लाल दिव्याची गाडी

अलख
#अलख

*आई*

तीन महिन्याचा राहिलेला गर्भ हा मुलीचा आहे ,
हे जेंव्हा घरात कळले
तेव्हा घरात तांडव सुरू झाले .
नवरा - सासू सासरे
सारे हिच्या विरोधात ...
पण ही
ही मात्र तेवढीच ठाम ...
कुणाला कधीही काहीही विरोधात न बोललेली ही
आज मात्र आपल्या पाडसासाठी पेटून उठली होती .
कुणालाही न जुमानता नऊ महिने काढले ,
हातात आलेले ते गोजिरं रूप पाहून सारे हरवून गेले ...
आज पंचवीस वर्षाने जेंव्हा
घराजवळ लाल दिव्याची गाडी येऊन थांबते
तेंव्हा सर्वात जास्त अभिमान हिला वाटतो ...
आपल्या पाडसाचा ...
?

*©®मीनल सचिन*