आषाढी एकादशी रांगोळी Aashadhi ekadashi special rangoli

Special rangoli for aashadhi ekadashi

आषाढी एकादशी रांगोळी 

विठ्ठल दर्शनाची आस असलेले अनेक वारकरी कित्येक दिवसापासून पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर दिवस रात्र चालत जात असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणाऱ्या तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या भक्तिभावाने नाचवत गात सगळे तिथे पोहोचतात. 

आषाढ महिन्याच्या एकादशीला म्हणजेच अकराव्या दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाते. यादिवशी सगळे वारकरी भक्तिभावाने उपवास करतात आणि विठ्ठल गजरात मग्न होतात. तसे तर दर महिन्याला एकादशी येते परंतु हिंदू धर्मात आषाढी एकादशीला महत्त्वाची एकादशी मानले जाते. 

या दिवशी सगळे भाविक मनोभावे विठ्ठलाचे स्मरण करून उपवास करतात. अनेक देवळांमध्ये भजनसंध्या, प्रवचने आयोजित केली जातात. पंढरपूर तर खूपच सुंदर सजलेले असते. चंद्रभागेच्या तीरी अखंड वारकरी सांप्रदाय विठुरायाच्या ओढीने गोळा झालेला असतो. चंद्रभागेत स्नान करून वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी देवळाकडे प्रस्थान करतात. अनेक भक्त मंडळी दर्शनाच्या ओढीने तिथे येतात. भक्त मंडळींसोबतच तिथे मुख्य भूमिकेत असतात ते म्हणजे पोलीस आणि पोलीस मित्र. 

भाविकांची पंढरपुरात गर्दी झालेली असताना सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करत रस्ता दाखवण्याचे काम, ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून गर्दी कंट्रोल करणारे अनेक डी.एम.व्ही. आपल्याला तिथे दिसतात. पोलिसांची खांद्याला खांदा लावून मदत करणारे ए.ए.डी.एम. अर्थात Aniruddha's Academy of Disaster Management चे स्वयंसेवक अगदी भक्तिभावाने तिथे सेवा करताना दिसतात. 

पंढरपूरमध्ये आलेल्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांची योग्य सोय व्हावी यासाठी पोलिस आणि डी.एम.व्ही. सतत कार्यरत असतात. विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण पंढरपूर तर न्हाऊन निघालेले असते सोबतच वरुणराजा देखील बरसत असतोच. 

आषाढी एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो. म्हणजेच मराठी महिन्यातील पुढील चार महिने लोकं त्यांच्या आहारातून कांदा, लसूण, मांसाहार असे पदार्थ वर्ज्य करतात. यामागचे शास्त्रीय कारण पाहायला गेले तर वातावरणात दमटपणा वाढलेला असतो आणि पावसाच्या दिवसात असे पदार्थ पचायला जड जातात म्हणूनच या कालावधीत असे पचायला जड पदार्थ वर्ज्य केले जातात. 

एकादशीच्या दिवशी भक्तांचा उपवास असतो. म्हणजेच खऱ्या अर्थाने भक्तगण देवाच्या सानिध्यात त्याच्या नाम गजरात मग्न झालेला असतो. 

ज्यांना प्रत्यक्ष पंढरपूरला जाता येत नाही ते हमखास मोबाईल किंवा टीव्हीवर याचे प्रक्षेपण बघून घरबसल्या विठू माऊलीचे दर्शन घेतात. अनेक शाळांमध्ये आणि देवळांमध्ये दिंडी सोहळा आयोजित केलेला असतो. 

घरोघरी देखील आषाढी एकादशी अगदी उत्साहात साजरी केली जाते. सकाळी लवकर उठून पूजा केली जाते आणि दारासमोर रांगोळी काढली जाते. चला तर मग बघूया आषाढी एकादशी निमित्त तुम्ही कोणत्या रांगोळ्या काढू शकता ते. आम्ही खाली काही रांगोळीचे नमुने देत आहोत त्यानुसार तुम्ही रांगोळी काढलीत तर नक्कीच तुमच्या दाराची शोभा अजूनच वाढेल. 

१. संजना इंगळे. 

२. सुप्रिया महादेवकर 

३. अंजली औतकार 

४. वंदना सूर्यवंशी