणाली...

            अभिमन्यू 23 वर्षाचा खूप महत्वाकांक्षी, आर्मीमध्ये, दिसायला गव्हाळ रंग, 6.2 फूट उंची. आर्मीमध्ये आहे म्हटल्यावर कसलेला बांधा, मजबूत बाहू, बारीक कापलेले केस, ब्रॉवून पण तेवढेच करारी डोळे, धारदार नाक, ओठांवर सकारात्मक्तेची स्मायल. पण शांत स्वभावाचा. समज आल्यापासून भारतमातेच्या सेवेची स्वप्नं बघत आलेला राजबिंडा मुलगा. अशा या करारी मुलाच्या दोन वर्षापासून प्रेमात पडलेली नाजुकशी , सुंदर, बोलके डोळे असलेली 20 वर्षाची निता, एका मोठ्या बिझनेसमनची मुलगी. 

           नीता, अभिमन्यूची लहान बहीण अश्मीची मैत्रीण.. बारावी झाल्यानंतर दोघी एका कॉलेजमध्ये दोन वर्ष पासून शिकत होत्या. आता त्या b.com च्या फायनल ईएरला होत्या. दोन वर्षापूर्वी जेव्हा अभिमन्यू सुट्टीमध्ये घरी आला होता. तेव्हा पहिल्यांदाच बघितले आणि त्याचा प्रेमामध्ये पडली, " Love at first sight" म्हणतात तसेच काहीसे नीता सोबत झाले होते. आणि तेव्हा पासून जेव्हाही तो सुट्ट्यांमध्ये घरी यायचा, निता फक्त त्याला बघत असायची..ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे अश्मीला सुद्धा कळले होते. अश्मीने तिला बरेचदा समजवले होते की अभिमन्यू कुठल्याच मुलीला जवळ फिरकू सुद्धा देत नाही. त्याचं फक्त त्याचा कामावर अतिशय प्रेम आहे. पण दिलके हातो मजबूर असं काहीसं निताच झालं होतं. कॉलेजमध्ये इतकी मुलं मागे असूनही ती फक्त आणि फक्त अभिमन्युच्या प्रेमात होती. 

"नीता, तुझं काहीच होऊ शकत नाही. इतकं वेड्यासारखं प्रेम करते त्याच्यावर, तर एकदा बोल तरी, त्याला कळू तरी दे. नाहीतर मला तरी सांगू दे?" अश्मी. 

" नको ग, भीती वाटते. नाही म्हणाला तर...?? माझा त्याला बघायचा हक्क सुद्धा जाईल. नको नको जाऊ दे." निता. 

"ये डरपोक बाई, एका आर्मी ऑफिसरवर प्रेम करते तर असे घाबरून कसे चालणार आहे? आर्मी ऑफिसरवर प्रेम करणं सोपं नसतं, त्यासाठी वाघिणीचे काळीज लागते. ते ऐर्यागैऱ्याचे काम नाही. फार मजबूत मनाचं माणूस लागतं. तू सोड त्याचा नाद, चल कॉलेजला उशीर होतोय." अश्मी.


"मला त्याचासमोर, माझं प्रेम व्यक्त करायला भीती वाटत नाही. मला फक्त त्याच्या नकाराची भीती वाटते. जर तुझा भाऊ वाघ आहे तर मी सुद्धा वाघीण आहे." नीताच्या आवाजात जरब होता. 

"हो ना, मग जा, आताच बोलून दाखव. आज त्याच्या सुट्ट्या संपत आहेत...तो दुपारी परत जातोय, आता तो सहा महिन्यांनीच येईल. ते पण काही इमर्जन्सी नसेल तरच त्याला सुट्ट्या मिळेल. " अश्मी. 

" तो आज परत जातोय.." अश्मीचचे बोलणे ऐकून निताच्या डोळ्यात पाणी तरळले. 

" बघ, तो जातोय हे ऐकूनच तुला त्रास व्हायला लागतो. प्रत्येक वेळी तुझं असेच असते. जा ना, सांग ना त्याला..त्याला पण कळू दे कुणीतरी त्याची इथे वाट बघतेय. त्याच्यावर पण कुणीतरी जीव ओवाळून टाकतय. हातातून वेळ निघून जायच्या आधी बोल." अश्मी. 

" हातातून वेळ निघून जायच्या आधी.. " ऐकून नीताने एकदा अश्मीकडे बघितले. 

" हो, जा. कुणीच नाहीये इथे, तुला निवांत बोलता येईल. आणि मी आहेच इथे. लक्ष ठेवेल. जा आता." अश्मी.

नीताने होकारार्थी मान हलवली आणि अभिमन्यू एका ठिकाणी बसून डंबल्स एका हातात पकडून व्यायाम करत होता तिथे पुढे हळू हळू गेली आणि त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. 

      तिची चाहूल लागताच अभिमन्यूने वरती बघितले. तिच्या डोळ्यात त्याला खूप वेगवेगळे भाव दिसत होते. त्याने हातातले डंबल्स खाली ठेवले आणि उठून उभा राहिला. 

" मला बोलायचं तुमच्यासोबत" निता.