आयुष्य एक ड्राईव्हिंग

Short Story
*आयुष्य एक ड्राईव्हिंग* 


आपल्या आयुष्याला किक ची गरज ठेऊ नका. कोणी येईल आणि तुमच चांगले करेल या भरवश्यावर कुठपर्यंत थांबणार ❓सेल्फ स्टार्ट ची मजाच वेगळी असते. त्याकरिता आपली `मानसिक बॅटरी फुल चार्ज` पाहिजे.??आयुष्य नियमाला धरून चालवा ना कोणी अडवेल ना अपघात होईल ???? आयुष्य चालवताना आपले हेल्मेट आपले सत्कर्म आहे. ते सुरक्षितता करतात. ती सुरक्षितता असली की चिंता नाही. ??आपले विचार आपले इंधन आहे. ते शुद्ध असेल तर गाडी स्मूथ पळणारच ??आपला हात जगन्नाथ.. आपल्या हातातच ब्रेक आहे आणि एक्सीलेटर आहे. कुठ सुसाट वेगाने पुढे जायच आणि कुठे ब्रेक लावायचा हे आपल आपण ठरवायचं. ??आयुष्याचे रस्ते खाच, खळगे, काट्याचे, वळणाचे, स्पीड ब्रेकरचे, निसरडे, चढ - उताराचे आहेतच ? बॅलन्स करण्याची कला जमून घ्याच. ??आयुष्य लक्षपूर्वक नजर हटी.... ? आयुष्य टेस्ट ड्राईव्ह साठी आहे. मजा घ्या सफरीची ? मोक्षाच शेवटच स्टेशन येईपर्यंत आयुष्य हे साधन आहे. मोक्ष मिळवण्यासाठी. या साधनाची चांगल्या विचारांनी, चांगल्या कृतीने चांगली सर्व्हिसिंग करा. आणि सगळ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या नाव घेऊन वाॅशिंग करा बघा कशी लखलखीत होईल आयुष्य रूपी गाडी ???तुमच्या प्रवासाला खुप शुभेच्छा ??  *सौ. भाग्यश्री चाटी सांबरे ??27.7.21*