आरोही - ( जीवनाचा संघर्ष )( भाग - 3)

Aarohi


          घरी गेल्यावर काकी आरोही ला खूप ओरडते, कोणी सांगितले गं तुला ह्या नसत्या उठाठेवी करायला, प्रोग्राम मध्ये भाग घेतेय..... आता  मोठी होत आली आहेस जरा घरात मदत कर मला...... कामं कर जरा....कचरा तरी नक्कीच काढू शकतेस तू, उद्यापासून रोज सकाळ आणि संध्याकाळी कचरा तूच काढायचास, असं काकी दरडावून बोलते.

         काकी ची बडबड चालूच असते शाळेतून आल्यापासून, आरोही मनातल्या मनात बोलते तरी मी टीचर ला बोलत होती काकी ला विचारू नका, पण त्या ऐकल्या नाहीत. आरोही दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन टीचर ला बोलते टीचर काकी काल घरी गेल्यावर मला खूप ओरडली, प्लीज तुम्ही माझ्याबद्दल काकी ला ह्यापुढे काहीच विचारू नका. टीचर बोलल्या अग पण आरोही असं केल तर तू कधीच कुठल्या प्रोग्राम मध्ये भाग चं घेणार नाहीस, त्यापेक्षा तू भाग घेत जा आणि मला बोलत जा आम्ही सर्व शिक्षिका मिळून तूझ्या ड्रेस चा वैगरे खर्च करू. आरोही ला मनातून हे ऐकून बरं वाटत.

      आरोही जरा अभ्यासाला बसली कि काकी हे आणून  दे, ते आणून दे, अशा बसल्या जागेवरून आरोहीला ऑर्डर सोडत असे. ती बिचारी काहीच न बोलता लगेचच तशीच उठून काकी ला वस्तू आणून देत असे, काकी ची मुलं ही कधी- कधी तीला बोलत असत कि आई आरोही अभ्यास करतेय ना आम्ही आणून देतो काय हवं ते सांग, पण काकी तुम्ही गप्प बसा रे करून मुलांना चं ओरडत असे.

       आरोही चौथी ला गेली होती काकी आता तीला अजून कामं सांगू लागली. तीला चहा ची भांडी घास, किचन पुसून घे, असं सांगू लागली, आरोही तिने सांगितलेली सर्व कामं करत असे. आरोही अभ्यासात हुशार होती. त्यामुळे ती त्यातल्या त्यात वेळ काढून स्वतः चा अभ्यास पूर्ण करत असे.

           आरोही सातवीला ला गेली आणि तिची पाळी येयला सुरवात झाली, आरोही चं पोट खूप दुखत असे, ती काकी ला काही बोलायला गेली, कि काकी तीला चं ओरडत असे, नाटकी करू नकोसं उगाचच हे दुखतय, ते दुखतय, सांगितलेली कामं कर असं वर आरोही लाच ओरडत असे. आरोही ला एके दिवशी पाळी आलेली असताना खूप पोट दुखत होत, ती टीचर ना बोलली, टीचर म्हणाल्या अग तू तुझा डब्बा खाल्लास का, जरा काहीतरी खावून घे मग बरं वाटेल. आरोही नको नको करत असताना टीचर नी स्वतः बाजूला बसवून तीला खायला सांगितले.

      टीचर अगदि प्रेमाने विचारपूस करत होत्या ते बघून आरोही च्या डोळ्यात पाणी आलं, त्या म्हणाल्या आरोही काय झाले गं त्यावर आरोही म्हणाली कि माझ्या बरोबर घरी कोणच असं प्रेमाने वागत नाही, मी काका - काकी ला घरात नकोशी असते, काकी माझा खूप राग राग करते....पण माझे आई - बाबा नाहीत ना म्हणून मी काकी कडे राहते. माझे आजी - आजोबा  आहेत गावाला असतात ते........ ते चं फक्त माझे खूप लाड करतात, पण मी आता पर्यंत दोनदा चं गावी गेली आहे सुट्टी मध्ये, काकी मला तिथे पण पाठवत नाही. टीचर च्या पण डोळ्यात पाणी आलं.

       आरोही दहावीला गेली होती, तीला अभ्यास करायचा असायचा पण काकी आता भरपूर कामं तीला सांगू लागली होती, शाळेतून आल्यावर सकाळपासून ची काकी ने ठेवलेली भांडी ती आरोही ला घासायला सांगत असे. रात्री च्या जेवणाची भांडी पण आरोही चं घासत असे. कधी कधी काकी कपडे पण तशेच ठेवत असे, आरोही आल्यावर तीला कपडे धुवायला सांगत असे. एकतर आरोही कुठल्याच क्लास ला जातं नव्हती त्यामुळे तीला दहावी चं वर्ष असल्यामुळे अभ्यास करायचा असायचा पण काकी ला त्याच काहीच पडलेलं नसे.

        आरोही ची दहावी ची परीक्षा झाली, आरोही ला नव्वद टक्के पडले, काका ने कळल्यावर आरोही ला पहिल्यांदा कॅडबरी आणली होती, काकी च्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसत नव्हता. शाळेतल्या शिक्षकांनी पण आरोही चं खूप कौतुक केलं.

        काकी ने आता वेगळचं चालू केलं सारखी काका ला बोलू लागली बसं झालं हीच शिक्षण कॉलेज ला नको घालूया हिला, आरोही रडू लागली, पण काकांचा एक मुलगा आता पंधरावी होऊन नोकरीला लागला होता तो आई वर ओरडून बोलला कि आता मी कमावतोय मी करेन माझ्या बहिणीचं शिक्षण.

       आरोही ला पण बोलला......... हा दादा आहे तूझ्या पाठीशी मी घालेन तुला कॉलेज ला तू काळजी करू नकोसं. आरोही चं सायन्स साईट ला ऍडमिशन दादा ने घेतलं. आरोही ची काकि आता अजूनच आरोही च्या नावाने धुस - पूस करू लागली. मोठी शिकून ऑफिसर होणार आहे असे तीला टोमणे मारू लागली.

       पण दादा ने तीला सांगितले होते कि काकी कडे लक्ष देऊ नकोसं तू अभ्यास कर चांगला. आरोही बारावी होते, बारावी ला तीला सत्तर टक्के मिळतात. तेव्हा आरोही दादा ला बोलते दादा आता मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून... कॉलेज करून पुढचं शिक्षण घेते. दादा बोलत असतो आरोही तू शिक मी देईन तुला पैसे आरोही बोलते नको दादा काकी खूप बडबडते, त्यापेक्षा मी नोकरी करून शिकेन.

         आरोही एका डॉक्टर कडे कंपाऊंडर ची नोकरी बघते, संध्याकाळी चार तास तिथे नोकरी करते. कॉलेज मधून आल्यावर काकी ची सगळी कामं करून तिथे नोकरीला जातं असे. घरी आपल्या पगारातले थोडेसे पैसे पण देत असे. त्यामुळे थोडा वेळ का होईना काकी जरा तीला बोलायची कमी आली होती.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत, आरोही च्या पुढच्या शिक्षणाबद्दल...)

      

🎭 Series Post

View all