आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 13 )

Aarohi


         सिद्धी चं लग्न ठरत. सिद्धी होणाऱ्या नवऱ्या मुलाला बोलते कि आई ची जबाबदारी आहे माझ्यावर - मी लग्नानंतर केव्हाही आईला गरज असेल तेव्हा माहेरी येणार हा, मला आशा आहे तुम्ही तेव्हा नाही बोलणार नाही, त्यावर तो बोलतो अग सिद्धी आता ती माझी पण आई चं आहे अग आणि कोणता मुलगा आपल्या आई च्या गरजेला धावून येणार नाही, मला कल्पना आहे आई अजून ओंकार च्या दुःखातून बाहेर पडल्या नाही आहेत  त्याची... तू काळजी करू नकोसं, माझ्या घरचे अगदी पुढारलेल्या विचारांचे आहेत ते तूला कुठल्याही गोष्टीत टोकणार नाहीत, ह्याची मी खात्री देतो. आणि मग साखरपुडा दहा दिवसांनी आणि त्या नंतर महिन्याने लग्न ठरत.

         आरोही आणि सिद्धी दोघीच सर्व खरेदी आणि सोनं वैगरे खरेदी करतात. सिद्धी मात्र दिवसेंदिवस काळजीत असते, आई ला एकटीला चं राहावं लागेल मी सासरी गेल्यावर ह्या विचारात ती सतत असे.

         सिद्धी च्या सासर चे लोक चांगले असतात, तिची सासू आरोही ला कॉल करून बोलते तुम्ही दोघीच आहात तर ज्या गोष्टी घ्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही किंवा काही कारणाने जमणार नाही त्याची लिस्ट मला मोबाईल वर पाठवून द्या, मी त्या वस्तू घेईन. आणि मनात  अज्जीबात असं आणू  नका कि मला कसं सांगायचं... अहो मी पण आता तुमची विहीण बाई कमी आणि मैत्रीण जास्त असं समजून  बिनधास्त सांगा.

        आरोही देवाचे आभार मानते आणि बोलते कि देवा सिद्धी चं सगळं चांगल आहे, तू कुठंतरी उभा राहिलास आमच्या पाठीशी, म्हणून आज माझ्या सिद्धी ला चांगलं सासर मिळालं आहे, होणारा नवरा मुलगा ( मयुरेश ) पण स्वभावाने चांगला असतो. तो पण डॉक्टर असल्यामुळे सिद्धी आणि त्याला एकमेकांचे विचार पटत  असतात.

        साखरपुडा आरोही च्या घरी करावा असं आरोही सिद्धी च्या सासरी कळवते तिचे सासर चे बोलतात तुम्ही म्हणाल तसं, आणि मग दहा दिवसांनी साखरपुडा व्यवस्थित पार पडतो. बघता बघता लग्नाला आठ  चं दिवस राहतात. सिद्धी आरोही ला बोलते आई मी पंधरा दिवस क्लिनिक बंद ठेवते मग आपण दोघी मिळून सर्व तयारी करू.. आरोही पण हो चालेल बोलते. सिद्धी आरोहीला सगळ्या तयारीत मदत करत असते. दोघी मिळून सर्व सामान वैगरे खरेदी करतात.

         आणि मग हळद लावणीचा दिवस उजाडतो, आता मात्र आरोही चे डोळे सिद्धी जाणार ह्या विचाराने भरून येत असतात. हळदी चा प्रोग्राम होतो आणि मग एक दिवसांनी लग्न असत. लग्नाचा दिवस येतो, सकाळी घरातून हॉल वर निघताना सिद्धी खूप रडते, आई तू राहशील ना एकटी, ओंकार च्या आठवणीने रडत राहणार नाहीस ना, असं सारखं आरोही ला बोलत असते, आरोही बोलते अग तू दोन तासाच्या अंतरावर च तर आहेस, आठवन आली कि येत जा लगेचच.

        दुपारी बारा चा मुहूर्त असतो. लग्न व्यवस्थित पार पडत, पाच वाजता सिद्धी ची पाठवणी असते. सिद्धी आई ला मिठी मारून खूप रडत असते. मयुरेश  बोलतो अग सिद्धी तू काळजी करू नकोसं आता तुझ्याबरोबर मी पण आहे आईंची काळजी घ्यायला. सिद्धी चे  सासू - सासरे, नणंद पण बोलते सिद्धी तू काळजी करू नकोसं आता आपण सगळेच आहोत त्यांच्यासाठी... आणि मग जड अंतःकरणाने सिद्धी निघते.

          सिद्धी गेल्यावर आरोही काकांच्या मुलाबरोबर घरी येते. दादा तीला सोडून एक तासाने घरी जातो. सिद्धी घरी  एकटीच उरते. पण ती रडत राहात नाही, घरी गेल्यावर अमित च्या फोटो च्या समोर उभी राहून बोलते... तुम्ही बघताय ना....आपली सिद्धी लग्न करून दुसऱ्या च्या घरी गेली पण, देवाच्या कृपेनें सासर ची लोक पण खूप छान आहेत. मयुरेश पण चांगला  आहे स्वभावाने.... आणि ती.....अमित आणि ओंकार च्या फोटो च्या पाया पडते.

      दुसऱ्या दिवशी आरोही - सिद्धी च्या घरी लग्नाच्या पूजेला जाते. पूजा उत्तम रीतीने पार पडते...सर्व छान असत अगदी...मग दोन दिवसांनी देवदर्शनाला त्यांच्या गावी कोकणात जावून आल्यावर जोडपं - हनिमून ला कुलू - मनाली ला चार दिवसांसाठी जाऊन येत. आणि मग सिद्धी पुन्हा दवाखान्यात जायला सुरवात करते..

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सिद्धी आरोही ला कशी जपते ते...)

( वाचकहो - कथा  आवडल्यास जरूर like करा....तुमचा एक लाईक  सुद्धा आम्हा लेखकांसाठी खूप महत्वाचा  असतो...)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे - ( राहणार - देवरुख - रत्नागिरी )...

🎭 Series Post

View all