Login

आठवणी.......गोड की कडू( भाग ५)

Sk


"आई बाबा गेले......पण घर किती सुनं वाटतंय ना!!!!" मानसी

"हो ना.....पण काय.......गावाकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना!!!"सागर

"हम्मम......"मानसी

"चल..... आता जरा वेळ आराम कर. रात्री पण उशीर झाला झोपायला आणि सकाळी पण लवकर उठलो आहोत......."सागर

"हो जरा आराम करू...... मग आवरेन सगळं."मानसी

मानसी जरा वेळ आडवी पडते तोपर्यंत सागर ऑफिस च काम बघत बसतो.

दोन अडीच तासांनी मानसी उठते. बघते तर सागर लॅपटॉप पोटावर घेऊन काम करता करताच झोपला होता.मानसी केसांना कल्चर लावते आणि हळूच सागर च्या पोटावरचा लॅपटॉप उचलून बाजूला ठेवते.
सागर झोपला होता म्हणून हळू आवाजातच किचनमधली काम आवरून भाजी निवडायला बसते.
एवढ्यात मागून सागर येतो आणि मानसी ला अलगद मिटी मारतो.मागूनच तिच्या पोटाला पकडून तिच्या चेहरा आणि मानेच्या मध्ये स्वतःचा चेहरा ठेवतो.त्याच्या रफ दाढि मुळे मानसीच्या मानेला गुदगुल्या होतात आणि तिच्या अंगावर रोमांच येतो.

"काय साहेब..... आज लाडात आलात."मानसी

"हम्मम्म.......आज फक्त माझी बायको आणि मी आहे.......सो.....कोणी बघण्याचं टेन्शन नाही."सागर

"हो का.......मग चला......आधी आंघोळ करा आणि फ्रेश व्हा.."मानसी सागरच्या कपाळावर किस करत त्याच्या केसातून हात फिरवत बोलते.

"हम्मम्म.......थांब ना........ थोडावेळ असच राहूदे ना........बरं वाटतं......... सागर मानसीच्या मानेमध्ये चेहरा मागेपुढे करत म्हणाला.मानसी पण मग वळते आणि सागर ला मिठी मारते.बराच वेळ असाच गेल्यानंतर मानसी सागर ला बोलते.

"बस झालं आता.......तुझं मन काही भरणार नाही......उठ चल पटकन अंघोळ करून घे आणि डायरेक्ट जेवायलाच बसू अडीच वाजलेत."मानसी

"ओके मॅडम........ तुझं भाजी मार्केट आवरून घे मी पटकन येतो."सागर
सागर टॉवेल घेतो आणि बाथरूममध्ये जातो.मानसी पण भाज्यांचा पसारा आवरते आणि किचनमध्ये जाते.

"आई गं.............. मानसी............"
सागर बाथरूम मधून जोरात ओरडतो. बाथरूम मध्ये काही तरी पडण्याचा आवाज येतो. मानसी पण त्या आवाजाने पळतच बाथरूम कडे जाते.

सागर बाथरूममध्ये पडलेला दिसतो. बादली एकीकडे आणि मग एकीकडे.

"सागर........काय झालं?? असा कसा पडलास........उठ बघू....."मानसी

सागर मानसी कडे बघतो तर मानसी घाबरली होती. सागर पटकन घाबरलेल्या मानसीला घट्ट.......मिठी मारतो.

"सागर......तू पडलास कसा????कुठे लागलं का????? असा कसा पडलास रे?????"मानसी

"हो अगं........ कसा पडलो माहीतच नाही पण तुझ्या विचारात असलो ना की नेहमी पडतोच बघ मी......आधी तुझ्या प्रेमात पडलो आणि आता आंघोळ करतांना पण तुझ्यावर प्रेम कसं करता येईल......या विचारात पडलो."सागर

"सागर.......म्हणजे.......तू मुद्दाम असं केलंस.......म्हणजे..... तू पडलासच नाही........."मानसी

सागर नाही म्हणून मान हलवतो.

"शी.........किती रे तू दुष्ट आहेस.......मी किती घाबरले.....आणि तू मस्करी करत होतास."मानसी
मानसी एवढासा चेहरा करत त्याच्या छातीवर मारत बोलते.सागर तिचे मारणारे दोन्ही हात पकडतो आणि चटकन तिला जवळ घेतो. त्याचा गाल......कधी तिच्या उजव्या तर कधी डाव्या गालावर फिरवत असतो.मानसी पण डोळे बंद करून घेते आणि सागरच्या कमरेतून हात टाकून त्याला मिठी मारते. सागर शॉवर चालू करतो. दोघेही चिंब भिजलेले असतात. सागरचा हात कधी तिच्या कमरेवर तर कधी पोटावर फिरत असतो मानसी पण त्या त्या क्षणांना शहारत असते. दोघेही एकमेकांच्या मिठीत बंदिस्त होतात.

"अस वाटते ही वेळ इथेच थांबावी."सागर

"का.?????"मानसी

"कारण तू माझ्या मिठीत आहे. आणि बायकोच्या मिठीत एवढा वेळ असणं हे तर सगळ्या सुखांपेक्षा मोठं आणि वेगळंच सुख आहे."सागर

"हो का........"मानसी

हम्मम्म्म......सागर तिची चेहऱ्यावर आलेली एक बट कानामागे करत म्हणाला. सागर तिच्या ओठांवर किस करणारच असतो की मानसी त्याच्या ओठांवर बोट ठेवते.

"सगळा रोमान्स इथेच करणार का??? काही तरी हनिमूनसाठी पण ठेव........"मानसी

"त्याच टेन्शन तू नको घेऊ....... इकडे तर गरमी आहे, तरी तुला लांब नाही करत.तिकडे तर थंडी असेल. मग तूच विचार कर."सागर खट्याळपणे बोलत होता.
मानसी लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवते.

"तुझा फजिलपणा झाला असेल तर मी जाऊ का बाहेर."मानसी

"नको ना.........थांब ना...... असचं छान वाटते. असं वाटते आपण पावसात भिजतोय.फक्त तू मी आणि चिंब..........भिजवणारा पाऊस."सागर

"हो का.......फॉर युअर काइंड इन्फर्मेशन...... हा पाऊस नाही शॉवर चालू आहे आणि असचं आणखी काही वेळ चालू राहील ना तर उरलेला दिवस बिना पाण्याचा काढावा लागेल. कारण पाणी उद्या सकाळी येईल.काय......... समजलं!!!!मानसी भुवया उडवतचं सागर ला बोलते.सागर पण नाराजीतच मानसीला जाऊ देतो.

मानसी कपडे बदली करते आणि आई बाबांना फोन करते.

"हॅलो........हा आई....... कुठे पोचलात???"मानसी


"हा अगं..... आता आम्ही कोल्हापूर ला डेपो मध्ये पोचलो आहोत.तासाभरात जाऊ घरी.गाडी येईपर्यंत थोडं भाजीपाला घेऊ आणि मग जाऊ."सागर ची आई

"बरं........ सागर पण आताच उठला आहे.आंघोळीला गेला आहे. घरी पोचलात की फोन करा......"मानसी


"हो चालेल....."सागर ची आई


"हा......चला ठेवते."मानसी

मानसी फोन ठेवते आणि किचन मध्ये जाते. डाळ भात बनवलेला असतो. मानसी बेसन चा पोळा बनवायला घेते.

"काय बनवतेस????"सागर


"बेसन चा तिखट झणझणीत पोळा."मानसी

"हम्मम्म्म......अगदी तुझ्या सारखा."सागर


"काय..?????म्हणजे मी तिखट आहे का???"मानसी


"मला काय माहीत......मी अजून तुला टेस्ट केलं नाही ना......आणि तू मला काही करूच देत नाही म्हणून अस म्हंटल."सागर

"अच्छा......."मानसी

"मी पोळ्या बद्दल म्हणतोय हां.......नाहीतर तुला आपलं उगाच काही तरी वेगळं वाटायचं."सागर

"सागर........तू जा बघू........ नाही तर आत पलेत्याने मार खाशील......"मानसी
मानसी पलेता उगारत बोलते तसा सागर किचनमधून धूम ठोकतो.

"हॅलो आई.......बोल गं......पोचलात का?????"सागर

हो आताच पोचलो आणि बॅगा ठेवल्या नि यांना म्हंटल लगेच फोन लावून द्या...म्हणजे तुम्हाला कळवतो पोचलो ते."सागर ची आई

"बरं बरं...... काही त्रास नाही झाला ना तुला."सागर

"नाही रे.....जरा दमलोय आता म्हणून म्हंटल फोन लावून थोडा वेळ आराम करू म्हणजे तुम्हा मुलांना काळजी नाही लागून राहणार."सागर ची आई

"बरं चालेल........करा आता आराम."सागर
सागर फोन ठेवतो. मानसी पण जेवण वाढून सागरला आवाज देते.

"आई बाबा पोचले हा घरी......आता जस्ट पोचले आणि लगेच कळवलं.......म्हणजे थोडा वेळ आराम करू म्हणत होती."सागर


"हो का......बरं........"मानसी

"पोळा बाकी खरचं झणझणीत बनवलास हा.....आणि लिंबू पिळून केलेला ठेचा तर........आहा......एक नंबर...."सागर

"हो का.......पण जरा बेतानेच खा......."मानसी


"हो मॅडम.......संध्याकाळसाठी ठेवतो जरा.........बर आपली खरेदी काय करायची आहे ते ठरव म्हणजे आज संध्याकाळी शॉपिंग ला जाऊ........आणि उद्या पॅकिंग करून परवा निघू..........हनिमूनसाठी..........काय?????चालेल ना तुला......."सागर खोडकर पणे बोलतो.

मानसी होकार देते आणि जेवण आवरून संध्याकाळची तयारी करून ठेवते.
(सागर मानसी चा हनिमूनचा भाग वाचायला आवडेल का ते कमेंट मध्ये जरूर सांगा.)
क्रमशः.....

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद???