आस

आस- (घाई कशाला लग्नाची)



*अष्टाक्षरी*

*शिर्षक- आस*

लग्न नाही भातुकली
नको अविचारे घाई,
दु:ख यातना मनाला
जीव कुचंबून जाई.

मनी आस बाई मला
खुप शिक्षण घ्यायाची,
ज्ञान घेण्यास अमाप
शाळा शिकाया जायाची.

वय आहे ग कोवळं
घाई कशाला लग्नाची.
उंच घेऊ दे भरारी
दोर तोडून विघ्नांची

नका छाटू कुणी माझे
पंख आहेत नाजूक,
मला आहे ग मनात
यश जिंकण्याची भुक.

एक मागणं मागते
शिरी ठेवा फक्त हात,
देता आशिर्वाद तुम्ही
बळ येईल अंगात.

आई बापाचे संस्कार
मला येई रोज कामी,
नाव उंचविन त्यांचे
अशी देते तुम्हा हमी.
----------------------
सौ. वनिता गणेश शिंदे©️®️
मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे