रात्रीची वेळ... चंद्रकोर मावळत होती आणि आकाशात काळी सावली पसरत होती. गावाच्या टोकावर असलेल्या त्या जुन्या स्मशानभूमीकडे कोणी सहज जात नसे. पण त्या रात्री, देवदत्तला तिथे जावं लागणार होतं. तो स्मशानाच्या दिशेने चालत असताना हवेने झाडांची पानं सळसळू लागली, जणू कुजबुज करत होती.
हे स्मशान वेगळं होतं. इथल्या जळणाऱ्या चितांनी शांतता कधीच पाहिली नव्हती. रात्रीच्या वेळी या स्मशानात विचित्र हालचाली जाणवत. काहींच्या मते, इथं जळलेली प्रेतं अजूनही कुठेतरी जिवंत होती. आणि त्याचं रहस्य आज देवदत्तच्या नशिबात होतं.
तो तिथं पोहोचताच, पायाखाली ओलसर मातीचा स्पर्श जाणवला. दूर कुठेतरी चितेच्या ठिकाणी काहीतरी हलल्यासारखं वाटलं. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. “कोण आहे?” तो अंधारात बघू लागला, पण समोर काहीच नव्हतं फक्त एक वाळलेलं झाड आणि मागे पेटलेल्या चितेचा मंद उजेड.
त्याची पावल हळुवारपणे त्या मंद उजेडाचा दिशेनं चालत होती पण त्या चितेकडे निरखून बघताच त्याला जाणवलं की... ती चिता जळत नव्हती. उलट, तिच्या ज्वाळा अचानक शांत झाल्या सारख्या वाटत होत्या आणि अचानक काहीतरी हाललं... एक हात त्या राखेतून बाहेर आला!.
त्या राखेतून बाहेर आलेला हात पाहून देवदत्तच्या अंगातलं रक्त गोठलं. त्याचा श्वास बंद होईल की काय असं वाटत होतं. संपूर्ण स्मशानभूमी शांत होती, फक्त त्याच्या हृदयाचे जोरजोरात वाजणारे ठोके ऐकू येत होते.
पण अचानक, त्या राखेतून फक्त हातच नाही, तर एक संपूर्ण आकृती बाहेर आली!
देवदत्तच्या डोळ्यासमोर एक माणूस… उभा राहिला त्याचं काळवंडलेलं, जळालेलं शरीर चितेच्या ठिकाणी पडूनही पुन्हा उभं राहिलं होतं. शरीरावर राख चिकटली होती, पण डोळे… डोळे मात्र रक्तासारखे लाल होते!
"कोण आहेस तू?" देवदत्तच्या तोंडून शब्द निघाले, खरे पण त्याच त्यालाच कळेना की तो खरोखर बोलला होता की मनातच स्वतःला विचारलं.
तेव्हाच… त्या आकृतीने जड आवाजात हसणं सुरू केलं.
"हा...हा...हा... इतक्या लवकर विसरलास का रे, देवदत्ता?"
त्या शब्दांनी देवदत्तच्या पायाखालची जमीन सरकली.
"त...तू कोण?" त्याच्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडलं.
तो घाबरून मागे सरकण्याचा प्रयत्न करत होता, पण शरीर हलायलाच तयार नव्हतं.
"तू विसरलास... पण मी नाही."ती आकृती जरा मोठ्याने म्हणाली.
तो आवाज ऐकताच देवदत्तच्या डोक्यात वीज चमकावी तसा एक आठवणींचा विस्फोट झाला.
पाच वर्षांपूर्वीचं तेच स्मशान... तीच चिता... आणि त्याचं एक गुपित!
ही आकृती कुणाची होती, हे त्याला आठवलं होतं!
तो माणूस... तो मेला नव्हता का? की तो मारला गेला होता? तो स्वतः शी पुटपुटला.
तो माणूस... तो मेला नव्हता का? की तो मारला गेला होता? तो स्वतः शी पुटपुटला.
देवदत्तच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या.
त्याने एक पाऊल मागे टाकलं, पण त्याच क्षणी...त्या आकृतीने त्याच्या हाताला घट्ट पकडलं!
त्याने एक पाऊल मागे टाकलं, पण त्याच क्षणी...त्या आकृतीने त्याच्या हाताला घट्ट पकडलं!
"मला माफ कर! मला काहीच माहित नव्हतं!" देवदत्त कापऱ्या आवाजात ओरडला.
पण त्या आकृतीनं एकच वाक्य म्हटलं –
"माझी राख अजून शांत नाही... आणि तुझ्या पापाची शिक्षा संपलेली नाही!"
त्या आवाजाने पूर्ण स्मशान हादरलं. आता हवेत कुजलेल्या मांसाचा वास मिसळला होता. झाडांवर बसलेले घुबडं, गिधाडं पंख पसरून वेड्यासारखी ओरडू लागली. चितेवरची राख हवेत उडून पुन्हा त्या आकृतीच्या भोवती फिरू लागली...
आणि देवदत्तला जाणवलं, त्याचं रक्तही आता गरम होऊ लागलं होतं
त्या आकृतीचा थंडगार स्पर्श देवदत्तच्या हाडांपर्यंत पोहोचला होता. मृत्यूची सावली त्याच्या जीवावर बेतली होती.
"माझी राख अजून शांत नाही... आणि तुझ्या पापाची शिक्षा संपलेली नाही!" त्या आकृतीचा आवाज.त्याच्या हृदयातून आरपार भेदून गेला.आणि त्या क्षणी...संपूर्ण स्मशान हलायला लागलं!
चहुबाजूंनी जोरदार वारा सुटला. जुन्या वडाच्या झाडाची वाळलेली फांदी अचानक स्वतःच तुटून जमीन हादरवू लागली. चितेच्या ठिकाणी पसरलेली राख हवेबरोबर फिरत होती आणि त्या राखेतून वेगवेगळ्या काळसर आकृत्या उभ्या राहत होत्या.
देवदत्तच्या भोवती त्या आकृत्यांचा वर्तुळ तयार होत होता.त्याला आता श्वासही घेणं कठीण झालं होतं.
"सांग, देवदत्ता... तु मला जिवंत गाडलं होतंस ना? आता कोण तुला इथून जिवंत जाऊ देईल?"त्या आकृतीतून एकाने पुढे येत मातकट आवाजात विचारलं.
त्या आवाजात एवढा थरार आणि भेसूरपणा होता की, देवदत्तच्या अंगातली ताकद संपून गेली. त्याच्या गुडघ्यांवर तो जमिनीवर कोसळला.
त्या आवाजात एवढा थरार आणि भेसूरपणा होता की, देवदत्तच्या अंगातली ताकद संपून गेली. त्याच्या गुडघ्यांवर तो जमिनीवर कोसळला.
देवदत्तच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला, आणि आठवणींचे तुकडे वेगाने समोर येऊ लागले.
पाच वर्षांपूर्वी त्यानेच या माणसाला जिवंत गाडलं होतं!
त्या वेळी गावात कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने त्याने एका विश्वासघाताची शिक्षा दिली होती. पण त्या मृतदेहाला पुरताना, त्याच्या आत्म्याने सूड घ्यायची शपथ घेतली होती!
त्या वेळी गावात कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने त्याने एका विश्वासघाताची शिक्षा दिली होती. पण त्या मृतदेहाला पुरताना, त्याच्या आत्म्याने सूड घ्यायची शपथ घेतली होती!
आणि आता...त्याच माणसाचा आत्मा जिवंत स्मशानात त्याचा थेट समोर उभा होता.
"मी... मी माफी मागतो! मला सोड!" तो वेड्यासारखा ओरडू लागला.पण आता उशीर झाला होता.त्या काळसर आकृतीने हात उचलला आणि त्या क्षणी संपूर्ण स्मशानाच्या वातावरणात एक प्रचंड वेदनादायक किंकाळी घुमली.
देवदत्तच्या शरीरावर जळणाऱ्या चितेच्या ज्वाळा दिसू लागल्या.
त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिलं ते वितळत होते!
त्याचं संपूर्ण शरीर त्या जळालेल्या राखेसारखं होतंय की काय असं त्याला जाणवलं.
त्याचं संपूर्ण शरीर त्या जळालेल्या राखेसारखं होतंय की काय असं त्याला जाणवलं.
"तुला आता राख व्हायलाच लागेल, देवदत्ता..."त्या आकृतीचा आवाज त्याच्या कानात घुमत असतानाच, त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला.आणि क्षणभरातच... त्याने शेवटचा तडफडणारा श्वास घेतला.
संपूर्ण स्मशान आता शांत होत होतं.चंद्रकोर पुन्हा लुकलुकत होती, झाडं हलणं बंद झाली होती.देवदत्त नामशेष झाला होता.फक्त एका चितेच्या राखेत त्याचे थोडेसे जळालेले अवशेष शिल्लक राहिले होते.आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर तेही हवेत उडून गेले.
स्मशानात पुन्हा एकदा अंधाराची चादर पसरली होती. चिता विझली होती,पण स्मशान शांत नव्हतं. हवेतील राख अजूनही जिवंत भासणाऱ्या सावल्यांमध्ये मिसळल्या सारखी भासत होती.जणू अजून काहीतरी बाकी होतं.
"हा...हा...हा..."काळोख्या रात्रीत, कुठूनतरी अचानक मंद, थंडगार हसू ऐकू आलं.ते हसू चितेच्या राखेतून उमटत होतं.
चितेच्या राखेतून हलकासा काळसर धूर उसळला.
त्या धुरात काहीतरी हालत होतं आणि क्षणातच…एक जळालेलं हाताचा पंजा बाहेर आला! आणि संपूर्ण स्मशानात अचानक थंड गार वाऱ्याची झुळूक पसरल
आणि एका क्षणातच…देवदत्त पुन्हा उभा राहिला!
त्या धुरात काहीतरी हालत होतं आणि क्षणातच…एक जळालेलं हाताचा पंजा बाहेर आला! आणि संपूर्ण स्मशानात अचानक थंड गार वाऱ्याची झुळूक पसरल
आणि एका क्षणातच…देवदत्त पुन्हा उभा राहिला!
त्याच्या शरीरावर जळालेल्या मांसाचे तुकडे चिकटले होते, हाडं उघडी पडली होती, आणि डोळ्यातील सफेद रंग काळसर राखेसारखा दिसत होता. जणू काही तो
आता पूर्वीचा देवदत्त नव्हता तो 'काहीतरी वेगळंच' बनला होता.जणू काही तो स्मशानाचा एक भाग बनला होता.
आता पूर्वीचा देवदत्त नव्हता तो 'काहीतरी वेगळंच' बनला होता.जणू काही तो स्मशानाचा एक भाग बनला होता.
त्याने आपल्या राख झालेल्या हाताकडे पाहत समोर पाहिलं.स्मशानात अजूनही चिता पेटत होत्या.त्या चितांमध्ये अनेक वर्षांपूर्वी जाळले गेलेले आणखी काही आत्मे बंदिस्त होते.
त्यांना सुटका हवी होती… आणि आता देवदत्तही त्यांच्यातलाच एक झाला होता.
त्या रात्री, पहाट होईपर्यंत स्मशानात अस्वस्थ करणाऱ्या हालचाल सुरू होत्या.
सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी स्मशानात पाऊल टाकलं, तेव्हा त्यांना जमिनीत कोरलेले शब्द दिसले:
"कोणीही येथे यायचं नाही... जिवंत स्मशान आता फक्त मृतांचंच आहे."त्या भीषण कोरीव अक्षरांनी तिथे जमलेल्या सर्वच जणू रक्त गोठवलं होतं.घाबरून सर्वांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर मात्र पुन्हा तिथे जाण्याची हिंमत करत नव्हतं.
काही दिवस गावात फक्त देवदत्त गायब होण्याचा बातम्या सतत कानावर पडत होत्या.
तरीही,एका रात्रीच्या अंधारात एक आकृती हातात मशाल धरून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला
तो होता धैर्यसिंह. गावातला एक तरुण, जो भयकथांवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने देवदत्तच्या बेपत्तापणाबद्दल ऐकलं होतं आणि आता त्याने सत्य जाणून घ्यायचं मनोमन ठरवलं होतं.
तिथं पोहोचल्यावर, स्मशानाच्या उंबरठ्यावर त्याच्या अंगावर शहारे आले. हवेतील कुजट वास आणि विचित्र शांतता अस्वस्थ करणारी होती. समोरच असलेल्या जळलेल्या चितेजवळ तो पोहोचताच, त्याच्या पायाशी काहीतरी हलल्यासारखं वाटलं. त्याने मशालीचा उजेड टाकला…
तर त्याला राखेतून वर एक हात दिसत होता!
धैर्यसिंह थोडासा मागे झाला. तो हात हळूहळू वर सरकू लागला. आणि अचानक, राखेतून एक आकृती बाहेर आली—जळालेलं शरीर, काळसर हाडं, आणि लालसर डोळ्यांचा एक भेसूर चेहरा!
"देवदत्त?!" धैर्यसिंहच्या तोंडून नाईलाजाने शब्द बाहेर पडले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा