आठवणी.......गोड की कडू(भाग १८) अंतिम

Sk


चि.सागर :::शुभविवाह::: चि.सौ. कां.कृतिका
चि.विक्रम :::शुभविवाह::: चि. सौ.कां.तेजस्विनी

सागर कृतिका आणि विक्रम तेजस्विनी असा दोन्ही जोडप्यांचा शुभविवाह कृतिकाच्या राहत्या बंगलोवर निर्विघनपणे पार पडला.दोन्ही जोडपी थोरा-मोठयांचे आशीर्वाद घेतात. दोन्ही जोडप्यांची पाठवणी होते.
विक्रमच्या घरी स्वागताला कोणी नसतं म्हणून सर आणि त्यांची फॅमिली जाते.

आमचं भाग्य खरंच खूप........मोठं आहे जे तुमच्या सारखे सर भेटले.असं म्हणून दोघेही सरांचे आणि मॅडमचे आशीर्वाद घेऊन गृहप्रवेश करतात.

इकडे सागरचे आई बाबा पण नवीन जोडप्याचा गृहप्रवेश करून घेतात.कृतिका आणि सागर पण आईबाबांचे आशीर्वाद घेतात.

रात्री सागर बाहेरूनचं जेवण ऑर्डर करतो. सगळे फ्रेश होऊन जेवणं उरकून घेतात. कृतिका पण ड्रेस घालून आईच्या खोलीत झोपायला जाते आणि बाबा सागरच्या खोलीत जातात.

थकली असशील ना? आराम कर आता जरा..."सागरची आई

नाही आई......प्रवास जास्त लांबचा नसल्याने एवढं काही नाही वाटलं.बरं, तुम्ही कॉफी घेणार का?"कृतिका

हो......चालेल की........"सागरची आई

लगेच आणते.
असं म्हणून कृतिका किचनमध्ये जाते.तिथे सागर आधीच कॉफी बनवत असतो.

काय करतोयस?"कृतिका

कॉफी........पण तुला काही हवं आहे का?."सागर

कॉफी...........एवढं बोलून कृतिका हसते. आणि ती पण कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये आल्याचं सांगते.
दोघेपण मिळून कॉफी बनवतात.

कॉफी झाल्यावर कृतिका आईला हॉल मध्ये बोलावते तर,सागर बाबांना हॉल मध्ये बोलावतो.

तुम्ही दोघेपण जागेच आहात का?सागरची आई सागरला उद्देशून बोलते.

अगं बाबांना कॉफी घ्यायची होती म्हंटल चला......मी बनवून आणतो.तेवढ्यात तिथे कृतिका पण आली.मला वाटलं तिला काही हवं असेल मग समजलं ती पण कॉफीसाठीचं आली आहे.मग काय.....बनवली दोघांनी एकत्र.....आता कॉफी बनवली आहेच तर मग घेऊ एकत्र म्हणून मग हॉल मध्ये बोलावल."सागर

सगळे एकत्र कॉफी घेतात. सगळेजण कॉफी पियाल्यावर कृतिका कॉफीचे मग धुवायला किचनमध्ये जाते.

कृतिका.......उद्या सकाळी मी तुझ्या घरी फोन करून पुजेचं कळवते. घरगुती पूजा करून घेऊ........चालेल ना...."सागरची आई

हो आई चालेल."कृतिका

बरं सागर उद्या सकाळी लवकर उठून सामान घेऊन या दोघे.मी सकाळी लिस्ट बनवून देते.काय ओ…....जाल ना?"सागरची आई

जाणार का काय विचारताय......जाणारचं....... पण मी काय म्हणतोय.......आत्ताच लिस्ट बनवूया.....म्हणजे काही राहील तर लिस्ट मध्ये लिहिता येईल उगाच सकाळी गडबड नाही होणार."सागरचे बाबा

हे बेस्ट राहील......असं पण आत्ताच कॉफी घेतली आहे तर झोपही लागणार नाही."सागर

चला.......मी पटकन वही पेन घेऊन येतो."सागर

सागर वही आणि पेन घेऊन येतो.सागरची आई जे सांगेल ते एका खाली एक अश्याप्रकारे लिहून घेतो.यादी बनवून ती यादी टीव्ही जवळ ठेऊन सगळे झोपायला जातात.

सागरची आई सकाळी पाच ला उठून आंघोळ करून घेते.पाठोपाठ कृतिका पण उठून आवरून घेते.सकाळी लवकरचं कृतिकाच्या घरी फोन करून पुजेचं आमंत्रण दिलं जातं. सरांची फॅमिली,विक्रम आणि त्याची बायको........कृतिकाचे आईबाबा आणि सोसायटीतील निवडक माणसं.... असा छोटेखानी पूजेचा कर्यक्रम होतो.
संध्याकाळी कृतिकाचे घरचे सगळ्यांचा निरोप घेतात. आजची रात्र नव्या जोडप्याची पहिली रात्र असते.सागर थोडा अवघडल्यासारखाचं रूममध्ये जातो.कृतिका गॅलरीत सागरची वाट बघत असते.सागर तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो.कृतिकाने आधीच दोन खुर्च्या मांडून ठेवलेल्या असतात.

मला तुझ्या मनाची घालमेल समजते आहे.मानसीला विसरून पटकन मला बायको म्हणून स्वीकारणं किंवा बायकोचा हक्क गाजवणं तुला अवघड होतंय. तुला हवा तेवढा वेळ घे......जेंव्हा तुला योग्य वाटेल तेंव्हा तू पुढे येऊ शकतोस."कृतिका

मी काय बोलू पुढे?? माझ्या मनातीलं सगळंच तू बोललीस.......मी या नात्याला कसा न्याय देईन किना न्याय देऊ शकेन की नाही मला नाही माहीत पण तुला माझ्यामुळे कधीच दुःख नाही होणार याची काळजी घेईन.आपण मित्र तर आधीपासूनचं होतो पण आज पक्की मैत्री करायची आहे जी नवरा बायकोच्या नाट्यपेक्षाही मोठी असेल.असं म्हणून सागर मैत्रीचा हात पुढे करतो.कृतिका पण तिचा हात पुढे करून त्याच्या निखळ मैत्रीचा स्वीकार करते.सागरचे आईबाबा दुसऱ्या रूमच्या गॅलरीत कृतिका आणि सागरचा विचार करत असतात तर त्या दोघांचे बोलणं यांच्या कानावर पडतं. दोघेपण त्यांचं बोलणं ऐकून फक्त एकमेकांकडे स्मित करून झोपायला जातात.

इकडे सागर बेडच्या मधोमध पिलोची लक्ष्मणरेखा तयार करत असतो ते बघून कृतिकाला हसू येतं.

का हसतेस?"सागर

विचार करते......तुझा माझ्यावर विश्वास नाही......की स्वतःवर ताबा नाही....."कृतिका

असं काही नाही.....ते......मला......झोपेत लाथा मारायची सवय आहे. "सागर इवलासा चेहरा करत कृतिकाला सांगतो.त्यावर कृतिका आणखी हसते.

अरे......आता एवढी मैत्री केली आहे....तर थोड्या लाथा ही खाईन......कृतिकाच्या वाक्यावर आता सागर पण हसू लागतो आणि मधली पिलोची रेषा तो काढून टाकतो. दोघेही सुरक्षित अंतर ठेवून बेडवर झोपतात.आई बाबा पण चार दिवसांत निरोप घेतात.
कृतिका आणि सागर पण त्यांचं ऑफिस जॉईन करतात.


नियमाप्रमाणे चार हनिमून तिकीट सर विक्रम आणि सागरच्या हातात देतात.चौघेही फिरायला जातात.सागर आणि कृतिका मित्र मैत्रिणी म्हणून खूप एन्जॉय करतात.
असेच सहा महिने होतात.कृतिका सागरचा संसार सुखाचा सुरू असतो.अगदी कुणाचीही दृष्ट लागेल असाच.दोघेही एकमेकांची काळजी घेत असतात.

कृतिकाला फार वाटायचं सागरने तिला जवळ घ्यावं पण तिला त्याच्यावर जबरदस्ती किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नव्हता.

एक दिवस मीटिंगसाठी बाहेर गेला असतांना सागरला एक जोडपं पब्लिक प्लेस मध्येचं रोमान्स करतांना दिसतं. त्याला त्याची चूक कळत होती.तो कृतिकासोबत अन्याय करतो तिच्या धीराची परीक्षा घेतोय याची जाणीव त्याला होते.त्याने त्याच्या मनातलं सगळं विक्रमला सांगितलं.विक्रमने सागरला घरी फोन करून कृतिकाला संध्याकाळी डिनर साठी रेडी रहायला सांगायला सांगितलं.
विक्रमने सांगितल्याप्रमाणे सागर कृतिकाला डिनर साठी रेडी राहायला सांगतो.कारण सागरला आता कृतिकाची हक्काची जागा द्यायची असते.सागर पण कृतिकासाठी छानशी चैन गिफ्ट घेतो आणि सोबतच हार्ट शेपचं पेंडेंट.....ज्यात त्या दोघांचा फोटो असतो.

दोघे पण ठरल्या ठिकाणी भेटतात.कृतिका रेड कलरच्या गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत असते.डीप नेक गाऊन त्यावर मोकळी केसं,एका हातात वडिलांनी गिफ्ट केलेलं डायमंड वॉच आणि हलकासा मेकअप.

Looking gorgeous.........पण या सगळ्यात एक कमी आहे.... ..असं म्हणून सागर कृतिकाला खुर्चीत बसवतो आणि तीच्या पाठी जाऊन स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात चैन घालतो.

कृतिका गिफ्ट पाहून खूप खुश होते. पेंडेंट मध्ये त्या दोघांचा फोटो असतो ते बघून कृतिकाच्या डोळ्यात पाणी येते पण ते ती लपवते आणि पटकन thnks सागर म्हणते.

दोघेपण गप्पा मारत डिनर एन्जॉय करून निघतात.इकडे विक्रमने पण त्याच काम केलेलं असतं. त्याच्याकडे डुप्लिकेट चावी असते त्याने दार खोलून विक्रम आणि तेजस्विनी दोघे मिळून अख्ख्या घराला गुलाबाच्या फुलांनी सजवून निघून जातात आणि आपण घरून निघाल्याचा मॅसेज सागरला करतात.

घरात आता फक्त कँडल लावायच्या बाकी असतात म्हणून सागर आईस्क्रीमचा बहाणा करून कृतिकाला खालीच थांबवतो आणि स्वतः घरी निघून येतो.

घरात आल्यावर कृतिका जे बघते.........ती खूप खुश होते सगळी कडे कँडल लागलेल्या असतात.सगळं घर गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि फुलांनी सजलेलं होतं. ज्या क्षणाची ती वाट पाहत होती तो क्षण \"आज\" आला होता.
कृतिका दोन्ही हात लांब करत वर बघून स्वतःभोवतीचं गोल फिरत होती कारण वरून तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतं होता.जो क्षण तिला हवा होता तो एवढा स्पेशल असेल असं तिला वाटलही नव्हतं.

कृतिका............सागरचा आवाज ऐकल्यावर कृतिका लगेच आवाजाच्या दिशेने बघते.सागर शाहरुख खान सारखे त्याचे दोन्ही हात खोलून कृतिकाकडे पहात उभा असतो. तशी कृतिका पळतचं जाते आणि DDLJ मधल्या काजोल सारखी सागरला घट्ट मिठी मारते.
दोघेही एकमेकांच्या मिठीत आकंठ बुडालेले असतात.अधून मधून सागर कृतिकाच्या कपाळावर किस करत असतो.नकळत कृतिकाच्या डोळ्यात पाणी येत.

काय झालं?"सागर

काही नाही.........मी खुप खुश आहे...असं म्हणून सागरला पुन्हा मिठी मारते.सागर कृतिकाची हनुवटी पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वर करतो.तशी कृतिका डोळे गच्च मिटून घेते.हळूहळू सागर कृतिकाच्या ओठांचा ताबा मिळवतो.कृतिका पण सागरला पूर्णपणे समर्पित करते स्वतःला. दोघेही त्यांच्या गुलाबी क्षणांचा आनंद घेत असतात.प्रणय सुखानंतर कृतिका सागरच्या मिठीत झोपते.तेंव्हा तिला सागरची मिठी म्हणजे पूर्ण जगचं भासतं होत जणू....

कृतिका आणि सागर आता खऱ्या अर्थाने नवरा बायको झालेले असतात.
पुढच्या तीन महिन्यातचं कृतिकाला नव्या पाहुण्याची चाहूल लागते.कृतिकाची गोड बातमी ऐकताच सगळे तिला भेटायला येतात.आंबट,गोड, तिखट,चमचमीत असे बरेच पदार्थ कृतिकासाठी आणतात.सगळेच खूप खुश असता
एक दोन तीन करत करत कृतिकाला नऊ महिने पूर्ण होतात.कृतिकाच्या पोटी एक गोंडस मुलगी जन्माला येते.
मुलीला बघून सागर आणि त्याच्या आईबाबांचे डोळे पाणावतात.सागर कृतिकाला मिठी मारून या अविस्मरणीय आनंदासाठी thank you म्हणतो.

बारा दिवसांनी पुण्यातचं कृतिकाच्या माहेरी बाळाचं बारसं करतात.सागरला बहीण नसल्याने विक्रमची बायको तेजस्विनी आत्याचा मान घेते.सगळे सोपस्कार झाल्यावर आत्या बाळाच्या कानात तिचं नाव सांगते.


मानसी..............कुर्रर्रर्रर्रर्रर्र.............

नाव ऐकून सागरचे डोळे पाणावतात.कारण छोट्या परीच्या पण हनुवटीला तिथेच तीळ असतो जिथे मानसीला होता. जणू मानसीचा नव्याने जन्म झाला आहे.

समाप्त........
खरचं...... आठवणी गोड समजून आनंदी राहायचं की सारखं दुःखात राहून त्या आठवणींना कडू करायचं हे फक्त आपल्याच हातात असतं. सागरने तर आठवणींना गोड राहू दिलं........तुम्ही तुमच्या आठवणी कश्या जपून ठेवता हे कमेंट मध्ये जरूर सांगा.

कथा कशी वाटली हे कमेंट द्वारे जरूर कळवा.कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद....???

🎭 Series Post

View all