आत्मविश्वास

एका आत्मविश्वास हरवलेल्या मुलाची छोटीशी गोष्ट जी कदाचित तुमच्या बरोबरही घडलेली असू शकते

सुधाकर देसाई,वय वर्ष पंचवीस चांगला उंचापुरा,देखणा आणि हुषार.बी कॉम होऊन काही वर्षे झालेली.सुधाकरला छान नोकरी मिळाली होती.आता सगळीकडून एकच विचारणा होत होती .लाडू कधी मिळणार?सुधाकर च आयुष्य खरच सुखात चाललं होतं आणि.....अचानक मार्च 2020 चा महिना संकट घेऊन आला.कोरोना च.सुरुवातीला वर्क फॉर्म होम असल्याने सुधाकर मजेत होता.आईने त्याला छान छान पदार्थ करून दिले.मस्त मजेत चाललं होतं सगळं.

हळूहळू पगार कपात सुरु झाली.सुधाकर ने नुकताच एक प्लॉट बुक केला होता.आता तो थोडा चिंतीत झाला.आई त्याला म्हणाली सुद्धा,"अरे होईल सगळं नीट नको चिंता करुस." आजवर सरळ रेषेत चाललेलं आयुष्य अचानक संकट घेऊन आलं आणि सुधाकर ला ठेच लागली.त्यानंतर च्या महिन्यात फर्म ने काही लोक कमी केली.

आता पुढचा नंबर आपला तर नसेल ना?या विचाराने सुधाकर च मन पोखरल जाऊ लागलं.आता आपलं काय होईल?या चिंतेत तो रात्र रात्र जागा राहू लागला.कामात चुका होऊ लागल्या.प्लॉट चे हप्ते थकु लागले.या सगळ्यात खूप नकारात्मक विचार मनात येत होते.चार महिने घरात राहून आत्मविश्वासच हरवला होता जणू.

आज सकाळी आई त्याला म्हणाली,"मी आणि बाबा शेजारच्या गावी एका नातेवाईकांना भेटायला जातोय."तो हो म्हणाला.ऐकट घर अंगावर येऊ लागलं.आपण आता संपलो असे विचार मनात येऊन रडायला येत होत.अशी घुसमट की संपवून टाकावं सगळं.

एवढ्यात दारावरची बेल वाजली.दरवाजा उघडला,सुहास तू? शेजारच्या सोसायटीत राहणारा सुहास होता.हो!काय रे ?काय काम काढलं?अरे मला एक मदत हवीय.बोल ना! अरे मी भाजी विकायचा व्यवसाय करतोय.काय????सुधाकर किंचाळत म्हणाला,सुहास अरे बरा आहेस ना!सुहास हसला,"अरे मी खूप गरिबी पाहिलीय. आता या लॉक डाउन मूळ गावातील लोक शहरात येऊन माल विकू शकत नाहीत.तर ही एक संधी आहे कामाची.

माझी काय मदत हवीय रे?सुधाकर म्हणाला.अरे माझा पार्टनर गावी गेला कायमचा.आता मला चारचाकी चालवणार आणि हिशोब ठेवू शकणारा पार्टनर हवाय. कोणी ओळखीत असेल तर सांग.सुधाकर म्हणाला,"पण तू का करतोय हे? ऐक तर एक म्हणजे माझी कमाई होते आणि त्या लोकांना मदत.शिवाय काम करत असल्याने माझा कॉन्फिडन्स हि कायम राहिला

कॉन्फिडन्स शब्द ऐकताच सुधाकर चमकला,"सुहास! मी होऊ शकतो का तुझा पार्टनर.ती एक नवी सुरुवात ठरली.आज तीन महिन्यांनी सुधाकर ने आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करायचा आणि वाढवायचा असे ठरविले आहे.सुहास आणि सुधाकर च्या दुकानाचे उदघाटन करताना मागचा प्रवास त्याला झरकन आठवला.

तो एक आत्मविश्वासाचा क्षण एका नवीन सुधाकरला जन्म देऊन गेला.संधी आसपास असतेच गरज असते ती ओळखायची आणि आत्मविश्वासाने स्वीकारायची...

*प्रशांत कुंजीर*