Aug 16, 2022
कथामालिका

आठवणी......गोड की कडू(भाग ११)

Read Later
आठवणी......गोड की कडू(भाग ११)


असाच........महिना निघून जातो.सागरची आई आणि बाबांना सागरची फार काळजी वाटत असते.तो घरात शांत शांतचं असतो.काही विचारल की तेवढ्या पुरताच उत्तर देऊन गप्प बसायचा कधीतरी देवीच्या टेकडीवर संध्याकाळचा फेरफटका मारायचा, पण तिकडून आला की त्याचे डोळे सुजलेले असायचे.नीट खाणं पिणं नाही की कोणाशी बोलणं नाही.शेवटी सागरचे बाबा मधल्या दिवसात मुंबईला जाऊन येतात. तिथल्या त्याच्या ऑफिसमधल्या सरांशी काहीतरी बोलून ते त्याच रात्री गावाकडे येतात.

आठ दिवसांनी सागरचे सर आणि सागरचा ऑफिसमधील मित्र विक्रम त्याला भेटायला गावी येतात.दोघांना असं अचानक बघून सागर खुश होतो.विक्रम सागरचा जवळचा मित्र असल्याने सागर पटकन जाऊन त्याला मिठी मारतो आणि त्याचाही नकळत तो रडू लागतो. सागरला असं रडतांना बघून सगळेच भावूक होतात. आई सगळ्यांसाठी चहा टाकायला आत जाते विक्रम सागरला थोपटून शांत करतो.सागरची आई सगळ्यांसाठी चहा नाष्टा घेऊन येते.दोघे पण शनिवार रविवार अशी सुट्टी काढूनच आलेले असतात. नाश्ता करून थोडा आराम झाल्यावर सागर दोघांनाही गावचा फेरफटका मारायला घेऊन जातो.त्याचे मोठे सर पण असतात त्यामुळे तो स्वतःच दुःख बाजूला ठेवून छान पाहुणचार करतो.संध्याकाळी जेवणं झाल्यावर सर सागरला एक एनवोलप देतात. सागर ते खोलून बघतो तर त्यात त्याच अपॉइंटमेंट लेटर असतं.


सर.........हे काय?????"सागरतुझं अपॉईंटमेंट लेटर!!!!!!! हे बघ सागर........तू माझा खूप जुना एम्प्लॉई आहेस शिवाय तू तुझ्या दुःखातून लवकर बाहेर निघावंस अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. तीन वर्षाचा गॅप पडल्यामुळे नवीन फीचर्स समजायला तुला थोडा वेळ लागेल.........पण अवघड नक्कीच नाही जाणार.........तेवढा तू कॅपेबल नक्कीच आहेस......."सर


सर.........खरचं thank you....... तुमचे आभार कसे आणि कुठल्या शब्दात मांडू खरचं समजतं नाही मला........"सागर सरांसमोर हात जोडत म्हणाला...


सागर........thank you म्हणायचंच असेल तर तुझ्या बाबांना म्हण आणि त्या एम्प्लॉईना म्हण ज्यांनी माझ्या या निर्णयात मला सोबत केली.गेल्या आठवड्यात तुझे बाबा आपल्या ऑफिसमध्ये आले होते.त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली.ओनेस्टली आम्हाला वाटलं की आम्ही तुला यातून थोडं बाहेर काढू शकतो .कम्पनीचा मालक जरी मी असलो,तरी कम्पनी तुम्हा एम्प्लॉई च्या हार्डवर्क मूळे चालते म्हणून मी तुझे बाबा गेल्यावर एक मिटिंग घेतली आणि फायनली आम्ही दोघे इथे आलो.so........... आता तू ठरव तुला काय करायचं आहे????"सर

मी तयार आहे सर.........कधी जॉईन करू सांगा फक्त.........."सागर


आम्ही उद्या निघू दुपारी.......तू हवं तर आमच्या सोबतच निघ.........तुझी तिकडची काही कामं आणि खरेदी वैगरे असेल ते पूर्ण कर थोडा आराम कर आणि आठ दिवसांत जॉईन हो.........हवं तर मी घरी येऊन नवीन फीचर्स तुला समजावून सांगेन म्हणजे जॉईन झाल्यावर तुला फार काही प्रॉब्लेम्स नाही येणार..........."विक्रम


हो चालेल.........असचं कर........तेवढी तुझी सोबत पण होईल सागरला........"सागर ची आई


हो चालेल की.......असं पण एकट्याला खरेदी करायला आता सुचणार पण नाही. पहिल्यासारखा फ्रेश नाही वाटतं. जॉइनिंग च्या आधी आठ दिवस भेटले तर माईंड पण रिफ्रेश होईल." सागरठरलं तर.......आपण उद्या दुपारी जेऊन निघतोय......अस म्हणत विक्रम सागरच्या हातावर हात ठेवतो.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून सागरची आई नाश्ता आणि जेवण आटोपून घेते आणि कांता काकूंना हाताशी घेऊन सागरसाठी तिखटामिठाच्या पुऱ्या, बेसनाचे लाडू, पोह्यांचा तिखट चिवडा आणि तांदुळाच्या पिठाच्या चकल्या बनवते. कांता काकू पण सागरसाठी पुरणपोळ्या बनवते.

सगळं आवरून सागरची आई रानटी भाज्या घेऊन येते.सागरचे सर मोठ्या कम्पनीचा मालक जरी असले तरी त्यांना गावच्या भाज्या फार आवडतात असं त्यांनी आदल्या रात्री सांगितलेलं असतं म्हणून त्या भाज्या घेऊन येतात.विक्रम सागरला पॅकिंग करायला मदत करतो. सागरला पॅकिंग करतांना त्याचा आणि मानसीचा फोटो दिसतो तसा तो फोटो छातीशी कवटाळून सागर बेडवरच बसतो.


अरे सागर.........आणखी काही राहील आहे का ते चेक कर म्हणजे नंतर हे राहील तर राहील असं नको व्हायला.
सागर..........सागर........काय रे.....काय झालं???? "विक्रममाझ्यासोबतच असं का घडलं रे???? एवढी वर्षे आम्ही एकत्र संसाराची स्वप्न पाहिली आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.........."सागरमित्रा........... अरे........" इसी का नाम जिंदगी हे"
माझं पण बघं ना........एवढी वर्षे पत्राच्या झोपडीत राहिलो आम्ही.......माझ्या आईने रक्ताचं पाणी करून मला वाढवलं.........चार लोकांच्या घरची धुणी भांडी करून शिकवलं. मला चांगली नोकरी लागली. सहा महिन्यातच माझं प्रमोशन होऊन चांगला पाच आकडी पगार भेटायला लागला. सगळ्यांची कर्ज चुकती केली.एवढी वर्षे दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन केला तिने. दारू ढोसून ढोसून लिव्हर डॅमेज झालं नि बाप गेला माझा. आम्ही झोपडी सोडली. मोठा आलिशान........ फ्लॅट घेतला आईला म्हंटल आता आराम करायचा फक्त खूप कष्ट घेतेलेस माझ्यासाठी. आता सुखाने चार घास भरवेन मी तुला.आईनी पण प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला नि झोपायला गेली.........आई अजून कशी उठली नाही बघायला गेलो तर आई............कायमचीचं निघून गेली होती.नियतीनं तिची सेवा करण्याआधीच हिरावलं........ खूप रडलो मी.तुला निदान काका-काकूंचा आधार तरी आहे......मला तर ते पण नव्हतं.

हां तसे मामा-मामी आहेत,पण ते आता जवळ येतात कारण माझ्याकडे पैसा आहे.नाहीतर कधी आई भेटायला गेली की तिला नि मला झोपडपट्टीतून येतो म्हणून दारातचं बसवून पाण्याचा ग्लास द्यायची नि राहिलेली शिळी भाकरी...........तिचं ते तूसडेपणाचं वागणं अजूनही आठवलं तरी चीड येते मला.


तुला सांगतो सागर......."मदर इंडिया"मधील एक गाणं माझं आणि आईच.......खूपच आवडतं........ कदाचित परिस्थिती मुळे असेल.

"दुनिया मे हम आये हे तो
जीना ही पडेगा.........

जीवन हे अगर जहेर तो
पिना ही पडेगा............."

Show must go on my frend
The show must go on...........
विक्रम सागरच्या खांद्यावर थोपटतो.
चल आवर म्हणजे जेवणं आटोपली की निघू........."विक्रम


हम्मम..........आता उभं राहिलं पाहिजे आई बाबांसाठी तरी.......एवढं बोलून सागर विक्रमला मिठी मारतो.चल......झालंय माझं पण...........सर काय करतायत बघू........
दोघेपण खोलीबाहेर येतात.


सागरचे बाबा.......तुमचा वाडा मात्र खूप छान आहे हां...... मस्त मेंटेन ठेवलंय...... शिवाय जुन्या वस्तूही जपून ठेवल्या आहेत."सर


अहो सर.............थोरामोठ्यांची आठवणं......... शिवाय तेवढीच त्यांची सोबत आणि आशिर्वाद........"सागरचे बाबा

हे मात्र १०१% खरं बोललात हां........"सर


बरं सर.......हे घ्या......हा खायचा डब्बा खास तुमच्यासाठी.........आणि गावचा भाजीपाला......तुम्हाला आवडतो ना!!!!! आणि विक्रम.......बाळा......हे तुझ्यासाठी...... आणि आता दोनाचे चार हात कर हो........."सागर ची आई


हो काकू...........यंदा कर्तव्य आहे........आणि तुम्हा दोघांना पण यायचं आहे."विक्रम

हो हो नक्की येऊ......"सागरचे बाबा


चला चला.......आता जेऊन घ्या आणि अर्धा तास आराम करून मगच निघा..........."कांता काकू.

क्रमशः.....


कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे जरूर कळवा आणि कथेला लाईक शेअर करायला विसरू नका.तबब्येत ठीक नसल्याने भाग टाकायला उशीर होत आहे.ही कथा pro blog नसून फ्री सबस्क्रिशन आहे.

धन्यवाद??
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading