Aug 18, 2022
कथामालिका

आठवणी.....गोड की कडू(भाग १०.)

Read Later
आठवणी.....गोड की कडू(भाग १०.)


मानसी...........

आज सागर तीन वर्षांनंतर किंचाळतच उठला होता.....

अहो.........डॉक्टरांना कळवा लवकर,सागर ला शुद्ध आली ते."सागर ची आई

डॉक्टर...... आमचा.......सागर......म्हणजे बरा होईल ना!!!"सागर चे बाबा

काळजी नका करू.....आपण त्याला लगेच ऍडमिट करून घेऊ.एवढी वर्षे वाट पाहिली......अजून थोडे दिवस .......मग सगळं नीट होईल."डॉक्टर सागरच्या वडिलांची समजूत घालत होते.

मी लगेच गाडीची व्यवस्था करतो. असं म्हणून सागरचे बाबा सरपंचांच्या घरी जाऊन त्यांची गाडी घेऊन येतात.सागरची आई रडत असते,कांता काकू आणि इतर शेजारच्या बायका त्यांना धीर देत असतात.

नका ओ अश्या रडू......सगळं ठीक होईल....आपला सागर लवकर बरा होऊन येईल."कांता काकू

कधी बरा होईल........तीन वर्षे झाली....देवीच्या दर्शनाला गेलेली माझी पोरं....... कायमची दुरावली........दर्शनाच्या आधीच असं विपरीत घडावं......काय तो काळ आला नि माझ्या लेकरांचा घात झाला. तो अपघात झाला नि माझी सोन्यासारखी पोरं....... सागरच्या डोळ्यांदेखत तडफडत गेली.....तीन वर्षे झाली सागर कोमात होता.आज त्याच्या तोंडून शब्द फुटला पण जिचं नाव त्याच्या तोंडून निघालं ती या जगातंच नाही माझ्या लेकरांचा संसार फुलण्याआधीच नियतीनं त्याला कुस्करलं गं....... पार.......कुस्करलं."सागर ची आई

शांत व्हा ओ......... तुम्ही असं खचून कसं चालेल.आता त्याच्या समोर अशी आसवं गाळू नका.त्याला पहिल्यासारखा उभं करायचं असेल तर आपल्याला अशी हिम्मत हारून नाही चालणार बघा....."सागर चे बाबा

हो........भाऊ अगदी बरोबर बोलतायत.आता आपल्याला हारून नाही चालणार.गेली तीन वर्षे डोळ्यात तेल घालून फक्त त्याच्या उठण्याची बोलण्याची वाट बघितली आणि आता तो कोमातून बाहेर आलाय तर आपणच त्याला बळं दिलं पाहिजे."कांता काकू


हो........नाही रडणार मी.......माझ्या लेकाला या सगळ्यातून लवकर बाहेर काढू आपण असं म्हणत सागरची आई दोन्ही हातांनी स्वतःचे डोळे पुसते.


सागर कोमातून बाहेर आलाय पण अजून पाहिजे तशी शुद्ध त्याला आलेली नाही त्यामुळे त्याच्या जीवाचा धोका अजूनही टळला नाही.शुद्धीत आल्यावर त्याला असं काही बोलू नका ज्याचा त्याला त्रास होईल.त्याच्या आJबाजूला आनंदी वातावरण राहुद्या."डॉक्टर

हो डॉक्टर....... आम्ही सगळी काळजी घेऊ......तुम्ही सांगाल तसचं करू."सागरची आई

डॉक्टर...... सागरला किती दिवस इथे ठेवावं लागेल."सागरचे बाबा


अजूनतरी सागर रिकव्हर नाही झाला. त्याचे रिपोर्ट थोडे नॉर्मल आले की आम्ही त्याला डिस्चार्ज देऊ.इमर्जन्सी पडली तर उगीच रिस्क आणि धावपळ नको म्हणून थोडे दिवस त्याला अंडरओब्जर्वेशन राहुद्या."डॉक्टर

हो चालेल....जसं तुम्ही म्हणाल...."सागर चे बाबा

आता इथे जास्त गर्दी करू नका.एकानेच कोणीतरी थांबा."डॉक्टर

हो डॉक्टर........धन्यवाद..... सागरचे बाबा हात जोडून डॉक्टरांचे आभार मानतात. सागर ची आई व डॉक्टरांसमोर हात जोडते.

पंधरा दिवसांनी सागरला घरी सोडतात.जास्त शक्ती नसल्याने त्याला व्हीलचेअर वर बसवून आणतात. सागर अगदी निस्तेज,निष्प्राण दिसत असतो.एकटक शून्यात कुठे तरी नजर लावून बसलेला असतो.घरी आल्यावर चार दिवसांनी काही तरी ठरवून सागरची आई त्याला संध्याकाळी चमच्याने थोडा थोडा चहा पाजते आणि मग सागरची आई,बाबा,कांता काकू,सोबतच सागरचे काही जवळचे मित्र आणि डॉक्टर त्यांना घेऊन सगळे देवीच्या टेकडीवर जातात.


मानसीला तडफडत जीव सोडताना बघितल्यामुळे सागरला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो, ज्यामुळे रडलेला नसतो. त्याने रडून मोकळं व्हावं अशीच सगळ्यांची इच्छा असते,पण त्या सगळ्यात त्याची तबब्येत ही तितकीच महत्वाची असते.

तिथे गेल्यावर काही वेळाने मंद.......वाऱ्याची झुळूक येते. जणू मानसी पण सागरला बरं वाटावं म्हणून सगळ्यांच्या सोबतच आहे.

एवढा वेळ शांत असलेला सागर अचानकपणे गुढग्यावर बसतो आणि दोन्ही हातांनी डोकं धरून जोरात ओरडतो.

मानसी...........मानसी.........
त्याची ती हाक इतकी आर्द्र असते की त्याच्या एका हाकेतचं सगळयांचे डोळे पाणावतात.त्याच्या आवाजाने सूर्यास्तावेळची शांतता भंग पावते.
टेकडीजवळ घर असतात तिथली माणसं पण एव्हाना टेकडीवर आलेली असतात.

सागर.......बाळा सावर स्वतःला.......असं करून कसं चालेल लेका........."सागर ची आई


आई.....माझ्या डोळ्यांदेखत मानसी निघून गेली कायमची......आणि मी काहीच करू शकलो नाही गं........ मी माझ्या मानसीला वाचवू शकलो नाही.आई मी अजिबात चांगला नवरा नाही बनू शकलो ........मी तिचं रक्षण नाही करू शकलो......."सागर

ए सागर.....असं नको रे बोलू.......जे नशिबात असते तर भोगावेच लागते,यालाच आयुष्य म्हणतात.तू मोकळं व्हावं म्हणूनच तुला आज इकडे घेऊन आलो.गेली तीन वर्षे तू कोमातून बाहेर येण्याची वाट बघत होतो रे आम्ही."कांता काकू

काय?????तीन वर्षे!!!!!म्हणजे????"सागर


होय बाळा.....मानसीला जाऊन तीन वर्षे झाली.....तुमचा अपघात होऊन तीन वर्षे झाली.....माझा मुलगा गेली तीन वर्षे जिवंतपणी मरणयातना भोगतोय.गेली तीन वर्षे तुझ्यासाठी जीव तिळतीळ तुटत होता.गेली तीन वर्षे आम्हाला तीन जन्मसारखी गेली रे.....तुझे डोळे कधी उघडतील त्याकडे आम्ही डोळे लावून होतो रे....जे झालं ते आपलं नशीब समजायचं अजून काय?????"सागर चे बाबा


बाबा......... पण मानसी........अहो.........वीस दिवस पण संसार नाही केला आम्ही.किती स्वप्न बघितली होती.........या.....या टेकडीवर हातात हात घालून बसलो होतो.........का......आपल्या सोबतच असं का झालं????मला तिला सगळी सुखं द्यायची होती.......तिच्या हक्काचं प्रेम द्यायचं होतं........ सगळी स्वप्न अर्धवट राहिली.माझी साथ अर्ध्यावरचं सोडली ओ बाबा.........अर्ध्यावरचं सोडली.(सागर बाबांच्या कुशीत शिरून रडत होता.)


त्याचे शब्द ऐकून सगळेच रडू लागले होते.सागरला कसंबसं शांत केलं आणि मग सगळे घरी आले. सागर त्याच्या फोन मधले मानसी आणि त्याचे फोटो बघून रडत होता.सागरची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला शांत करते.

आई.........शेवटच्या क्षणी मानसी कशी दिसत होती गं...... मला फक्त तिचा तो चेहरा आठवतो जो अपघात झाल्यावर तिने मला बघितलं होतं.......तिचे ते भरलेले डोळे आणि ओठांवर हसू......."सागर


हो.......अगदी तशीच होती आपली मानसी......शेवटच्या क्षणी सुद्धा......हिरव्या साडीत.......असं वाटत होतं आता उठेल नि मला आवाज देईल पण.........देवाला काही वेगळंच मंजूर होतं बघ.......म्हणतात ना......"जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला".

क्रमशः.....


कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.तबब्येत ठीक नसल्याने भाग टाकायला उशीर होत आहे.

धन्यवाद??


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading