आवरा... सावर... भाग 3 अंतिम.. रीपोस्ट

स्वातीने सगळ्यांना सांगितल,..." अहो माझी बहिण येणार होती ना, ती येत नाही आज आपल्याकडे",



आवरा... सावर... भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
......

त्यानंतर ती शरद झोपला होता तिकडे गेली,.. "अहो उठा माझी मावस बहीण येते आहे एका तासात" ,

"मग मी का उठू तुझी बहीण तुला भेटायला येते ना ती, बसा बोलत तुम्ही आरामात",.. शरद

"अहो घर कोण आवरणार? आटपा, मदत करा मला थोडी ",.. स्वाती

"अरे तिला सांगून द्यायचं ना की आज येऊ नकोस, सुट्टी आहे ना आज",.. शरद

" असं कसं बोलणार हो समोरच्याला डायरेक्ट, उठा मला घर आवरू लागा आणि बाहेरून खाण्याचे पदार्थ घेऊन या, आता मला परत काही बनवण्याचा अंगात त्राण नाही",.. स्वाती

" घर म्हणजे पसारा असणारच, काही नाही ग, असुदे, आपलं घर जस आहे तस आहे, त्यांना नाही आवडलं तर नाही येणार पुढच्या वेळी ते",.. शरद

" काहीही काय आटपा बर, बोलण्यात वेळ वाया घालवू नका ",.. स्वाती

हा शरदचा नेहमीचा डायलॉग होता, काम कसं टाळायचं यासाठी तो नेहमी हेच वाक्य वापरायचा,

तोपर्यंत मुलं रूम आवरत होते, त्यांची धावपळ होत होती, म्हणून मी म्हणत असते की नेहमी घर आवरलेलं असाव, कोणी येणार असल की धावपळ होते,

स्वातीने पटापट घर झाडलं, मुलांनी त्यांचं रूम आवरायला घेतल , किचन ओटा आवरला, बाथरूम धुतले, कॉट वरच्या चादरी बदलल्या, सगळेच करावे लागतं कोणी येणार असले की, काही चिकित्सक बायका अगदी बाथरूममध्ये पण जाऊन बघतात आवरल आहे की नाही, मुलांनी कपडे कपाटात पटापटा कोंबले, तो पर्यंत शरद समोसे, जिलेबी घेवून आला,

"आहो सोफ्यावर बसू नका मी आताच आवरल आहे सगळ, नाश्ता किचन मध्ये ठेवा" ,.. स्वाती

"किती टेंशन घेते ग तू, मी बसणार सोफ्यावर",.. शरद

"मग मी पुढच आवरणार नाही सांगून ठेवते, बाकीच्यांकडे जावून बघा घर किती स्वच्छ असत त्यांच, कस करतात काय माहिती, इथे आपल दोन तास घर आवरलेल दिसत नाही, सांगितलेल ऐकत नाही तुम्ही",.. स्वाती

स्वातीचा फोन वाजत होता, मावस बहीण फोन वर होती,
.." अग स्वाती आज नाही येत आम्ही, इकडे पाहुणे येता आहेत, पुन्हा कधीतरी भेटू",

ठीक आहे,

स्वातीला आता हसाव की रडाव अस झाल होत, एक तर दुपारच्या झोपेचं खोबरं झाल, घरचे चिडतील ते वेगळ. सांगू कशी आता यांना

"काय झाल ग कोणाचा फोन होता? ",.. शरद

स्वातीने सगळ्यांना सांगितल,..." अहो माझी बहिण येणार होती ना, ती येत नाही आज आपल्याकडे",

मुल नवरा आता चिडले होते,

"उगीच आमची धावपळ झाली",.. मुल

"मी तर बोलत होतो कश्याला टेंशन घ्या",.. शरद

"एक दिवस ही आराम नाही",.. परी

पण स्वाती खुश होती मस्त घर आवरल गेल,

"अहो चहा ठेवा समोसे आहेत सोबत",.. स्वातीने बसल्या जागेवरून ऑर्डर सोडली,

" आई आम्हाला समोसा चाट हवा आहे",.. मुल

" अहो मुलांसाठी चाट बनवा, जा मुलांनो बाबांना मदत करा, माझा आता रविवारी सुरू झाला आहे डोन्ट डिस्टर्ब मी" ..... स्वाती आरामात टीव्ही बघत होती.

🎭 Series Post

View all