आयुषी ने अर्जुन ला फोन लावला. अर्जुन ने फोन उचलल्यावर ती ओरडून चं बोलली...... तुझा साखरपुडा झाला... आणि तू मला सांगितलं ही नाहीस.... तू असं कां केलंस.... माझा विश्वासघात केलास, फसवलंस तू मला... कां....
अजून बोलला... म्हणजे तुला कळलं तर... मी तुला उदया सांगणार चं होतो...अगदी चं सहज अर्जुन बोलला... आणि ऐक.... मी काय केलंय... मी कुठे फसवलंयं तुला... माझं लग्न झालं नाही आहे म्हंटल्यावर मी कधीतरी लग्न करणार चं होतो ना... मी तुला काही लग्नाचं प्रॉमिस केल नव्हत.. मग विश्वासघात कुठून केला मग.... आणि हे जे काही घडलं ते तूझ्या मर्जीने घडलं..
मी काही बळजबरी केली नाही... मला तू कॉलेज च्या दिवसांपासून आवडत होतीस... पण ते बालिश प्रेम होतं... पण आता तू विवाहित आहेस... मी तुझ्याशी लग्न करेन असं वाटलंच कसं तुला... मी एवढ्या मोठ्या पोस्ट ला आहे.. माझी प्रतिष्ठा मी एका विवाहित मुलीबरोबर लग्न करून धुळीला कशी मिळवेन... तू लग्नाची स्वप्न बघत होतीस कि काय.. हे वाक्य बोलून तो हसला....
आयुषी तिरस्काराने म्हणाली.. तू एवढा नालायक असशील असं वाटलं नव्हत मला..कां असा वागलास...
अजून पुन्हा बोलू लागला.. खरंतर तुझ्या नवऱ्यातली थोडीशी उणीव तुला सहन करता आली नाही म्हणून ती तू माझ्या कडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलास... तूझ्या नवऱ्याचा तू विश्वासघात केला आहेस.. त्याची फसवणूक केली आहेस.. आणि तू मला विश्वासघातकी बोलतेस... असं बोलून अर्जुन ने हसत फोन ठेवला....
आयुषी हे सर्व ऐकूनच हादरली होती... अर्जुन खरं तेच बोलला होता.. राज चं सारखं टूर वर असणं त्याचा सहवास न लाभण तीला त्रास देत होतं...घरात सर्व सुबत्ता होती.. सगळ्या कामाला नोकर होते... पण एकटेपणा होता.. राज चा सहवास नव्हता...म्हणून ती ते सुखं अर्जुन कडून मिळवू पाहत होती... चूक तिचीच होती...
आयुषी सगळं आठवून बेड वर पडून रडू लागली...आज आपण स्वतः च्या हाताने आपला संसार असा उधळून लावला.. हे आठवून ती हुंदके देऊन रडू लागली... एका मोहापायी आज मी हे काय करून बसली... ह्या विचाराने तीला अजूनच रडायला येऊ लागलं...
दोन दिवस तिने पूर्ण रडून काढले... काय करावे, कोणाला हे दुःख सांगावे असं तीला झालं होतं.. आपण आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केला आहे ह्याच तीला वाईट वाटू लागल... आणि तिने झोपेच्या गोळया घेतल्या... आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला... दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई तीला भेटायला आली तेव्हा खूप वेळ दरवाजा ठोकवून पण दार उघडत नाही बघून तिने आधी राज ला कळवले आणि शेजारच्या लोकांच्या मदतीने दार तोडून काढले.. तर आयुषी बेडवर निपचित पडली होती..
राज ही लगेचच येयला निघाला.. आई - वडिलांनी आयुषी ला ऍडमिट केले.. पोलीस केस झाली.. कॉल डिटेल्स तपासण्यात आले.. जास्तीत - जास्त कॉल अर्जुन ला केले गेले होते... पण अर्जुन ला चौकशी ला बोलावल्यावर त्याने सरळ हात वरती केले आणि बोलला... साहेब माझं लग्न ठरलं आहे आणि ही आयुषी तीला खूप एकटेपणा वाटायचा म्हणून अशाच गप्पा मारायला ती मला कॉल करायची. ही माझी कॉलेज मधली मैत्रीण आहे फक्त बाकी काहीच नाही असं...तुम्हीच चेक करा मी हिला कॉल केलेलाच नाही आहे पंधरा दिवसात - हिच्याच मोबाईल वरून मला कॉल्स आलेले आहेत... आणि ते खरंच होतं... आयुषी नेच कॉल केलेले होते...
राज आणि आयुषी चे आई -वडिल तर या सर्व गोष्टी ऐकून हादरूनच गेले होते... आयुषी दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्धीत आली.. ती ने राज ला बघितल्यावर आपण काय चूक करुन बसलो ह्याची तीला कल्पना आली... पण वेळ निघून गेली होती..
राज तिच्या जवळ जात बोलला कां अशी वागलीस मी अजून एक महिन्याने येऊन तुला सरप्राईज देणार होतो आणि तुला कायम चं तिकडेच नेणार होतो.. त्यासाठी चं मी माझ्या प्लँनिंग मध्ये व्यस्त होतो...
आयुषी रडू लागली..... राज मी चुकली... मी तू इथे नाहीस म्हणून मी माझ्या एका मित्राशी रोज बोलू लागले.. गप्पा मारू लागले... मला माफ कर... मी चुकले रे.... अर्जुन ने ही पोलीस स्टेशन मध्ये फक्त मैत्री चं असल्याचा दावा केल्यामुळे पोलीस ही काही बोलू शकले नाहीत... आयुषी ने ही लगेचच मी अर्जुन मुळे काहीच केलेलं नाही... आम्ही चांगले मित्र आहोत . अशीच जबानी दिली...
मला एकटेपणा खायला उठत होता.. आणि त्या एकटेपणा ला कंटाळून चं मी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं सर्वांना भासवले... आयुषी ला दोन दिवसांनी घरी सोडण्यात आलं...
राज ने संध्याकाळी आयुषी ला विचारल्यावर तिने पण शिताफिने राज ला पटवून दिले कि तुम्ही मला घेऊनच चला तिकडेच मी इथे कशी कंटाळली आहे ते... राज ला पण वाटल कि खरंच तिने ह्या एकटेपणा ला कंटाळून चं सुसाईड चा प्रयत्न केला... आणि मग राज तीला एक महिन्यासाठी तिच्या आई - वडिलांकडे सोडून चार दिवसांनी पुन्हा परदेशी गेला...एक महिन्यानी तुला कायमच तिकडेच घेऊन जायला येतो असं आयुषी ला सांगून राज निघाला...
पण म्हणतात ना आई च्या नजरेतून काहीच सुटत नाही तसं आयुषी च्या आई ने हेरलं होतं कि तिने अर्जुनाच्या प्रकरणातुन चं काहीतरी केले आहे.. आणि मग आई ने आयुषी ला विचारले - कि मला सांग खरं काय ते...तिने ही मग आई ला सगळं सांगितलं.....
हे सर्व ऐकून आई तीला म्हणाली अग बाई च्या जातीने सोशिक असावं... सहनशक्ती हवी बाई च्या अंगात... त्या देवाची जावून माफी माग आधी आणि त्याला बोल मी अशी चूक पुन्हा करणार नाही...देवाच्या कृपेनें तुझा नवरा राज चांगला माणूस आहे म्हणून त्याने ते प्रकरण तूझ्या वर विश्वास ठेवून पुढे वाढवलं नाही... नाहीतर आज नवऱ्याने सोडलेली बाई हा शिक्का आयुष्यभर घेऊन राहावं लागलं असत तूला... आयुषी ला ही तिची चूक उमगली होती.. ती आई च्या पाया पडून बोलली.. आई मी चुकले... माफ कर मला...
एक महिन्याने राज येऊन तीला त्याच्या बरोबर परदेशीं घेऊन गेला.. आता सध्या पाच वर्षांनंतर - राज आणि आयुषी ला एक गोंडस मुलगी झाली आहे.. दोघेही तिकडे सुखात आहेत....
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा