आरोही - ( जीवनाचा संघर्ष ) ( भाग - 1 )

Aarohi

                    ( ही एक सत्य कथा आहे.)

        आरोही - चार वर्षाची गोड मुलगी, तीला बिचारीला कळतं ही नसे, कि आई - बाबा का सारखे भांडत असतात. आई - बाबांचं भांडण झाले कि आई रडत बसते. माझ्याकडे नीट बघत ही नाही, बाबा पण नुसते आठ आठ  दिवस आई वर रागवून तिच्याशी बोलत नाहीत, रागात बाबा आई  वर कधी कधी हात ही उचलतात. आरोही च्या बाल मनाला हे काय चालू आहे ते काहीच समजत नव्हत.

       आणि आरोही ची आई एक दिवशी  घरातून निघून गेली ती परत आलीच नाही, बाबा ती गेल्यावर खूप चिडचिड करत होते, तिच्या नावाने वाईट वाईट शब्द बोलत होते. आरोही खूप रडत होती. आरोही ला बाजूच्या दीदी कडे सोडून बाबा कुठेतरी निघून गेले ते डायरेक्ट रात्री अकरा वाजता दारू पियुन चं आले.

       आरोही - बाबा घरी आल्यावर धावतच त्यांना येऊन बिलगली. पण बाबांना स्वतः चा तोल ही सावरता येत नव्हता. ते सोफ्यावर चं कोसळले. आरोही रडून बाबा आई कुठे आहे अजून का आली नाही असे प्रश्न विचारू लागली. बाबा जोरात ओरडून बोलले तीच नाव ही घेऊ नकोस ह्या घरात. ती गेली आपल्याला सोडून आता परत येणार नाही.

     आरोही ला समजेना, काय झालंय आई ला, आरोही जोरजोरात रडू लागली तेव्हा शेजारच्या एक काकू येऊन, चल तुला छान छान  खाऊ देते असं सांगून तीला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आरोही बोलत होती कि मला आई पाहिजे मला नाही याययचं तुमच्याकडे, पण काकू थोडा वेळ तरी चल असं सांगून तीला घेऊन गेल्या. रडून रडुन आरोही शेजारच्या काकूंकडे चं झोपली.

       सकाळी आरोही चे बाबा उठल्यावर तीला शेजारच्यांकडून घेऊन आले. त्यांना काय करावे ते समजत नव्हते. आरोही ला कसं आणि काय सांगाव असं त्यांच्या मनात चालू होत. आरोही ची आई तिच्या ऑफिस मधल्या एका माणसाबरोबर पळून गेली होती. ह्या दोघांना एकटं सोडून. बाबांना संशय आला होता तीन महिन्यापूर्वी आणि त्याच कारणावरून सतत त्या दोघांची भांडण चालू होती.

       बाबांनी आई च्या मोबाईल मधला रात्री उशिरा आलेला तो....मिस यु..चा .मेसेज बघितला होता. आणि त्यामुळे त्यांना हे सर्व कळले होते आई ला विचारल्यावर ती बोलली तो माझा मित्र आहे ऑफिस मधला त्याने असचं लिहीलं असेल मेसेज मध्ये त्यावर बाबांनी खूप कांगावा केला होता पण आई शेवटपर्यंत हेच म्हणतं राहिली कि तो माझा चांगला मित्र आहे बाकी काही नाही आहे आमच्या  दोघांत.

      त्यामुळे आई - बाबांन मध्ये रोज चं भांडण होऊ लागली, आई बोलत राहिली तुम्ही माझ्यावर संशय घेताय. आणि त्या मुद्द्यावरून  भांडत राहिली तीन महिने, आणि आज त्याचं माणसाबरोबर पळून गेली होती, सुखाचा संसार सोडून. तीला आरोही ची काळजी पण वाटली नाही. सात वर्षाचा संसार मोडून ती निघून गेली होती.

      बाबा आता टेन्शन ने रोज चं दारू पिऊन घरी येऊ लागले. आरोही ला घरी बघण्यासाठी कोणीही नसल्याने - शेजारी पाजारी तीला घरी घेऊन जाऊन काय काय खायला देऊ लागले. शेजारी राहणारी एक दीदी आरोही चे पहिल्यापासून चं खूप लाड करायची ती कॉलेज मधून दुपारी आली कि आरोही ला आपल्या घरी घेऊन जाऊ लागली.

         आरोही च्या आई च्या माहेरी तीला सोडायची सोय नव्हती कारण आरोही च्या आई - वडिलांनी इंटरकास्ट म्यॅरिज केल्यापासून त्यांनी ह्या लोकांबरोबर काहीच संबंध ठेवले  नव्हते. आणि बाबांचे आई - वडिल गावी राहात असत. आरोही चे एक काका - काकीं होते पण ते आरोही ला आम्ही सांभाळतो असं काहीच बोलत नव्हते.

    त्यामुळे बाबा टेन्शन ने दारू पियू लागले. आरोही बिल्डिंग मध्ये कोणाकोणाकडे जेवू लागली. आणि चार महिन्यानी दारूच्या नशेत बाईक चालवताना तिच्या वडिलांचा अकॅसिडेन्ट झाला. सहा दिवसांनी बाबा वारले. आजी - आजोबा गावावरून आले आणि काका - काकीं ला बोलले कि, आमचं  पण आता वय झाले आहे त्यातून गावाला शाळा पण चांगल्या नाहीत मुंबई सारख्या तर आरोही ची जबाबदारी आता तुम्हीच घ्या. 

       काका हो बोलला, पण काकीं च्या अज्जीबात मनात नव्हते. पण सासू - सासर्यांना तीला काही बोलता आले नाही आणि ती हो चालेल बोलली. काकीं च म्हणणं होत हिची आई गेली दुसऱ्या बरोबर पळून आणि हे लोढण माझ्या गळ्यात टाकून गेली. आरोही च्या काकांची नोकरी पण तशी बेताची चं होती. काकीं ला दोन मुलगे होते. त्यामुळे काकीं च्या मनात आरोहीला तिच्याकडे नेण्याचं नव्हत.

           आरोही ला काकीं ने नाइलाजाने तिच्या घरी नेले....

     ह्या सर्वात त्या बिचाऱ्या लहान जीवाचा - आरोही चा काय दोष होता, ह्या सगळयाची शिक्षा म्हणून तीला भविष्यात काय काय भोगावं लागणार आहे ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

( कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करा.)

🎭 Series Post

View all