Aug 16, 2022
कथामालिका

आठवणी.....गोड की कडू(भाग ९)

Read Later
आठवणी.....गोड की कडू(भाग ९)
इथे किती छान वाटतंय.......काय थंडगार वारा सुटलाय. मानसी सागरच्या हातात हात गुंफत बोलते.

हो मग, ही माझी आणि माझ्या मित्रांची सगळ्यात आवडती जागा.दिवसभर उनाडगिरी करून झाली की, संध्याकाळी मात्र सूर्यास्त बघायला रोज न चुकता यायचो."सागर

हिला देवीची टेकडी का म्हणतात???काही history आहे का?" मानसी

असं काही नाही!!!!! तो.......बघ समोरचा डोंगर दिसतोय.....तो आई अंबाबाईचा डोंगर आहे,ईथुन खुप स्पष्ट अंबाबाईचा डोंगर दिसतो म्हणून या टेकडीला देवीची टेकडी म्हणतात."सागर

अच्छा......असं आहे होय!!!! बरं चल आता घरी जायला निघू, फार उशीर नको व्हायला.घरी जाऊन आईंना जेवणाला पण मदत करायची आहे,आणि त्यांचे गिफ्ट्स पण देऊ."मानसी

हो चल.......आणखीन......उद्याचा काय plan आहे.......सागर मानसीचा हात पकडून लहानमुलांसारखा मागे पुढे करत बोलत होता.

घरी गेल्यावर बघू.......आई काय म्हणतायत.मला तर वाटत त्या उद्याच आपल्याला देवीच्या दर्शनाला पाठवतील."मानसी

हम्मम्म्म......मला पण तेच वाटते."सागर

दोघेही गप्पा मारत मारत घरी येतात. सागरचे बाबा बाहेरच व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसलेले असतात.

या या........जोडपं आलं हो फिरून....काय मग.......सूनबाईंना कुठे घेऊन गेला होतात??"सागर चे बाबा

माझ्या आवडत्या जागेवर....."सागर

हम्मम......देवीच्या टेकडीवर वाटते......"सागर चे बाबा

हो.......तिकडेच.अजूनही तिकडे तसचं वाटतं एकदम प्रसन्न........मानसीला पण छान वाटलं तिथे."सागर


हो बाबा.......खरचं खूप छान वाटलं......दिवसभराचा सगळा क्षीणचं नाहीसा झाला.वरून खालचा नजरा पण किती छान दिसतो. एवढ्या उन्हाळ्यात पण बरीच हिरवळ आहे इकडे,मग पावसाळ्यात तर किती विलोभनीय दृश्य असेल."मानसी


हो मग........अगं बेटा......आपल्याच नाही तर प्रत्येक गावोगावी असंच असत.उन्हाळी शेती आणि लागवड करून बारा महिने पीक घेणारे पण शेतकरी असतात. ज्या मुळे कडक उन्हात पण हिरवळ कायम असते."सागर चे बाबा

बरं बाबा.......आपला हा वाडा किती जुना आहे ओ........ नाही म्हणजे यात बऱ्याच मोठंमोठ्या खोल्या आहेत. अजून तरी मी वरच्या मजल्यावर नाही गेले,पण या खालच्या चार खोल्या बऱ्याच मोठ्या आहेत."मानसी

आता किती जुना आहे याचा नेमका अंदाज.......मला पण नाही बघ......पण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की, सागर आपल्या वाड्यातली तेरावी पिढी आहे."सागर चे बाबा


काय??????खरचं....... मानसी तोंडावर हात ठेवत बोलते.

हो मग, वरती पण अश्याच मोठ्या तीन खोल्या आहेत. त्यात एक मोठा व्हरांडा आहे तुमच्या भाषेत हॉल.ही वास्तू म्हणजे आपल्याला मोठ्यांच लाभलेलं आशिष आहे. या वाड्याने मुलगा मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही.जसा आईवडिलांच्या इस्टेटीवर दोघांचाही अधिकार असतो, तसाच आईवडिलांवरही असतो. आजकालच्या तुम्हा मुलांचं कसं आहे..........आईवडिलांची इस्टेट हवी असते त्यात हिस्सा पाहिजे असतो पण त्यांची जबाबदारी नको असते. मुलींना काही महिने जरी आईवडिलांना ठेव सांगितलं, तरी मुली हात वर करतात, काय.... तर म्हणे आमचंच आम्हाला होत नाही.
भावाने आईवडिलांना सांभाळायचं,पण मुलीने सासू-सासऱ्यांना सांभाळायचं नाही. कुठली रे तुमची ही रीत.ज्याना अंगाखांद्यावर खेळवलं, आपल्या घासातला पण अर्धा घास भरवला....ती मुलं कमवायला लागली की सर्रासपणे आईवडिलांना अक्कल तरी शिकवतात नाही तर कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोडतात.काही मुलं-मुली याला अपवाद आहेत,सगळेच काही तसे नसतात,पण तुमच्या मुंबईत हेच जास्त चालते. पण या वाड्यात नेहमी न्याय झाला.ज्यांना आईवडीलांची जबाबदारी नको त्यांनी वाड्यावरचे पण अधिकार सोडायचे. त्यामुळेच हा वाडा सगळयांना धरून आहे किंवा सगळे या वाड्याला धरून आहेत असं म्हंटल तरी चालेल."सागर ची आई

खरचं......असा नियम सगळीकडे लागू व्हायला हवा.जेणेकरून उतारवयात आईवडिलांची फरफट नाही होणार.

बरं...... तुम्ही बसा.......मी आलेच.असं म्हणून मानसी आत जाते आणि मोठी बॅग घेऊनच बाहेर येते.
हं..... आई......ही घ्या, ही खास शॉल आहे तुमच्यासाठी........मनालीवरून घेतली,आणि बाबा हे घ्या......तुमच्यासाठी मफलर.......खूप उबदार आहे. तुम्हाला नक्की आवडेल.केसर,बदाम, सुका मेवा आणि इतर बऱ्याच गोष्टी मानसी सासुकडे देते.इतक्यात कांता काकू येतात.

बाई बाई.......सुनेनं खूप सामान आणलंय वाटत सासूसाठी. कांता काकू दोन्ही भुवया उडवत म्हणतात.

नाही ओ काकू......सासूसाठी नाही....आई साठी आणलंय,आणि आईची आवड लेकं तर जपूचं शकते ना!!!

या ना तुम्ही पण बसा. हे घ्या हे तुम्हाला ठेवा......खरतरं आईंसाठी आणलं होतं....... त्यांचे गुडघे फार दुखतात ना म्हणून मनालीवरून आयुर्वेदिक तेल आणलं होतं.दोन बॉटल आहेत एक तुम्हाला ठेवा आणि हा घ्या सुका मेवा.तबब्येतीसाठी चांगला असतो. आमच्या दोघांकडून तुम्हाला छोटीशी भेट समजा. मानसी कांता काकूंच्या हातावर हात ठेवत बोलते.

कांता काकूंना भरून येत त्या हातातल्या वस्तू खाली ठेवतात आणि येतेच जरा असं बोलून भरभर घराकडे जातात. त्यांच्या पेटीतली खणाची साडी एक नारळ आणि मूठभर तांदूळ घेऊन पुन्हा येतात.

बस बाय......... इथं बस.......ही घे साडी......नवीन नाही एवढी पण घे पोरी........एवढ्या आपलेपणाने कोणी नाही केलं गं माझं.......ही तुझी सासू आहे तिच्याकडेच येते बघ मी. तुझी भेट मला खूप आवडली हो........आणि सागरा.......बाळा.......आमच्या लेकीला दुखवू नको बघ कधी........पोरगी लक्ष्मी आहे बघ.........माझी अंबाबाईची आहे. कांता काकू दोन्ही हात डोक्यावरून फिरवून कडाकडा बोट मोडतात नि तिच्या हनुवटीला धरून तिचा मुका घेतात.

हो काकू......तुमची भेट फार आवडली मला thank you म्हणून मानसी काकूंना वाकून नमस्कार करते. काकू पण तोंडभरून आशीर्वाद देतात दोघांना.

काकू.....आज तुझ्या हातच्या भाकऱ्या आणि आईच्या हातची सुकट होऊन जाऊदे......"सागर


हो रे......बाळा करते हं........"कांता काकू

मी पण येते मदतीला......तेवढ्याच गप्पा पण करू....."मानसी

चल चल......कांता काकू

कांता काकू,सागरची आई आणि मानसी तिघी मिळून स्वयंपाक करतात आणि आठ वाजता जेवायला बसतात. सागर पण त्याच्या गावच्या सवयीप्रमाणे हाताची मूठ आवळतो आणि एक बुक्का कांद्यावर मारतो तश्या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या होतात.

अरे......मला सांगायचं ना!!! मी चिरून दिला असता कांदा..... असं लागेल ना हाताला!!!"मानसी


सागर स्मित करतो आणि म्हणतो."कापलेल्या कांद्याला.....हाताची मूठ करून फोडलेल्या कांद्याची चव नाही येणार." बघ हा कांदा खाऊन.......असं म्हणत सागर कांदा मानसीला देतो.

हो रे......एकदम रसरशीत आहे......."मानसी


आहे का आधी चव......कापलेल्या कांद्याला....."सागर दोन्ही भुवया उंचावत विचारतो.

खरचं.... गावाकडे या अश्या छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंदी असतात सगळे.आपल्याला सगळ्या सुख सुविधा असून पण समाधान मात्र नसते."मानसी


अगं...... म्हणून तर लोकं सुट्टीत लेकरा बाळांना घेऊन गावी येतात. हवा पालट करायला.गावी कशी मोकळी हवा असते,विहिरीचं पाणी,चुलीवरची भाकरी.........आहा...."सुख म्हणजे नक्की काय असतं" हे गावी आल्यावर समजतं."सागर चे बाबा

बरं मी काय म्हणते........उद्याचं दोघे देवीला जाऊन या.......काय....."सागर ची आई

सागर मानसी दोघेपण एकमेकांकडे बघून हसतात.

काय झालं हसायला????" सागर ची आई

मानसी मगाशीच बोलली मला.....कदाचित आई उद्याच आपल्याला देवीला पाठवतील."सागर

हो का??? बरं.......मग चला आता पटकन आवरून झोपा म्हणजे सकाळी उन्हाच्या आधी परत याल......"सागर ची आई

हो........म्हणत मानसी पण आवरायला मदत करते आणि मगचं झोपायला येते.सागर केंव्हाचाच झोपलेला असतो. मानसी त्याचा हात हळूच आपल्या डोक्याखाली घेते आणि त्याच्या मिठीत विसावते.

दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी लवकर उठून आंघोळ करून तयार होते.कांता काकू पण सकाळीचं येतात पोरं निघाली का ते बघायला.त्यांना समोरचं मानसी दिसते.त्यांनी दिलेली हिरवी कंच खणाची साडी,कपाळाला चंद्रकोर,त्याखाली हळदीकुंकू, हातभार चुडा घातलेली मानसी त्यांना जणू अंबाबाईचं दुसरं लोभस रुपचं दिसत होती.त्या पटकन चाफ्याचं फुल खुंटून आणतात.


बाय....... थांब जरा......असं म्हणून कांता काकू तिच्या वेणीत फुल माळतात आणि तिच्या कानामागे तीट लावून दृष्ट नको गं........ कुणाची लागायला अस म्हणून कडकड बोटं मोडतात. सागर पण धोतर आणि कुर्ता घालून येतो.

हम्मम्म......आल्यापासून बघतोय......तू नुसती मानसीचीचं दृष्ट काढतेस........ जरा माझी पण काढ.... मी पण गोराचं आहे......सागर मस्करीत बोलतो.

हो काय????? ये बरं...... असं म्हणून काकू त्याची पण दृष्ट काढून त्याच्या कानामागे पण तीट लावतात.

सागरची आई दोघांना पण साखर देते आणि देवळाबाहेरच ओटी घ्या असं सांगते. दोघेपण लवकरच या म्हणजे जरा दुपारी चार घर फिरवून आणेणं मानसीला असं सागरला सांगते.

सागर मानसी तिघांच्या पाया पडतात आणि कांता काकूंच्या मुलाची गाडी जी तिथेच असते ती घेऊन दर्शनाला निघतात.

सागर मानसी बोलत गप्पा मारत जात असतात आणि घाटामध्ये गेल्यावर अचानक मागून कसली तरी जोरदा......र धडक त्यांच्या गाडीला बसते.

मानसी........................सागर जिवाच्या आकांताने ओरडतो.

क्रमशः.....


कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद??

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading