आभासी जगातील मी निवडलेले रत्न .

आभासी जगातील मी निवडलेले रत्न...
आभासी जगातील मी निवडलेले रत्न !!   

फेसबुक वर अकाउंट नसलेली मी. बाकी सगळ्यांचे अकाउंट आहे म्हणून मीही सहज ह्या सोशल मीडियामध्ये सामील झाले. फक्त इतरांचे फोटो लाईक करणे , छान छान पोस्ट वाचणे इतकाच काय तो माझा विरंगुळा होता. वर्तमानपत्रात लिहिणारी मी ! फेसबुक वर पण लिहू शकते हे जेव्हा कळले तेव्हा कसलाही विचार न करता mom'spresso ला लिहू लागले. तिथे मला चांगल्या वाचकांसोबतचं चांगल्या मैत्रिणी सुद्धा मिळाल्या. खरंतर फेसबुक वर झालेली आमची ओळख आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात झालेले बदल हे माझ्यासाठी मात्र फार सुखद आहेत. 

एफबी ला झालेली पहिली ओळख , मैत्रीण म्हणजे दिप्ती . फार सुंदर कविता , कथा लिहिते ती . त्या वेळी असलेली टॉप ब्लॉगर म्हणजे दिप्ती. हळव्या मनाची , स्वतः चे कामे बाजूला सारून आमच्यासाठी वेळ काढणारी दिप्ती मला फार भावली. तिच्या नंतर हळू हळु कळायला लागलं की ये एफबी तो बडे काम की चीज है. इथे चांगल्या चांगल्या मैत्रिणींची काही कमी नाही. म्हणून एक एक करून मैत्रिणींची एक साखळी तयार झाली आणि त्या साखळीला मी नाव दिले ब्लॉगर्स कट्टा ! माझा जीवा भावाचा कट्टा . इथे सगळ्याचं जणी आपले सुख दुःख शेअर करतात. चंगळ करतात. एकमेकींची खेचतात देखील. सगळ्यांचा एकमेकींना असणारा सपोर्ट ,एकमेकींना दिलेली कौतुकाची थाप , काही चुकल्यास केलेली कान उघाडणी सुद्धा खूप काही देऊन जाते. इथे कुणीच लहान किंवा मोठे नाही. सगळेच सारखे आहोत. प्रत्येकीची लिखाणाची शैली वेगळी , स्वभाव वेगळा. ह्यांच्याकडे बघून कायम वाटतं की मी आयुष्यात खूप काही मिळवलं. गेल्या कित्येक दिवसात मी ब्लॉगर्स कट्ट्यावर ॲक्टिव नाही. पण आठवण मात्र सगळ्यांची येते. 

माझ्या वाढदिवसाला ह्या सगळ्यांचा येणारा फोन म्हणजे माझ्यासाठी मोठं गिफ्ट असतं. किती निरागस नी सोन्यासारखी असते ना ही मैत्री ? 

पुण्यात ज्या मैत्रिणी राहतात त्या एकदा सगळ्या भेटल्या .त्यांनी फार धम्माल सुद्धा केली. आमची मात्र भेट अजूनही घडलेली नाही , कारण सगळ्याचं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात . इकडे मात्र दिप्ती आणि मीचं फक्त भेटलेलो..बाकी रत्न मात्र न भेटताच कॉन्टॅक्ट मध्ये राहिलीत , राहतोय आणि कायम कॉन्टॅक्ट मध्ये असू , न भेटता देखील ! आम्ही कसे काय एकत्र आलोत ? आणि जिवाभावाच्या मैत्रिणी झालोत हे कळलं देखील नाही.. बरं ! रोजचं बोलतो असेही नाही.. कट्ट्यावर प्रत्येकीची हजेरी असतेच असेही नाही.. पणं मनाची नाळ घट्ट जुळल्या गेलीये हे मात्र खरं.. 

मनात उठलेलं वादळ ह्यांच्याकडेच शांत होत.. ह्यांच्याशी बोलून , शेअर करून खुपचं छान वाटतं.. एक अनुभव तुम्हाला सांगावस वाटतं. तो म्हणजे असा की संजना आणि अश्विनीचा ( आमची संजू आणि आशू ) गेल्या वर्षी आशूचे मिस्टर
स्ट्रिक्ट लॉकडाऊन मध्ये विदेशातून मायदेशी म्हणजे आपल्या भारतात परतले...
त्यावेळी त्यांचा मुंबई ते नागपूर बसने सोय करण्यात आली होती...
आधीच covid restriction मध्ये सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करून थकले होते त्यातून विदेशातून आल्यामुळे स्वतःकडे खाण्या पिण्याची काहीच सोय नव्हती...
बाहेरून घेण्यासाठी जीव धजावत नव्हता...
प्रवास सुरु झाला ते या सगळ्या चिंताजनक परिस्तिथी च..
बस नाशिक मधून येणार होती त्यामुळे संजूच्या helping nature मुळे तिच्या अहोंनी आशूच्या आहोंची आणि सोबत असलेल्या त्यांच्या फ्रेंड्स ची संपूर्ण जबाबदारी बिनधास्त पणे उचलून घेतली आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली.. एक वेळचं च नाहीतर अगदी पूर्ण प्रवासात त्यांना पुरेल एवढं सगळं दिलं ते ही काही ओळख-पाळख नसतांना म्हणजे आम्ही फक्त virtual friends... एकमेकींना कधी भेटलो नाही की पुरेशी ओळख नाही पण आमची मैत्री ईतकी पक्की आहे की त्यातून हवी तशी होईल तेवढी मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो... त्यातून फक्त निखळ आनंद मिळतो... आणि आमच्या मैत्रीला तेवढं खतपाणी पुरेसं आहे... 

ते म्हणतात ना friend in need is a friend indeed...
हीच आमच्या मैत्रीची speciality आहे
कितीही दूर असलो तरीही मनाच्या अगदी जवळ आहोत...

 प्रसंग छोटा पणं आशूच्या मनात संजुची असलेली प्रतिमा आणखीनच उजळून निघाली .. कोण संजना? कोण अश्विनी ? फेसबुक वर झालेली ओळख अडचणीच्या वेळी कामाला येत असेल तर ती ओळख फेसबुक पर्यंतच मर्यादेत राहत नाही..
ती नाती अगदी जीवा भावाची नी घट्ट होऊन जातात .

नंतर मात्र संजुच्या वाढदिवसाला आशुने तिच्यासाठी गोड गोड केक पाठवून एक छोटीशी भेट सुद्धा दिली..

फेसबुक वर तुम्हालाही छान छान मैत्रिणी मिळाल्या आहेत का ? तुमचेही अनुभव वाचायला आवडतील मला. तुम्हीही लिहू शकता आपल्या ॲप वर , मी वाट बघतेय.. अशाच आगळ्या वेगळ्या मैत्रीची !

चला तर मग , वाट कसली बघताय ? लिहा पटापट...