आवरा... सावर

स्वातीने पटापट घर झाडलं, मुलांनी त्यांचं रूम आवरायला घेतल , किचन ओटा आवरला, बाथरूम धुतले, कॉट वरच्या चादरी बदलल्या, सगळेच करावे लागतं कोणी येणार असले की, काही चिकित्सक बायका अगदी बाथरूममध्ये पण जाऊन बघतात आवरल आहे की नाही, मुलांनी कपडे कपाटात पटापटा कोंबले, तो पर्यंत नवरा समोसे, जिलेबी घेवून आला,आवरा... सावर

©️®️शिल्पा सुतार
......

घर म्हटल की पसारा आलाच, किती पण तो? , आवराव ना जरा, पसारा हा प्रत्येक घरचा अविभाज्य भाग आहे, किचन मधला पसारा, कपड्यांचा पसारा, पुस्तकांचा पसारा, ऑफिसच्या फाईलचा पसारा, खेळण्यांचा पसारा तर कधीच न आवरला जाणारा पसारा आहे, सोमवारी तर एवढ घर आवराव लागत, कोणी आल तर म्हणेल बापरे काय आहे हे, इथे नक्की माणस राहतात ना,

एखादी गोष्ट खाली पडली तर ती उचलून ठेवायची असते, खाण्याचे पदार्थ सांडले तर लगेच आवरायच, हे जणू काही कोणाला माहितीच नाही असे सगळे वागतात, आई करेन हे सगळ अस फिक्स आहे, तिचच काम आहे हे फक्त अस सगळ्यांनी समज करून घेतला आहे

संध्याकाळपर्यंत आवरून आवरून घरातील गृहिणी दमून जाते, मग ती सुद्धा बघू उद्या सकाळी म्हणून बाकीचं काम तसंच पडू देते, मग वाढत जातो पसारा,

आज रविवार सकाळपासून सगळ्यांचा आराम सुरू होता , अंघोळी ही झाल्या नव्हत्या अजून , स्वातीने दोन-तीनदा सांगितलं की आवरा.... तरी कोणीही ऐकत नव्हत, रविवार असल्याने मोठा स्वयंपाक होता, स्वाती स्वयंपाकातच बिझी होती,

सगळ्या घरात पसारा तसाच पडून होता, पुढे टीव्ही सुरू होता जो कोणी बघत नव्हत, सोफा तर दिसत नव्हता एवढ्या वस्तू होत्या त्याच्यावर, टॉवेल, न्यूज पेपर, चहाचे कप, आवरायला अर्धा तास लागला असता

डायनिंग टेबल वर तर घरातल्या नाही त्या वस्तू होत्या, घरात काही हरवल तर ते इथेच सापडेल अस होत

मुलीच्या रूम मध्ये तर एंट्री नव्हती तिला, आई माझ्या कुठल्याच गोष्टीला हात लावू नको, पसारा आवरु नको , it\"s my world, रूम कशी कोझी हवी comfortable
त्यात परीला आज तिचे ड्रेस धुवायचे होते त्यामुळे तिने ते सगळे खाली काढून ठेवले होते, एका बाजूला ती तिचा प्रोजेक्टर वर्क पूर्ण करत होती, सगळीकडे कापलेल्या कागदाचे कात्रण होते,

मी धुवेन उद्या तुझे ड्रेस मशीन मध्ये टाकून ठेव,

तरी तिने ऐकल नाही, मलाच धुवायचे आहेत माझे ड्रेस, इतर वेळी म्हणते ना तू मी काही काम करत नाही आज बघ मी कपडे धुणार

ठीक आहे मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा धू, पण आधी हा पसारा आवर ग तो कपड्याच्या ढीग तसाच पडून होता

मुलाची रूम म्हणजे एक वेगळंच रसायन होत , ती रूम कितीही आवरली तरी पसारा असल्यासारखी दिसायची, आणि त्याचं त्याला काहीच वाटत नव्हत , सगळीकडे खेळणी बाॅल पसरलेले आणि आपण कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही, नाहीतर काही हरवला तर आपल्यावरच नाव येत, त्याच शाळेच सामान कधीच सापडत नाही, अभ्यास झालेला नाही, काय कराव याच
मुलगा खेळण्यात बिझी, आटोप रे होम वर्क करून घे, पण कसल काय त्याच्या जवळ बसाव लागत तर अभ्यास करेल तो, आता स्वातीला वेळ नव्हता

स्वातीच्या बेडरूम मध्ये तर आनंदीआनंद होता, ओला टॉवेल सुद्धा तिच्या नवऱ्याने वाळत टाकलेला नव्हता, काहीतरी ऑफिसच्या फाईल काढून शरद सकाळपासून काहीतरी शोधत होता, सगळीकडे कागदच कागद होते, एका बाजूला मस्त गाणे सुरू होते,

स्वातीने दोन-तीन वेळा सांगून बघितलं की अहो आवरा जरा पण शरदने त्याकडे आरामशीर दुर्लक्ष केलं, माझं काम व्हायचा आहे अजून स्वाती, उगाच एखादा पेपर गहाळ व्हायचा, मी आवरेल माझं बरोबर, तू सारख आवरा अस बोलू नकोस, आज अगदी निवांत आहे मी, तू ही ये अशी बस माझ्या समोर, म्हणून शरद ने तिला जवळ ओढल

काहीही काय तुमच, आता मुलांना भूक लागली म्हणून येतील जेवायला, मला स्वयंपाक आहे

मुल जेवायला आले

आई आज आम्ही काहीही काम करणार नाही, एक दिवस मिळतो सुट्टीचा तो आम्ही आम्हाला आवडतो तसं घालवणार, तू सारखा उठ उठ आवर आवर करू नको

मी एकटी सकाळपासून आवराआवर करते आहे, आता मी ही काम करणार नाही म्हणून स्वातीने ही बसून घेतलं,

दुपारचे जेवण झाल, स्वाती एकटीच काम करणारी, कोणी मदतीला नाही, तिने तिला शक्य होईल तेवढ आवरलं, आणि तेवढ्यात तिच्या मावस बहिणीचा फोन आला, बर्‍याच दिवसांन पासुन ठरवतो आहे तुझ्या कडे यायच अस, घरी आहात ना ग तुम्ही

हो घरी आहोत

आम्ही येतो आहोत एका तासात,

जे व्हायचं ते झालं, आरामशीर पेपर वाचत बसलेली स्वाती उठली, आधी मुलांच्या रूम मध्ये गेली, आवरा रे लवकर पाहुणे येता आहेत आपल्याकडे,

कोण येत आहे

माझी मावस बहीण येते आहे

त्यानंतर ती नवरा झोपला होता तिकडे गेली, अहो उठा माझी मावस बहीण येते आहे एका तासात,

मग मी का उठू तुझी बहीण तुला भेटायला येते ना ती

अहो घर कोण आवरणार आटपा

अरे तिला सांगून द्यायचं ना की आज येऊ नकोस,

असं कसं बोलणार हो समोरच्याला डायरेक्ट, उठा मला घर आवरू लागा आणि बाहेरून खाण्याचे पदार्थ घेऊन या, आता मला परत काही बनवण्याचा अंगात त्राण नाही,

घर म्हणजे पसारा असणारच, काही नाही ग, असुदे, आपलं घर जस आहे तस आहे, त्यांना नाही आवडलं तर नाही येणार पुढच्या वेळी ते

काहीही काय आटपा बर, बोलण्यात वेळ वाया घालवू नका

हा तिच्या नवऱ्याचा नेहमीचा डायलॉग होता, काम कसं टाळायचं यासाठी तो नेहमी हेच वाक्य वापरायचा,

तोपर्यंत मुलं रूम आवरत होते, त्यांची धावपळ होत होती, म्हणून मी म्हणत असते की नेहमी घर आवरलेलं असाव, कोणी येणार असल की धावपळ होते,

स्वातीने पटापट घर झाडलं, मुलांनी त्यांचं रूम आवरायला घेतल , किचन ओटा आवरला, बाथरूम धुतले, कॉट वरच्या चादरी बदलल्या, सगळेच करावे लागतं कोणी येणार असले की, काही चिकित्सक बायका अगदी बाथरूममध्ये पण जाऊन बघतात आवरल आहे की नाही, मुलांनी कपडे कपाटात पटापटा कोंबले, तो पर्यंत नवरा समोसे, जिलेबी घेवून आला,

आहो सोफ्यावर बसू नका मी आताच आवरल आहे सगळ, नाश्ता किचन मध्ये ठेवा,

किती टेंशन घेते ग तू,

बाकीच्यांकडे जावून बघा घर किती स्वच्छ असत त्यांच, कस करतात काय माहिती, इथे आपल दोन तास घर आवरलेल दिसत नाही

स्वातीचा फोन वाजत होता, मावस बहीण फोन वर होती,

अग आज नाही येत आम्ही, इकडे पाहुणे येता आहेत, पुन्हा कधीतरी भेटू,

ठीक आहे

स्वातीला आता हसू की रडू अस झाल होत, एक तर दुपारच्या झोपेचं खोबरं झाल, घरचे चिडतील ते वेगळ

काय झाल ग कोणाचा फोन होता

स्वातीने सगळ्यांना सांगितल,... अहो माझी बहिण येणार होती ना, ती येत नाही आज आपल्याकडे

मुल नवरा आता चिडले होते, उगीच आमची धावपळ झाली

मी तर बोलत होतो कश्याला टेंशन घ्या

एक दिवस ही आराम नाही

पण स्वाती खुश होती मस्त घर आवरल गेल,

अहो चहा ठेवा समोसे सोबत, स्वातीने बसल्या जागेवरून ऑर्डर सोडली,

आई आम्हाला समोसा चाट हवा आहे

अहो मुलांसाठी चाट बनवा, जा मुलांनो बाबांना मदत करा माझा आता रविवारी सुरू झाला आहे don\"t distrub me.....