पच्छाताप...

Old Age Story

रात्री तीन वाजेच्या सुमारास स्वाती च्या बाजूला राहणाऱ्या आशा ताईना अस्वस्थ वाटू लागले,.त्यांनी स्वाती शेजारी राहत असल्यामुळे तिला लगेच कॉल केला, स्वाती लगेच विचारपूस करण्यासाठी  आशा  ताईच्या घरी पोहोचली. स्वाती ने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना औषध दिले व त्यांच्या जवळच बसून राहिली. आशा  ताईना आराम पडावा म्हणून स्वाती स्वतः त्यांचे हात-पाय हळूवारपणे दाबू लागली. आणि आशा ताईनचे डोळे पाणावले.

स्वाती ने आशा ताईला विचारले, "ताई, काय होतंय तुम्हाला." त्यावर आशा ताई काहीच बोलल्या नाही. स्वाती ने पुन्हा विचारल्यावर ताई म्हणाल्या, स्वाती तुझी सेवा पाहून मला माझा मुलगा व सुनेची आठवण झाली. माझी सुन रिया ही माझी काळजी घेत होती. माझा मुलगा सुनील इंजिनियर आहे. माझ्या पतीच्या मृत्युनंतर तोच तर माझ्या आशेचा किरण होता. माझ्या सुनेला दिवस गेले. तेव्हा मला खूप आनंद झाला. नातूच पाहिजे म्हणून मी तिला जबरदस्ती करून गर्भजल चाचणी करायला लावली. तिच्या पोटात मुलीचा गर्भ वाढत होता. तो मी ‍तिच्या इच्छेविरूध्द काढून टाकायला लावला. मात्र तो गर्भपाताचा धक्का रिया सहन करू शकली नाही. काही दिवसातच ती आजारी पडली आणि त्या आजाराच ती गेली.

रिया च्या अचानक जाण्याने सुनील एककी पडला. माझ्यावर नाराज होऊन बाहेरगावी स्थायिक झाला आहे. मी मा‍त्र इथे एकटी पडली आहे. आता मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होतोय. मी माझ्या नातीचा गर्भ पाडला नसता तर माझा मुलगा, सुन व नात माझ्यासोबतच असते. माझ्या नातीला मी तुझ्यासारखेच डॉक्टर केले असते. तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती. असे म्हणून आशा ताईचे डोळे झरझर वाहू लागले....पण आता पच्छाताप करून काहीच उपयोग नाही...

सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )