एक चूक - ( भाग - 1 )

Aarushi


                      ( ही एक सत्य घटना आहे.)

        आयुषी एम जी कॉलेज मध्ये असलेली एक मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम, एकुलती एक मुलगी. त्यामुळे लाडात वाढलेली..आई - वडील एका बँकेत कामाला होते.. दोघेही एकाच बॅंकेत जॉब ला होते...आयुषी चं कॉलेज मध्ये असलेल्या एका अर्जुन नावाच्या मुलावर प्रेम होत...... अर्जुन ही तिच्या प्रेमात पडला आहे असं तीला खूप वाटत असे म्हणून मग तिने फायनल एक्साम झाल्यावर त्याला प्रपोज करायचे ठरवले... पण अर्जुन फायनल परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन कायमचा कोल्हापूर ला निघून गेला.. आणि आयुषी चं त्याला प्रेमाबद्दल सांगायचं चं राहून गेलं..

      आयुषी  कॉलेज ला  असल्यापासून चं तीला डिझाईन ची आवड  होती. त्यामुळे पुढे जावून फॅशन डिझाईन चा कोर्स करून त्यात चं करियर करावे असं तिने आई - वडिलांना सांगितल्यावर ते पण हो चालेल.. तूला आवडेल ते कर.. असं ते म्हणाले..

        आयुषी वर कुठलीच बंधन नव्हती. आयुषी ने कोर्स पूर्ण झाल्यावर स्वतः चं बुटीक चालू केलं...त्यालाही आई - वडिलांनी पटकन होकार दिला. तीला बुटीक साठी लागणार भांडवल ही आई - वडिलांनी दिल..

         आणि आयुषी बुटीक नावाने बुटीक चालू झालं...एकंदरीत सर्व छान चाललं होत. आणि मग बघता बघता ती चं लग्नाचं वय झाल्यावर आई - वडिलांनी स्थळ शोधायला सुरवात केली.. आणि मग दोन चं महिन्यात एक चांगलं स्थळ सांगून आल. मुलगा चांगला शिकलेला होता, सर्व व्यवस्थितआहे बघून आई - वडिलांनी लग्न ठरवलं, आणि एक महिन्याने अगदी थाटामाटात लग्न झालं..

        आयुषी चा नवरा ऑफिस च्या कामानिमित्त बरेचदा टूर वर असायचा. आयुषी च्या घरी सगळ्या कामाला नोकर होते. आयुषी  लग्नानंतर ही बुटीक ला जात असे.. लग्नाला दोन वर्ष झाल्यावर आयुषी च्या नवऱ्याला ( राज ) ला त्याच्या कंपनी ने एक वर्षाच्या ट्रेनिंग साठी लंडन ला पाठवलं..

       आयुषी आता एकटीच असे दिवसभर त्यामुळे तीला फेसबुक , इंटरनेट ची खूप सवय लागली.. आणि मग असंच एके दिवशी  फेसबुक बघता बघता तीला अर्जुन ची आठवन आली, आणि तिने त्याला एफ बी वर शोधायला सुरवात केली. आणि त्याच प्रोफाइल भेटल्यावर तिने लगेचच त्याला फ्रेंड् रिक्वेस्ट पाठवली..दुसऱ्या दिवशी अर्जुन ने ती एक्सेप्ट केली.. आणि मग इथून दोघांनी एकमेकांशी पुन्हा बोलायला सुरवात केली आणि इथेच आयुषी चुकली......


          अर्जुन एफ बी वर भेटला, आणि आयुषी च्या मनातलं सुप्त प्रेम पुन्हा उफाळून आल. अर्जुन ने मग एक दिवशी मॅसेजर वर बोलता बोलता तिचा व्हॉटसप नंबर घेतला.. आणि मग दोघे चॅटिंग करू लागले.. त्यात अर्जुन चं अजून लग्न झालेलं नव्हत हे ऐकून तर आयुषी ला अजूनच बरं वाटल.. अर्जुन ने एका कार्यक्रमाचं  तीला आमंत्रण दिलं.. आयुषी पण लगेचच त्याला हो बोलली... आणि मग असं करता करता दोघं अधून मधून भेटू लागली..आयुषी शेजारच्या लोकांना सांगायची मी आई  कडे जात आहे.. आणि आई - वडिलांना सांगत असे मी एकटीच असल्यामुळे बोर होते म्हणून मी मैत्रिणींनबरोबर इथे तिथे जात असते.

        त्यानंतर दर शनिवार - रविवारी दोघं भेटू लागली. अर्जुन सांगेल तिथे ती त्याला भेटायला जात असे.. मग हळू हळू लांब फिरायला जाणं चालू झालं, मग सुरवातीला दोघं वेगवेगळ्या रूम मध्ये राहात असत.. नंतर नंतर एक चं रूम शेयर करू लागले.. आयुषी च्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून सर्वांना हे दोघे पती - पत्नी आहेत असेच वाटतं असे. दोघे ही फिरायचे, मज्जा करायचे..

     आयुषी च्या नवऱ्याला ( राज - ला ) जावून जवळ जवळ पाच महिने झाले होते.  आयुषी - अर्जुन ची मैत्री अगदी बिनभोबाट सुरु होती.  तिच्या आई - वडिलांना, नवऱ्याला ह्यातलं काहीच माहीत नव्हत.. आणि आयुषी ते जाणवू ही देत नव्हती, त्यामुळे तसा कोणालाही संशय  आला नाही...

     अर्जुन मुंबई ला कामानिमित्त राहत आहे असं तो आयुषी ला सांगत असे. परंतु  अलीकडे अर्जुनचे कोल्हापूर चे दौरे खूप वाढले होते. तो नसला कि आता आयुषी ला करमत नसे. आतातर आयुषी ला सारखं मनातून वाटत असे कि आता ती राज ( नवरा ) परत आल्यावर त्याच्याबरोबर संसार करू शकेल कि नाही, आणि जर नवऱ्याला घटस्फोट दिला तर हा अर्जुन आपल्या बरोबर लग्न करेल कि नाही.. तिच्या डोक्यात दिवसरात्र हेच विचार येऊ लागले होते..

        आयुषी आता एका विचित्र वळणावर आली होती.. आता एकीकडे आई - वडिल, एकीकडे राज..आणि समाज.... आणि दुसरीकडे अर्जुन बद्दल वाढत जाणारी ओढ... काय करावे ह्या विचारात ती सतत राहू लागली...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ह्या अशा नात्याचे पुढे काय होते ते.....)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ).......

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )....

🎭 Series Post

View all