Mar 01, 2024
वैचारिक

आयुष्यावर बोलू काही

Read Later
आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

सुख दुःखाच्या धाग्यांमध्ये गुंफलेले असते आयुष्य .मनात उमलणाऱ्या  भावनांमधे दडलेले असते आयुष्य .. आईच्या उदरात असते आयुष्य .. निसर्गाच्या काना  कोपऱ्यात असते आयुष्य .. फुलांच्या सुगंधात असते आयुष्य .. तुमच्या माझ्या असण्यात असते आयुष्य .. प्रेमाने घेतलेल्या मिठीत असते आयुष्य ..

पहिला  श्वास आणि शेवटचा श्वास या  दोघां  मधील अंतर म्हणजेच आयुष्य .. एकदम सिम्पल गणित आहे ना आयुष्याचे .. तरीही किती गहन आहे .. शाळेतल्या भिंतीवर एक सुविचार लिहलेला  असायचा   " मरावे परी कीर्ती रुपी उरावे " आयुष्य कसे असावे? तर याचे उत्तर मला तरी हा सुविचार आहे ना तोच वाटतो. एक माणूस जन्माला आला आणि मरून गेला असे आयुष्य नसावे हे मात्र नक्कीच .. प्रत्येकाची वाट हि वेगळी असते .. प्रत्येकाचा संघर्ष हा सुद्धा वेगळा असतो ..  कोणाला बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर कोणाला आत्मसन्मान जपण्यासाठी संघर्ष करावा लागतो .. थोडक्यात काय तर या आयुष्यावर बोलायचं म्हंटले ना आयुष्य पुरायचे नाही.

आयुष्य जगताना आपण नेहमी असे म्हणतो कि पुरेपूर जगावे म्हणजेच काय तर सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत घेत जगायचे .. आनंद .. अत्यांनंद .. परमोच्च आनंद .. सुख .. हे असे शब्द किती मनाला उभारी देतात .. रडत कुढत जगण्यापेक्षा आयुष्य हसत खेळत जगावे .. मग कोणी सांसारिक , कोणी सन्यास , कोणी परमार्थ .. कोणी आध्यत्मिक अशा वेगवेगळ्या दृष्टीने या छोट्याश्या आयुष्याकडे बघतात ..

व पु काळे यांनी लिहून ठेवलंय

अत्यंत महागडी , न परवडणारी , खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य !

 गम्मत आहे नाही का ? खरोखऱ आपण मोलाचे अनेक क्षण हे फुकट घालवत असतो .. उधळत असतो .. राग , रुसवा , फुगवा हे तर बाजूलाच मी तर  म्हणेल कि त्यात सुद्धा आपण काहीतरी करत असतो  .. कसे आहे ना वेळ कोणासाठी थांबत नाही .. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून घेणे हेच खरे आयुष्य जगणे आहे असे मला वाटते .. आता हा सदुपयोग आपल्या दृष्टीने कशात आहे हे हि व्यक्ती परत्वे बदलते .. याचाच शोध घेणे म्हणजे मिळालेल्या आयुष्याचा  सदुपयोग करणे आहे .. शास्त्रज्ञांना शोध लावण्यात , लेखकांना लिहण्यात , वाचकांना वाचण्यात , विद्यार्थ्यांना अभ्यासात , खेळाडूंना खेळात आयुष्य दिसते ..

माणूस मरे पर्यंत शिकत असतो .. चुका झाल्या तर झाले गेले सोडून द्या उद्याचा दिवस हा नवा आहे आणि नवा दिवस नवा विचार घेऊन येतो ...

स्वतः भोवती आपणच एक रिंगण घालून घेतो आणि त्या रिंगणातून बाहेर पडता येत नाही .. आणि मग तेच रिंगण आपल्या साठी चक्रव्यूह बनते . त्यातुन जर वेळेत बाहेर पडता आले नाही तर मानसिक त्रास  आणि त्यातून येणारे नैराश्य हे जीव घेणा आजरच आहे जो कि आनंदी आयुष्याला लागलेली कीड आहे.

म्हणून तर म्हटले आहे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा  शिल्पकार ”.. एक वेळ अशी येते  कि आपली मदत हि आपणच करायची असते ..  तुमच्या माझ्यात , लहान मोठ्यात किंवा पुरुषांमध्ये सुद्धा हि कीड दिसून येऊ शकते. ..नैराश्य हे कोणाला हि येऊ शकते .. त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः लाच  प्रयन्त करावे लागतात ..

. "तूच आहेस तुझा रक्षक" .. मनातील येणाऱ्या वाईट विचारांवर विजय मिळवता आला पाहिजे .. वेळ आली तर नामःस्मरण करा .. दासबोधात सांगितले आहे कि मनातल्या विचारांवर विजय मिळवण्यासाठी देवाचे नामःस्मरण करा ..सगळे वाईट विचार पळून जातील.

आपले मन हे लहान मुलासारखे असते मनाला  नेहमी कशात तरी गुंतवून ठेवावे लागते .. तसे नाही केले तर जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीत राग ,द्वेष , मत्सर अशा नकारात्मक विचारांना थारा मिळत जातो .. तेच जर मन खळखळत्या झऱ्या सारखे ठेवले तर घाण पाणी साचून च नाही दिले तर विचार पण फ्रेश येतात .माणूस स्वतः वर प्रेम करू लागतो कारण त्याला कळते माझ्यामध्ये पण चांगल्या qualities आहेत .. नाही कोणाला दिसल्या तरी माझ्या मला माहित आहेत त्याने  मनाला उभारी येते.

माझे आयुष्य हे इतके फालतू नक्कीच नाहीये कि दुसऱ्या ने मला त्रास दिला म्हणून मी संपवून टाकावे . माझे आयुष्य हे मी कसे जगावे   हा माझा आणि फक्त माझाच निर्णय असला पाहिजे .. रडत जगायचे कि हसत .. जर हसत जगायचे असेल तर मनाला आनंद वाटेल असेच काम करेन आणि माझ्या मनाने ते काम मी केलय तर त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील ते नक्कीच मीच सहन करेन तेही आनंदाने  . रडत कुढत आयुष्य जगण्यापेक्षा  चांगलं आयुष्य जगण्याकरता  प्रत्येक जण ज्याला जे पटेल तेच वागत असतो .. दुसऱ्याला दोष न देता आपणच प्रयत्न “केल्याने होतं आहे रे आधी केलेच पाहिजे.,, असा दृष्टीकोन आयुष्य जगताना असला पाहिजे.

 

आयुष्य  जगावे असामान्यांचे

मरून सुद्धा जगणाऱ्यांचे

आयुष्य असावे असे निराळे

कमळा सारखे चिखलात उमलणारे !!

 

तोडून टाका हि बंधने

जगू द्या मला माझ्या रीतीने

तुम्ही जे करता तेच मी करेन

पण जरा वेगळ्या पद्धतीने !!

 

आपल्यातले वेगळेपण शोधून त्या वेगळे पणावर काम केले तर काम करायला नक्कीच आयुष्य कमी पडेल.!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//