आरसा
एका चौकटीत आहे जी काच,
तिला म्हणतात आरसा,
जो तुम्हांला देतो तुमच्या आस्तित्व आहे याची जाणीव,
जो दाखवतो तुम्हांला तुमचे प्रतिबिंब,
प्रतिबिंबात बिंबित होतात तुमच्या मनातील प्रतिक्रीया,
ज्यात असतो कधी आनंद तर कधी दु:ख,
जो सांगतो तुम्हांला आनंदी छान दिसता,
जो सांगतो करा दु:खावर मात, आणि करा आनंदाचे स्वागत,
जो असतो तुमच्या प्रत्येक गोष्टिंचा साक्षीदार,
म्हणूनच आहे हा सर्वांचा जोडीदार.
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा