तो तेजोमय बिंदू हळूहळू फुलत गेला… आणि त्याच्या सभोवताल एक-एक करून ती आत्म्यांची छाया प्रकट होऊ लागली ज्या आत्म्यांना वर्षानुवर्षं त्या स्मशानात अडकून राहावं लागलं होतं.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळं दु:ख… पण आज त्यांच्या डोळ्यांत एक संधी होती अंतिम मुक्तीची.
धैर्यसिंह गोंधळलेल्या नजरेनं त्या यंत्राकडे पाहत होता, जिथे संध्याचा प्रकाश अजूनही दरवळत होता.तेवढ्यात, एक आत्मा पुढे आला तोच लहान मुलगा, ज्याला धैर्यसिंहने वाचवायचा प्रयत्न केला होता. त्याच्या तोंडात शब्द नव्हते, पण त्यानं धैर्यसिंहचा हात पकडला… आणि एक चित्र दाखवलं –
संध्या एका भल्या मोठ्या अंधाराच्या वावटळीत अडकलेली, त्या आत्म्यांसोबत, तिची ओळख विसरत चाललेली.
"ती जास्त वेळ तिथं राहिली… तर तीही कायमची हरवेल…" एक वयोवृद्ध आत्मा बोलला, ज्याचा आवाज धूसर पण गंभीर होता. "तिचं प्रेमच एकटं तिची ओळख आहे. ते जर कोणी पुन्हा जागवू शकलं… तर ती वाचू शकेल."
धैर्यसिंह पायजवळ बसला. त्याचे डोळे ओले झाले. "मी काहीही करीन… पण ती हरवता कामा नये."
तेव्हा आत्म्यांनी एकमेकांकडे पाहिलं… आणि एक निर्णय घेतला.
"तुझं प्रेम तिला वाचवू शकेल. पण त्यासाठी तुला त्या यंत्रात उतरावं लागेल.तुझा जीव गेला तरी चालेल… पण तिचं अस्तित्व परत येईल."
धैर्यसिंह शांत उभा राहिला. डोळ्यांत निर्धार होता.
"माझं जीवन संपलं तरी चालेल… पण ती परत यायला हवी."
तो त्या तेजोमय बिंदूकडे चालू लागतो…
धैर्यसिंह त्या तेजोमय वलयात उतरला, जिथे संध्याचा आवाज अजूनही अधूनमधून घुमत होता – कधी साद घालणारा, कधी हरवलेला. त्याच्या पावलाखालून स्मशानाच्या जमिनीने कुरकुर करत त्याला ओळखलं… जणू अंधारही त्याचं संकल्प ओळखून थबकला.
"तू परत येणार नाहीस," एका आत्म्याने सांगितलं.
"माझं परत येणं महत्त्वाचं नाही… ती येणं गरजेचं आहे," धैर्यसिंह म्हणाला.
तेवढ्यात एका प्राचीन, काळोख्या कोनाड्यातून एक आकृती पुढे आली ती होती "छायासत्ता", जिच्या अधीन त्या स्मशानातील कैद झालेल्या आत्मा होते.
"तू तिला मागतोस? तिचं अस्तित्व माझ्या सावलीत विरलंय…"
"मी माझं सर्वकाही देतो माझं शरीर, मन, आत्मा… पण ती पुन्हा तिच्या ओळखीमध्ये परत यायला हवी."
छायासत्तेने थोडा वेळ शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत काळजाचं गहिरं पाणी होतं.
"ठीक आहे," ती म्हणाली. "पण एक अट आहे…
तुला तिचं सगळं आठवणीतून पुसून टाकावं लागेल.
तिच्या जीवनात तुझं अस्तित्वच उरायचं नाही."
तुला तिचं सगळं आठवणीतून पुसून टाकावं लागेल.
तिच्या जीवनात तुझं अस्तित्वच उरायचं नाही."
धैर्यसिंह क्षणभर थबकला. डोळ्यांत एक हलकी थरथर. पण त्यानं डोळे मिटले.
"जरी ती मला विसरली, तरी… ती स्वतःला विसरू नये."
त्याने हात पुढे केला.छायासत्तेने हात धरला… आणि अंधारात एक झोत उठला!
तेवढ्यात, संध्या एका उजळ वावटळीतून खाली पडत गेली… तिच्या डोळ्यांत गोंधळ, पण चेहऱ्यावर शांततेची किनार. ती पुन्हा स्मशानाच्या बाहेर होती… जिवंत.मात्र…
"धैर्यसिंह…?"ती त्याचं नाव पुन्हा पुन्हा घेत राहिली… पण आता तो फक्त त्या स्मशानातल्या एका आत्म्यांच्या ओंजळीत सामावलेला होता.
संध्या एकटीच त्या स्मशानाच्या वेशीवर उभी होती. तिच्या श्वासात धडधड होती,
पण डोळ्यांत प्रश्न..."मी... इथे कशी?"आजूबाजूला कोणी नव्हतं. त्या जुन्या वटवृक्षाखाली ती बसली, डोळे मिटले... आणि काही क्षणांपूर्वीचा धक्का तिच्या मनात स्पष्ट होत गेला एक झोत, एक स्पर्श... पण चेहरा आठवत नव्हता.
तिच्या मनात केवळ एक अस्पष्ट नाव घुमत होतं – "धै... धैर्य...?"ती उठून स्मशानाकडे वळली, पण आता तिथे दगड, राख आणि शांतता होती. तो वलय, तो काळोख, तो संघर्ष... सगळं जणू तिच्या आठवणींसह नष्ट झालं होतं.
त्या स्मशानाच्या अंतर्भागात मात्र, एक आत्मा स्थिर होता – धैर्यसिंह.त्याने संध्याला वाचवलं होतं, पण त्याचं अस्तित्व आता केवळ त्या जागेपुरतं मर्यादित होतं.
त्याचं प्रेम तिच्या हृदयातून कायमचं पुसलं गेलं होतं... पण त्याचं बलिदान त्या जागेच्या प्रत्येक कणात जिवंत होतं.आणि त्या रात्री, संध्याच्या स्वप्नात एक अस्पष्ट छाया येऊन बसली.एक आवाज…"तू सुरक्षित आहेस… हेच पुरेसं आहे."
त्याचं प्रेम तिच्या हृदयातून कायमचं पुसलं गेलं होतं... पण त्याचं बलिदान त्या जागेच्या प्रत्येक कणात जिवंत होतं.आणि त्या रात्री, संध्याच्या स्वप्नात एक अस्पष्ट छाया येऊन बसली.एक आवाज…"तू सुरक्षित आहेस… हेच पुरेसं आहे."
त्या रात्री संध्या झोपेतून दचकून उठली. तिचं संपूर्ण शरीर घामाने न्हालेलं होतं. पंखा चालू असूनही तिच्या हृदयाची धडधड थांबत नव्हती.
"कोण होता तो…? का येतोय माझ्या स्वप्नात वारंवार?"
ती स्वतः शी पुटपुटली.
ती स्वतः शी पुटपुटली.
संध्याच्या खिडकीबाहेर एक गडद छाया हलली. ती उठली, खिडकीपाशी गेली. बाहेर फक्त राखट वारा आणि काळसर आकाश… पण एका झाडाखाली एक माणूस उभा होता. छायेसारखा, स्थिर, पण त्याचे डोळे... ओळखीचे भासणारे!
ती क्षणभर मागे सरकली, पण काही तरी तिच्या मनात आलं आणि संध्या झाडाजवळ पोहोचली. तिथे कोणीच नव्हतं.फक्त एक पुरातन कागदाचा तुकडा जमिनीवर…
त्यावर लिहिलं होतं "तू अजूनही त्या सत्यापर्यंत पोहोचलेली नाहीस. तुझं आयुष्य अजून एका अंधाराच्या वळणावर आहे… आणि यावेळी मी तुझ्या मागे आहे."
त्यावर लिहिलं होतं "तू अजूनही त्या सत्यापर्यंत पोहोचलेली नाहीस. तुझं आयुष्य अजून एका अंधाराच्या वळणावर आहे… आणि यावेळी मी तुझ्या मागे आहे."
त्या क्षणी संध्याच्या आजूबाजूला हवा थंड झाली. कुत्रे भुंकायला लागले. आकाशात एक न भूतो न भव्य गडगडाट झाला.
"धैर्याचा अर्धा आत्मा अजूनही या जगात अडकलेला आहे… आणि त्याला मुक्त करणं फक्त तुझ्या हातात आहे."तिच्या कानात एक आवाज घुमला
संध्याच्या डोळ्यांत प्रश्न, काळजात धडधड…ती परत चालू लागली – पण आता प्रत्येक पावलाबरोबर तिला वाटू लागलं, कोणी तरी तिच्या मागे चालत आहे.
संध्या परत घरात आली, पण घर तेच नव्हतं…
दरवाजे बंद झालेले, खिडक्या झाकलेल्यासारख्या… आणि प्रत्येक कोपऱ्यातून हळूच कुणीतरी बघतंय असं वाटत होतं.तिने कागदाचा तुकडा पुन्हा हातात घेतला पण आता त्यावरचं अक्षर बदललेलं होतं.
दरवाजे बंद झालेले, खिडक्या झाकलेल्यासारख्या… आणि प्रत्येक कोपऱ्यातून हळूच कुणीतरी बघतंय असं वाटत होतं.तिने कागदाचा तुकडा पुन्हा हातात घेतला पण आता त्यावरचं अक्षर बदललेलं होतं.
“तू जितकी जवळ जाशील, तितकीच सावली तुला गिळायला सज्ज होईल…”
संध्याने वाऱ्याला धक्का देत समोरच्या आरशात पाहिलं
पण आरशात तिचा चेहरा नव्हता…धैर्यसिंहचा चेहरा होता.त्याची नजर खोल, अंधाऱ्या सागरासारखी.
पण आरशात तिचा चेहरा नव्हता…धैर्यसिंहचा चेहरा होता.त्याची नजर खोल, अंधाऱ्या सागरासारखी.
"संध्या…"तो आवाज आरशातून आला – मंद पण व्याकुळ.
"धैर्य!" ती पुढे झेपावली, पण आरशातले पाणी हलल्यासारखं होतं, आणि चेहरा विरघळला.इतक्यात घरभर घंटीचा आवाज झाला घड्याळातील काट्यांनी उलटी दिशा सुरू केली.
संध्याचं मन आता उलथून गेलं. ती धावत खोलीच्या आत गेली जिथे तिच्या आजीचा जुना, झाकलेला आरसा होता.तिने तो उघडला.आणि आत…एक पुरातन पुस्तक आणि त्यावर – धैर्यसिंहच्या नावाने कोरलेली एक ओळ
“जर तू हे वाचत असशील, तर मी अजून अडकलेलो आहे…”
त्या वेळी मागे कोणीतरी फुसफुसलं "तो अजून तुझ्याभोवतीच आहे, पण यावेळी तो एकटाच नाही."
संध्या वळली आणि तिच्या सावलीत दोन डोळे चमकले.
संध्या वळली आणि तिच्या सावलीत दोन डोळे चमकले.
त्या सावलीत चमकणारे डोळे आता हळूहळू संध्याच्या दिशेने सरकत होते. खोलीतील दिवा अचानक बंद झाला, आणि फक्त अंधार तिच्याभोवती घोंगावत राहिला.
"धैर्य…" तिचा आवाज थरथरत होता, पण आत कुठेतरी त्याला शोधायचा निर्धार सळसळत होता.
मागून एक थंड वारं आलं, आणि तिच्या गालावर कोणाचं तरी बोट फिरल्यासारखं वाटलं. ती थोडीशी मागे सरकली… पण तिच्या पाठीमागे आता भिंत नव्हती एक खोल पायरी होती.संध्या ती पायरी उतरू लागली एका नव्या जगात.
खाली उतरल्यावर समोर आलं एक विस्तीर्ण दालान जिथे चारही कोपऱ्यांत धैर्यसिंहचे वेगवेगळे प्रतिबिंब उभे होते पण त्यात फक्त एकच खरं प्रतिबिंब होतं.
"संध्या…" चारही प्रतिबिंबांनी एकाच वेळी पुटपुटलं.
"खरं कोण?" ती ओरडली. तिचा घाम अंगभर गारसर पसरला.
तेव्हा, उजव्या कोपऱ्यातील एक प्रतिबिंब पुढे आलं, आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. "माझ्या सावलींनी मला कैद केलंय. पण तुला शोधत होतो, कारण माझं शेवटचं सत्य तुझ्या हातात आहे."
संध्याच्या हातातलं ते पुस्तक तेजाने उजळलं,
“एक सत्य सोडल्याशिवाय दुसरं उजळत नाही… तुला निवड करावी लागेल.”त्यातून धूसर आवाज आला.
आता संध्या अडखळली. कोणता धैर्य खरा?
ज्याच्यावर ती विश्वास ठेवेल, तोच तिला या सावल्यांच्या साम्राज्यातून बाहेर काढू शकतो…
पण चुकीची निवड तिचा कायमचा अंत ठरू शकतो.
संध्याच्या मनात उलथापालथ सुरू होती. चारही धैर्यसिंहांसमोर उभी असताना तिचा श्वास जड होत चालला होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती एकात प्रेम, दुसऱ्यात राग, तिसऱ्यात घृणा, आणि चौथ्यात… रिक्तता.
"धैर्य…" तिने एक पाऊल टाकलं. तिच्या हातातलं पुस्तक आता अधिकच तापत होतं, जणू ते तिला योग्य दिशा दाखवत होतं. पण ती दिशा स्पष्ट नव्हती… तशीच धूसर, जशी सावल्यांची दुनिया असते.
"तू मला ओळखशील… कारण तुझं भय, आणि माझं प्रेम दोघांचं मूळ एकच आहे," त्या चार धैर्यांपैकी एकाने शांतपणे म्हटलं.
संध्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तिने डोळे मिटले… आणि एक क्षणासाठी तिला आठवलं त्या एका स्पर्शाचा कोमलपणा, ज्याने तीचं भय शांत केलं होतं.
"तूच!" ती किंचाळली आणि त्या धैर्यसिंहाच्या हातात आपलं पुस्तक दिलं.क्षणात बाकीच्या तीन सावल्या भयंकर किंचाळत विरघळल्या. पण…तिने निवडलेला धैर्यसिंहही तिला ओळखत नव्हता.
"मी… मी कोण?" त्याने विचारलं. त्याचा चेहरा आता भंगत चालला होता.
संध्याचं हृदय थरथरलं.ती चुकीच्या सावलीवर विश्वास ठेवून, खरं धैर्य गमावलं होतं.
संध्या आता पूर्णतः एकटी होती. तिच्या आजूबाजूला सावल्यांची माया हरवत चालली होती, पण हृदयात एक साद अजूनही घुमत होती
"संध्या... मी इथे आहे..."
ती आवाजाच्या दिशेने वळली.स्मशानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यातून, एका फुटलेल्या दगडी झऱ्यामागे, ती एक दरवाजा दिसत होता लोखंडी, जाडजूड आणि बंद
"माझं प्रतिबिंब जगतं आहे… पण मी अजून कैद आहे."
"संध्या, मला शोध… कारण तुझं भय अजून संपलेलं नाही!"त्या दरवाज्याच्या आतून दर दर करत, एक हळुवार आवाज येत होता खऱ्या धैर्यसिंहाचा.
"संध्या, मला शोध… कारण तुझं भय अजून संपलेलं नाही!"त्या दरवाज्याच्या आतून दर दर करत, एक हळुवार आवाज येत होता खऱ्या धैर्यसिंहाचा.
संध्याने झपाटल्यासारखी त्या दगडी भिंतीला हात लावला. तिच्या स्पर्शाने पुस्तकातल एक पान चमकल आणि त्यावर शब्द उमटले:
"तुला जे दिसतं, ते खोटं असू शकतं… पण जे ऐकू येतं, त्यामागे नेहमी काहीतरी असतं."
ती दरवाजा उघडू लागली… पण दरवाज्याच्या कडांवरून अंधाराचे जीव उसळू लागले.एक भयाण तडाखा!संध्या मागे फेकली गेली, पण तिनं एकदा मागे वळून पाहिलं आणि पाहिलं, त्या दरवाज्याच्या आतून धैर्यसिंहाचे डोळे तिला पाहत होते अश्रूंनी भरलेले, पण शांत.
संध्याचं शरीर अजूनही वेदनेने कुरकुरत होतं, पण तिचा नजरेचा कटाक्ष अजिबात ढळला नव्हता त्या लोखंडी दरवाज्यावरून.त्या भिंतीवर कोरलेले चिन्हं आता तिच्या हातावर उमटू लागली होती पुरातन शाप.
"धैर्यसिंह… जर हा खऱंच तू आहेस, तर मी तुला सोडवणार!"तिनं हात जोडले, आणि तिच्या ओठांवरून नकळत एक जुना मंत्र निसटला जो तिच्या आईनं तिला लहानपणी सांगितला होता… जो ती कधी समजून घेत नव्हती.
मंत्राच्या उच्चारानंतर संध्याच्या आजूबाजूचं हवामान बदलू लागलं.दरवाजा थरथरू लागला…आणि त्या अंधारातून, एक आत्मा बाहेर पडला पण तो धैर्यसिंह नव्हता.
तो होता… शापित रक्षक.ज्याचं काम होतं दरवाज्याच्या पलीकडे कोणीच पोहोचू नये, जोवर शुद्ध हेतू सिद्ध होत नाही तोवर
"तू प्रेमासाठी आलियेस… की केवळ भीती टाळण्यासाठी?" त्या आत्म्यानं विचारलं.
संध्या थोडी घाबरली. पण ती थांबली नाही."मी प्रेमासाठी आले आहे… आणि माझं भय आता माझं शस्त्र झालं आहे."
त्या क्षणी आत्म्यानं मागे सरकून दरवाज्याचा मार्ग मोकळा केला.
दरवाजा "क्र्र्र्र" असा आवाज करत उघडला… आणि एक नव्या भयानक जगात प्रवेश झाला जिथे प्रत्येक सावली जिवंत होती, आणि प्रत्येक दगडाला एक कथा होती.
दरवाजा पूर्णपणे उघडताच, एक गार वाऱ्याची झुळूक संध्याच्या अंगावरून गेली. ती झुळूक केवळ थंडी घेऊन आली नव्हती, तर एक विचित्र कुजक्या आठवणींचा वास… जणू कोणी शतकानुशतकांपासून रडत होतं, जगाच्या विस्मरणात हरवलेलं.
गुहेत पाऊल टाकताच तिच्या पायांखालील जमीन बदलली मऊ माती नाही, तर… मानवी कवट्यांचं ठिकाण.
"हे… इथे लोक गाडले नाहीत, तर जिवंतच अडकलेत…" संध्या हळूच कुजबुजली.
तिच्याभोवती भिंतीवर कोरलेली नावे उजळू लागली एकामागोमाग एक, जणू एखाद्या अज्ञात लढाईतील हुतात्मे.तिने एक नाव ओळखलं – "धैर्यसिंह"
तेच नाव… पण त्याच्या खाली एक तारीख होती मृत्यूची तारीख.
तेच नाव… पण त्याच्या खाली एक तारीख होती मृत्यूची तारीख.
"नाही… हे खोटं असू शकत नाही." संध्यानं हात त्या नावावर ठेवला.तेवढ्यात भिंतीतून धूसर आवाज उमटू लागले कुजबुज, किंकाळ्या, रडारड…
आणि एका क्षणात, संध्याभोवती अनेक आत्मे प्रकट झाले. ते तिच्या भोवती फिरू लागले त्यांची नजर उपरोधाची नव्हे, तर उपशयाची होती.
आणि एका क्षणात, संध्याभोवती अनेक आत्मे प्रकट झाले. ते तिच्या भोवती फिरू लागले त्यांची नजर उपरोधाची नव्हे, तर उपशयाची होती.
"तूच आमचं उध्दार करू शकतेस…" एका आत्म्यानं कुजबुजत म्हटलं.
संध्या हादरली."मी… मी फक्त धैर्यसिंहसाठी आले आहे!"
"त्यालाही मुक्ती हवी आहे… पण तो आता या शापाचा भाग आहे."
त्या क्षणी गुहेच्या शेवटी एक पायरी उगम पावली अंधारात हरवणारी, पण वर नेणारी.ती वर जाणारी वाट… धैर्यसिंहकडे जाणारी होती.
संध्याच्या पायाखालची ती अंधारात हरवणारी पायरी… काहीतरी बोलवत होती, पण पाठीमागे त्या आत्म्यांचे कुजबुजते शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते.
"तो तिथे आहे… पण आता तो तुझ्या ओळखीचा राहिलेला नाही…"
ती एक पायरी चढली. प्रत्येक टप्प्यावर हवेतला दाब वाढत होता, जणू गुरुत्वाचं सामर्थ्य तिच्यावर ओझं टाकत होतं.अचानक…
भिंती बदलू लागल्या. एका बाजूला धैर्यसिंह उभा होता शांत, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज.
पण दुसऱ्या बाजूला… तोच धैर्यसिंह – पण डोळे रक्तसर, अंगभर काळं धुकं, आणि त्याच्या पाठीमागे शापित आत्म्यांचा झुंड.संध्या थबकली.
पण दुसऱ्या बाजूला… तोच धैर्यसिंह – पण डोळे रक्तसर, अंगभर काळं धुकं, आणि त्याच्या पाठीमागे शापित आत्म्यांचा झुंड.संध्या थबकली.
"कोणता खरा आहे?" तिचं मन गोंधळलं.
तेवढ्यात दोघेही तिच्या दिशेने चालू लागले.
तेवढ्यात दोघेही तिच्या दिशेने चालू लागले.
एकाच वेळी…"संध्या… मीच आहे."संध्या… माझ्या हातात ये."
तिला निर्णय घ्यायचा होता.एक चुकीचा पाऊल, आणि ती कायमची अडकून पडणार.
संध्यानं डोळे मिटले. आणि…तिचा श्वास खोल गेला, आणि काळजात एक ओळखीची जाणीव जागी झाली.
"धैर्य…" ती हलक्या आवाजात म्हणाली.
डोळे उघडताच ती सरळ उजव्या दिशेने वळली… त्या शांत धैर्यसिंहकडे.
डोळे उघडताच ती सरळ उजव्या दिशेने वळली… त्या शांत धैर्यसिंहकडे.
तो तिला बघत होता डोळ्यात खूप काही अनकथं, पण चेहऱ्यावर एक शांती.पण…डावीकडून एक किंकाळी ऐकू आली. तो दुसरा धैर्यसिंह – काळसर, शापित अचानक गरजला, "तू चुकीचं निवडलं!"
त्याच्या आवाजातून अंधाराचे शंभर हात बाहेर आले आणि हवेत धडपडू लागले.
त्याच्या आवाजातून अंधाराचे शंभर हात बाहेर आले आणि हवेत धडपडू लागले.
संध्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या गळ्यातल्या कवचाला हात लावला तेच कवच जे तिच्या आईने तिला दिलं होतं, ज्यात एक पुरातन मंत्र बंदिस्त होता.
"ॐ क्षयमुक्ताय आत्मभवाय नमः…"ती मंत्र म्हणू लागली.
शब्द गडगडाटासारखे हवेत उसळू लागले.त्याच क्षणी ती शापित सावली आक्रोश करत जमिनीकडे खेचली गेली जणू त्या मंत्राच्या एका अक्षरानेही तिचं अस्तित्व वितळत होतं.
संध्या आणि खरा धैर्यसिंह दोघं एकत्र उभे राहिले.
तिच्या हातात आता तो कवच प्रकाशमान होत होतं आणि त्या प्रकाशात दिसला एक नवीन दरवाजा जो या स्मशानाच्या पलीकडील जगात जात होता.
तिच्या हातात आता तो कवच प्रकाशमान होत होतं आणि त्या प्रकाशात दिसला एक नवीन दरवाजा जो या स्मशानाच्या पलीकडील जगात जात होता.
दरवाजा उघडताच एक वेगळंच जग त्यांच्या समोर उभं होतं. ना ते पूर्ण काळोखात होतं… ना पूर्ण प्रकाशात. जणू सत्य आणि भ्रमाच्या सीमारेषेवर उभं असलेलं एक स्थान.
संध्या आणि धैर्यसिंह त्या दरवाजातून आत गेले. मागे स्मशानाचं शतकांपासूनचं भय राहिलं… आणि समोर होता "अज्ञाताचा पायवाटा."
ते चालू लागले, पण या पायवाटेवर प्रत्येक पाऊल मागच्या आयुष्यातल्या आठवणींचं रूप घेऊन त्यांच्यासमोर उभं राहत होतं.
संध्याला तिच्या आईचा आवाज ऐकू आला…
"सत्याची निवड सोपी नसते. पण भयाला ओळखणं म्हणजेच त्यावर मात करणं."
"सत्याची निवड सोपी नसते. पण भयाला ओळखणं म्हणजेच त्यावर मात करणं."
धैर्यसिंहला पुन्हा एकदा तो क्षण आठवला… जिथे त्याने मृत्यूला सामोरं जाण्याचं ठरवलं होतं. पण आता तो एकटा नव्हता.
तेवढ्यात एका अंधारलेल्या दगडी कमानीखाली ते थांबले.
"शेवट नाही… पुनर्जन्माच्या सुरुवातीस ओळखा."कमानीवर शब्द कोरले होते
धैर्यसिंहने संध्याकडे पाहिलं"आपण अजून एका भयाच्या रूपाशी सामना करायला तयार आहोत का?"
ती हसली…."हे भय नाही, हे तर सत्याच्या नव्या दाराचं निमंत्रण आहे."धिटाईने म्हणाली.
कमानी पार करताच हवेत गारठा उतरला. समोर एक विशाल सभामंडप होता तिथं न कुठलं दार होतं, न खिडकी, पण तरीही आत एक विचित्र प्रकाश पसरलेला होता… जणू काळजाच्या आतल्या खोलीत शिरल्यासारखं वाटत होतं.
संध्या आणि धैर्यसिंह समोर उभ्या असलेल्या चौकटीकडे पाहू लागले. त्या चौकटीत काही तरी सतत हलतं होतं अशांत, असंख्य आत्म्यांचा भयानक खेळ सुरू होता.
"हे ते अंतिम परीक्षा स्थळ आहे…" धैर्यसिंह कुजबुजला.तेवढ्यात एक अस्पष्ट आकृती त्या चौकटीतून पुढे आली ती संध्यासारखीच दिसत होती… पण चेहरा, डोळे, हावभाव—सगळं अगदी निर्जीव आणि थंड.
"तू आहेस का माझं प्रतिबिंब… की माझं अर्धवट भय?" संध्याने विचारलं.
ती आकृती हसली."मी आहेस तूच… जी सत्यापर्यंत पोहोचू शकली नाहीस. आता तुला निवड करावी लागेल एक शेवट… किंवा एक वेगळं जन्म."
धैर्यसिंह पुढे सरसावला, पण त्याच्या पायाजवळ जमीन चिखलासारखी वितळायला लागली."हे भय… मला गिळायला आलं आहे!"
संध्या जोरात ओरडली, तिच्या आवाजात मंत्र मिसळले होते. तिच्या हातात पुन्हा एकदा प्रकाश प्रकट झाला आधीच्याच ग्रंथाचा अखेरचा मंत्र.
"हा मंत्र… तुमच्यासाठी नाही… माझ्यासाठी आहे!" ती आकृती किंचाळली, आणि संध्याकडून सगळं प्रकाश बाहेर पडत गेला.
तेवढ्यात... सभामंडप ढवळून गेला. जमिनीखालून आर्त आवाज, भिंतींवर गडगडणं… आणि अचानक, शांतता.
धैर्यसिंहने डोळे उघडले. संध्या समोर होती. थकलेली, पण जिवंत.
"आपण ते पार केलं?"
"नाही धैर्य… आपण अजून वाटेवर आहोत. पण आता भय आपल्या पायाशी झुकलं आहे."
संध्या आणि धैर्यसिंह मंद प्रकाशात पुढे चालत होते. सभामंडप मागे राहिला होता, पण त्याचे कंपने अजूनही त्यांच्या शरिरात घोंगावत होते.तेवढ्यात, अचानक एक जुनाट घंटानाद झाला ओळखीचा, पण विसरलेला. दोघंही वळून पाहतात.
त्या घंटानादातून एक दरवाजा उघडतो तोच दरवाजा, जो स्मशानाच्या तळघरात त्यांनी कधी पाहिलाही नव्हता. दरवाज्यावर कोरलेलं होतं "सत्य प्रवेश द्वार एकदाच उघडणारा."
धैर्यसिंहने संध्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांत भीती नव्हती पण न सांगता येणारी तगमग होती.
"आपण इथून गेलो, तर मागं काहीच उरणार नाही…" ती म्हणाली.
"पण जे उरलंय, ते आपलं नाही संध्या. आपण जे शंभर आत्म्यांसाठी लढतोय, त्यांची मुक्तता या दरवाज्याच्या पलीकडे आहे."
तेवढ्यात, त्या दरवाज्याच्या मधोमध एक भयंकर छाया प्रकट झाली अगदी मानवी चेहरा, पण डोळे रिकामे. तो हळूहळू बोलतो
"तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत आहात… पण तुमचं स्वतःचं भय अजून जिवंत आहे. एकाने इथेच राहावं लागेल. एका आत्म्याची पूर्ण आहुती द्यावी लागेल."
संध्याचं मन डगमगलं. पण धैर्यसिंहने हात पुढे केला.
"मी राहीन. मी माझ्या वंशाच्या शापासाठी इथे थांबेन."
संध्या चिडली. "मीही तेवढीच जबाबदार आहे!"तेव्हा छाया थोडं हसली "जेव्हा प्रेम आणि भय समोरासमोर येतं… तिथं निर्णय नसतो, फक्त समर्पण असतं."
… आणि त्या क्षणी, दरवाज्यामागून एक प्रकाशझोत आला. त्या प्रकाशात एक लहान मुलगी दिसली – धैर्यसिंहच्या बालपणातील आठवणीसारखी.
ती फक्त म्हणाली –"कुणीही निघालं, तरी दुसरं जिवंत राहत नाही.…आणि दरवाजा आपोआप उघडू लागला.
दरवाजा पूर्ण उघडला. आतून झणझणीत प्रकाश उसळत होता, पण त्यात केवळ शांती नव्हती तो प्रकाश वेदनांनी भरलेला होता, काळाच्या आणि आत्म्यांच्या करुण आक्रोशांनी भारलेला.
धैर्यसिंह थोडा पुढे गेला, पण संध्या त्याच्या हातात घट्ट पकडून राहिली. तिचा चेहरा थरथरत होता, पण डोळे ठाम होते.
"आपण दोघेही जाणार." ती म्हणाली.
धैर्यसिंहने नकारार्थी मान हलवली. "नाही, मीच… फक्त
तेवढ्यात, पुन्हा ती छाया प्रकट झाली यावेळी तिच्या रूपात स्पष्टता होती. ती एखाद्या महाराणीसारखी दिसत होती… पण डोळ्यांत मृत्यूचं प्रतिबिंब.
"समर्पण एका आत्म्याचं लागेल. पण प्रेम… त्यात जे मरतं, ते खरंच मरणार नसतं."
धैर्यसिंहने संध्याकडे पाहिलं. त्याने तिच्या कपाळाला हळूच हात लावला.
"तुझं प्रेमच माझं पुनर्जन्म ठरेल…" तो हसला, आणि तो प्रकाशाच्या दिशेने झेपावला.
संध्या किंचाळली, धावत त्याच्या मागे गेली पण क्षणात दरवाजा जोरात बंद झाला!
धडाम!
संध्या दरवाज्यासमोर कोसळली… तोंडात फक्त एकच शब्द: "धैर्य…"
संपूर्ण स्मशान पुन्हा शांत झालं. पण हवेत एक मंद सुवास दरवळू लागला जणू मुक्त झालेल्या आत्म्यांचा आशीर्वाद.
संध्या एकटी उभी होती, पण तिच्या पाठीशी आता एक तेजस्वी वलय होतं धैर्यसिंहचा आत्मा, जणू तिच्या मनात घर करून गेला होता.
ती मागे फिरली. तिच्या डोळ्यांत आता ना भीती होती, ना अश्रू.फक्त एक अढळ निश्चय "आता मी हे स्मशान उधळून टाकणार."
संध्या हळूहळू उभी राहिली. अंगावरची राख झटकली. तिच्या डोळ्यांत आता अश्रू नव्हते तिथं होता एक तेज, एक उर्मी… धैर्यसिंहच्या बलिदानाचं तेज.
तिने मागे वळून स्मशानाकडे पाहिलं तिथं अजूनही अंधार होता, पण आता तो अंधार तिला गिळायला तयार… नव्हता कारण तिच्या मनात उजेड उगम पावत होता.
"हेच शेवटचं स्मशान असणार आहे," ती पुटपुटली.
तेवढ्यात, तिच्या हातात पुन्हा तो तेजस्वी मंत्रलेखन प्रकट झाला धैर्यसिंहने आधी दिलेला ग्रंथाचा अंतिम मंत्र.
तिने डोळे मिटले, आणि मंत्र बोलू लागली.
"शापांच्या छायांत तू जन्मलास,मुक्त आत्म्यांच्या आसांत तू वितळलास, धैर्याच्या बलिदानातून मी उठते,
या स्मशानाच्या चक्राला मी खंडित करते!"
या स्मशानाच्या चक्राला मी खंडित करते!"
तिच्या आजूबाजूला हवेत गरम स्पंदनं उठू लागली. जमिनीखालून थरथराट सुरू झाला. स्मशानातील लांब झाडं स्वतः पेटून उठू लागली. आकाशातून विजा चमकू लागल्या, आणि एका प्रचंड गर्जनेने त्या स्मशानाचं हृदय हलू लागलं.
तिथं अजूनही काही आत्म्यांचे किंकाळ्या होत्या… पण आता त्या भीतीच्या नव्हत्या त्या मुक्तीच्या होत्या.
तेवढ्यात, संध्याच्या आजूबाजूला प्रकाशाचं वलय तयार झालं. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, जणू ती आता केवळ मरणातून नव्हे तर भयातूनही मुक्त झाली होती.
शेवटचा मंत्र तिच्या ओठांवर आला…"धैर्याच्या स्मशानातून… आता जीवनाचा उदय व्हावा!"...आणि त्या क्षणी संपूर्ण स्मशान फाटून गडगडत कोसळलं.
संध्या तिथं उभी होती, पण आता ती एकटी नव्हती
"तू आता जिंकलीस, संध्या." धैर्यसिंहचा आवाज तिच्या कानात उमटला:
स्मशान कोसळून शांत झालं होतं. राखेच्या ढिगाऱ्यातून धूर अजूनही उसळत होता, पण त्यात आता मृत्यू नव्हता त्यात नवजीवन होतं.
संध्या त्या ढिगाऱ्याकडे पाहत होती. एका क्षणात तिनं जे गमावलं, ते आता पुन्हा मिळणं शक्य नव्हतं. पण तिचा चेहरा शांत होता –कारण तिच्या हृदयात एक विश्वास जागा झाला होता… धैर्य अजूनही तिच्यात कुठंतरी जिवंत होतं.
"संध्या…"त्या राखेतून एक आवाज ऐकू आला… ओळखीचा…
तिचं काळीज दचकून थांबलं. ती वळली… आणि तिला एक अस्पष्ट, धूसर आकृती दिसली.
धैर्यसिंह.पण तो माणूस नव्हता… तो आता पूर्ण प्रकाशमय झाला होता.
"मी फक्त शरीराने मेलो आहे, संध्या. तुझ्या साहसामुळे, हजारो अडकलेल्या आत्म्यांना मुक्ती मिळाली. आणि मलाही…"
संध्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं पुढं हात लांबवला, पण त्याचं रूप स्पर्शात नव्हतं… केवळ प्रकाश.
"तू आता एकटा नाहीस, "तू आता हजारो मुक्त आत्म्यांची स्मृती घेऊन जगणार आहेस."धैर्य म्हणाला,
तेवढ्यात त्या ढिगाऱ्यातून अचानक एखादी सावली हलली. संध्याचं लक्ष तिकडे गेलं.एक मुलगी… लहान, धीरगंभीर चेहऱ्याची.ती स्मशानातून बाहेर आली होती, पण तिच्या डोळ्यांत अजिबात भीती नव्हती
आई…" ती म्हणाली.
संध्या गोंधळली. "तू कोण?"
मुलगी हसली… आणि तिच्या गालावरती… धैर्यसिंहसारखं लाजरं खूपस्मित.
संध्या स्तब्ध. तिने डोळे मिटले… आणि पुन्हा उघडले. पण त्या क्षणी तिला समजलं धैर्य पुन्हा तिच्याकडे परत आलंय… एका नव्या रूपात.
"हे शेवटचं प्रेतवाडा नव्हतं," संध्या स्वतःशी पुटपुटली,
आणि त्या स्मशानावर पहिल्यांदाच सूर्यप्रकाश पडला.
स्मशान मागे पडलं होतं. ते आता केवळ एक आठवण उरली होती काळजावर कोरलेली, पण मनाला अधिक मजबूत करणारी.
संध्या त्या लहान मुलीचा हात धरून चालत होती. ती अजूनही धैर्यसिंहच्या अस्तित्वाचा स्पर्श आपल्या बोटांत जाणवत होती.
"तुझं नाव काय ग?" संध्या हळूच विचारते.
मुलगी हसली. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती.
"धारा…" तिनं उत्तर दिलं.
संध्या स्तब्ध झाली. धैर्य… आणि धारा.जणू मृत्यूने जे हिरावलं, ते आयुष्याने वेगळ्या स्वरूपात परत दिलं होतं.
त्या दिवशीपासून संध्या कुठल्याही सावलीला घाबरली नाही. कारण ती जाणून होती…काही अंधार, आपल्याला प्रकाशाचं खरं मूल्य शिकवतो.
धारा मोठी होत होती, पण तिच्या आजूबाजूला एक भयावह तेज होतं.
कधी संध्याच्या स्पर्शाने झोपताना ती नकळत म्हणायची
"आई, बाबा आज स्वप्नात आले होते… त्यांनी सांगितलं, अजून खूप काही लिहायचं आहे."
संध्या फक्त हसायची. ती आता लेखक झाली होती
'स्मशानातील सत्य' या पुस्तकाने लोकांचं मन जिंकलं होतं. पण तिच्या मनात अजून एक गोष्ट लिहायची होती
धारा आणि तिच्या पित्याच्या पुनर्जन्माची कथा.
'स्मशानातील सत्य' या पुस्तकाने लोकांचं मन जिंकलं होतं. पण तिच्या मनात अजून एक गोष्ट लिहायची होती
धारा आणि तिच्या पित्याच्या पुनर्जन्माची कथा.
धारा आता दहा वर्षांची झाली होती. ती हुशार, शांत आणि थोडीशी विचित्र होती. तिच्या डोळ्यांत एक अजब झळक होती जणू ती अनेक जन्म पाहून आली होती.
एका रात्री… पौर्णिमा होती. आकाशात चंद्र प्रचंड मोठा आणि लालसर दिसत होता. संध्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. धारा झोपली होती… असं तिला वाटलं.पण अचानक अंगणात पावलांचा आवाज झाला.
कडाक! एखादी जुनी झाडलेली झाडाची फांदी वाकली असावी तसा आवाज.
कडाक! एखादी जुनी झाडलेली झाडाची फांदी वाकली असावी तसा आवाज.
संध्या दचकली. ती उठून खाली आली.पायऱ्या उतरत असताना तिच्या पावलांखाली काहीतरी ओलसर वाटलं…ते रक्त होतं.
"धारा!" ती किंचाळली.
आंगणात उभी होती धारा… पण ती काहीशी वेगळी वाटत होती. तिच्या डोळ्यांत चंद्र परावर्तित होत होता, पण चेहऱ्यावर शांततेऐवजी एक अनामिक भाव होता.
"आई…" धारा म्हणाली, पण आवाज तिचा नव्हता.तो आवाज… धैर्यसिंहचा होता.
"माझं अधुरं काम अजून बाकी आहे."
संध्याच्या अंगावर काटा आला. "धारा… तु… तु ठीक आहेस ना?"
पण धारा त्या झाडाजवळ गेली… आणि झाडाच्या बुंध्याजवळ हाताने जमीन कुरवाळली. तिथे माती ताजी उकरलेली होती. आणि आत काहीतरी गाडलेलं होतं एक जुनी लोखंडी पेटी.
पेटी उघडताच एक तीव्र गारठा संपूर्ण घरभर पसरला.
त्यात होती एक जुनी डायरी, आणि एक मोडकं कंकण.
तेवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि घरातील सर्व दिवे एकदम विझले
त्यात होती एक जुनी डायरी, आणि एक मोडकं कंकण.
तेवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि घरातील सर्व दिवे एकदम विझले
तेवढ्या रात्री… संध्याच्या हातात ती जुनी डायरी आली. धारा आता पूर्ववत शांत झोपलेली वाटत होती, पण संध्याचं मन अस्वस्थ झालं होतं.
स्वप्नांच्या आधीचा मृत्यू… आणि मृत्यूआधीचं सत्य."डायरीवर धूसर अक्षरात लिहिलं होतं ,
संध्याने पहिलं पान उघडलं…त्यातल्या ओळी रक्तासारख्या लाल शाईत होत्या "ज्याने हे वाचलं, त्याने माझं दुःख उचलावं.अन्यथा त्याच्या घरात प्रत्येक चंद्राच्या रात्री एक आत्मा जन्म घेईल… पण मरण कधीच नाही येईल."
तिच्या हातातली डायरी गरम झाली. अक्षरं जळू लागली.
धारा पुन्हा उठली… पण यावेळी तिचे डोळे पूर्ण काळे होते.
"आई… मला काहीतरी दिसतं… एक स्त्री… एक फार जुना वाडा… आणि तो वाडा होऊन गेलेल्या वधूंनी भरलेला आहे… त्या रडतात… पण त्यांचा आवाज ऐकूच येत नाही!"
संध्या धाराला घट्ट मिठीत घेते.
"आई, त्यांच्यात एक तुझ्यासारखीच आहे… ती तुझ्याकडे पाहतेय."धारा थरथरत म्हणते
तेवढ्यात, घरभर एक चुकार सावरून गेलेला आवाज घुमतो "त्या वाड्यात परत यावं लागेल, संध्या… कारण शेवट अजून झाला नाही."
संध्याच्या पाठीमागे एक सावली उभी होती – अर्धी विखुरलेली, अर्धी स्पष्ट… तिच्या चेहऱ्यावर संध्याचाच चेहरा होता!
संध्या थिजली होती. ती सावली अजूनही तिच्या पाठीमागे उभी होती जणू तिच्याच आयुष्याचा एक विसरलेला भाग.
"मी आहे तुझं भविष्य… आणि तुझं भूतकाळही," त्या सावलीने शांतपणे सांगितलं. तिचा आवाज संध्याचाच होता, पण तो अधिक खोल, थंड आणि अनोळखी वाटत होता.
धारा भीतीने आईच्या पाठीमागे लपली. "आई, आपण इथून निघूया… मला या घरात राहायचं नाही!"
तेवढ्यात, डायरी स्वतःहून उघडली. तिच्या पानांमधून एक जुनं नक्षीदार आमंत्रण खाली पडलं. त्यावर लिहिलं होतं "कुलवधूचा विवाह – रात्रभर वाड्यातील अतिथींसह."खालच्या ओळीत धूसर नावं होती… पण एक नाव स्पष्ट होतं – संध्या कुलकर्णी.
संध्याच्या काळजात भीतीने धडधड वाढली.
"हे… हे माझं नाव का?"
"हे… हे माझं नाव का?"
तेव्हाच त्या आमंत्रणावरचं शाईतलं अक्षर रक्तासारखं ओघळू लागलं, आणि त्याच क्षणी घराच्या खिडक्यांमधून तो वाडा दिसू लागला जणू तो कालातीत होता, पण आता तिच्यासमोर होता.
"तुला यावंच लागेल,"तुझं लग्न अजून बाकी आहे… आणि त्या वधूंचं उद्धार तुझ्याच हातात आहे."सावली म्हणाली.
संध्या आणि धारा दोघींनी खिडकीबाहेर पाहिलं दूर अंधारात, त्या वाड्याच्या गच्चीत अनेक वधूंच्या आकृती उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यांत आशा… की सूड?
संध्याच्या हातात ते आमंत्रण अजूनही होतं.रक्तासारखी ओघळलेली शाई आता हळूहळू वाळत चालली होती, पण त्यावर उमटलेलं तिचं नाव... ते तिथेच ठाम होतं.
"आई, आपल्याला खरंच तिथं जायचं आहे का?" धारा घाबरून म्हणाली.
संध्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. "काही गोष्टींपासून पळून जाऊ शकत नाही ग धारा. काही वेळा… त्यांना सामोरं जावंच लागतं."
त्या रात्री संध्या आणि धारा वाड्याकडे निघाल्या. जसजशा त्या गडद जंगलाच्या वाटा ओलांडत होत्या, वाऱ्याचा आवाज वेगळाच वाटत होता जणू तो जुन्या विवाहगीतांचं पारायण करत होता.
वाड्याच्या दारात पोहोचताच, दार आपोआप उघडलं. आत एक भला मोठा मंडप सजलेला होता पण वऱ्हाड कुठेच नव्हतं. त्या ठिकाणी उभ्या होत्या अनेक वधूंच्या आकृती… पांढऱ्या साड्या, मोकळे केस, आणि गळ्यात मंगलसूत्र.
संध्या पुढे गेली. एक वधू तिच्याजवळ आली आणि हळूच तिच्या गळ्यातील मंगलसूत्र काढून तिच्या हातात ठेवून म्हणाली "हे त्या विवाहाचं प्रतीक आहे जे अपूर्ण राहिलं. तू पूर्ण करणार का?"
संध्याच्या हातातलं ते मंगळसूत्र गरम झालं… आणि त्यासोबत तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व वधूंच्या चेहऱ्यावर एकच भाव उमटला मुक्तीची ओढ की सूडाची आस?
संध्या एका भयानक शांततेच्या गर्तेत उभी होती. तिच्या हातातलं मंगलसूत्र आता अगदी जळत होतं, पण त्यातून एक विचित्र थंडावा तिच्या शरीरात झिरपत होता.
धारा कुठेतरी गायब झाली होती, आणि वाड्यातल्या त्या सात वधूंच्या सावल्या तिच्या भोवती फेर धरत होत्या…
एकीने पुढे सरसावत विचारलं, “तू आमचं पूर्णत्व बनशील का?”
संध्याचा श्वास अडखळला. “मी… मी फक्त माझ्या मुलीला शोधायला आले आहे.”
“मग शोध, “पण आठव, या वाड्याचं नियम सोपा नाही… ज्याला एकदा वधू मानलं, तिला इथून परत जायला परवानगी नसते.”दुसरी सावली कुजबुजली,
तेवढ्यात एक भिंत आपोआप फाटली. आत एक मंद प्रकाश दिसला. संध्याने धडधडत्या काळजाने तिकडे पावलं टाकली.
त्या अंधाऱ्या खोलीत धारा एका जुनाट आरशासमोर उभी होती… पण तिचा चेहरा नव्हता तिचाच डोळ्यांत अजून एक आत्मा होता – एक वधू, जी कधीकाळी त्या वाड्यात अपूर्ण विवाहाच्या अग्नीमध्ये अडकून गेली होती.
आई…” धारा काही बोलायच्या आत तिचा आवाज बदलला,
“मी धारा नाही, मी त्या सातपैकी शेवटची आहे… आणि माझं लग्न अजून बाकी आहे.”
संध्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. वधूंच्या सावल्या हसत होत्या, फेर धरत होत्या, आणि एक मांडव उभा राहत होता नव्याने!
संध्या अंधाऱ्या मांडवाच्या मध्यभागी उभी होती. तिच्या पायाखाली काळसर रंगाची फुलं पडली होती जणू जिवंत नसलेल्या आत्म्यांच्या शापित आठवणी. सात सावल्या तिच्याभोवती फेर धरत होत्या, त्यांच्या हातात मृत फुलांची माळ होती.
“तुला जर खरंच तुझ्या मुलीला वाचवायचं असेल… तर आमचं लग्न पूर्ण कर.”एका सावलीने पुटपुटत विचारलं,
संध्याच्या हातातल्या मंगळसूत्राची साखळी आपोआप घट्ट झाली. तिच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा, पण नजरेत अजूनही असणारी आईची आग होती.
"मी कोणाचंही लग्न करणार नाही," ती ओरडली,
"पण मी माझं मूल घेऊन इथून निघेन… कारण एक आईचं प्रेम, कुठल्याही शापित विधीपेक्षा बलवान असतं!"
"पण मी माझं मूल घेऊन इथून निघेन… कारण एक आईचं प्रेम, कुठल्याही शापित विधीपेक्षा बलवान असतं!"
तेवढ्यात तिच्या मागे कोणीतरी उभा राहिल्याचा भास झाला.
धैर्यसिंह. पण त्याचा चेहरा अर्धवट जळालेला… डोळ्यांत अजूनही प्रकाश, पण अंगावर सावल्यांचा कोट.
“संध्या… तुला इथून सोडवण्यासाठी मला एका सावलीचा करार करावा लागला. मी आता पूर्ण माणूस नाही… पण तुला आणि धाराला बाहेर काढायला अजून शक्ती उरली आहे.”
त्याच्या पावलांखाली मृतकांची राख उडत होती.
संध्या धैर्यकडे धावत गेली, त्याचा हात घट्ट पकडला, आणि एक क्षणात त्यांच्याभोवती तेजोवधू वर्तुळ तयार झालं. वधूंच्या सावल्या किंचाळल्या, आक्रोश करत मागे सरकल्या.
"हे नातं बनावट नाही, ही शपथ आहे – एका जीवांचं दुसऱ्यासाठी जीव देण्याचं!"
तेवढ्यात एक भीषण गर्जना झाली… आणि वाड्याचा मांडव कोसळू लागला. सात सावल्यांची राख हवेत विरून गेली… आणि संध्या, धैर्यसिंह आणि धारा – तिघंही त्या अंधाऱ्या वाड्यातून बाहेर पडले.
पण… सांध्याचा गळ्यातलं मंगळसूत्र अजूनही गरम होत होतं…
पण आकाश अजूनही गर्द काळं होतं. एखाद्या अपूर्ण मंत्रासारखी शांतता त्यांच्यामागे दबकत येत होती.
"आपण वाचलो का…?" संध्या धीरगंभीर स्वरात विचारत होती.
धैर्यसिंह थांबला. त्याने आकाशाकडे पाहिलं काळसर ढगांच्या आत काहीतरी हलत होतं. त्याचा चेहरा पांढराफटक पडला.
"तो मंत्र… पूर्ण झाला नाही. त्या सात सावल्यांपैकी सातवी अजूनही मुक्त झाली नाही."
तेवढ्यात धारा अचानक गारठली. तिच्या गळ्याभोवती सावल्यांचा एक धागा उमटला अगदी हलकासा, पण जीवघेणा.
"आई…" ती कुजबुजली, तिचा श्वास थांबू पाहत होता.
संध्या धावत गेली. "माझ्या मुलीला काही झालं, तर… मी पुन्हा त्या वाड्यात जाईन! त्या सावलीला स्वतःमध्ये कैद करेन!"
धैर्यसिंहने तिच्या खांद्यावर हात ठेवला."तुला एकट्याने जाण्याची गरज नाही. पण एक लक्षात ठेव… सातवी सावली ही इतर सहांचं प्रमुख अस्तित्व आहे. ती एकटीच संपूर्ण विधी मोडू शकते… किंवा पूर्ण करू शकते."
त्या क्षणी मंगळसूत्र पुन्हा गरम झालं. आणि दूरवर, वाड्याच्या गाभार्यातून एक आवाज घुमला…