आठवणीतील सुशांत सिंग राजपूत.....

Sushant Singh Rajput was very talented actor...

आठवणीतील सुशांत सिंग राजपूत...

 जेव्हा मी पहिल्यांदा त्याला एका नाटकात बघितले,आज मला त्या सिरीयल चे नाव देखील आठवत नाही,परंतु त्याच सिरीयल मध्ये त्याचा जरी साईड रोल असला तरी त्याने माझ्या सोबतच माझ्या घरातील सर्वांच्या मनात एक विशिष्ट छाप सोडली आणि फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी आम्ही सर्व ती सिरीयल बघत होतो...

किती निरागस चेहरा तो,चेहऱ्यावरचे त्याचे सौम्य हास्य मन हेलकाऊन लावणारे तर होतेच पण सोबतच त्याच्या अती सौम्य आवाजाने बोलण्याची पद्धत खूप च छान होती...

आणि नंतर मग त्याची अतिशय प्रसिद्ध पवित्रा रिशता ही सिरियल गाजली,त्यामध्ये सर्वात जास्त फक्त मानव मुळे च प्रसिध्दी मिळाली,मानव म्हणजेच सुशांत सिंग,,,,अगदी फक्त त्याला बघण्यासाठी ती सिरीयल मी बघायचे,न चुकता शेवट पर्यंत मी ती नाटिका बघितली फक्त आणि फक्त सुशांत मुळे....जेव्हा तो त्या नातिकेमधून बाहेर निघाला तेव्हा ती सिरीयल मला अजिबातच बघाविशी वाटली नाही आणि नंतर मग हळू हळू त्या सिरीयल चा टीआरपी देखील घसरला....

राहिला प्रश्न सुशांत च्या अभिनयाचा तर सिरीयल प्रमाणे अथवा त्या पेक्षा जास्त बॉलिवूड मध्ये त्याने धमाल केली,मी जवळपास त्याचे सर्वच सिनेमे बघितले,,,,आणि पुढे येणाऱ्या सिनेमे ची आतुरतेने वाट देखील बघत होते....

मुळात प्रश्न हा त्याच्या प्रसिध्दी चा नाहीय तर त्याचे जे काही स्वप्न होते त्या स्वप्नाचा आहे,ती स्वप्न अशी अर्धवट सोडून का गेला असेल तो??हे तर कोणालाच माहीत नाही,पण येवढे भयानक पाऊल उचलण्या मागे कारण तरी काय असावे असे प्रश्न मात्र मनात घर करतात...

सुशांत हा मिडल् क्लास फॅमिली मधील होता,त्याची आई आधीच मरण पावली होती,त्याला चार बहिणी असून एक बहीण देखील मरण पावली होती,असा चार बहिणी मध्ये एकुलता एक असणारा सुशांत,,,,ज्याला कशाचीच कमी नव्हती,त्याने असा मार्ग स्वीकारावा हे मनाला पटत नाही....का पण ,,नेमके काय कारण असावे,आता ते तर देवालाच माहीत...पण आत्महत्या हा एकच मार्ग त्याच्या समोर येण्या इतपत असे काय घडले असावे...

आता काही लोकांच्या म्हणण्या प्रमाणे तो डिप्रेशन मध्ये गेला असेल,पण डिप्रेशन मध्ये गेल्यावर त्यांना आत्महत्या करण्याचे कसे सुचते,तेच मला कळत नाही...काय झाले असेल कुणास ठाऊक,पण असे होऊच नये,शेवटी जीवन हे खूप सुंदर आहे,आणि त्याला संपून मार्ग निघत नसतात,आणि म्हणूनच प्रत्येक माणसाने कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा,यातच आयुष्याचे खरे सार्थक आहे...

सुशांत च्या मागे च त्याचे मारण्याचे गुपित सुध्धा गेले म्हणायचे,नेमके कशामुळे असे झाले असेल हे देखील सांगता येत नाही.......असो आणि शेवटी येवढेच की सुशांत च्या आत्मास देव शांती देवो,,,आणि त्याच्या घरातील लोकांना दुःख पचविण्याची बळ देवो....

ना चिट्टी ना कोई संदेश
ना जाणे वो कोनसा देश
जहा तुम चले गए
जहा तुम चले गए.......

Missing you sushant

लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा........


Ashwini Galwe Pund....