आरसा भाग ५ (अंतिम )

------

आरसा भाग ५ ( अंतिम )

( मागच्या भागात आपण पाहिलं की, राघव नोकरीचा राजीनामा देऊन रात्री मित्राची कॅब चालवायचं ठरवतो. आता पुढे....)

राघव आता दिवसा आईजवळ राहायचा. आईला वेगवेगळ्या चेकअपला नेणं, तिच्या औषधाच्या वेळा सांभाळणं, काळजी घेणं सर्व करत होता आणि रात्री कॅब चालवत होता. थोडी कसरत होतं होती पण त्याला आईसाठी सर्व मंजूर होतं. आईची शुगर खूप वाढल्यामुळे पुढे किडन्यांना त्रास होऊ नये म्हणून हॉस्पिटलमधले दिवस वाढले होते.

राघवला कॅब चालवायला लागून जवळपास एक आठवडा झाला होता. आज तो एक भाड सोडून परत निघाला तोच एका ब्रिजवर एक तरुण मुलगा त्याला दिसला जो खाली उडी मारण्याच्या तयारीतच होता. राघवने त्याला आवाज दिला आणि राघव कॅब बाजूला लावून त्याच्यापर्यंत जाणार तोच त्या मुलाने पाण्यात उडी मारली.

राघवने सुद्धा त्याच्या पाठोपाठ पाण्यात उडी मारली. राघवने मोठ्या शर्थीने त्याला पाण्यातून बाहेर काढलं. तो मुलगा बेशुद्ध होता. राघवने त्याला कॅबमध्ये टाकलं आणि आईला ऍडमिट केलं होतं त्याचं हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. लगोलग फोन करून त्याने पोलिसांना सुद्धा कळवलं आणि हॉस्पिटलचा पत्ता सांगितला.

राघव हॉस्पिटलला पोहचला तोपर्यंत पोलीस सुद्धा तिथे पोहचले होते. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट सुरु केली. राघवने सर्व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. राघव बराच वेळ तिथे बसून होता. डॉक्टरांनी बाहेर येऊन रुग्ण आऊट ऑफ डेंजर असल्याचे सांगितलं आणि राघव पोलिसांना सांगून परत निघाला.

दुसऱ्या दिवशी राघव पुन्हा हॉस्पिटलला आला. हॉस्पिटलमध्ये आत येताच तो त्या मुलाच्या रूमच्या दिशेने गेला, ज्याला राघवने काल रात्री वाचवलं होतं. रूमच्या बाहेर पोलीस होतेच. राघवने त्यांच्या जवळ चौकशी केली तेव्हा कळलं की त्या मुलाच्या घरचे आले होते शिवाय त्या मुलाने ऑफिस मधल्या राजकारणामुळेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

राघव चौकशी करून निघणार तोच पोलीस म्हणतात, " त्या मुलाच्या घरच्यांना तुम्हांला भेटायचं आहे. ते आत आहेत, त्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना भेटून जा. "

राघव त्या मुलाच्या रूममध्ये जातो आणि समोर उभ्या व्यक्तीला पाहून स्तब्ध होतो. समोर प्रतिभा मॅडम त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. पोलीस सुद्धा आत येतात आणि म्हणतात, " मॅडम, तुम्हांला तुमच्या मुलाला ज्याने वाचवलं त्याला भेटायचं होतं ना. हाच तो राघव. याच्यामुळे आज तुमचा मुलगा जिवंत आहे. "

पोलिसांचं बोलून ऐकून आणि राघवला समोर पाहून प्रतिभा स्तब्ध होते. प्रतिभाचा मॅडमचा मुलगा मानव एक गोल्डमेडलिस्ट, सगळयांत अव्वल. आईसारखाच मोठ्या कंपनीमध्ये कामाला. पण त्याचे सिनिअर सुद्धा प्रतिभासारखेच. त्यात ऑफिसमधलं राजकारण या सर्वामुळे त्याची मानसिक स्थिती ढसाळत होती. जी प्रतिभाच्या लक्षात आली नाही. मानवने स्वतःच्या आईला सुद्धा फोनवर स्टाफशी तसंच बोलताना ऐकलं होतं. त्यामुळे त्याचं करिअर सुद्धा सिनिअरच्या हातात आहे हे तो ओळखून होता. त्याला सहन झालं नाही आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

राघव त्याच्या तब्बेतीची विचारपूस करून निघाला. प्रतिभा त्याच्या मागे आली आणि तिने त्याला आवाज दिला. राघव थांबला मात्र प्रतिभा काही बोलणार त्या आधीच राघवने तिलाचं प्रश्न केला, " मॅडम, आज तुम्ही स्वतः तिथे आलात? तुमची एवढी ऐपत नक्कीच आहे की पैसे देऊन तुम्ही दुसरं कोणाला मुलाच्या देखभालीसाठी ठेवू शकला असता. आज पर्याय सुचला नाही का? " आज राघवने प्रतिभाला आरसा दाखवला होता. 

राघवच बोलणं ऐकून प्रतिभाला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने राघवची क्षमा मागितली. स्वतःच्या वागण्यात बदल केला शिवाय राघवला ऑफिसमध्ये सन्मानाने परत बोलावलं.

समाप्त.....

🎭 Series Post

View all