आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 6 )

Aarohi

    

         आरोहीला जेवण करण्यासाठी अमित स्टोव्ह आणून देतो. आणि थोडंसं घरात लागणार सामान आणून देतो. आरोही अमित ला म्हणते अहो मी ह्यावर कधीच जेवण केलं नाही आहे तुम्ही दाखवा मला कसा पेटवायचा ते स्टोव्ह. अमित पण तीला अगदी हाताला धरून सर्व शिकवतो. आणि त्या दिवशी पहिल्यांदा आरोही स्टोव्ह वर त्या दोघांसाठी डाळ - भात करते.

      आरोही आणि अमित अगदी छान  राहात असत. संध्याकाळी केव्हातरी बाजारात जाऊन घरातलं  सामान आणतं असत. रात्री जेवून झाल्यावर रोज जवळच शतपावली करायला जातं असत. आठ दिवस झाल्यावर आरोही - अमित ला बोलते मी आता जॉब शोधते. अमित पण हो चालेल बोलतो. आणि मग दुसऱ्या दिवसापासून आरोही वर्तमानपत्र आणून त्यात  नोकरी च्या जाहिराती बघायला सुरवात करते.

         आरोही एक महिना रोज इंटरव्हिव्ह ला जात असते आणि मग एक महिन्याने एका कंपनी मधून कॉल येतो तीच सिलेकशन झाल्याचा. आरोही आणि अमित खूप खुश होतात. ऑफिस ते राहात असतात त्या घरापासून खूपच लांब असत पण आरोही अमित ला बोलते कि मला चालेल.

          रोज सकाळी आरोही लवकर उठून स्टोव्ह वर त्या दोघांचा डब्बा बनवत असे, आणि मग दोघं एकत्र चं ऑफिस ला निघत असत. संध्याकाळी मात्र आरोही जरा लांब ऑफिस असल्यामुळे उशिरा  येत असे, पण अमित लवकर आल्यामुळे डाळ - भात चा कुकर लावून ठेवत असे. घरातला कचरा, वैगरे पण काढायला अमित तीला मदत करत असे. तो तीला घरातल्या  सगळ्या चं कामात मदत करत असे. आरोही ने लहानपणापासून उपेक्षा चं भोगलेली  होती त्यामुळे तीला अमित चं वागणं, त्याचं तीला जपणं, तीला खूप आवडत  असे.

         असं चं दोन वर्ष निघून जातात. मग कालांतराने घरी गॅस येतो, मग एक छोटंसं कपाट  घेतलं जातं. छोटासा बेड पण घेतात दोघं पैसे साठवून  आणि मग ठरवतात कि आपण मुलाचा विचार करूयात, आणि सहा महिन्यानी आरोही गरोदर राहते. दोघं हि खूप खुश  असतात. आरोही काकी कडे बाळंतपणासाठी जाऊ शकत नव्हती त्यामुळे अमित तीच त्यांच्या चं घराजवळच्या एका हॉस्पिटल मध्ये नाव नोंदवतो.

        आरोही ला सहाव्या महिन्यापर्यंत ओमेटिंग चा खूप त्रास होत असतो त्यामुळे गरोदरपणात पोटात काहीच थरत नसल्याने आरोही खूप चं बारीक होते. तीला खूपच विकनेस येतो. त्यामुळे ती सातव्या महिन्यापासून ऑफिस ला सुट्टी टाकते. आणि मग घरीच आराम करायचा  ठरवते. आता अमित चा पगार एकतर कमी त्यातून आरोही घरीच डिलिव्हरी साठी म्हणून अमित अजून एक पार्ट टाईम जॉब करू लागतो. त्यात मग पैशाचं थोडंसं गणित ऍडजस्ट होत असत.

        आरोही नऊ  महिन्यानी एका गोंडस मुलीला जन्म देते. अमित तर मुलगी झाली हे ऐकूनच खूप खुश होतो. अमित त्याच्या मावशी ला कळवतो, ती बोलते मी आरोही चं बाळंतपण  करण्यासाठी एक महिना तुमच्याकडे राहायला येते. मग हॉस्पिटल मधून सोडल्यावर मावशी घरीच येते. बाळाचं बारस  केलं जातं, तीच नाव - सिद्धी ठेवलं जातं. मावशी आरोही आणि बाळाची नीट काळजी घेते.

     मावशी एक महिन्याऐवजी दोन महिने राहते आणि मग आपल्या घरी जाते. आरोही अमित ला बोलते कि सिद्धी ला कोणाकडे ठेवू शकत नाही आपण एवढी लहान असल्यामुळे त्यामुळे ऑफिस ला कशी जाऊ, त्यावर तीच तोडगा काढते आणि अमित ला बोलते कि घरीच ट्युशन चालू करू का, अमित पण बोलतो अरे वा छान  कल्पना आहे. सिद्धी तीन महिन्याची होऊदेत मग कर.

        आरोही पहिल्यापासून चं अभ्यासात हुशार असतें. आरोही घरी पाचवी  ते दहावी चे ट्युशन चालू करते, सुरवातीला दोनच मुलं येत असतात. मग हळूहळू दोनाची चार होतात, सिद्धी एक वर्षाची होईपर्यंत पंधरा  मुलं झालेली असतात. सर्व सुरळीत चालू असत. अमित पण ऑफिस मधून आल्यावर सिद्धी ला सांभाळत असतो.

     सिद्धी पाच वर्षाची होते, आरोही ला आता ला घरी क्लास साठी जागा कमी पडत असल्यामुळे ती जवळच एक छोटासा गाळा रेंट वर घेवून तिथे क्लास चालू करते. क्लास पण छान  पैकी चालू असतो, सिद्धी क्लासेस नावाने आरोही नवीन क्लास चालू करते . छान यश  मिळत असत. आणि अमित ला एके दिवशी अचानक प्यारेलेसिस चा झटका येतो. आरोही खूप घाबरते. अमित ला हॉस्पिटल ला ऍडमिट करते.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत, अमित च्या आजारपणात आरोही त्याची कशी साथ देते ते....)

🎭 Series Post

View all