Login

आठवणी........गोड की कडू (भाग ३)

Sk


"काय झालं???"सागर

"खिचडी करपली......."
मानसी डोक्याला हात लावत चेहरा पाडून बोलते.

"ते तर होणारचं होतं....... वातावरण एवढं हाय फ्लेम वर जे होतं....... "सागर जीभ बाहेर काढत आणि डावा डोळा मारतच बोलतो.

"तुला अजून पण चेष्टाचं सुचते का??? ते पातेलं बघ.....किती काळ झालं आहे......आता त्याला स्वच्छ करतांना नाकी नऊ येतील माझ्या......आता नाही बोलणार ना......माझ्या नाजूक बायकोला त्रास नको म्हणून....... आता जा.....घास ते पातेलं...... लाव जोर......मानसी एवढं बोलून सोफ्यावर येऊन बसते.......

आता पुन्हा तिला खिचडी करायला कंटाळा आला होता.म्हणून ती सागरच्या नकळत त्याच्या आवडीचा राजमा चावला ऑर्डर करते. इकडे सागर पण मानसी च्या नकळत तिच्या आवडीचं बटर पनीर आणि तंदूरी रोटी ऑर्डर करतो. दोघांची ऑर्डर पण पाच मिनिटांच्या अंतरावर येते. पण आधी बटर पनीर आणि रोटी येते.

मानसीला वाटते तिची ऑर्डर आली म्हणून ती दार खोलते.

"मॅडम.... तुमची ऑर्डर......."पहिला डिलीव्हरी बॉय

"Thank you......"मानसी

"Wel come mam"पहिला डिलीव्हरी बॉय

अरे......हे काय???? Excuse mi........ ही.......ही आमची ऑर्डर नाही......... मी तर राजमा चावला ऑर्डर केला होता.......तुम्ही चुकीची ऑर्डर आम्हाला आणली."मानसी

"नाही मॅडम.......अडड्रेस तर हाच आहे.......बघा........"पहिला डिलीव्हरी बॉय

"अय्या हो की........बहुतेक तुमच्या ऐकण्यात गल्लत झाली असेल.......तुम्ही एकदा कॉल करून विचारा ना प्लिज......"मानसी

"काय झालं ग मानसी......."सागर

"अरे हे बघ ना.....मी तुझे फेव्हरेट राजमा चावला ऑर्डर केलं होते आणि आपल्याच अडड्रेस वर हे बटर पनीर आणि रोटी आली आहे......"मानसी

"अगं ते........अं..... मित्रा.....तू जा....काही नाही झालं. ऑर्डर बरोबर आली आहे.......तुमचं हॉटेल हे आमच्या दोघांचं आवडतं आहे ना म्हणून थोडी गडबड झाली."सागर

"ओके सर......thank you"पहिला डिलीव्हरी बॉय

"Wel come.........."सागर

"अरे हे काय......तू का घेतलंस ते...."मानसी

"अगं......का म्हणजे काय? तुझ्या साठी ऑर्डर केलं होतं मी.चल आत......की इथेच बोलणार आहेस."सागर

"Excuse mi........ मानसी प्रधान........"दुसरा डिलीव्हरी बॉय

"हो मीच......."मानसी

"तुमची ऑर्डर........"दुसरा डिलीव्हरी बॉय

"हां......... हे घ्या पैसे.......thank you......."मानसी

"Wel come mam........ have a good day sir, have a good day mam........"दुसरा डिलीव्हरी बॉय

"Thank you...."मानसी

"अगं हे काय......???" सागर

"आतमध्ये चल आता.......सगळं बाहेरच बोलणार का??मानसी सागरला हळूच कोपर मारते.

"आऊच.........\"सागर पण जोरात लागल्यासारख करतो.

"चल बस......मी पटकन प्लेट्स आणते......"
मानसी प्लेट्स घेऊन येते.

"अगं....... तू केंव्हा ऑर्डर केली.....????"सागर

"तू आतमध्ये होतास तेंव्हा........ !! आणि तू केंव्हा ऑर्डर दिली???"

"हा हा हा हा........."सागर

"हसायला काय झालं???"मानसी

"तुझ्या प्रश्नावर हसलो...."सागर

"का???"मानसी

"मी आतमध्ये होतो तेंव्हा तू ऑर्डर दिली........ बरोबर."सागर

"हो......."मानसी

"मग तू बाहेर होतीस..... तेंव्हा मी ऑर्डर दिली........सिम्पल... हा हा हा हा... .. "सागर

"सागर..........तू मार खाशील हा आता......."मानसी
एवढं बोलतच असते की सागर मानसीला मिठी मारतो.आणि तिला विचारतो.

"तुला तर राजमा नाही आवडत......मग तू का ऑर्डर दिली राजमा चावला ची?????"सागर

"कारण तुला आवडतो.....आणि तू पण तर पनीर खात नाही तरी ऑर्डर दिलीसच ना!!!"मानसी

"हम्मम्म्म.......कारण माझ्या राणीला आवडतं....."सागर
दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात.

"चला......आता जेऊया का???? नाहीतर पुन्हा मगाशी झालं तसं होईल.....नाही म्हणजे मगाशी वातावरण गरम झालं तर खिचडी करपली...... आणि आता जर वातावरण गरम झालं तर गरम जेवण गार होईल........मग जेवणाची मज्जा नाही घेता येणार.......काय?????"सागर

"हो......जेऊया......."मानसी
एवढं बोलून मानसी पटकन सागर च्या गालावर किस करते........

"अरे यार.........हे आधी माहीत असत तर सकाळपासून एवढी उठाठेव केलीच नसती....."सागर

"काय माहीत असत तर.....आणि कसली उठाठेव...??"मानसी

"हेच की बटर पनीर आणि तंदूर रोटी दिली की कीस मिळते........"सागर

"चल......आगाऊ कुठला......."मानसी

"अगं खरचं...... माहीत असतं तर सकाळी सकाळी बटर पनीर ची ऑर्डर दिली असती......."सागर

"सागर........आता जेऊया का??????जेवण गार होतयं......."मानसी

"हो हो चल जेऊन घेऊ..... अस पण सगळ्या गोंधळात खूप भूक लागली आहे आणि आता तर काय आवडती गोष्ट ताटात आहे........"सागर

"मानसी राजमा चावला चा एक घास सागर ला भरवते......तर सागर बटर पनीर आणि रोटी चा घास मानसी ला भरवतो.

दोघेही जेवण उरकून घेतात..........मानसी किचन आवरून जाईपर्यंत सागर झोपलेला असतो. मानसी पण त्याच्या बाजूला जाऊन आडवी पडते.
सागर कुशी होऊन हळूच मानसी च्या कुशीत जातो.मानसी पण त्याच्या मानेखाली हात टाकून त्याला मिठी मारते.

दोघानाही डोरबेल च्या आवाजाने जाग येते.मानसी केसांना कल्चर लावताच बाहेर येते.

"काय गं........अजून झोपलात की काय???"सागर ची आई

"आई........अहो......ते.....जरा झोप लागली.......पडदे बंद होते म्हणून समजलच नाही किती वाजलेत......सॉरी......मी पटकन आवरून दिवा लावते."मानसी

"बरं एक काम कर तू आवरून घे......दिवा मी लावते...... तुझ्या हातचा जरा कडक चहा कर फक्त.यांच्या मित्राच्या सुनेने केला होता......पण चहा मध्ये साखर होती की साखरेच्या पाकाचा चहा केला होता हेच समजलं नाही......."सागर ची आई

"ठीक आहे.....मी करते चहा....."मानसी

"सागर अरे उठ.....आई बाबा आलेत.पटकन फ्रेश हो मी चहा करते.एकत्रच घेऊ म्हणजे मी लगेच जेवणाला लागेन."मानसी

"हम्म.......उठतो."सागर

सागर आळोखे पिळोखे देतंच उठला.

मानसी किचनमध्ये येऊन चहा करते.

सगळ्यांचा चहा आणि मस्का खारी असा सादा नाष्टा होतो.चहाची भांडी हिसळून मानसी जेवणाला लागते.

ओला नारळ,लाल मिरची,धणे, लसूण आणि टोमॅटो च्या वाटणातील मांदेलीचा झणझणीत रस्सा आणि हिरव्या मिर्चीचं वाटण लावलेले बांगडे फ्राय....... सोबत भाकरी, भात आणि कांदा लिंबू.


"अगं....... झालं का स्वयंपाक...?????? लग्नाची काम करून दमले होते आणि आता काही काम नाही म्हणून कंटाळा आलाय.काही तरी दे करायला........"सागर ची आई

"राहुद्या आई...... करते मी आणि असं ही सगळं होतंच आलंय....... जरा एवढी सिंक मधली भांडी आवरते मग झालंच......."मानसी

"बरं बाई........बसते मी. आता बसून बसून घेतलंय पण गावी गेल्यावर सगळा आराम एकत्रच निघणार आहे बघ माझा.......
पावसाआधी लाकूडफाटा जमवावा लागेल,तरवा भाजणे, वळी करणे......ही सगळी काम गेल्या गेल्या करायला घ्यावी लागतील.दोन चार बायका बघू मदतीसाठी......दारापुढे आणि पाठीमागे झडप पण काढायची आहे. त्यासाठी गडी माणूस बघावा लागेल.पावसाला जेमतेम पंधरा दिवस राहिलेत.आता बघू पटापट चालवू हात."सागर ची आई

"गावी राहणं म्हणजे किती कामं असतात ना......."मानसी

"हो मग......पण गावी कसं...... सगळं ताज अन्न आणि घरचा भाजीपाला असतो बघ. दारासमोरची पडवळ काढायची आणि परसावातल्या चार मिरच्या घ्यायच्या आणि कांदा टाकून द्यायची भाजीला फोडणी. तुला सांगते......त्या भाजीतली चव तुमच्या शहरातल्या भाज्यांमध्ये नाही हो...."सागर ची आई

"हो ते खरचं आहे म्हणा.......गावची पाट्यावरची चटणी भाकरी जरी खाल्ली......तरी मन आणि पोट दोन्ही भरतं..... अगदी तृप्त होतं....!!!! आमचं गावं नसल्याने मला हा आनंद फार घेता नाही आला.......पण हां...... मैत्रिणींसोबत त्यांच्या गावी जायचे म्हणून हे सगळं माहिती आहे."मानसी

"आता येत जा दोघे पण अधून मधून........तुम्ही दोघे पण काम वाले तुमच्या वेळा ठरवून या. तेवढंच आम्हाला पण बरं वाटेल....."सागर ची आई

"हो आई नक्की येऊ........."मानसी
मानसी सासूच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

आई आणि बायकोला एवढं क्लोज बघून सागरला बरं वाटत होतं.

"अगं आई........जेवण झालं की नाही....... वासाने भूक लागली आहे जोरात.....लवकर वाढ......."सागर

"हो झालंच.......मानसी जरा आवरते मग बसू."सागर ची आई

"Ok......." सागर

मानसी फ्रेश होऊन जेवणाची पानं वाढायला घेते.

"काय छान वास येतोय बांगड्यांचा....."सागर

"हो का???जेव आता पोटभर...."सागर ची आई

"जेव काय????? मी तर तावचं मारणार आहे आता....."सागर


"बरं........ चला सुरू करा."मानसी

"अगं तू पण बस......"सागर ची आई

"हो बसते.....जरा पाणी घेते."मानसी

"हम्म......." सागर ची आई

"जेवण छानचं झालं आहे हा बाळा......."सागर चे बाबा

"हो ना......आणि सार तर अगदी माझ्या सासूबाई बनवायच्या तसचं झालंय....... पहिल्या घासातच त्यांची आठवण आली.......नाही का ओ......."सागर ची आई

"हो खरचं......माझ्या मनातलंच बोललीस बघ......"सागर चे बाबा

"आई जाऊन आता पाच वर्षे झाली......या पाच वर्षात किती वेळा मी मांदेलीचं सार बनवलं असेल पण ती चव आज चाखायला भेटली."सागर ची आई

"तुम्हाला आवडलं ना.....मग झालं तर......"मानसी

"सागर ची आई.......आपल्याला परवाचं निघावं लागेल.तयारी करून ठेवा सगळी. मी उद्या जाऊन तिकीट नक्की करून येतो."सागर चे बाबा

"बाबा...........पण लगेच उद्या का??? राहा की थोडे दिवस आणखी."सागर

"हो ना..."मानसी

"राहिलो असतो....पण गावाकडची काम खोळंबली आहेत.त्यात पावसाचा काही भरवसा नाही.लवकर आला तर सगळीच काम रखडतील...... म्हणून म्हणतोय उद्या निघायचं.तुम्ही सूनबाईंना हाताशी घेऊन काय काय आवरायचं आहे ते बघा."सागर चे बाबा

"ठीक आहे बाबा.... मी तुम्हाला उद्या गाडीच रिजर्वेशन करून देतो."सागर

"चालेल.......चला आता लवकर आटपा आणि झोपा." सागर चे बाबा

हो......मानसी....चल आता मी पण जरा मदत करते मग तू मला आवरायला मदत कर.सगळ्यांच्या भेटी आणि आहेरं घेतली आहेत त्याची पिशवी आजचं बांधून घेऊ म्हणजे राहिलेलं उद्या करता येईल."सागर ची आई

"हो आई चालेल." मानसी

"सागर......तुला काही काम आहे का???"सागर चे बाबा

"नाही बाबा...!!!! का ओ????" सागर

"मग चल जरा माझ्यासोबत खाली.....आईस्क्रीम घेऊन येऊ खालून......."सागर चे बाबा

"अहो मग तुम्ही बसा......मी घेऊन येतो." सागर

"नको रे येतो मी पण....तेवढीच शतपावली........."सागर चे बाबा

"बरं चालेल.......मी येतो पाकीट घेऊन."सागर

"हा ये........" सागर चे बाबा

दोघे बाप बेटे खाली जातात पण कोण कोणाशी बोले ना....शेवटी सागरचं बोलता झाला.

"मानसी लग्नानंतर पण जॉब करायचं बोलते......मला काही अडचण नाही पण जर तुम्हाला चालणार नसेल तर........मानसी जॉब नाही करणार अस म्हणाली......खर तर ती स्वतःच विचारणार होती पण तिला भीती वाटते."सागर

"अरे आम्हाला कसली अडचण?? संसार तुमचा.....आणि जर तुम्हाला चालणार असेल तर आम्ही का नाही म्हणू......."सागर चे बाबा

"हम्मम्म........घरी गेलो की सांगेन तिला...... बाबांची हरकत नाही असं....."सागर

"बाळा.......तू सांगितल्याप्रमाणे पोरीने खूप त्रास काढलाय लहानपणापासून पोरं खूप गुणी आहे........ आईविना वाढली आहे......समजून घेत जा तिला......."सागर चे बाबा

"हो बाबा........" सागर

"लग्न झालं की या बायका...... आपल्या नवऱ्याचं करण्यात एवढ्या व्यस्त होतात की त्यांना त्यांचं पण एक जग आहे याचा विसर पडतो.....कामात एवढं पण गुंतून राहू नको की सूनबाईंना वेळ देता नाही येणार.......बायका सहसा आपलं मन मोकळं करत नाहीत. त्या आतल्या आत कुढत असतात. बायकोला काय हवंय....... काय नको..... हे अगदी त्यांनी न सांगता नाही... पण थोडं का होईना आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं.........बाईला पाळी आली की तिची चिडचिड होते अश्या वेळी तिला सगळ्यात जास्त तुझ्या आधाराची तुझ्या प्रेमाची गरज असेल,त्यावेळी तिला कधी एकटं वाटून देऊ नको.दोघे एकमेकांना धरून राहा. संसाराची गाडी ही दोन चाकावर चालते......आणि विश्वासाच्या पाया वर उभी राहते. पोरीला जप........गुणाची पोरं आहे....... काय???"सागर चे बाबा

"हो बाबा........" सागर

"हम्मम......चला आता......सूनबाईंच्या आवडीची आईस्क्रीम घ्या बघू......"सागर चे बाबा


"हो बाबा...... घेतो........दादा.......एक केसर पिस्ता कुल्फी द्या आणि एक कुल्फी फालुदा......"सागर

क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका..
धन्यवाद.????