अभिमान

this is a lalit lekh on pride

अभिमान

संध्याकाळी बाजारातून फेर फटका  मारून येत असताना एका फुलांच्या दुकानाशी थांबले . थांबले म्हणजे त्या रंगी बेरंगी ताज्या टवटवीत फुलांना बघून पाय निघेच ना तिथून . शेवटी काही खास कारण नसताना सुद्धा मी त्या  फुलवाल्याकडून ५ लाल गुलाब , २ पिवळे गुलाब ,  घेऊनच घरात आले . जशी ती फुले माझ्या हातात आली तसा वेगळाच आनंद मला होत  होता .. त्या फुलांच्या सुगंधाने मन हर्षित आणि उत्साहित झाले .

घरात आल्या आल्या पायावर पाणी घेतले आणि स्टुलावर चढून वरच्या कपाटात ठेवलेला मस्त फ्लॉवर पॉट खाली काढला .... आणि आता कपाट बंद करून ठेवणार तोच खोट्या फुलांचा एक रेडिमेड फ्लॉवर  पॉट जो मी आवडीने घेतला होता तो बाहेर डोकावू लागला .. जसा कि तो मला खुणावत होता .. “एवढा घेतलंस आहेस मला तर  मला पण बाहेर कधी आणि ठेव कि .. “

घेताना आपण आवडीने वस्तू घेतो पण काही दिवसाने त्याच वस्तू अडचण वाटू लागतात आणि मग असा वरच्या कपाटात जाऊन बसतात ..

त्या प्लास्टिक च्या फ्लॉवर पॉट ला साबणाच्या पाण्यात भिजत घातले आणि या डेकोरेटिव्ह रिकाम्या फ्लॉवर पॉट ला  हलक्या हाताने ओल्या कापडाने पुसले .. आणि मग त्यात थोडे पाणी टाकले आणि हि आत्ता आणलेली ताजी टवटवीत गुलाबाची फुले मी त्या फुलदाणीत ठेवली आणि मस्त टीव्ही च्या शेजारी विराजमान केले त्यांना .. काय फ्रेश वाटत होते .. त्या गुलाबाच्या फुलांचा  हलका सुगंध घराला मोहून टाकत होता .. पाच एक मिनिटांनी त्या प्लास्टिक च्या फुलदाणी ला स्वच्छ पाण्यात धुतले तसा  तो पण एकदम नवीन आणि सजीवच दिसू लागला .. त्याला एक कापडाने सुके केले आणि टिव्ही च्या दुसाऱ्या  बाजूला  त्याला  विराजमान  केले .

फुलांनी घराला एक वेगळेच रूप आले होते .. हॉल  तर असे वाटे कि सणा समारंभाला सजवतो तसेच वाटू लागले ..

सहज मनात विचार आला .. लांबून बघितले तर खरी  कोणती आणि खोटी कोणती हे कळतच नाहीयेत ..हि कृत्रिम प्लास्टिक ची फुले पण इतकी हुबेहूब बनवली आहेत कि ती खरीच भासत आहेत  आणि खऱ्या फुलांना ती एक प्रकारे शह देत होती .

घरात येणार प्रत्येक जण त्या दोन्ही फ्लॉवर पॉट ला बघून खुश होत आणि उगाचच दोघांमध्ये कम्पॅरिजन करत

कोणी म्हणे " खरं ते खरं .. खोटें ते खोटें च .

कारण खऱ्या फुलांना सजीवता आली होती ते सुगंधाने .. सुवासाने .. खऱ्या फुलांच्या सुगंधाने आत्म्याला आंतरिक शांती मिळत होती . म्हणूनच कि काय सर्वांना खऱ्या फुलांनी जास्त आकर्षून घेतले .

आज या खऱ्या आणि खोट्या फुलांना एकमेकांसमोर बसवल्याने माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार येत होते .. एक क्षण मला असे वाटले कि खऱ्या फुलांना आता थोडा अहंकार किंवा अभिमान आला आहे .. शेवटी ते पण सजीवच हो .. त्यालाही भावना असतीलच ना .. गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात .. त्याचा रुबाब काही वेगळाच नाही का ?

गम्मत अशी झाली दोन दिवस खऱ्या फुलांची ऐट काही वेगळीच होती .. मी पण ती जास्त टिकावी म्हणून पाणी बदल .. त्यांचे थोडे खालचे देठ काप वगैरे असे प्रकार केले तरी पण बिचारी  हि खरी फुल कोमेजायला  लागली .. सुकायला लागली .. त्याची सुदंरता कमी होऊ लागली .. त्याचा रुबाब कमी होत होता .. एकेक पाकळी गळू लागल्या .. आणि तिसऱ्या दिवशी त्या फुलांना घाण वास येऊ लागला .. आणि त्या वासावर बारीक केम्र येऊ लागली ..

इतक्यात माझे लक्ष त्या प्लास्टिक च्या कृत्रिम फुलांकडे गेले . ती मात्र जशी होती तशीच दिसत होती .. त्या खऱ्या फुलांचं आपल्या आजू बाजूला असण्याचा त्यांना काही फरक पडत नव्हता .. ती जशी वरती कपाटात होती तशीच ती आता तीन दिवसानंतरही छान दिसत होती ..

आता मी जर खऱ्या फुलांना एक दिवस जरी घरात ठेवले असते तर घरात सगळीकडे दुर्गंध पसरला असता .. त्यामुळे साहजिकच मला त्यांना कचरा पेटिट टाकावे लागले .

 खोट्या फुलांना गर्व ना अभिमान म्हणूनच बहुदा त्यांना अमरत्व मिळले असावे !!!

लिंक क्लीक करून पहा .. ऐका आणि शेअर करायला विसरू नका ..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1075606452923873&id=581606972323826