आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 10)

Aarohi


        ओंकार अमित च्या ऑफिस मध्ये जॉब ला लागतो, सकाळी कॉलेज करून तो दुपारी बारा वाजेपर्यंत ऑफिस ला जातं असे. रात्री घरी आल्यावर त्याचा अभ्यास पण करत असे. सिद्धी पण आता एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस करत असते. आरोही क्लास मध्ये अजून एक शिक्षिका ठेवते आणि अकरावी, बारावी चे क्लासेस सुद्धा चालू करते.

       ओंकार पंधरावी होतो. आरोही त्याला कॉलेज संपलं म्हणून सकाळ च्या वेळेत कॉम्प्युटर च्या कोर्स ला टाकते. आरोही चे क्लास चे उत्पन्न, सिद्धी आणि ओंकार चा पगार मिळून घराच्या लोन चा  हफ्ता ऍडजेस्ट होत असे.

         ओंकार कॉम्प्युटर चा कोर्स पूर्ण करतो. त्याचा कोर्स आणि पंधरावी झाल्यावर तो ऑफिस मध्ये पगारवाढी साठी बॉस बरोबर बोलतो, आणि एक महिन्यानी त्याचा पण पगार वाढतो. सिद्धी ची पण आता प्रॅक्टिस पूर्ण झालेली असते, त्यामुळे ती आरोही ला बोलते कि आई मी एक छोटासा दवाखाना चालू करेन म्हणतेय, सध्या रेंट वरच कुठे एखादा गाळा मिळतो का ते बघूया आपण आणि त्यात दवाखाना चालू करूयात.

          आरोही आणि ओंकार ला पण सिद्धी ची कल्पना पटते. आणि मग चार महिन्यानी बजेट मध्ये बसणारा एक गाळा सिद्धी ला आवडतो. तिथे ती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन दवाखाना चालू करते. दवाखाना मोक्या च्या ठिकाणी असल्यामुळे पेशंट पण बऱ्या पैकी येत असत. हळू हळू सिद्धी चा त्या ठिकाणी जम बसतो, आणि तीच क्लिनिक चांगलं चालू लागत.

       आरोही पण देवाचे सारखे आभार मानत असते, त्याला बोलत असते कि देवाच्या कृपेनें माझी मुलं चांगली निघाली त्यांनी मला खूप मोठा आधार दिला, मला साथ दिली. अमित ची कमी तर आयुष्यभर सलत राहिलं पण मुलं मला टेन्शन घेऊ देत नाहीत. माझी नीट काळजी घेतात. घरात आता लोन चा हफ्ता देऊनही जास्तीचे पैसे बाजूला पडू लागले. सेविंग होऊ लागली.

          सिद्धी पण त्या एरिया मध्ये एक चांगली डॉक्टर म्हणून आणि विशेषतः स्त्रियांनसाठी चांगली डॉक्टर म्हणून फेमस होते. अशीच मध्ये तीन वर्ष निघून जातात. घराच्या लोन ची अमाऊंट पण कमी उरलेली असते. घरात सर्व सुबत्ता येते. वॉशिंग मशीन, मोठा फ्रीज, नवीन सोफा सेट अशा गरजेच्या वस्तू घेतल्या जातात.

        ओंकार ची पण त्याच्या नोकरीत बढती होते. सर्व चांगलं चालेललं असत, पण म्हणतात ना तसं कि सर्व चांगलं चालेललं  असताना काहीतरी वाईट घडतच.

            एक दिवस ओंकार ऑफिस मधून रोजच्या घरी येण्याच्या वेळेवर घरी येत नाही. रोज तो आठ वाजता घरी येत असे तर त्या दिवशी दहा वाजून गेले तरी घरी आलेला नसतो. आरोही त्याचा फोन लावत असते पण फोन लागत नसतो ती न राहवून मग सिद्धी ला कळवते, सिद्धी पण क्लिनिक बंद करून घरी यायला निघालेली चं असते. ती सुद्धा घाबरते तरी ती म्हणते आई तू घाबरू नकोसं त्याला ऑफिस मध्ये मिटिंग वैगरे असेल.

        सिद्धी अर्ध्या तासात घरी येते, ओंकार रात्री चे साडे दहा वाजत आलेले असतात तरी घरी आलेला नसतो, सिद्धी त्याच्या ऑफिस मध्ये फोन लावत असते पण कोणीच उचलत नसतं कारण ऑफिस सात लाच बंद होत असे. मग सिद्धी त्याच्या एका ऑफिस च्या मित्राला कॉल करते तर तो बोलतो ओंकार रोजच्या चं वेळेवर सात वाजताच ऑफिस मधून निघाला आहे.

      आता मात्र आरोही आणि सिद्धी खूप घाबरतात. रडायला लागतात, पण सिद्धी आई ला धीर देत असते. सिद्धी बोलते आई तू रडू नकोसं, मी बाजूच्या दादाला बोलावून आणते. मग बाजूचा दादा आल्यावर सर्व जण बोलतात कि अजून एक तास वाट बघूया आणि पोलीस स्टेशन ला कंप्लेंट करूयात.

         रात्री चे साडे अकरा वाजत आलेले असतात. ओंकार चा काहीच पत्ता नसतो मग म्हणून आरोही आणि बिल्डिंग मधली दोन मुलं पोलीस स्टेशन  ला जायला निघतात, सिद्धी आणि ती मुलं बिल्डिंग च्या गेटवर चं पोचतात तो पर्यंत त्यांना तिथेच दोन पोलीस दिसतात ते वॉचमन ला विचारत असतात कि इथे.....ओंकार कोण आहे....... सिद्धी रडून बोलते माझा भाऊ आहे..

       पोलीस जे सांगतात ते ऐकून.......सिद्धी तिथे चं मटकन  खाली बसते......पोलीस बोलतात ह्या मुलाचा ट्रेन मध्ये दरवाजा वर संध्याकाळी गर्दी च्या वेळेत लोमकळत असताना अँकसिडेन्ट झाला आहे, तो ऑन दि स्पॉट तिथे चं डेड झाला आहे. आम्ही त्याच्या खिशात जे आय डी कार्ड  होत त्यावर जो पत्ता होता त्या पत्त्यावर इथे शोधत आलो आहे. 

        सिद्धी खूप घाबरते आई ला कसं सांगू ह्या विचाराने अजून रडू लागते....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत सिद्धी ने आरोही ला हे सर्व सांगितल्यावर तिची अवस्था काय होते ते.......)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )...

🎭 Series Post

View all