Oct 18, 2021
कथामालिका

आठवणी......गोड की कडू (भाग १)

Read Later
आठवणी......गोड की कडू (भाग १)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


"अरे.........काय करतोयस......सोड.....कोणी बघेल ना....?" मानसी

"बघेल तर बघूदे ना.......मी माझ्या बायकोला मिठीत घेतलं आहे.......कुणाला घाबरतो की काय.....????" सागर

"हो का......" मानसी

"हो........" सागर

चल सोड आता........घरात सगळे आहेत आणि हे किचन आहे.आपली बेडरूम नाही........ समजलं......मानसी त्याच्या डोक्यात हळूच लाटणं मारते नि बोलते.

आई गं.......लागलं ना....... सागर नाटकी आवाजात बोलतो.....

"हो का???? एवढ्या जोरात नाही मारलं हां........ लागायला आणि तू आधी आंघोळ कर जा घाणेरडा.......बुरसा कुठला......" मानसी

"अच्छा......मी बुरसा..... मी घाणेरडा का????" सागर

"हो मग.......जा पटकन फ्रेश होऊन घे.....मी तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी आलू पराठे बनवते........तुला आवडतात तसे......"मानसी

"ओ.........हो.........बायकोच्या हातचे आलू पराठे........इस बात पे एक पप्पी तो बनती हे........"सागर

"ए नाही हा......जा तू.....आधी आंघोळ करून घे....."मानसी

"नाही आधी एक पप्पी दे......."सागर

"नाही............आधी फ्रेश हो.......... मग जे हवं ते देईन."मानसी

"एक........प्लिज........??"सागर

नाही............तू जा.....आधी मानसी सागर ला किचन मधून ढकलत ढकलत बाथरूम जवळ नेते आणि आंघोळ करायला सांगते.

सागर आंघोळीला जातो पण बॉक्समध्ये साबण नसतो म्हणून तो मानसी ला आवाज देतो.

मानसी.........अगं मानसी.......माझा साबण संपलाय........ प्लिज जरा देतेस का????

हो आले आले.........मानसी तव्याखालचा गॅस मंद करते आणि साबण घेऊन बाथरूम चा दरवाज नॉक करते.

"काय गं...... तुला साबण पण ठेवता येत नाही..... बरं ये आत......इकडे ठेव........." सागर

"अरे आता घे की असाच......मी गॅस चालू ठेवला आहे."मानसी

"अगं बोले पर्यंत ठेवला पण असतास, प्लिज ठेव ना तू.......मी टॉवेल वर आहे.........मला लाज वाटते........सागर मस्तीच्या मूड मध्ये बोलत होता........

"हो का....????"मानसी

मानसी साबण बाथरूमच्या दारात ठेवते आणि रूम च्या दाराजवळ येऊन त्याला ऐकायला जाईल अश्या आवाजात सांगते.

"साबण बाथरुमच्या दारात ठेवला आहे तुझा तूच घे......."मानसी

"काय यार मानसी.......!!!"सागर

मानसी परत किचनमध्ये येते तोच पुन्हा सागर आवाज देतो

"मानसी.......... अरे माझा शॅम्पू पण संपला आहे प्लिज दे ना......."सागर

मानसी गालातल्या गालात हसते....... आणि सागर ची मस्ती बघून नवरा बायकोच्या नात्याचा नवा अनुभव सुद्धा घेत असते.

मानसी चे सासू सासरे पण लेकाचा नवीन संसार बघून खुश असतात.

सागर ची थोडी गम्मत म्हणून सागर ची आई स्वतः शॅम्पूची बॉटल घेऊन जाते.

यावेळी सागर बाहेर न बघता आणि कोणाचा हात आहे त्या कडे लक्ष न देताच हात धरून आई ला आत खेचतो.

"अ......आई.........आई अगं......तू.......ते...... मी.......मानसीला.......म्हणजे......अगं शॅम्पू संपला होता आणि पाठ........पाठ अगं किती खराब झाली आहे माझी.........म्हणून तिला घासायला सांगायचं होत......
नाही पण राहूदे......मी करेन ऍडजस्ट.......तू जा......"सागर गोंधळतच बोलतो

"पाठचं घासायची आहे ना.......दे..... मी घासून देते.......लहानपणी मीच तर देत होते ना घासून.....मानसी आत काम करते दे.....इकडे पाठ कर बघू........"सागर ची आई

"अगं नको.......राहूदे.........ते मी नंतर कधी तरी सांगेन ना तुला तेंव्हा घास......"सागर

"अरे नंतर कधी.......दोन चार दिवसांत जाऊ की आम्ही परत गावी......मग कधी घासणार पाठ......ये इकडे." सागर ची आई

"अगं मग मी येईन की तिकडे...... पाठ घेऊन........."सागर

"काय????"सागर ची आई

"आं... .नाही म्हणजे काही नाही...... तू जा ना.......मी आंघोळ करतो पटकन......."सागर

"बरं बरं जाते मी......"सागर ची आई

सागर ची आई हसतंच बाहेर येते आणि बाथरूम बाहेर आल्यावर बोलते.......अजून काही नसेल तर आताच सांग.....उगाच माझ्या सुनेला त्रास देऊ नको सारखा....... आणि हो.....तूझी ती किचन मधीली पप्पी राहिली आहे ना......त्यासाठी मी सूनबाईला आत पाठवते हो......काय ती घेऊन टाक म्हणजे हे साबण आणि शॅम्पू च्या बहाण्याची गरज नाही लागणार....... सागर ची आई तोंडाला पदर लावून हसते आणि एक नजर मानसी वर टाकते.

मानसी हे ऐकून लाजते तर सागर पण डोक्यात खाजवून लाजतो.

क्रमशः.....

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद???
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading