आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 14 ) अंतिम भाग.

Aarohi


       आरोही घरात एकटीच राहात असते. सकाळी घरची सर्व कामं आटपून अकरा वाजताच्या दरम्यान क्लास ला जात असे. ती जाताना टिफिन घेऊन जात असे. अकरा वाजता क्लास ला गेली कि डायरेक्ट आता संध्याकाळी सात वाजता च परत येत असे. आल्यावर एकटी साठी काहीतरी जरासं जेवण, खिचडी भात वैगरे करत असे. आणि मग जेवून टीव्ही पाहत असे. एकटी असल्यामुळे आणि कोणीच बोलायला नसल्याने तीला झोप लवकर लागत लागत नसे. मग ती एक - दोन वाजता झोपत असे. असं आरोही च रुटीन होत सध्या.

         सिद्धी आई ला रोज क्लिनिक ला पोचल्यावर खुशाली साठी कॉल करत असे. सिद्धी च्या सासूबाई खूप च चांगल्या होत्या. त्या पण आरोही ची आठ - दहा दिवसांनी कॉल करून चौकशी करत असत. सिद्धी आणि मयुरेश दहा - पंधरा दिवसांनी आई ला बघण्यासाठी भेटायला येत असत. आली  कि मग एक - दोन तास आई शी गप्पा मारून सिद्धी जात असे.

          असेच मध्ये दोन वर्ष निघून जातात, सिद्धी पण क्लिनिक, घर सर्व उत्तम प्रकारे सांभाळत असते. आणि मग लग्नाच्या दोन वर्षानंतर सिद्धी गरोदर राहते, दोन्ही कुटुंबात अगदी आनंदी - आनंद होतो. आरोही पण खूप खुश होते. सिद्धी ला बोलते तू राहायला ये, आठ दिवस, सिद्धी पण हो येते असं बोलते. सिद्धी आठ  दिवस राहायला आल्यावर आरोही ला तिच्यासाठी काय करू नी काय नको असे होत असे. आठ  दिवस आराम करून ती तिच्या घरी जाते.

       सिद्धीच्या सासूबाई आरोही ला बोलतात , तुम्ही आमच्याकडे येता का राहायला, दोघी मिळून मस्तपैकी सिद्धी चे डोहाळे पुरवूया, पण आरोही बोलते कि तुमच्या घरापासून माझा क्लास मला खूप च लांब पडेल. मला एवढा प्रवास रोज झेपणार नाही. सिद्धी ची सासू बोलते आता तुम्ही हे कारण सांगितल्यावर मी काय बोलणार, बरं तुम्ही केव्हाही यावेसे वाटले तर बिनधास्त या... असं बोलून फोन ठेवते.

       आरोही सिद्धी ला सातव्या महिन्यात ओट भरणी करून माहेरी राहायला घेऊन येते. सिद्धी चे सर्व लाड पुरवते. सिद्धी नऊ  महिन्यानी एका गोंडस बाळाला जन्म देते. ( मुलगी होते ) सिद्धी च्या सासरी सर्वांना मुलगी च हवी असते, त्यामुळे सगळेच खूप खुश  होतात.  मयुरेश पण खूप खुश  होतो, सर्व मित्रांना फोन करून सांगत असतो, लक्ष्मी घरी आली आमच्या असं...... डिलिव्हरी नॉर्मल होते म्हणून मग सिद्धी ला चार दिवसांनी हॉस्पिटल मधून सोडण्यात येत.

       आरोही सिद्धी च्या सासूला बोलते मी सिद्धी च्या बाळाचं बारस आमच्याकडे करेन असे म्हणतेय, त्या निम्मिताने आमच्याकडे पण बरेच दिवसांनी शुभ कार्य होईल, सिद्धी च्या सासरची सगळी माणसं हो चालेल बोलतात. बाळाचं बारस होत, बाळाचं नाव - ( आराध्या ) ठेवण्यात येत. सिद्धी बाळ झाल्यावर दोन महिने माहेरी राहून पुन्हा सासरी निघून जाते. असेच दिवस जात असतात. आराध्या आता तीन वर्षाची झालेली असते.

        सिद्धी ची जी मोठी नणंद लंडन ला असते तिच्या मुलाचा दहावा वाढदिवस असतो त्यामुळे तिची नणंद...सिद्धी ला बोलते तुम्ही सगळयांनी आमच्याकडे या काही दिवसांसाठी, बर्थडे ला या आणि त्या निमित्ताने आई - बाबा, तुझी आई पण परदेश फिरतील.  सिद्धी बोलते आई ला विचारते हा, सिद्धी ची सासू बोलते मी विहीण बाईना तयार करेन यायला, ती जबाबदारी माझी.

        आरोही सुरवातीला नाहीच बोलत असते, क्लास कसा  बंद ठेवणार एवढे दिवस असं बोलत राहते...पण सिद्धी च्या सासुपुढे तीच काहीच चालत नाही, आणि मग ती हो बोलते, आणि मग लंडन ला जायची तयारी सुरु होते, सिद्धी ची सासू आरोही बरोबर अगदी फ्रेंडली वागत असे कायम त्यामुळे आरोही ला जास्त नकार देता आला नाही.

        आरोही - अमित च्या फोटो पुढे उभी राहून त्याला बोलते - बघा आज आपली लेक मला परदेशी घेऊन चालली आहे फिरायला. कुठे ते दिवस - जेव्हा काकी ला मी तिच्या घरातून कधी  एकदाची जाते ह्याची सतत घाई असायची, आणि कुठे आजचा दिवस,  हे सर्व त्या देवामुळे शक्य झालं आहे आणि तुमचे आशीर्वाद पण आहेतच आमच्या पाठीशी सतत. आपली लेक मला लंडन ला घेऊन जाणार आहे.

      आणि मग दोन महिन्यानी सर्व पेपर वर्क वैगरे आटपत. आणि मग  ( आरोही, सिद्धी - आराध्या, सिद्धी चे सासू - सासरे )  सर्व लंडन ला रवाना  होतात. मयुरेश मात्र जात नाही - कारण त्यांचं हॉस्पिटल सांभाळ्याला तो इथेच राहतो.

       आरोही देवाचे खूप आभार मानते आणि बोलते देवा तू आहेस कुठेतरी....आधी अमित गेले आणि मग ओंकार... हे दोघे पण गेल्यावर मी घरचा कर्ता पुरुष गेला, आता आम्ही दोन बायका च उरलो घरी कसं होणार पुढे... ह्या विचारात च असायची सतत, पण देवा तू माझ्या लेकीच्या पंखात एवढं बळ दिलंस कि तिने दोन्ही घरं नीट सांभाळली. आज त्याचं माझ्या लेकीने मला परदेशीं जायची पण संधी दिली. धन्यवाद देवा...

अशाप्रकारे ही कथा  इथे संपते आहे, पुन्हा भेटू लवकर च एका नवीन कथेसह )..

( वाचकहो - कथा  आवडल्यास जरूर लाईक करा  - कमेन्ट करा.......)

( तुमचा एक like पण आम्हा लेखकांसाठी खूप महत्वाचा असतो..)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all