आठवणी........गोड की कडू (भाग२)

Sk

""काय झालं????चल आता नाश्ता करायला. तुझे आवडते पराठे आहेत."मानसी

"मी कोण आहे......."सागर

"म्हणजे???"मानसी

"मी कोण आहे........ आजपर्यंत मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी माझे आई बाबा पण कधी नाही म्हणाले नाही...... आणि तू कोण होतेस गं मला नकार देणारी.......हां......."सागर
सागर जरा चिडतचं बोलतो.

"सागर........अरे काय झालं......मी कशाला नाही म्हणाले......"मानसी

"हे तू मला विचारतेस???? जरा स्वतःला विचार.
आणि हे बघ आज नाही बोललीस.......परत बोललीस तर याद राख........"सागर
सागर एवढं बोलून विंडो जवळ जाऊन उभा राहतो. मस्करीच्या नादात त्याने मानसीला दुखावलं हे त्याच्या लक्षातच नाही आलं."

"सागर........."मानसी
मानसी रडू लागते.तिच्या हुंदक्यांचा आवाज येतो तसा सागर मागे वळून बघतो............आणि बघतो तर काय...... मानसी बेडला पाठ टेकवून खाली मान टाकून रडत असते.डोळे पुसत असते.

"अगं....... अगं मानसी सॉरी....... अगं मी तर मस्करी करत होतो......आय एम रिय......ली वेरी सॉरी मानसी......ए मानसी......वर बघ ना......… अगं माझ्याकडे बघ की जरा......."सागर

सागर तिचे दोन्ही खांदे पकडून तिला वर बघायला सांगतो पण, मानसी काही वर बघत नाही.... म्हणून मग सागर तिला मिठी मारतो.

"अगं वेडाबाई.......मी तुझी मस्करी करत होतो.....मी खरचं नाही रागावलो तुला........इकडे बघ.......वर बघ......डोळे पूस बघू आधी."सागर

सागर तर्जनीने मानसीची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करतो. तर मानसी लगेच डोळे बंद करते.तिच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं.

सागर तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडून तिच्या जवळ जातो.

"मानसी....... अगं खरचं सॉरी.......मी फक्त मस्ती करत होतो. आणि मी तर मगाच्या राहिलेल्या किस बद्दल बोलत होतो......तुझी शपथ ........."सागर

"हे....हे असं.......एवढ्याने ओरडून......दमदाटी करून.......जा तू......मला नाही बोलायचं......आणि काही गरज नाही आता मला मस्का मारायची."मानसी

"बरं ठीक आहे जातो मी........"सागर

एवढं बोलून सागर मागे फिरला तोच मानसीने तिच्या हाताचा विळखा त्याच्या कमरेभोवती घातला......

"असं काय रे......बायको रागावली की तिला जवळ घ्यायचं असतं. बायको काय...... रागात लाख वेळा जा बोलेल म्हणून लगेच जायचं असतं का? आज्ञाधारक असल्यासारखं.......लोक तुला बायकोच्या ताटाखालच मांजर म्हणतील........"मानसी

"हो का????? म्हणू दे काही..... पण आता माझी राहिलेली गोष्ट तर दे आधी.......म्हणजे पराठे खायला मी मोकळा......."सागर

"आता तर मुळीच देणार नाही......."मानसी

"बघ हां .....मग मी परत ओरडेन तुला.........."सागर

"हम्म......"मानसी

"हम्म नाही....... खरचं आणि तरी नाही दिली ना..... तर जबरदस्ती करून घेईन.......कारण माझ्या हक्काच्या गोष्टी मी कधीच सोडत नसतो."सागर

सागर मानसीच्या अगदी जवळ येऊन बोलत होता. एवढा जवळ की त्याच्या श्वासाची गरमी मानसीला जाणवत होती.
मानसीने लाजून मान वळवली.......तोच सागरचा उष्ण श्वास तिला स्वतःच्या मानेवर असल्याचं जाणवलं त्याने त्याच नाक तिच्या मानेवर हलकेच घासत....... तिला स्वतःकडे वळवलं. मानसी लाजून त्याच्या मिठीत शिरली. किस राहिली बाजूला दोघे पण एकमेकांच्या मिठीतचं गुंतले. त्यांना नाश्ता करायचा आणि देण्याचा पण विसर पडला.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला.....

"सागर.......बाळा आंघोळ झाली असेल तर आता बाहेर या दोघेपण....... आम्ही नाश्त्यासाठी वाट बघतोय....."सागर ची आई

आई च्या आवाजाने दोघेही भानावर आले.

"आले आले आई...…...
बघ.......झाला ना उशीर.......म्हणून म्हणत होते तुझी मस्ती बाजूला राहूदे......."मानसी

"अरे मी काय केलं........तूच किस नाही दिली.... मग मला मिठी मारावी लागली........"सागर

"एवढी घट्ट मिठी कोणी मारत का??? आता गप्प बस.......आणि चल लवकर......"मानसी

"बरं.......चलतो, पण किस च लक्षात ठेव हां.......आणि हो......मिठीतच एवढी विरघळलीस मग.......बाकी सगळं........."सागर
एक भुवई उंचावत सागर मानसीकडे बघू लागतो आणि हसतो.

"ए....... गप चावट कुठला........ पुरे कर तुझा फाजिलपणा आणि चल मुकाट्याने........"मानसी

मानसी किचन मध्ये येते आणि सगळ्यांसाठी नाश्त्याची प्लेट भरते. सोबत टोमॅटो सॉस,हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दुधाचा कडक चहा.

सागरच्या आई बाबांना नाश्ता खूप आवडतो. गावच्या ठिकाणी सकाळची भाजी भाकरी, किंवा सुकट भाकरी असायची. मुंबईला मुलाच्या लग्नासाठी आल्या पासून नवनवीन नाश्ता भेटतो म्हणून सागर चे आई बाबा खूप खुश असतात मानसीवर.

सागर चे आई बाबा त्यांच्या मित्राकडे जायला निघतात आणि डायरेक्ट संध्याकाळी येऊ अस सांगतात.

"नवीन का असेना...... पण मूलं संसारात रमली आहेत ना हो...... "सागर ची आई

"हो........पण अशीच साथ आणि सोबत राहूदे कायम......चढ उतार आले की आपला अहंम बाजूला ठेऊन एकमेकांचा हात घट्ट पकडला पाहिजे. मुलं अजून नवीन आहेत. संसाराची सुरवात गोड आहे ती कायम अशीच गोड राहुदेत. आपले आशीर्वाद तर आहेतच मुलांबरोबर."सागर चे बाबा

"हो......ते तर आहेच ओ........."सागर ची आई

घरी मानसी सगळं आवरत असते. किचन साफ करून कपडे मशीन ला लावून घेते. मशीन कपड्यांचं काम करत होती, तो पर्यंत मानसी लादी पुसून घेते.सागर पण त्याच्या ऑफिस च्या फाईल चाळत असतो.नवीन लग्न झालं होतं म्हणून बॉसने त्याला वीस दिवसांची सुट्टी...... प्लस ऑफिस स्टाफ तर्फे दोघांना कुलू मनाली चं दहा दिवसांचं पॅकेज दिल होतं. तशी तर त्याच्या ऑफिस मधून नवीन लग्न झालेली सगळी जोडपी ऑफिस तर्फेच हनिमूनला जात आणि तिथे बॉस चं मोठं......फार्म हाऊस आहे तिथेचं राहत.

"सागर........दुपारी जेवण काय करू??? आई बाबा पण नाहीत."मानसी

"तू मला जेवण काय करू हे विचारतेस.........की आई बाबा नाहीत हे सांगतेस.......तसं तर पराठे खाऊन पोट बरंच भरलं आहे माझं........ पण काही गोड....स्टार्टर देणार असशील तर मला चालेल."सागर

"अच्छा.......स्वारी पुन्हा चावट मूड मध्ये आलेली दिसते.
तुला विचारण्यापेक्षा मी खिचडीचं करते गरम गरम.सोबत आईंनी गावाहून लोणचं आणि पापड आणलेत ते तळते."मानसी

"एकदम भारी........."सागर

मानसी किचनमध्ये निघून जाते.

सागर पण किचनमध्ये येतो..

"काय करतेस.....???"सागर

"खिचडीची तयारी......मी काय म्हणते.......आधी पापड तळून घेते मग त्याच तेलात कांदा टोमॅटो टाकेन आणि खिचडी ला फोडणी देईन.....नाही का???"मानसी

"हम्म........"सागर

मानसी पापड तळत असते..... तसा मागून सागर येऊन तिच्या खांद्यावर स्वतःची हनुवटी ठेवतो. त्याच्या उष्णतेने मानसीच्या अंगावर शहारे येतात.

"सागर........तेलाजवळ मस्ती नको ना....."मानसी

"मी कुठे मस्ती करतोय.....मी तर मदत करतोय तुला.....पापड जड असेल ना....माझ्या नाजूक बायकोचा हात दुखला मग.......म्हणून मी पण चिमटा पकडला आहे....."सागर

"हो.....पण मला तुझी मदत नको....."मानसी

"पण मला करायची आहे ना......."सागर
मानसी लाजते आणि हळूच डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेते.

दोघे पापड तळतात आणि मानसी डाळतांदूळ धुवायला टोप घेते.... तसा सागर पण त्या टोपातले डाळतांदूळ धुवायला मानसी सोबत टोपात हात टाकतो. मानसी तांदूळ धुते तर सागर मानसीच्या हातात हात घालत तिच्या या खांद्यावरून त्या खांद्यावर त्याची मान ठेवत असतो. मानसी त्या प्रत्येक वेळी शहारत असते. तिच्या हृदयाचे ठोके वाढलेलं असतात.

डाळ तांदूळ धुवून मानसी फोडणी देते इकडे सागराची मस्ती चालूच असते. फोडणी झालेली बघितली तसं सागर मानसीला लगेच उचलून घेतो आणि बेडरूममध्ये जातो.यावेळी मानसी सुदधा काही बोलत नाही ती फक्त त्याच्या रासलीलेमध्ये सामील होते. दोघेही नात्याच्या दुसऱ्या टप्प्यात असतात जिथे नवरा बायको एकमेकांना सर्वांग समर्पित करतात.

"करपली................अरे देवा.........अरे खिचडी करपली.......सोड सोड........गॅस बंद करू दे."मानसी
मानसी डोक्यावर हात मारते आणि धावतच किचनमध्ये जाते.
सागर बेडवर डोक्याला हात लावून बसतो आणि स्वतःशीच हसतो.

क्रमशः...
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद???

🎭 Series Post

View all