Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

आयुष्याच्या वळणावर

Read Later
आयुष्याच्या वळणावर


राज्यस्तरीय करंडक स्पर्धा कविता फेरी
विषय:- मीच माझा शिल्पकार
कवितेचे नाव:- आयुष्याच्या वळणावर

जन्मदाता पिता माझा, प्राणप्रिय सखा तूच रे..
जातिभेदापायी सोडले बापास, पती माझा तूच रे..

शब्दसरशी शब्द माझे, तुझेचं आहे गीत ते..
शरिर माझे हृदय माझे, श्वास फक्त तूच रे..

आई-भाऊ-बहीण तुझे केले मी आपलेसे रे..
सगळ्यांना एका माळेत बांधून ठेवले.. संसार माझा हाच रे..

कळी उमलली संसार वेलीवर,गोड आपुली परीराणी..
दुनिया तुला तिच्या पुढे वाटे शून्य सारी..

एके दिवशी अचानक वादळ आले माझ्या दारी..
शब्द तिचे कानी घुमता विक्राळ होई माझ्या उरी..

संसार तुझा असला तरी..तो फक्त माझा होता आणि माझाच आहे.
दोघांत तिसरी आली म्हणून वाट त्याची ती दारातचं पाहे

मला पाहता नजरेसमोर आणि सोबतीस माझ्या ती..
शरमेने नजर झुकली त्याची, डोळ्यात जागा आसवांची..

का केलास तू दगा असा, कमी मी पडले होते का?
संसार आपला पाच वर्षांचा मी एकटीच सांभाळत होते का?

चुकलो मी माफ कर मला म्हणतचं फोडला त्याने टाहो
हात झिडकारूनी त्याचा म्हणे आता थांबू मी? का हो??

वणवण करुनी लेकिसोबत गाठीले तिने आश्रम ते
कामं, शिक्षण पूर्ण करण्यास्तव घेतले कठोर परिश्रम ते

आयुष्यात खऱ्या न हरता फक्त स्वतःवर विश्वास ठेवला फार
मेहनत खूप घेऊनी तिने दिला आयुष्याला नवा आकार
खूप मोठी वकील होता..म्हणे..
मीच माझी शिल्पकार मीच माझी शिल्पकार

@श्रावणी लोखंडे@
जिल्हा पालघरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading

//