आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 11)

Aarohi


         पोलीस बोलतात, कि तुम्हाला पोलीस स्टेशन ला यावे लागेल.. , सिद्धी खूप घाबरते - आई ला वरती  जाऊन कसं सांगू असं बाजूच्या दादा ला बोलते, ते सगळे बोलतात सांगावं तर लागेलच ना, चल आपण आधी वर जाऊन काकींना ह्याची कल्पना देऊ, नाहीतर डायरेक्ट प्रेत आल्यावर त्यांची अवस्था अजूनच वाईट होईल.

        सिद्धी आणि ते दोन दादा वर घरी जातात, आरोही बोलते अरे पोलीस स्टेशन ला जात होतात ना लगेचच कशे आलात, ओंकार भेटला वाटत तुम्हाला खाली, बघितलं मी बोलत होती ना तो येईल, आला ना तो, कुठे आहे... अग सिद्धी त्याला आत घे , तुम्ही पण या सगळेच आत, दरवाजात चं काय उभे आहात. सगळेच रडू लागतात. आरोही बोलते अरे रडताय काय, ओंकार येना रे बाबा आता घरात, माझा जीव अगदी टांगणीला लागला आहे.

        आरोही - ओंकार, ओंकार असं ओरडत चं, त्याला शोधत बाहेर धावत जाते, तर तीला बाहेर लोकांची गर्दी दिसते, ती ओरडून बोलते ओंकार कुठे आहे माझा, का सगळे अशे माळ्यावर एकत्र गोळा झाला आहात, काय झालं आहे. आरोही घाबरते, मग त्यातल्या एक बाजूच्या काकी येऊन आरोही ला बोलतात, तू घरी चल मी सांगते तुला सगळं. आरोही ला हाताला धरून घरी आणतात. आणि बोलतात कि ओंकार चा अपघात झाला आहे.

       आरोही बोलते मग कुठे आहे तो, कुठल्या हॉस्पिटल ला ऍडमिट आहे, सांगा लवकर, सिद्धी तू डॉक्टर आहेस ना चल पटकन निघू  हॉस्पिटल ला तूला समजेल तो कसा आहे ते, बराच असेल तो काही नाही होणार त्याला - बरा होईल अग तो - अग सिद्धी चल तू निघ, पटकन, सिद्धी बोलते आई अग.....ओंकार नाही येणार आता, तो ऑन दि स्पॉट डेड झाला आहे, आरोही जोरात किंचाळते, सिद्धी ला बोलते काही ही बोलू नकोसं, माझ्या ओंकार ला काही होणार नाही. साधा अपघात झाला असेल त्याचा - सिद्धी - आरोही च्या जवळ  जाते आणि बोलते आई ओंकार आपल्याला सोडून गेला.

        आरोही हे वाक्य ऐकून चक्कर येऊन खाली चं पडते. जवळ  - जवळ  पंधरा मिनिटांनी ती शुद्धीत येते, पुन्हा ओंकार किंचाळते आणि पुन्हा बेशुद्ध होते, सिद्धी तीला जाग ठेवण्याचा प्रयत्न करत असते, ह्या सगळयांत एक तास जातो, तो पर्यंत ऍम्ब्युलन्स मधून ओंकार चं प्रेत पण आणण्यात येत.

         प्रेत वरती रूम वर आणण्यात येत. ते बघून आरोही अजूनच जोरजोरात रडू लागते, सिद्धी पण खूप रडत असते. ओंकार च्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला असतो, आरोही बोलते, ओंकार का रे असा सोडून गेलास आम्हा दोघींना..... मी आणि सिद्धी अगदी एकट्या पडू रे तुझ्याशिवाय....

        आरोही कडून पाहुणे म्हणून काका, त्याचे दोन मुलगे, अमित कडून पण तो अनाथ असल्यामुळे मावशी चा मुलगा चं फक्त आला होता. आरोही दादा ला बिलगून खूप रडते, बोलते दादा बघ ना हा देव आम्हाला कशाची शिक्षा देतोय, आधी अमित ला नेलं त्याने, आता माझ्या ओंकार ला पण घेऊन चालला आहे. 

        थोड्याच वेळाने ओंकार चं प्रेत उचलण्यात येत, आरोही आणि सिद्धी त्याला सोडतच नसतात. कसं कसं करून काका चा मुलगा त्यांना समजावतो. आणि मग प्रेत नेलं जातं. सिद्धी चं त्याच्या प्रेताला अग्नी देते. आरोही बोलते सिद्धी चं सगळं करेल ओंकार चं, सिद्धी ला पण खूप भरून येत असत हे सगळं करताना.

       सिद्धी, काका, त्याचे मुलगे, मावशीचा मुलगा सगळे क्रिया कर्म करून घरी येतात. थोड्या वेळाने बिल्डिंग मधली लोक पण आपापल्या घरी जातात. मग काका आणि बाकीचे पण दोन तासाने जातात. घरी फक्त आरोही आणि सिद्धी चं उरतात. दोघी एकमेकीला मिठी मारून खूप रडतात.

         सिद्धी तिचा दवाखाना पंधरा दिवस बंद चं ठेवते. आरोही चा क्लास पण बंद चं असतो तो पर्यंत, सिद्धी पंधरा दिवसांनी दवाखान्यात जायला निघते तेव्हा खूप रडते. आरोही ला बोलते आई तू पण क्लास ला जायचा विचार कर, किती दिवस क्लास बंद ठेवणार आहेस. आरोही हा विचार करते मी असं बोलून गप्प बसते.

       सिद्धी चं पण आरोही ला  एकटीला घरी सोडून जायचं मन होत नसतं, आरोही सारखी ओंकार ची आठवन काढून रडत राहील आणि स्वतः ला त्रास करून घेईल हे सिद्धी ला माहित होत, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. ती आरोही ला आई रडत बसू नकोसं, मी लवकर येते असं सांगून जड अंतःकरणा ने घरातून निघते.

      सिद्धी निघून गेल्यावर आरोही रडायला लागते, देवाजवळ जाऊन बोलते कसली ही शिक्षा दिलीस मला, ओंकार च्या बदली मला का नाही घेऊन गेलास...... आणि मग एकटीच सोफ्यावर बसून रडत राहते... तेवढ्यात सिद्धी दवाखान्यात पोचल्यावर फोन करते, आई काय करत होतीस असं विचारते... आरोही बोलते....मी बरी आहे... तू काळजी करू नकोसं....काम कर तुझं...

     आरोही मनातून पूर्णपणे  खचलेली असते. तीच क्लास ला जायचं मन चं होत नसतं. ती क्लास मधल्या  दोन शिक्षिका असतात त्यांना कॉल करून सांगते घरी या आणि क्लास ची चावी  घेऊन जा आणि क्लास खोला आजपासून... सर्व पालकांना फोन जरून कळवा कि आजपासून क्लास चालू करत आहोत. दोघीनीचं संभाळा सगळं... माझ्या मनाची अजून बाहेर पडायची तयारी नाही आहे.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत आरोही क्लास ला जायला लागते कि नाही...  काय निर्णय घेते ते...)

🎭 Series Post

View all