Oct 24, 2021
कथामालिका

आठवणी.......गोड की कडू (भाग ६)हनिमून स्पेशल

Read Later
आठवणी.......गोड की कडू (भाग ६)हनिमून स्पेशल

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


हॅलो आई......अगं आम्ही उद्याचं कुलूमनाली साठी निघतोय.थंडी असते म्हणून पाच दिवसच जाणार आहोत."सागर

हो का....!!! छान छान....थांब हं..... तुझ्या बाबांशी बोल.
अहो....ऐकलत का??सागर चा फोन आहे. सागर ची आई त्याच्या बाबांना आवाज देते!!!!!! पोरं फिरायला जाताहेत उद्याच...हे घ्या बोला......"सागर ची आई


हॅलो......हां बेटा बोल...."सागरचे बाबा

हां बाबा...... आम्ही उद्या निघतोय मनालीसाठी......पॅकिंग करायला घेतली की सांगायला वेळ नाही भेटणार म्हणून आताच फोन केला......"सागर

बरं बरं...... सूनबाईंना सांभाळून ने........आणि दोघे पण काळजी घ्या......."सागर चे बाबा

हो बाबा. चला ठेवतो, उद्या सकाळी चार ची फ्लाईट आहे. तिकडे पोचलो की फार्महाऊस वरून फोन करेन.आता थोडी तयारी करतोय......."सागर

हो चालेल चालेल."सागर चे बाबा

सागर पुन्हा बेडरूममध्ये जाऊन सगळ्या गोष्टी चेक करतो.

अरे सागर.......तापावरची गोळी मी इथचं ठेवली होती तू बघितली का????"मानसी

अगं...... त्या आता कशासाठी?????"सागर

कशासाठी म्हणजे...!!!!! असुदे सोबत, उगाच कणकण आली तर सोबत असलेली बरी......."मानसी


बरं बाई......घे......थांब बघतो कुठे आहे ती..........हां..... ही घे.......पेपर खाली लपली होती.....बहुतेक तिला पण आपल्या सोबत यायचं नाही. उगाच "कबाब मे हड्डी".........हे त्या गोळी ला समजत, पण तुला नाही....."सागर मानसीची चेष्टा करत म्हणाला.....


तुझ्या नादाला लागून काही फायदा नाही...... मला बरीच कामं आहेत....."मानसी


ठीक आहे तू पण आवर मी जरा ऑफिस मधून जाऊन येतो."सागर
सागर ऑफिसला जातो आणि मानसी पण सगळ आवरून घेते.

हॅलो.... सागर अरे कुठे आहेस......"मानसी

तुझ्या दिलात❤️."सागर

चेष्टा पुरे कर........वाजले बघ किती.....सकाळी लवकर निघावं लागेल......."मानसी


अरे बापरे.......हनिमूनची एवढी घाई लागली आहे का माझ्या राणीला......."सागर मानसीची मस्करी करत बोलतो.

सागर......अरे सांग ना रे...... कुठे आहेस ते...."मानसी

दार उघड........बाहेरच आहे."सागर

काय रे.......कुठे होतास एवढा वेळ??? तुझा फोन पण बंद येतोय..!!!! संध्याकाळी येतो बोललास आणि वाजले बघ किती???"मानसी

अगं सॉरी........मित्राचा बर्थडे होता आणि तुला फोन करायला मोबाईल काढला तेंव्हा लक्षात आलं फोन ची बॅटरी डेड आहे.....आणि मोबाईल आल्यापासून नंबर पाठ कोण करत......"सागर


ठीक आहे......चल पटकन फ्रेश हो मग जेऊ......"मानसी

हा चल..... वाढायला घे तू......मी येतो लगेच."सागर

दोघे पण जेऊन घेतात. आणि लगेच झोपतात.
मानसी सकाळी दोन वाजताच उठते.आंघोळ करून देवपूजा करते आणि सागरला उठवते.

सागर......उठ अडीच वाजलेत. आपल्याला लवकर पोचावं लागेल.एअरपोर्टवर सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करेपर्यंत तासभर जाईल.उठ ना रे......"मानसी

थांब ना पाच मिनिटं....... सागर आळस देत बोलत होता.....

पाच मिनिटं का??? बरं...... ठीक आहे.मग हनिमून कॅन्सल ना.!!!!!"मानसी


हां..... नाही नाही....उठतो मी......काय यार मानसी चल बॅग घे बाहेर......मी पटकन रेडी होतो."मानसी
सागर च वागणं बघून मानसीला हसू येत होतं.
मानसी गॅस वैगरे बंद करते आणि कॉफी ओव्हन मध्ये गरम करून सागर ला देते.सागर ची कॉफी पिऊन होते.मानसी कप हिसळायला किचनमध्ये येते पाठोपाठ सागर पण येऊन तिला मागून मिठी मारतो आणि मानेला किस करतो.

सागर......आपण अजून पोचलो नाही...... आणि जर असच करत राहिलास तर मग निघणं कठीण होईल आणि फ्लाईट मिस होईल."मानसी


फ्लाईट मिस करून नाही चालणार........कारण माझ्या राणीने या दिवसासाठी थांबवून ठेवलं होतं मला...."सागर

हो का???? मग चलूया का आता.!!!"मानसी

हो.....चल खाली......मी कॅब बुक केली आहे दार लावून घेतो मी......"सागर

दोघेपण देवाला नमस्कार करतात आणि एअरपोर्ट वर वेळेच्या आधी पोचतात.
फ्लाईट ची अनाउन्समेंट होते तशी मानसी सागरचा हात घट्ट पकडते.सागर पण तिच्या हातावर हात ठेवतो दुसऱ्या क्षणाला तिला कमरेत पकडून चालू लागतो.

फ्लाईट मध्ये बसल्यापासून ते उतरेपर्यंत दोघांचा पण हात घट्ट हातात असतो.

एअरपोर्ट वर दोघांना पिकअप करायला ऑफिसची गाडी आलेली असते.ड्रायव्हर सगळं सामान गाडीत ठेऊन तिघेही फार्महाऊस वर पोचतात.

फार्महाऊस खूप मोठ्ठं असतं.मेनडोर च्या समोरचं छानशी कारंजी असते. डायनिंग हॉल च्या उजव्या बाजूला किचन.किचन म्हणजे.......आपलं पूर्ण घरचं मावेल त्यात, एवढं मोठं....... आठ खोल्यांचा ते फार्महाऊस...... आठही खोल्यांमधून दिसणार प्रशस्त अस स्विमिंगपुल.मानसी फार्महाऊस बघण्यात एवढी गुंग होते की ती तिचा थकवा सुदधा विसरते.

बापरे.......सागर.......किती मोठं आहे हे....... आणि या फार्महाऊस वर पाच दिवस आपण दोघेच असणार का????"मानसी

हो......एक माणूस आहे तो सकाळी सगळी आवराआवर करून जाईल बाकी दिवसभर आपणच......किचनमध्ये लागणार सगळं सामान आहे पण बनवायच की नाही ते तू ठरव."सागर

अरे बनवेन की......."मानसी


बरं मी जरा फ्रेश होते."मानसी


हो जा.......तोपर्यंत मी बॅग घेऊन येतो."सागर


मानसी वर जाते. बाथरूम उघडते तर, त्यांच्या मुंबईतील खोली एवढं बाथरूम असतं.बाथटब,शॉवर, सगळ्याच आधुनिक सुविधांनी सुसज्ज असं असत.

मानसी........अगं जरा माझा टॉवेल भेटत नाही कुठे आहे."सागर


सागर.....तुझे कपडे तूच भरले ना.......मग शोध की बॅग मध्ये......."मानसी

हां भेटला गं....."सागर

सागर जाण्याचं नाटक करतो आणि बाथरूमच्या बाहेरच उभा राहतो.कारण त्याला पाण्याच्या आवाजावरून समजलं होत मानसीची आंघोळ होत आली आहे ते.

मानसी दार खोलून बाहेर येतच असते की सागर पटकन आत शिरतो सोबत मानसी ला घेऊन जातो.


सागर......अरे.....काय करतोयस."मानसी

रोमांस......."सागर

हो.....पण आता घरात आपल्या शिवाय आणखीन एक व्यक्ती आहेत......ती संध्याकाळी जातील."मानसी

असुदे की......ती त्यांची कामं करतायत."सागर

सागर मानसीच्या जवळ जातो तशी मानसी मागे मागे जाते आणि बाथटब मध्ये पडते.सागर मात्र मानसीच्या नजरेत नजर टाकून बाथटब मध्ये जातो.मानसी पटकन बाहेर पडणार तोच सागर तिचा हात पकडून तिला पुन्हा पाण्यात खेचून घेतो.
दोघेही समोरासमोर बसलेले असतात.सागर मानसीच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारतो.

कितीवर्षं या दिवसाची वाट बघितली. फायनली तो दिवस आला."सागर

हम्मम्म.......त्यात सगळ्यात जास्त तुला थँक्स.......तू एवढा वेळ वाट बघितली या क्षणाची."मानसी

मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं......तुझ्या शरीरावर नाही.मला सगळ्यात जास्त तुला आपलंसं करायचं होतं."सागर

मानसी सागर ला मिठी मारते. आणि सागर ला फ्रेश होऊन बाहेर यायला सांगते.दुपारी उशिरा पोचल्याने आणि फ्लाईट मध्ये हेव्ही नाश्ता केल्याने दोघांना भूक नव्हती.
म्हणून दोघेही घरी फोन करून कळवतात आणि आराम करतात.सकाळी लवकर उठल्याने आणि प्रवासाच्या थकव्यामुळे दोघे पण झोपतात.

संध्याकाळी सागर हळूच उठून मानसीच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश होऊन पुलसाईड ला जातो.काही वेळाने मानसी पण उठते.बघते तर सागर पूल जवळ बसलेला असतो.मानसी छान अशी कॉफी करते आणि पुलसाईडला जाते.सागर पाण्यात पाय सोडून बसलेला असतो.मानसी ट्रे......टेबलवर ठेऊन सागरच्या बाजूला पाण्यात पाय सोडून बसते.

तू कधी उठलीस???"सागर

आताच....... विंडो मधून बघितलं तर तू इथे दिसलास..... मग फ्रेश होऊन आले खाली.बघितलं तर इथे आणखीन कोणी दिसल नाही म्हणून मग मीच कॉफी केली."सागर


हो ते दादा आणि त्यांची मिसेस मगाशीच गेले मला सांगून. आता उद्या सकाळीचं येतील.त्यांची रोजची कामं आवरून निघतील असं म्हणाले."सागर

हो का????बरं आहे. मानसी सागरच्या हाताला पकडत आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत बोलते.

किती छान वाटतंय ना... .आपण दोघे आणि निवांतपणा......"मानसी


हम्मम....... खरचं हे क्षण खूप छान असतात ना!!!!!"सागर

हो ना.......ह्रदयाची धडधड, हव्या असलेल्या क्षणाची भीती,सगळंच असत."मानसी


कॉफी घेऊया......."सागर

हो....."मानसी
दोघेपण कॉफी घेऊन चेंज करतात आणि गाडी काढून संध्याकाळच्या मनलीचा आनंद घ्यायला बाहेर पडतात.

मानसी मरून कलरमध्ये वेलवेटचा गाऊन घालते,डार्क मरून लिपस्टिक,कर्ल केलेले हेअर,सिंदूर आणि हायहिल्स घालून बाहेर येते.सोबतच सासूने दिलेली शाल......मानसी च रूप या सगळ्यात खुपच खुलून दिसत होतं.मानसी ला बघून सागर तर घायाळचं होतो.

ब्यु........टीफुल!!! "सागर

थँक्स......."मानसी

आपण नक्की जाऊया का????? नाही तर .......मी काय म्हणतो उद्या जाऊ बाहेर.....आजचं कॅन्सल करू.सागर मानसी च्या जवळ जात तिच्या कमरेत हात टाकून बोलतो.


मानसी पण तिचा डावा हात त्याच्या कमरेभोवती टाकते आणि उजवा हात त्याच्या छातीवर ठेवून म्हणते........"चल आता पटकन....... नाही तर माझा पण मूड बदली होईल आणि त्याचा मानेला किस करते.

दोघेही हसतात आणि निघतात.असेच तीन दिवस जातात.

चौथ्या दिवशी दोघे सकाळी लवकरच फार्महाऊस वरून फिरायला निघतात. सगळ्यांच्या आवडी निवडीची खरेदी करून थोडं इकडे तिकडे फिरून दुपारी जेऊनच फार्महाऊस वर येतात.

खरेदी खूप मस्त झाली ना!!!!!"मानसी

हो......पण रेट किती होते ना!!!!"सागर

आता टुरिस्ट येतात म्हंटल्यावर तेवढं तर चालणारच ना!!!!"मानसी

हो.......ते ही खरंच आहे म्हणा......"सागर

चल जरा आराम करू.जेवण पण जास्त झालंय."सागर

हां मला पण"मानसी
दोघे पण आराम करायला जातात.

*संध्याकाळी*

मानसी.......रात्रीच जेवण ऑर्डर करूया का गं???नाही म्हणजे आताच करावं लागेल. नाही तर इथली हॉटेल्स होमडिलिव्हरी आठ च्या नंतर बंद करतात."सागर

हो चालेल......करून ठेव ऑर्डर नंतर ओव्हनमध्ये गरम करून घेऊ."मानसी

सागर दोघांच्याही आवडीचं जेवण ऑर्डर करतो इतक्यात मानसी चहा घेऊन येते. चहा घेऊन गप्पांच्या ओघात आणि जुन्या आठवणीत संध्याकाळ होते. रात्री नऊच्या सुमारास दोघेही जेवण करून घेतात. मानसी सागर ला सांगून शॉवर घ्यायला जाते. शॉवर घेऊन मानसी तिच्या सासूने खास गिफ्ट केलेली नायटी घालते.बाहेर येऊन बघते तर काय????

बेड अगदी गुलाबांच्या पाकळ्यांनी सजलेला असतो. मानसी बेड कडे बघूनच लाजते आणि सागर पासून नजर चोरून खाली बघत असते.

आवडलं का माझं सरप्राईज???"सागर

हो!!!!"मानसी

बस तू......मी आलोच शॉवर घेऊन. अस म्हणून सागर मानसीच्या बाजूचा टॉवेल उचलतो आणि जातो.
सागर गेल्यावर मानसी पण तिने आणलेल्या मॅजिक कँडल सेट करून घेते आणि गॅलरीत जाऊन उभी राहते.


काय बघतेस एवढं??"सागर

समोरचा डोंगर बघ!!! आजच्या चांदण्या रात्रीत.....किती सुंदर दिसतोय.असं वाटतं संपूर्ण डोंगराने पांढऱ्या रंगाची चादरचं ओढली आहे."मानसी
सागर बेडवरून त्यांची सफेद कंबल घेऊन येतो आणि त्यात मागाऊन च मानसीला मिठी मारतो आणि म्हणतो.

हो ना अगदी तसचं जसं आता मी तुला घेतलं आहे."सागर

मानसी लाजते आणि मागे वळून सागरच्या कुशीत शिरते.सागर पण तिला घट्ट मिठी मारतो. कम्बल ची दोन्ही टोकं एका हातात पकडून सागर मानसीची चेहऱ्यावरची केसं बाजूला करून म्हणतो.

आज तो दिवस आला ज्याची आपण वाट बघत होतो. लग्नाआधी आपण जी स्वप्न बघितली होती आपल्या मधुचंद्राची ती बघ........ आज पूर्ण होताहेत. तुला हवं होतं ना आपला बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजलेला असावा......तो बघ मी सजवलाय.....अगदी तुला हवा तसा."सागर


अजून आपलं स्वप्न अर्धवटचं आहे. एवढं बोलून मानसी आत जाते आणि ड्रॉवर मधली मोठी कँडल काढून एक एक करून मॅजिक कँडल पेटवत असते. ते बघून सागर ला आठवत की त्याने पण सांगितलेलं असत आपल्या मधुचंद्राची रात्र ही कँडल च्या मंद प्रकाशात उजळावी.

सागर पण त्याचा मोबाईल स्पीकर ला कनेक्ट करून कमी आवाजात रोमँटिक गाणी लावतो आणि मानसीला मागूनच मिठी मारतो. तिच्या उजव्या हातावरून त्याचा उजवा हात हळूहळू खाली आणतो आणि डाव्या हाताने तिचा दुसरा हात घट्ट पकडून तो तिच्या पोटाजवळ धरतो. मानसीच्या हृदयाची धडधड वाढलेली असते.

मोबाईलमध्ये पण गाणं लागलेलं असतं

बाहो के दरमिया....... दो...प्यार मिल रहे.......हे....
बाहो के दरमिया....... दो...प्यार मिल रहे.......हे....
जाने क्या.......बोले मन.......डोले सून......के बदन.......
धडकन बनी जुबान.........
बाहो के दरमिया....... दो...प्यार मिल रहे.......हे....

मानसी कँडल ठेवते आणि सागराचा हात सोडून जातच असते की सागर तिचा हात घट्ट पकडून पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो आणि हळूच तिच्या कानात म्हणतो.

बघ......तुला हवं होतं ना आपल्या मधुचंद्राचा साक्षीदार तो चन्द्र आणि चांदण्या असाव्या.......बघ ते आकाश.......आज आपल्या मिलनाची साक्ष देतायत.
मानसी नजर वर करून आकाशाकडे बघते आणि सागर कडे बघून त्याच्या छातीवर डोकं ठेवते.
जस जस गाणं वाजत असत मानसी सागर जवळ येत असतात.

सागर मानसीचा चेहरा त्याच्या तर्जनीने वर करतो तशी मानसी डोळे मिटून घेते.त्याचा उष्ण श्वास मानसीला जाणवत असतो. हळूहळू सागर त्याचे ओठ मानसीच्या ओठांवर टेकवतो आणि किस करू लागतो. मानसी पण त्याच्या कमरेभोवती विळखा घालते.
सागर मानसीला उलट फिरवून तिच्या मानेला किस करू लागतो तशी मानसी शहारते. सागर तिला अलगद कवेत उचलून बेड वर ठेवतो आणि तिच्या पायाला तर कधी पोटाला किस करतो. थंडीतही मानसीला घाम फुटू लागतो तिच्या जीवाची घालमेल सुरू असते तर एकीकडे हा क्षण हवाहवासा असतो.

मानसी पण सागर ला किस करू लागते. दोघेही आता एकमेकांना सुपूर्त करायला तयार असतात. दोघांची मन तर एक होतीच आता शरीर सुद्धा एकरूप झाले होते.

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा.
धन्यवाद??


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading