आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 9 )

Aarohi


           अमित चं प्रेत हॉस्पिटल मधून घरी आणण्यात येत. आरोही ला सारखी चक्कर येत असते. आरोही ला हा धक्का चं सहन होत नसतो. सिद्धी आणि ओंकार पण खूप रडत असतात. दुसऱ्या दिवशी च्या सकाळी अकरा वाजता प्रेत नेण्यात येत, आरोही अमित ला बिलगून खूप रडत असते..........असे कसे तुम्ही आता सर्व कुठे चांगलं होत असताना मला अचानक सोडून गेलात, मी तुमच्या साथीशिवाय कसं सर्व पुढे सांभाळणार........असं सारखं बोलत असते.

         अमित ला घरातून नेण्यात येत. आरोही ला अजूनच रडायला येत. अमित वारल्यानंतर पाच दिवसांनी आरोही जराशी सावरते. मुलांकडे बघून स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत असते.

         आरोही अमित वारल्यानंतर सहाव्या दिवशी दोन्ही मुलांना पुढ्यात बोलावते आणि बोलते मी आज तुम्हाला सर्व सत्य परिस्थिती ची आपल्या आर्थिक बाजूची जाणीव करून देणार आहे, पप्पा असताना त्यांनी कधीच तुम्हाला कुठल्या चं गोष्टीची कमी पडून दिली नाही. त्यांनी ओव्हरटाईम करून, वेळेला स्वतः ची हौसमौज विसरून तुम्हाला आतापर्यंत शिकवलं.

          माझ्याही क्लास मधून जे काही आतापर्यंत उत्पन्न येत होत त्यातले पैसे साठवून आणि मग उरलेल्या अमाऊंट चं लोन करून आम्ही दोघांनी ही रूम घेण्यासाठी पैसे साठवले. आणि पप्पा आणि मी दोघेही ह्या रूम चं लोन फेडणार होतो. पण आता पप्पा आपल्यात नाहीत. त्यामुळे मला एकटीला हे एवढ्या किमतीच लोन फेडणं कठीण होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर मला साथ दिलीत तर मी कदाचित  लोन फेडू शकेन.

            मुलं म्हणतात मम्मी ....तुला हवी ती मदत करू आम्ही..... आरोही म्हणते...सिद्धी तू एम बी बी एस च्या शेवटच्या वर्षाला आहेस तर तू.... कॉलेज करून पार्ट टाइम कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये जॉब बघशील का . म्हणजे मला मदत होईल पैश्याची, आणि ओंकार तू - तू आता चौदावीला आहेस तर तू कॉलेज करून पार्ट टाइम.. कुठेतरी साधासा जॉब बघशील का, कमी पगार असेल तरी चालेल, पण मला थोडी हेल्प होईल लोन च्या अमाऊंट साठी.

         दोन्ही मुलं हो बोलतात. आरोही एक महिना घरी राहून पुन्हा क्लास ला जायला सुरवात करते. हा एक महिना तिच्या जोडीला क्लास मध्ये शिकवायला असणाऱ्या शिक्षिकेने क्लास व्यवस्थित सांभाळलेला असतो. आरोही क्लास ला पहिल्या दिवशी गेल्यावर दिवसभर मुलांमध्ये तशी बरी असते. पण संध्याकाळी क्लास मधून घरी गेल्यावर आज पहिल्यांदा चहा घेण्यासाठी आरोही ची वाट बघत असणारा अमित नव्हता.

        आरोही घरी गेल्यावर अमित च्या आठवणीने खूप रडते. पण थोडयाचं वेळाने शांत होते ती मनातल्या मनात विचार करते मी रडत बसली तर मुलं पण अपसेट होतील. आणि मग ती डोळे पुसते आणि जेवण करायला घेते. 

         सिद्धी ला एका छोटया हॉस्पिटल मध्ये नोकरी लागलेली असते. पण ओंकार अजूनही नोकरी च्या शोधात असतो. प्रयत्न करत असतो. आरोही ने तिच्याजवळ  ची जी काही एवढ्या वर्षाची सेविंग होती ती घर  घेण्यासाठी वापरली होती त्यामुळे तिच्या अकाउंट ला पण फारशे  पैसे नव्हते तसे.

       त्यात मुलांची शिक्षण बाकी होती अजून कसं होणार ह्या विचाराने आरोही ला रात्र रात्र झोप लागत नसे. पण आरोही चं नेहमीच वाक्य असे कि देव नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल.

       असेच मध्ये दोन महिने गेले आणि अमित च्या ऑफिस मधून कॉल आला कि आम्ही असा निर्णय घेतला आहे कि तुमचा मुलगा जर आमच्या ऑफिस मध्ये नोकरी करण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्याला नोकरी वर ठेवू इच्छितो. पण तो सध्या चौदावीला असल्यामुळे आणि त्यात त्याला एक्सपेरियन्स काहीच नसल्याने जास्त सॅलरी देता येणार नाही. पण आम्ही दहा - बारा हजार पगार देऊ शकतो. तो त्याच कॉलेज करून दुपारी बारा ते संध्याकाळी सात अशी आमच्या ऑफिस मध्ये नोकरी करू शकतो.तुम्हाला चालत असेल तर आम्हाला दोन दिवसांत विचार करून कळवा.

        आरोही बोलते मी कळवते. आरोही ओंकार ला विचारते  तो बोलतो चालेल मम्मी मला, मी करेन सांग कॉलेज करून जॉब. आरोही दोन दिवसांनी कॉल करून ऑफिस मध्ये कळवते.

        आणि मग ओंकार पण जॉब ला जायला लागतो. सिद्धी पण हॉस्पिटल ला जॉब करत असते. हळू हळू मग वर्षभराने आरोही च्या परिस्थिती ची गाडी जरा रुळावर येते. तो पर्यंत सिद्धी पण एम बी बी एस होते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत आरोही ची मुलं कसं लोन फेडतात  आणि आरोही ला कसं सुख देतात ते )....

          

🎭 Series Post

View all