Feb 26, 2024
वैचारिक

आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर

Read Later
आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर
*आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर*

नेहमीप्रमाणे आजही सुमती बागेमधील बाकड्यावर बसल्या होत्या आणि

“हाय मिस माने” त्यांच्याच वयाच्या एका व्यक्तीने त्यांना हाक मारली.

सुमतींनी आवाजाच्या दिशेने पाहिले. विचार करून आपल्या बुध्दीला ताण देत असताना एकदम त्यांच्या लक्षात आल आणि त्या आश्चर्याने बोलल्या.

“ माधव कुलकर्णी”

“ येस..अगदी बरोबर ओळखलेस ;

माधव कुलकर्णींना पाहून सुमतीला खूप आनंद झाला.

“ बसा ना”.माधवला जागा देत सुमती म्हणल्या.

“ कम ऑन एकाच वयाचे आहोत आपण त्यामुळे एकेरी बोलू शकतेस.” हसत हसत माधव सुमती शेजारी बसत म्हणाले.

“कसा आहेस?”

“कशी आहेस?”

दोघेही एक साथ म्हणाले.

किंचितसा ऑकवर्डनेस दोघांमध्येही होता.

“ मी बरी आहे.”

“ मी पण बराच आहे.”

“ मध्यंतरीचा काळ कसा भुर्रकन उडून गेला न! आणि आता आयुष्याची सांज वेळ आली. खूप काही शिकवून गेलं र आयुष्य ”. सुमती

“हो ना..! कुठे ते निरागस बालपण आणि कुठे हे अनुभवाची शिदोरी असलेलं जीवन किती फरक आहे” माधव

“पण या शहरात तू कसा?” सुमती

“तुझ्याखातर”

सुमती आश्चर्याने माधवकडे बघतात.

“ अजूनही विसरला नाही का?”

“ नाही”

“ अरे ते एक अल्लड वय असतं आकर्षण असते . बी प्रॅक्टिकल मधू सॉरी माधव”

“मधूच म्हण आवडेल मला. आणि प्रेमाचं म्हणशील तर खरचं माझे तुझ्यावर प्रेम होतआणि आजही आहे. पण त्यावेळी कधी हिम्मतच झाली नाही तुला सांगायला आणि दहावी नंतर तर तूच निघून गेली. ”

“ह्मम. बाबांची बदली मुळे आम्ही सर्व दुसऱ्या गावी गेलो. तिथेच बी. ए. पूर्ण केलं त्यानंतर लग्न झाल आणि केळकरांची सून झाली.मग मुलं आणि घर सांभाळण्यात आयुष्य गेलं.
हया सर्व गोष्टींमुळे आपोआप सर्व मागे पडत गेलं. मुल मोठी होत गेली आणि घरट्यातून कधी भुर्रकन उडून गेली कळलेच नाही आणि आता एकटे जीवन वाट्याला.” सुमती एक सुस्कारा सोडत म्हणाल्या.

“ह्मम…..हाच तर नियम आहे. पिल्ल मोठी झाली की त्यांना बाहेरच जग खुणावत आणि मग पंखात बळ आलं की ते उडणारच, त्यासाठी आपल्याला आनंद झाला पाहिजे की पिल्लं आता स्वतंत्रपणे जगायला शिकली.”

“होय , तू म्हणतो ते खरं असलं तरी आता ह्या वयात त्यांनी आपल्या सोबत असायला हव ही अपेक्षा ठेवणं चुकीच आहे का?”सुमती

“नाही, पण त्यांनी आपल्याजवळच राहायला हवं हा अट्टाहास तरी का? इनफॅक्ट त्यांच्यामध्ये राहण्यापेक्षा किंवा ते आपल्यामध्ये राहण्यापेक्षा वेगळे राहून पण एकमेकांच्या आसपासच राहूनआपल्या नात्याची वीण घट्ट का करू नये.आणि…….” माधव बोलतच होते की त्यांना शोधत त्यांचा मित्र रॉबर्ट फर्नांडिस तिथे आले.

“ हेय यंग मॅन ,व्हॉट आर यु डुइंग हिअर? हू इज ब्युटीफुल लेडी?”

“ हे हाय रॉबर्ट, अरे मी येतच होतो तिकडे. पण ही भेटली म्हणून गप्पा मारत बसलो” माधव

“ कोण आहे ह्या? युवर गर्लफ्रेंड?” रॉबर्ट मोठ्याने गडगडाटी हास्याने बोलले.

“ अरे ये बाबा…..काहीही काय बोलतोय,माझी क्लासमेट आहे ही”.

“ओहह….सॉरी सॉरी यंग लेडी”

“चला मी जातो पुढे कट्ट्यावर” रॉबर्ट जाता जाता म्हणाले.

“होय” माधव

“निघते मी आता”

“ तुला भेटून खूप आनंद झाला,उद्या भेटशील ना नक्की ?इथेच ये मी वाट पाहील” माधव.

“हो”असे म्हणून सुमती निघल्या.

दुसऱ्या दिवशी सुमती नेहमीच्याच वेळी आल्या.तिथे माधव होतेच आणि त्यांनी हसतच गुड इव्हिनिंग विश केले पण सुमतींचा हवा तसा रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे त्यांनी लगेच ताडलं की आज काहीतरी बिनसल आहे.

“काय झालं?” माधव

“ काही नाही” सुमती

“मग चेहरा का पडला”? माधव

“असंच” सुमती

“सांगायचं नाही का” माधव

“काही नाही रे” सुमती

“पूर्वीसारखीच हट्टी स्वभावाची आहेस” माधव

जरास गालात हसत माधव बोलले

“मग, मला तुझ्याबद्दल अजून खूप काही माहिती आहे ” माधव

“वेडा आहेस का , आपल वय काय आपण बोलतोय काय” जरास, हसत सुमती म्हणाल्या.

“वय काय बघतेस मन तर अजूनही तरुण आहे”

“ तू सांगितलं नाहीस तू इथे कसा”? सुमती

“दहावीनंतर मी गाव सोडले आणि खूप मोठं व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून मी शहरात आलो शिक्षण केले आणि चांगली नोकरी मिळाली. सर्व लग्नासाठी मागे लागले पण खरं सांगू मला आतून वाटायचं कधीतरी तु मला भेटशील आणि मी तुला लग्नासाठी विचारेल पण कदाचित नियतीच्या मनातच नसेल. आणि मग नंतर आमच्या सौभाग्यवती आयुष्यात आल्या. सारं काही विसरून मी पुढे जात गेलो पण कधीतरी मनाच्या कप्प्यातून तुझी दडवून ठेवलेली आठवण बाहेर यायची जीव कासावीस व्हायचा. आणि बघ आता आयुष्याच्या सांजवेळी तू सापडली.
लग्न झालं दोन मुले झाली त्यांचेही लग्न झाले.छान चाललंय दोघांचही. मी मात्र एकटा पडलो”शेवटचे वाक्य बोलताना माधवचे स्वर कातर झाले आणि डोळे पाणवले.

सुमतींनी माधवच्या हातावर हात ठेवत त्यांना धीर दिला.

“तेच तर असत रे मुलं मोठी झाली की त्यांचा निर्णय स्वतः घेतात आपण मात्र त्यांच्या दखलपात्रतेचेही नसतो आणि त्यांचे निर्णय ते आपल्यावर थोपवू पाहतात” बोलतांना सुमातीचा स्वर खालावला.

“ काय झालं आता तरी सांगशील”? माधव

“काल मुलाचा फोन आला होता म्हणत होता तुझी काळजी घ्यायला इथे तुझ्याजवळ कोणी नाही तर तू वृद्धाश्रमात जावे तिथं सर्व देखभाल होईल असं म्हणाला”

“याच दिवसासाठी का रे आपण त्यांना जन्म देतो, त्यांना वाढवतो हा दिवस पाहायला का , यांना कस कळत नाही माय बापाच काळीज” सुमतींना अश्रू अनावर झाले. आणि त्यांचा अश्रूंचा बांध फुटला.माधवने त्यांना जवळ घेत शांत केले.

………………

थोड्याच दिवसात सुमती त्यांच्या ग्रुपमध्ये रुळल्या.आता पहिल्यापेक्षा त्या अधिक आनंदी दिसू लागल्या. सुमती आणि मधवची स्टोरी सगळ्यांना माहित पडल्यापासून सर्वजण त्यांना चिडवत होते. सुमतीही सर्व काही एन्जॉय करत होत्या. वाढदिवस असो किंवा एखादी आनंदाची बातमी अगदी फ्रेंडशिप डे पासून ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत सर्व ही ज्येष्ठ मंडळी अगदी आनंदाने साजरा करायचे त्याचप्रमाणे एकमेकांची दुखणे खूपणे, डॉक्टरच्या ॲपोइंटमेंट सर्व एकमेकांचे कामे अगदी मनापासून करायचे. प्रसंगी मतभेदही होत असे परंतु थोड्या कालावधीसाठीच.

असेच एका दिवशी सुमती कट्ट्यावर आल्या नव्हत्या म्हणून सर्वजण त्यांच्या घरी गेले असता त्यांना त्यांची दयनीय अवस्था पाहून खूपच वाईट वाटले. मधवने पुढ्यात येवून त्यांना हातानेच धरले आणि सोफ्यावर बसवले.जेनीने लगेच पाणी आणून दिले. सुमती कडून काहीच बोलवले जात नव्हते. त्यांनी इशाऱ्यानेच औषधाच्या बॉक्स कडे बोट दाखवत गोळ्या मागवल्या. गोळ्या देत असताना माधवला तिथे कॅन्सर सेंटरची फाईल दिसली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.आजार लपवून ठेवल्याबद्दल त्यांना सुमतीला जाब विचारायचा होता. पण सध्या तरी ती नॉर्मल होणे महत्त्वाचे होते.

त्या दिवसापासून माधव सुमतींसोबतच राहू लागले आणि त्यांची काळजी घेऊ लागले. फर्स्ट स्टेज कॅन्सर असल्यामुळे छोटेसे ऑपरेशन आणि केमोथेरपीने पूर्णपणे बरे होऊ शकतो असा विश्वास माधवनेच सुमातीला दिला आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला सुद्धा अगदी वर्षभरात सुमती कॅन्सर मुक्त झाल्या.पण हे एक वर्ष पुन्हा एक नवा धडा शिकवून गेला. सर्व सुविधा असूनदेखील मानसिक आधारासाठी आपल माणूस हवं. आणि तो आधार त्यांना माधव ने दिला.अश्यावेळी मुल धावून आली नाही ही खंत मात्र त्यांच्या मनात राहिली.

अशाच एका सायंकाळी सर्व कट्ट्यावर जमले असताना सुमतींनी लाल गुलाब देवून माधवला प्रपोज केले. आणि सर्वानुमते त्यांनी एका नव्या इनिंग ला सुरुवात केली.
समाप्त…..
?सारिका गडे
डोंबिवली.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sarika Gade

//