कोणत्याही कठीण प्रसंगात एक आशेचा किरण नेहमीच दिसतो,तो म्हणजे आपला "आतला प्रकाश....'' त्याच्यावर विश्वास ठेवून जो पुढे जातो तो नेहमीच यशस्वी होतो.... म्हणूनच माझ्या या कथा संग्रहाचे नाव आहे "आतला प्रकाश...."
अशाच काही प्रेरणादायी कथा मी आपल्या समोर मांडणार आहे... आशा करते तुम्हाला त्या नक्की आवडतील आणि नेहमीं प्रमाणे तुम्ही लाइक आणि कंमेंट करून प्रोत्साहन द्याल...
आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींवरून या कथा मला सुचल्या आहेत माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही... कथा पूर्ण काल्पनिक आहेत....
माझ्या सर्व कथा तुम्हाला "आतला प्रकाश" या सिरीज मध्ये सापडतील... सर्व प्रेरणादायी कथांमधुन मला हेच सांगायचं आहे... "आपल्या मनात असंख्य विचार एखाद्या पक्षाप्रमाणे फडफड करत असतात,त्या मधील सकारात्मक विचारांना मुक्त करून आकाशात उडणार्या पक्षाप्रमाणे आनंदी जीवन जगायचं की नकारात्मक विचारांमध्ये अडकून पिंजर्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे बंदिस्त जीवन जगायचं हे आपणच ठरवायचं असते...."
कितीही कठीण परिस्तिथी आली तरी मनाचे धैर्य ढळू न देता धीर धरून करावा आलेल्या परिस्थितीशी सामना....
म्हणजे पूर्ण होईल आपली मनोकामना.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा ती व्यक्ती खचुन जाते.... म्हणूनच जेव्हा मनाचे खच्चीकरण होऊन जीवन नीरस होते.... तेव्हा देवाला स्मरण करून केलेली प्रार्थना आपले जीवन प्रफुल्लित करते....आणि मनाला शांती आणि समाधान मिळते.... मानसिकदॄष्ट्या समाधानी असलेला माणूस कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो..
ईरा टीमचे आभार मानते की त्यांनी खूप छान विषयावर लिहायची संधी दिली.... लवकरच भेटूया पहिली कथा घेऊन...
©® अनुजा धारिया शेठ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा