Login

आवडली का मूलगी अंतिम भाग

राज सगळ्यांनाच गोंधळून बघत होता. त्यात भावनाच आताच बोललेल वाक्य तर त्याच्या डोक्यावरून गेल होत. मग निता पुढे आली.
मागील भागात.

भावनाच वागण बघून त्या चौघांनाही भावना आणि त्यांच्या ग्रुपमधल्या त्या तिघी यांच्यावर जरा शंका यायला लागली. ‘कूछ तो गडबड हय दया.’ हे मनातल्या मनात ह्या चौघांनी एकमेकांकडे बघून म्हटले. पण पुरावा नसल्याने बोलता कोणालाच आल नाही.

आता पूढे.

सकाळी सगळेच फ्रेश झाल्यावर कालचा ग्रुप परत राज आणि त्याच्या ग्रुपसोबत येऊन बसला. परत आता मैफिल सजणार होती. संगीत गोष्टच अशी असते ना की ती सगळ्यांना बांधून ठेवण्यात यशस्वी होते. परत गाणी सुरू झाले. परत भावना राजला जॉईन झाली. राजची नजर परत परत भावनावर जात राहीली. ती देखील त्याच्याकडे हसून बघत होती. आतातर तर कंपार्टमेंटमधले बाकी प्रवासीही तिथे येत जात होते.

दुपारपर्यंतचा सगळा प्रवास असाच चालू राहीला. ह्या प्रवासात कधी शेवटचा थांबा आला हे कोणालाही समजल नव्हत. आता प्रवास म्हटला की त्याला अंत तर असतोच. राजने त्या मुलांनाही त्यांच्या स्पर्धेला प्रेक्षक म्हणून येण्यासाठी निमंत्रण दिले.

राजचा ग्रुप राजला भावनासोबत बोलण्यासाठी त्याला पुढे करत होते. त्यातल्या त्यात निता तर जास्तच जबरदस्ती करायला लागली होती. पण राज बोलण्यासाठी जरा बिचकत होता. कारण त्याला जरी ती आवडली असली तरी तिच्याकडून असा काहीही प्रतिक्रिया त्याला जाणवली नव्हती. पण एका बाजुला प्रयत्न न करता हार कशी मानू? म्हणुन त्याच मन सांगत होत. आयुष्यात पहिल्यांदाच कोणावर तरी त्याच मन जडलं होत. शेवटी मनाचा हिय्या करत त्याने भावनासोबत बोलण्याचे ठरवले.

दिल्ली स्टेशनला उतरल्यावर त्याने भावनाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती काही त्याला दिसत नव्हती. पण दुसर्‍या बाजूला बघताच भावनाच त्याला त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली. तिला येताना बघून राजचा चेहरा जरा उजळला. ती जशी जवळ येत होती तस त्याला भावनासोबत कोणीतरी मुलगाही येत असल्याच दिसला. भावना त्याला घेऊन राजजवळ आली.

“मीट माय फ्यूचर फियांसे” भावनाने त्याच्या हातात हात गुंफवला. “केदार.”

राजला थोडा झटका बसला. पण त्याने तस दाखवल नाही आणि हसतच त्याने केदारसोबत शेकहँड केल.

“तुझ लग्न झालाय?” राज चेहऱ्यावर उसने हसू आणत बोलला.

“झाल नाही अजून.” भावना हलकेच हसत बोलली. “विचार चालू आहे.”

आता राजच डोक धावायला लागल. भावनाची हलकीच नजर निता आणि बाकी दोघींवर गेली. तसे बाकी चौघ आता त्या तिघींना घेरून उभे राहिले.

“तुझ्यासारखा मुलगा ज्या मुलीच्या आयुष्यात जाईल ना ती लकी असेल.” भावनाने राज काहीच बोलत नाही बघून भावनाने बोलायला सुरवात केली. तिच्या आवाजाने राज त्याच्या विचारातून बाहेर आला. तिच्या डोळ्यात त्याला कसलीतरी आशा दिसत होती.

“थॅंक्स फॉर कॉम्प्लीमेंट.” राज उसन अवसान घेत हसला. “पण मी एकटाच खुश आहे. रिलेशनशिपवर विश्वास नाही माझा.”

भावना गंभीरपणे हसली. “कालपासून जे गाण गायला आहेस ना ते सगळे आठव.” तिने राजचा हात हातात घेतला. थोडा लवकर भेटला असतास ना. तर नसत सोडल मी तुला.” भावनाने वातावरण हलक करण्यासाठी हसत बोलली.

भावनाच्या या एका वाक्याने राजला आशेचा एक किरण दिसला आणि तो नकळतच बोलयला लागला.

“नको सोडूस ना मग.” राज भावनेच्या भरात बोलून गेला. “आजवर मनाला भावेल अशी एकही मुलगी भेटली नाही. एक तूच आहेस जिने एका क्षणात माझ हे मोकळ मन व्यापून टाकलस. आता ह्या क्षणाला माझ अस बोलण तुला वेड्यासारखं वाटेल. पण प्रेम तर वेडच असत ना, कधीही कोणावरही होऊ शकत. तुझ्या मनात जे असेल ते बोल. मला काहीच वाईट वाटणार नाही. शेवटी जे आपल्याला आवडत तेच आपल्या आयुष्यात भेटेल, हे आपल्या हातात नसत ना. तू नाही जरी बोललीस तरी आजवर जसा जगात आलो आहे. तसाच एकटा जगत राहील. पण एक गोष्ट खरी की तू मला आवडली आहेस. तुझ्यासोबत आयुष्य गुणगुणत घालवायला मला नक्कीच आवडेल. तूला मी कशाचीही कमी भासू देणार नाही.”

राज एका दमात हे सर्व बोलून मोकळा झाला होता. तर बाकी त्याचा ग्रुप हे सगळच ऐकून त्याला आ वासून बघत राहीला. कारण तो एवढ एका दमात कधीच बोलाला नव्हता. जे काही बोलण असायचं, ते मोजकच राहायचं.

राजच बोलण ऐकून भावनाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने तिचे डोळे घट्ट मिटले आणि पुढच्याच क्षणाला राजला घट्ट मिठी मारली. तसे मागे उभ्या असलेल्या निता, कार्तिकी, जान्हवी या तिघीही आनंदाने उड्या मारायला लागल्या. निताला तर एवढा आनंद झाला की ती बाकी सगळच विसरून मोठ्याने ओरडली.

“मावशी मिशन सक्सेफुल.” निता ओरडल्या ओरडल्या भावना पटकन त्याच्यापासून लाजूनच बाजूला झाली. तर राज गोंधळून निता आणि नाचणाऱ्या बाकी दोघींना गोंधळून बघू लागला. तशी निताने तिची जीभ चावली.

राजने भावनाकडे पाहिलं.

“हेच ऐकायला तर मी मुंबईवरून दिल्लीला आली.” भावना राजचा हात हातात घेत बोलली.

पण राज तर ‘तिथे काय चालू आहे?’ याचा विचार करायला लागला.

“मग, आवडली का मुलगी?” .....

मागून आलेल्या ओळखीच्या आवाजाने राज त्याच्या विचारातून बाहेर आला आणि त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला धक्काच बसला. कारण तिथे त्याचे आई वडील उभे होते. सोबत बाकी ग्रुपचे आई वडीलही होते. अजून एक कुटुंब उभ होत. ज्याला राजने ओळखलं नव्हत.

राज सगळ्यांनाच गोंधळून बघत होता. त्यात भावनाच आताच बोललेलं वाक्य तर त्याच्या डोक्यावरून गेल होत. मग निता पुढे आली.

“तू भांडणार नसशील तरच मी बोलते.” निता हलकेच हसत बोलली. राजने फक्त त्याची मान हलवली. असही हे समजून घेण्यापलीकडे त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.

भावना ही निताच्या मावशीची मुलगी. जी पुण्यामध्ये स्थायिक होती. राजच्या आईने राजच नाव त्याच्या नकळत वधु वर सूचक मंडळात टाकल होत. तिथून निताच स्थळ राजला चालून आल. पण राजला अस सरळ विचारलं तर तो नाहीच बोलणार होता. हे त्याच्या आईला चांगलच माहिती होत. मग त्या दिवशी राजचा ग्रुप त्यांच्या घरी जमलेला असताना, त्याच्या आईने या स्थळाबद्दल मदतीला आलेल्या निता आणि बाकी दोघींच्या कानावर घातलं.

तिचं नाव ऐकताच निताने तिचा फोटो बघायला मागतीला. तर ती तिच्या मावशीची मुलगी निघाली. तशी ती तिथेच आनंदाने उड्या मारायला लागली होती. मग त्याच दिवशी त्या चौघींमध्ये हा प्लॅन शिजला होता. दिल्लीला जाणाच्या बहाण्याने भावनाचा दाखवण्याचा कार्यक्रम उरकून घ्यायचं ठरवलं गेल आणि त्यांचा हा प्लान यशस्वी झाला होता.

निताच्या ग्रुपच युट्यूब चॅनल म्हणून तिने फक्त ते सबस्क्राईब करून ठेवलं होत. जेव्हा त्यावरचे व्हिडीओ पहिले, तस भावनालाही राज आवडला होता. म्हणून त्या मंडळात त्याचा फोटो बघून तिने लगेच तिचा होकार कळवला होता. नंतर तिचीच बहिण निताला फोन करून त्याबद्दल सगळीच माहिती गोळा केली आणि ती देखील त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झाली.

एवढ सगळ ऐकून राजच डोकच गरगरायला लागल होत. त्याच्यासाठी सगळ्यांनीच एवढा उपद्व्याप केलेला बघून त्याने डोक्यालाच हात लावला.

“ठरवतोस की येऊ मी?” केदारने त्याच्या शांततेचा भंग केला.

इकडे लगेच त्याने भावनाचा हात पकडून घेतला. तसे सगळेच हसत सुटले आणि भावना तर लाजून गोरीमोरी झाली.

मग राजच्या वडिलांनी भावनाच्या आई वडिलांची राजसोबत ओळख करून दिली. आता वडिलांच्या बोलण्याने राजला प्रश्न पडला की ते इथे कसे काय म्हणून.

“पण तुम्ही कसे इकडे?” राज त्याच्या आई वडिलांकडे बघत बोलला.

“आमचा मुलगा कसा लाजतो? ते बघयला.” राजचे वडील त्याची फिरकी घेत बोलले.

तस राज बारीक तोंड करून बघू लागला. तर बाकी परत हसायला लागले.

“अरे, तुमची एवढी मोठी स्पर्धा,” निताची आई “मग आम्ही सपोर्ट करायला आलो आणि दुसर काम तर आता तू पाहिलसच.”

“चला,” भावनाचे वडील “आता त्यांना स्पर्धेत सपोर्ट करूयात. बाकी तर घरी जाऊन ठरेलच.”

मग काय? सगळेच आनंदाने त्यांच्या त्या नव्या जोडप्याला चिडवत त्यांच्या स्पर्धच्या ठिकाणी चालले गेले.

समाप्त.

अष्टपैलू लेखन स्पर्धा.

कशी वाटली कथा? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all