Login

आयुष्यात परत न येणारे दिवस...

Old memories

आयुष्यात परत न येणारे दिवस......                                                        मोठ झालेल्या प्रत्येकाला मधली सुट्टी हवी असते ... जुन्या आठवणीच्या बाकावर शाळा अगदी नवी असते .... चल आज सर्व आपापल्या बालपनात, उन्हाळ्याचा सुट्या आता संपत आहेत आठवण करा ती मनात असलेली लगबग....नविन वर्ग,नविन विषय.. मित्रांनो आठवत का काही की...! की गेले विसरून तस कोणीच विसरले नसतीलच पण खुप मोठा फरक पडला आहे साध्य चा generation मधे........                                                                   आठवतो का शाळेचा पहिला दिवस.... नवीन दप्तर, नवीन वह्य़ा, नवीन पेन,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे...नवीन वर्ग आणि नवे मित्र कुणी हसायच तर कूणी रडायच.किती छान होते ते बालपणीचे दिवस.पण आता ते बालपण कधीच नाही येणार नाहीत missing वाटत न सर्व मित्रानो तुम्हाला आठवत का लहानपनी सर्व एक प्रश्न करायचे तुला काय बनायच आहे......?                                                                         पण लहान असतांना उत्तर कधी सपडलच नाही... पण आज कोणी विचारल तर उत्तर एकच राहील...... मला पुन्हा लहान व्हायच आहे मित्रांनो लहान व्हायसाठी कोणत्या अश्या दिवसाची आवश्कता नसते आपण रोजच असल काही करू शकतो.पण आनंद तो कशात तो शोधावा अपल्यालाच लागतो....म्हणून मस्त अस जगा की तुम्हाला आनंद होईल अस आणि हो दूसऱ्याना पण आनंद वाटा.                                                       लहानपणाची मस्ती आठवा...खरच खूप सुंदर आणि अविस्मरणीय काळ असतो ते म्हणजे बालपण...... मस्ती, शाळेतून पडून घरी येणे, मित्र-मैत्रीनी सोबत मधल्या सुट्टीत जेवनाचा डबा शेयर, मास्टरांची शिक्षा आणखी बरेच काही.....पण आता सर्व आठवीनी उरल्या आहेत.माझ्यामते बालपणात डोकाउन बघा आयुष्य खुप सुंदर वाटत..... मित्रांनो आता तरी आठवल का बालपन............????                                                                     मोठ झालेल्या प्रत्येकाला मधली सुट्टी हवी असते ... जुन्या आठवणेच्या बाकावर शाळा अगदी नवी असते ...