आठवणी......गोड की कडू(भाग १७)

Sk


काय? अगं बाळा...काय बोलतेस तू? मी तुला नोकरीची परवानगी दिली,कारण मला तुला दुखवायचं नव्हतं."सरपोतदार

पप्पा.....सागर खरचं खूप चांगला मुलगा आहे.त्याच पहिलं लग्न झालं होतं मान्य आहे मला,पण पप्पा......ते वीस दिवस ही नाही राहील.त्यांचा संसार सुरू होण्याआधीचं तो मोडला.पप्पा......प्लिज....... मी सागर सोबतचं खुश राहू शकते.ज्या प्रेमाची मला गरज आहे ते फक्त सागरचं देऊ शकतो मला."कृतिका


मी विचार करून सांगेन.मला दिल्लीला जायचं आहे.महत्वाची मिटिंग आहे.उद्या संध्याकाळी आल्यावर बोलू."सरपोतदार


ओके पप्पा....."कृतिका

कृतिकाचे पप्पा निघून जातात आणि गाडीत बसून त्यांच्या खबरीला फोन करतात.

हॅलो........मी एक नाव,नंबर,आणि पत्ता मॅसेज करतो.त्या मुलाची सगळी पर्सनल आणि प्रोफेशनल माहिती चोवीस तासाच्या आत मला माझ्या टेबलवर पाहिजे.मी उद्या संध्याकाळी पुण्यात येईन.तेंव्हा मला ऑफिसमध्येचं भेटा. समजलं...…"सरपोतदार
एवढं बोलून कृतिकाचे पप्पा फोन ठेवतात.

हॅलो.......काय करतोयस?"कृतिका

ऑफिसला निघायची तयारी!!! "सागर

बरं....... मी आज पप्पांशी बोलले.त्यांना सगळं सांगितलं आहे.उद्या येऊन बोलू असं म्हणालेत. "कृतिका

पण बाकी काय बोलले?"सागर

होकार नाही दिला पण अजून नकार ही नाही दिला.बघू आता काय बोलतायत उद्या."कृतिका


ठीक आहे.चल मग मी जरा गडबडीत आहे.ऑफिसला महत्वाची मिटिंग पण आहे."सागर


हो चालेल.बाय.....टेक केअर.......आणि ऑल द बेस्ट."कृतिका


Thanks......."सागर

संध्याकाळी कृतिका सागरला फोन करते.दोघे बोलत असतात तेवढ्यात कृतिकाची आई तिथे येते.कृतिकाकडून तिचा फोन घेते.


हॅलो......मी कृतिका ची आई बोलते."कृतिका ची आई

हां काकू......बोला....कशा आहात? "सागर

मी ठीक आहे.जरा मुद्दयाचं बोलते."कृतिका ची आई

हो काकू.....बोला ना!!"सागर

हे बघ....आम्हाला मान्य आहे की, या सगळ्या राजकारणामुळे आमचं कृतिकाकडे तिच्या लहानपणापासूनचं दुर्लक्ष झालंय...... पण कृतिका लाडात वाढलेली आहे. एवढ्या मोठया आलिशान घरात राहिलेली आहे.तुझा 2 bhk फ्लॅट तिच्या लेखी खूप लहान असणार आहे.तिची हौस भागवायला जमेल का तुला?"कृतिका ची आई


तिची हौस भागवायला जमेल की नाही.......ते मला माहित नाही पण जे प्रेम लहानपणापासून तिला मिळालं नाही ते प्रेम मात्र भरभरून देण्याचं प्रयत्न करेन.राहिला प्रश्न आलिशान.......घराचा......तर, तुमच्या मुलीचं मन तुमच्या आलिशान बंगलो पेक्षाही खूप मोठं.......आहे."सागर


बरं..... घे...बोल कृतिकाशी."कृतिका ची आई

कृतिकाची आई कृतिकाला फोन देते आणि तिची पाठ थोपटून स्मित करून निघून जाते. कृतिका पण सागरला बाय बोलून फोन ठेवून देते.तिला माहीत असतं आईच्या प्रश्नाला आईला पटेल असचं उत्तर सागरने दिलं असणारं. म्हणून ती त्याबद्दल सागरला काही विचारत नाही.

दुसऱ्या दिवशी तो खबरी सरपोतदारांच्या ऑफिसमध्ये येतो.

सर.......तुम्ही सांगितलेल्या मुलाबद्दल सगळी माहिती गोळा केली आहे."खबरी

Good...... बोला आता पटापट....."सरपोतदार

सर...त्या मुलाचं नावं......."खबरी

नाव नको.......इन्फर्मेशन द्या......"सरपोतदार

Ok सर.....सर तो मुलगा......मुंबईत एका प्रा.लि कंपनीत जॉब करतो.महिना तीस हजार पगार आहे.मुंबईत स्वतःचा 2 bhk चा फ्लॅट आहे.गावी म्हणजे कोल्हापूरला त्याचे आई वडील राहतात.मुलगा एकुलता एक आहे. लाडात वाढलेला आहे पण लाडावलेला नाही.आई वडिलांची काळजी घेणारा आहे.पहिलं लग्न झालं होतं......पण......"खबरी

पण काय?"सरपोतदार

गावी देवीच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या बाईकचा अपघात झाला आणि त्याची बायको त्या अपघातात जागीच गेली.त्या धक्क्यामुळे तो मुलगा तीन वर्षे कोमात होता. कसलं व्यसन सुद्धा नाही.थोडक्यात \"आपण भलं नि आपलं कामं भलं\".........मुलगा खूप हुशार आहे सर......"खबरी

ठीक आहे.......जा तुम्ही......"सरपोतदार

Ok सर......"खबरी

कृतिकाचे पप्पा रात्री नऊच्या दरम्यान घरी येतात.कृतिका आणि तिची आई.....दोघीपण डायनींग टेबलजवळ येऊन बसतात.घरातली नोकर माणसं तिघांना पण जेवणं वाढतात.सगळा स्वयंपाक कृतिकाच्या आवडीचा असतो.जेवणाचं वाढलेलं ताट बघूनचं पप्पांचा या लग्नाला होकार आहे हे कृतिका समजून जाते.कृतिकाच्या आईलाही त्यांचा होकार आहे हे समजतं. तिघे पण शांतपणे जेवण आटोपतात.


कृतिका......अर्ध्या तासात आपल्या टेरेसवर भेटा.........दोघीपण...."सरपोतदार

हो पप्पा......"कृतिका

कृतिकाचे पप्पा......त्यांच्या लायब्ररीत निघून जातात.त्यांना पुस्तकं वाचण्याचा खूप छंद असतो.रात्री जेवणानंतर रोज अर्धा तास ते पुस्तकं वाचत असतं. पप्पांची पाठ होताच कृतिका लगेच आईला जाऊन मिठी मारते.कृतिकाची आई पण खुश होते.

बरोबर......अर्ध्या तासाने कृतिका आणि तिची आई......दोघीपण टेरेसवर जातात.


माझं उत्तर काय आहे ........हे तुम्हा दोघींनापण समजलंच असेल."सरपोतदार

हो पप्पा.......आणि त्यासाठी thank you soooo much....... तुम्ही सगळी चौकशी करूनच हा निर्णय घेतला असेल हे मला माहित आहे. एवढ्या लाडात वाढवलेली असतांना असचं तुम्ही मला कोणाच्याही हातात सोपवणार नाही हे माहीत आहे मला.तुमच्या सगळ्या चौकशीत सागर खरा उतरला असेल याची खात्री आहे मला."कृतिका


हो........मी सगळी चौकशी केली आहे.आता फक्त मुलाच्या आईवडिलांना बोलावून घेऊ.एक काम करू.......येत्या रविवारी सगळ्यांना आमंत्रण देऊन बोलावू आणि रीतसर बोलणी करून सगळं ठरवू.......चालेल ना?" सरपोतदार


कृतिका लगेच पप्पांना मिठी मारते.कृतिकाची आई पण खुश होते.ती लगेच मिठाई आणून दोघा बाप लेकीचं तोंड गोड करते आणि बाप लेक मिळून आईचं तोंड गोड करतात.तिघेपण एकमेकांना मिठी मारतात.कृतिका आई वडिलांच्या पाया पडते. दोघेही लाडक्या लेकीला तोंड भरून आशीर्वाद देतात.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन कृतिका ही गोड बातमी सगळ्यांना देते.सगळे त्या दिवशी ऑफिसमध्ये पार्टी करतात.

आठ दिवसांनी सागर पुण्याला कृतिकाच्या घरी जातो. सागर सोबत त्याचे आईबाबा,विक्रम आणि त्यांचे सर असतात.दोघांच्याही लग्नाची बोलणी होते.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांचं सध्या पद्धतीने लग्न करायचं असं ठरतं. कृतिकाला लग्नासाठी फार खर्च होऊ नये असं वाटतं असतं. त्यांच्या लग्नाचा होणार खर्च ती तिच्या पप्पांना वृद्धाश्रमात द्यायला सांगते.सगळ्या गोष्टी मुलांच्या मनाप्रमाणे होणार असतात.सगळेच एकमेकांना मिठी मारून भेटत असतात नवीन नात्याच्या शुभेच्छा देत असतात.तर दुसरीकडे सागर आणि कृतिका न बोलताच डोळ्यातून व्यक्त होतं असतात.

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा.आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद??