Oct 24, 2021
कथामालिका

आठवणी.....गोड की कडू(भाग ४)

Read Later
आठवणी.....गोड की कडू(भाग ४)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
"आई......मी थोडा चिवडा बनवला आहे आणि डिंक सुका मेवा घालून थोडे मेथीचे लाडू वळलेत गुळातले. दोन्ही डब्ब्यात भरलं आहे. तुमची आणखी काही पॅकिंग राहिली असेल तर मदत करू का??" मानसी

"नको......माझं झालं सगळं कालच......पण तू एवढं कशाला करत बसलीस??? पुढच्या आठवड्यात तुम्ही पण निघणार आहात ना!!! मग त्याकडे पण लक्ष दे जरा......."सागर ची आई

"हो आई.....पण त्यासाठी अजून उशीर आहे आणि ते काय.........करू दोन दिवसात ."मानसी

"बरं!!!!! आता...... काळजी घ्या दोघे आणि असेच एकमेकांना धरून रहा......असेच आनंदी रहा. तुम्ही खुश तर आम्ही खुश."सागर ची आई
सागर ची आई मानसी च्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते.मानसी जरा भावुक होते कारण एवढया वर्षात कधी तिच्या डोक्यावरून मायेने हात कोणी फिरवलाच नव्हता.लहान असतांना मामी दिवसभर राबवून घ्यायची, आणि चौत भाकरी द्यायची ती पण कडक झालेली. कधी कधी मामा गपचूप तिला गोठ्यात जाऊन जेवणाचं ताट द्यायचा.मामीच्या त्रासाला कंटाळून जेंव्हा ती जीव द्यायला गेली होती,त्याच वेळी मामाने निर्णय घेतला आणि मानसीला हॉस्टेलला पाठवलं. मामी कुचकूच करत होती पण मामाने तीच काहीच ऐकलं नाही आणि शेवटी मानसीची त्या नरकातुन सुटका झाली.

"काय गं...... कुठे हरवलीस???"सागर ची आई

"अं....... काही नाही..... ते आपलं....असचं...... कोणी कधी........डोक्यावरून मायेने हात फिरवलाच नाही...... म्हणून थोडं भरून आलं......मामा होता चांगला... पण मामीचा धाकचं एवढा होता की काय सांगू......पण तरी मामाने मला होस्टेलला पाठवलं शिकायला.स्वतःच्या हिमतीवर शिकले आणि आज ही नोकरी मिळवली आहे.मामी चुकीची वागली आहे पण आई गेल्यानंतर तिनेच डोक्यावर छप्पर दिलं. तिचे उपकार कधीच नाही फेडू शकणार.जमेल तसे पगारातले पैसे पाठवते मामाला....... माहेरचं म्हणायचं तर मामाचं आहे म्हणून करते.तुम्हाला चालेल ना आई!!!!! मी पगारातले थोडे पैसे मामाला दिले तर..!!!!"मानसी

"अगं..... तुझा पगार आहे तो.....आणि तो कुठे, कसा खर्च करायचा हे ठरवण्याचा अधिकार पण तुझाचं आहे.दिवसभर राबणार तू आणि पगार मिळाल्यावर ठरवणार आम्ही......असं कशाला.जे आहे ते माझं तुझं करण्यापेक्षा आपलं म्हणण्यात योग्यता वाटते आम्हाला."सागर ची आई

"Thank you आई........सुनेला एवढं समजून घेणारं सासर कोणाला मिळालं आहे......मला माहित नाही,पण मी खूप लकी आहे."मानसी

"हो का.....आता पुरे झालं आमचं कौतुक......चल तुला एक गंमत दाखवते."सागर ची आई

"काय दाखवताय...?"मानसी

"अगं...... आधी चल तर......त्या ठेव पाण्याच्या बॉटल नंतर धु त्यांना."सागर ची आई
मानसी हातातल्या बॉटल किचनवर ठेवते आणि हात धुवून सासुबरोबर दुसऱ्या रूम मध्ये जाते.

"हम्म......हे घे......बघ.....तुला आवडतंय का...???"सागर ची आई

"आई.......काय आहे यात....???"मानसी
मानसी बॉक्स ची पॅकिंग खोलत बोलते.

"आधी खोल तर...!!!"सागर ची आई

"हम्म......छान आहे....."मानसी
मानसी सासू ने दिलेलं गिफ्ट बघून.... लाजतचं हो म्हणते........


"आवडली का????"सागर ची आई

"हो.....आवडली खूप......छान आहे..."मानसी


"अगं....... मी मगाशी खाली गेले होते ना......तेंव्हा तो समोरचा मॉल आहे बघ,रस्त्याच्या कडेला...... तिथे बाहेरच ही नाइटी लावली होती बघ......मला फार आवडली म्हंटल तुला फार शोभून दिसेल आणि तुम्ही जाणारचं आहात फिरायला म्हणून घेतली......"सागर ची आई

"काय आई तुम्ही पण......."मानसी

"अगं..... लाजतेस काय..??तुला सांगू..... माझं लग्न झालं आणि जेंव्हा आम्ही बाहेर जाणार होतो ना.......तेंव्हा माझ्या सासूबाईंनी मला चक्क नऊवारी दिली होती......आणि म्हणाल्या!!! पोरी......हेच ते दिवस जे आयुष्यभर लक्षात राहतात......या नवीन क्षणांना भरभरून जगा......नंतर संसाराच्या राहाटगाड्यात आणि पोरंबाळ झाली की फक्त आठवणी असतात ज्या नवरा बायकोची सोबत करतात. आज मी पण तुला हाच कानमंत्र देईन......फिरायला जाल....... तेंव्हा तुमचे ते गुलाबीक्षण भरभरून जगा.......या क्षणात खुप काही दडलेलं असतं.रोजची रात्र वेगळी आणि मधुचंद्राची ही खास रात्र वेगळी.त्यावेळी आमच्या कडे आतासारखे फोन नव्हते, पण तरी ते गोड क्षण आमच्या मनाच्या कोपऱ्यात जसेच्या तसे आहेत."सागर ची आई

"हो आई.........तुम्ही जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवेन......."मानसी

"चल......आता राहिलेलं आवरू सगळं आणि आता साधी खिचडी बनव. सकाळी लवकरच निघायचं आहे.उगाच प्रवासात पोट जड नको राहायला....."सागर ची आई

"हो आई चालेल....."मानसी
मानसी किचनमध्ये येते आणि खिचडी कुकरला लावते. सोबत साधी कोशिंबीर आणि पापड भाजते.


"बाबा......ही घ्या तिकिटं....... आणि आई सकाळी साडे पाच ची गाडी आहे...... मानसी तू पण जरा लवकरचाच अलार्म लावून ठेव.......इथून लवकरच निघू म्हणजे उगाच गाडीत चढतेवेळी घाई नको. उशीर झाला की गडबडीत सामान इकडे तिकडे ठेवायला लागत."सागर

"हो मी अलार्म लावते........आणि आई तुम्ही जेऊन लगेच झोपायला जावा म्हणजे सकाळी त्रास नाही होणार."मानसी

"हो हो.....तुम्ही पण लवकरच झोपा आणि तू पण आराम कर जरा........सकाळपासून कामातच जुंपली आहेस."सागर ची आई

"सुनबाई.....सागर लहान होता.......तेंव्हा सागर ची आई आणि आजी......असेच खाऊ चे डब्बे भरून द्यायचे.मी पण माझ्या पाकिटातले पैसे द्यायचो त्याच्या शाळेच्या सहलीसाठी.........आज तोच लेक.... त्याच्या पाकिटातले पैसे काढून.... त्याच्या आई बाबांना तिकीट काढून देतो......"सागर चे बाबा

"हो ना.....किती लवकर मोठा झाला ना आपला सागर......"सागर ची आई

"आई.....मी किती........ मोठा झालो ना तरी नेहमी तुझं बाळंचं राहणार आहे." सागर

"हो रे बाळा........तू आमचा बाळंचं आहेस हो......आणि कायम राहशील अगदी तुम्हाला बाळ झाल्यावर सुद्धा.."सागर ची आई

मानसी लाजते आणि तिथून निघून जाते. रात्री सगळेच लवकर झोपतात. मानसी पण सागर च्या कुशीत पडल्या पडल्याचं विसावते. सागर पण तिला घट्ट मिठीत घेऊन झोपी जातो.

पहाटे चार ला सगळे उठतात. बस स्टॉप घरापासून जवळच असत म्हणून मानसी आणि सागर फक्त फ्रेश होतात. आई बाबा आंघोळ करून देवा जवळ दिवा लावतात. मानसी कोरा चहा करते. सगळे मिळून चहा घेतात आणि जायला निघतात.सागर बॅगा घेऊन बाहेर निघतच असतो की सागर ची आई त्याला थांबवते.

"सागर......थांब बाळा.....जरा इकडे ये. इथे उभा रहा...... मानसी च्या बाजूला."सागर ची आई

"अगं आई.....आता काय एवढ्या सकाळी सकाळी दृष्ट वैगरे काढणार आहेस का???" सागर

"नाही...!!!! तुमचा हक्क आणि जबाबदारी दोन्ही देणार आहे."सागर ची आई

"म्हणजे??? "मानसी

"थांब........."सागर ची आई

सागर ची आई तिच्या बॅग मधून दोन तोडे काढते.

"हात दे बघू........"सागर ची आई
मानसी एक हात पुढे करते.त्यात सागर ची आई एक तोडा घालते आणि तिचा दुसरा हात स्वतः त्याच्या हाताने हातात घेऊन दुसरा तोडा घालते.

"अहो आई.......या सगळ्याची गरज नाही."मानसी

"गरज म्हणून दिलेच नाहीत मी..!!!!!! ते तुझेच आहेत. तूझ्या हक्काचे आहेत. माझ्या सासूबाईंनी मला दिले होते आता हे तुझे."सागर ची आई
दोघे पण आई बाबांच्या पाया पडतात आणि सगळे जायला निघतात.मानसी दरवाजा लॉक करते.

गाडी डेपो मध्ये लागलेली असते सागर गाडी कन्फर्म करून सगळं सामान गाडीत व्यवस्थित ठेवतो आईबाबांना त्यांची सीट दाखवतो.मानसी भाजी घेइपर्यंत गाडी सुटायची वेळ होते.

चला......काळजी घ्या.....आणि जाल बाहेर तर व्यवस्थित जा.....काळजी घ्या एकमेकांची.......आणि खुशाली कळवत रहा......वेळ भेटला की एकदा गावी फेरी मारा......"सागर चे बाबा

हो बाबा......तुम्ही पण काळजी घ्या."सागर

आणि हो आई........राई चं तेल दिल आहे त्याने रोज रात्री मालिश करा म्हणजे गुडघे दुखणार नाहीत."मानसी

"हो हो......चला आता आणि काळजी घ्या.."सागर ची आई

"पोहचल्यावर फोन करा."सागर

दोघे पण आई बाबांना गाडीत बसवून घरी येतात.

क्रमशः.....

कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद???


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading