अभंग

संताची परंपरा




किती संत झाले॥ संत परंपरा॥
शुशोभित धरा॥ सदा झाली॥१॥

संत ज्ञानेश्वर ॥ ज्ञानेश्वरी लिहे॥
जगसारे पाहे॥ माऊलीला॥२॥

संत एकनाथ ॥ अनाथांचे नाथ॥
भारुडाची साथ॥ वारकरी॥३॥

संत जनाबाई ॥ मराठीची आई॥
तिच्या विना नाही॥ भक्तिमार्ग ॥४॥

परंपरा चाले॥ संताची पाऊले॥
दिंडित त्या चाले॥ यात्रेत त्या॥५॥

संत मुक्ताबाई ॥ संत जनाबाई ॥
भावभक्ती ठायी॥ माऊलींच्या॥६॥

शेकडो वर्षांची॥ परंपरा चाले॥
मोहन हा डोले॥ भजनात ॥७॥

मोहन सोमलकर नागपुर